श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे संपूर्ण माहिती || Thorale Bajirao Peshwa Biography Marathi
पूर्ण नाव- थोरले बाजीराव पेशवे
जन्म- 18 ऑगस्ट 1700
वडिलांचे नाव- बाळाजी विश्वनाथ
आईचे नाव- राधाबाई
Bajirao - I Peshwa Marathi Biography
मध्ययुगीन महाराष्ट्राच्या कालखंडात साताऱ्याच्या छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या कालखंडापासून महाराष्ट्रात एक नवीन पर्वाला सुरुवात झाली.
शाहू महाराजांनी राज्याच्या पेशवा पदावर श्रीवर्धनकर भट म्हणजेच पेशवे यांच्या घराण्याला रुजू केल्यानंतर या घराण्याचे योगदान हे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक जीवनाला महत्वाचे ठरले. या कुटुंबातील पहिले पेशवे हे बाळाजी विश्वनाथ भट हे होते. त्यांच्यानंतर पेशवेपदाची वस्त्रे त्यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे पहिले यांना मिळाली. बाजीराव पहिले यांनी महाराष्ट्राच्या आणि मराठी साम्राज्याच्या दृष्टीने खूप महत्वाचे निर्णय तर घेतलेच परंतु संपूर्ण भारत वर्षाला वाचविण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न देखील केले.
पहिले पेशवे म्हणजे बाळाजी विश्वनाथ यांच्या मृत्यूनंतर 1720 मध्ये शाहू महाराजांनी बाजीराव पेशवे यांना पेशवे पदाची वस्त्रे दिली. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षापासूनच बाजीराव यांना राजकारण, युद्ध आणि लष्कर याविषयी त्यांच्या वडिलांकडून मार्गदर्शन मिळत गेले. वडिलांच्या मृत्यूनंतर बाजीराव यांच्यातील धाडस आणि हिंमत बघत शाहू महाराजांनी त्यांना पेशवे पदाची सूत्रे सोपविली.
पेशवे पदाचा कारभार हाती मिळताच बाजीरावांनी आपली कामगिरी आणि कर्तबगारी दाखवायला सुरुवात केली. त्यांनी हैदराबादचा निजाम, जंजिऱ्याचा सिद्धी, गोव्याचे पोर्तुगीज, मुघल दरबारातील सरदार आणि सेनापती, मराठ्यांचे लपून असलेले हितशत्रू, सातारा दरबारातील स्वराज्य द्रोही आणि गद्दार यांच्या विरोधात जाऊन त्यांना चांगल्या प्रकारे धडा शिकविला.
त्यांनी जुन्या विचारांच्या सरदारांना बुद्धीचा वापर करत काढून टाकले व त्यांच्या जागेवर शिंदे, होळकर, पवार, जाधव, फडके, पटवर्धन, विंचूरकर यांच्यासारखे शूर सेनानी लष्करात आणले. त्यापैकी काहींना त्यांनी दरबारी कामकाजात देखील समाविष्ठ करून घेतले. त्यांनी प्रत्येकाला प्रशासकीय प्रदेश वाटून दिले. यालाच संघराज्य संरचना म्हणून आज आपण ओळखतो आणि यामुळे त्यावेळी देखील मराठा साम्राज्य अधिक बळकट होत गेले.
मराठा साम्राज्यात बऱ्याच कालखंडानंतर एक धाडसी आणि आक्रमक वृत्ती निर्माण करण्याचे पूर्ण श्रेय हे थोरले बाजीराव पेशवे यांना जाते. भोपाळ आणि पालखेड येथे निजामाच्या विरोधात त्यांनी लढाई केली व ती जिंकली देखील. मोहम्मद शाह, पोर्तीगीजांवर केलेली मोहीम आणि जंजिऱ्याच्या सिद्द्यांचा केलेला पाडाव हे काही बलस्थाने बाजीरावांकडे होती.
थोरल्या बाजीरावांचा उल्लेख हा घोडदळाच्या माध्यमातून लढल्या जाणाऱ्या युद्धातील जगातील सर्वात उत्तम सेनापती मध्ये केला जातो.
बाजीराव पेशवे यांना वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी तीव्र तापाने नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या रावेरखेडी इथे 28 एप्रिल 1740 रोजी काळाने घाला घातला. एका कुशल युद्धकौशल्य असलेल्या वीराचा अंत झाला….