Squid Game Netflix Webseries Review Marathi || स्क्विड गेम मराठी रिव्ह्यू

Squid Game Netflix Webseries Review Marathi || स्क्विड गेम मराठी रिव्ह्यू

कोरियामध्ये बनवला गेलेला हा ड्रामा सध्या नेटफ्लिक्स वर धुमाकूळ घालतो आहे. याच स्क्विड गेम विषयी आपण आजच्या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. 

Download Squid Game Webseries free , Squid Game web series first review, Squid Game marathi webseries download

Squid Game Netflix Webseries Review Marathi || स्क्विड गेम मराठी रिव्ह्यू

स्क्विड गेम ही दक्षिण कोरियन एक थ्रीलर वेबसिरीज आहे. स्क्विड गेम ही 17 सप्टेंबर 2021 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म वर रिलीज झाली. स्क्विड गेम ही संपूर्ण वेबसिरीज 9 भागांची असून प्रत्येक भाग हा अर्धा तास ते एक तास कालावधीचा आहे. 

हिंदी भाषेत या मालिकेचे भाषांतर होऊन ती नेटफ्लिक्स वर उपलब्ध आहे. स्क्विड गेम मधील पात्र हे त्यांच्या आयुष्यातील एका वाईट काळातून जात आहेत. या सर्व लोकांना त्यांचे जीवन बदलून टाकू शकतील अशी एक संधी मिळते. त्या सर्वांना असा एक खेळ खेळायला बोलावले जाते ज्याला जिंकल्यानंतर त्यांना भरपूर पैसे मिळू शकतील. खेळ खेळायचा म्हणल्यानंतर सर्व काही सोप्पे आहे असेच वाटेल मात्र जेवहा तुम्ही या खेळात हारता तेव्हाच तुमचा मार्ग हा थेट स्वर्गाचा असतो!

असा खेळ कोण खेळणार? हे लोक देखील नकार देऊ शकत होते मात्र गरिबी, कर्ज यासारखे संकट त्यांना हा खेळ खेळण्यासाठी पुढे ढकलतात.

स्क्विड गेम का बघावा? Why to Watch Squid Games?

स्क्विड गेम या मालिकेचे चित्रीकरण अफलातून केलेलं आहे. त्यामुळे आपण या आधी जरी एखादि अशी मालिका पाहिलेली असली तरी देखील आपल्याला स्क्विड गेम कायम काहीतरी नवीन दाखवून जाईल. स्क्विड गेम वेबसिरीज मधील प्रत्येक कलाकाराने त्याचे पात्र हे उत्तम प्रकारे साकारलेले आहे. या वेबसिरीज मध्ये कोणी एक असा मुख्य हिरो नाहीये. यात प्रत्येक कलाकार हा हिरो आहे आणि त्याचे पात्र तो बखुबी निभावतो आहे. कलाकारांनी यात खरी रंगत आणलेली आहे असे बोलायला काही हरकत नाही. यात तुम्ही पहिला भाग बघितल्यानंतर आपोआप तुम्हाला पुढील भाग बघण्यासाठी इर्षा निर्माण होईल यात काही शंका नाही. यातील काही पात्र हे चांगले वाटतात तर काही पात्रांचा आपल्याला तिरस्कार देखील होतो. त्यामुळे ज्याप्रमाणे मनी हाईस्ट ने तुम्हाला मनोरंजन दिले तसेच काहीसे यात देखील तुम्हाला अनुभवायला मिळेल. 

स्क्विड गेम्स मध्ये नावातच गेम आहे. आणि हेच गेम तुम्हाला या मालिकेत प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतील. प्रत्येक खेळाचे काहीतरी वेगळे नियम तर आहेच मात्र यात प्रत्येक ठिकाणी सस्पेन्स हा भरभरून आहे. तुम्ही एखाद्या गोष्टीचा जेवहा अंदाज लावता आणि त्यानंतर तसे काहीच न घडता भलतेच या वेबसिरीज मध्ये घडते. स्क्विड गेम मध्ये जिथे जिथे जे हवे आहे तेच संगीत आणि डायलॉग दिलेले आहेत. त्यामुळे अनावश्यक असे काही या वेबसिरीज मध्ये वाटत नाही.

स्क्विड गेम वेबसिरीज- कमतरता | Squid Game Webseries - Cons

स्क्विड गेम ही मालिका ओढलेली आहे असे वाटते. बऱ्याच वेळा आपल्याला अनावश्यक ठिकाणी जास्त भर दिलेला बघायला मिळेल आणि त्यामुळे प्रेक्षकांना ही मालिका बघत असताना कंटाळवाणे वाटू शकते. वेबसिरीज 9 एपिसोड ओढण्यापेक्षा ते 6 ते 7 एपिसोड मध्ये दाखवले जाऊ शकते असे मला वाटते. यात एक पोलीस अधिकारी त्याच्या भावाचा शोध घेत असतो. त्यावेळी अनेकदा आपल्याला एखादा सिन वाढवलेला आढळतो. 

शेवटी सांगायचे झाले तर यात तुम्हाला स्लो मुव्ही म्हणतो ते बघायला मिळेल. त्यामुळे ज्यांना स्लो मुव्ही आवडत नाही त्यांच्यासाठी ही मालिका कंटाळवाणी ठरू शकते.


स्क्विड गेम पात्र आणि त्यांचा मृत्यू

डेक्सु हा एका सिन मध्ये आपल्याला पुलावरून धावताना दिसतो. पूल ओलांडल्यावर तो त्या गेम मधून एलिमिनेट देखील होतो. 

अली हे पात्र त्याच्या बॉस कडून पैसे चोरून पळून गेलेले पात्र आहे. अली गेम मधून बाहेर पडतो कारण तो त्याच्याकडे असलेले मार्बल्स सांभाळून ठेवू शकत नाही. 

सेबेओक ही महिला खेळाडू आहे. तिने एकदा तिच्या सहकाऱ्याच्या गळ्या वर चाकु लावला होता त्याच प्रमाणे तिची देखील एक जण हत्या करतो.

हा व्यक्ती सेंगु होता आणि तोच पुढे स्वतःला मारण्याचा देखील प्रयत्न करतो. तो देखील खेळातून स्वतःला मारून घेऊन एलिमिनेट होतो.

त्यामुळे जर तुम्ही सुरुवात नीट बघितली तर तुम्हाला समजून जाईल की पुढे जाऊन याचा मृत्यू कसा येणार आहे.

तुम्ही जर प्रत्येक सिन मध्ये पाहिले तर तुम्हाला याचा मास्टर माईंड कोण याविषयी माहिती मिळेल. हे जर आत्ताच सांगितले तर तुम्हाला वेबसिरीज बघण्यात जास्त मजा शिल्लक राहणार नाही.

खेळाचा मास्टर माईंड हा फाईल मध्ये नाव नसलेला प्लेअर होता असे तुम्हाला आत्ताच सांगतो मग तुम्ही त्याचा शोध घेत रहा!

तुम्ही जर निरखून पाहिले तर ते सर्व लोक ज्या हॉल मध्ये झोपायचे तिथे त्या सर्व खेळांविषयी चित्र काढलेले होते. 


स्क्विड गेम विषयी तथ्य - Squid Game Facts

1 स्क्विड गेम शो ची स्क्रिप्ट लिहायला 2008 मध्ये सुरुवात झाली. 2009 मध्ये ती पूर्ण देखील झाली.

2 लेखकांनी शो न बनविण्याचा निर्णय घेतला होता कारण त्यावेळी प्रेक्षक हे अशा हिंसक कार्यक्रमांसाठी तयार नव्हते.

3 स्क्विड गेम या वेबसिरीजचे पहिले नाव हे 6 Rounds असे असणार होते. यात 6 गेम आहेत म्हणून हे नाव होते.

4 ब्रिज गेम जेव्हा सुरू असतो तेव्हा तिथे ग्लास वर्कर असतो. यात त्याचा कंपनीतील कालावधी हा 1897 ते 2020 हा फ्रंट मॅन डेटाबेस मध्ये आहे. म्हणजे त्याने 100 हुन अधिक वर्ष कंपनीत काम केले असा होतो. ही एक मोठी त्रुटी आहे. 

5 एटीएम मशीन मध्ये गिहान हा त्याची जन्मतारीख ही पासवर्ड म्हणून टाकतो. पासवर्ड मध्ये त्याची जन्मतारीख 26 एप्रिल दाखवलेली आहे मात्र डेटाबेस मध्ये फाईल वर जन्मतारीख 31 ऑक्टोबर लिहिलेली आहे. 

6 VFX चा या शो मध्ये खूप कमी ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे.


तुम्हाला जर थ्रिलर असलेले चित्रपट किंवा वेबसिरीज बघायला आवडत असतील तर तुम्हाला ही मालिका नक्कीच आवडेल.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने