श्रीमंत होण्याचे 5 नियम - वॉरन बफेट || Top 5 Rules to get Rich by Warren Buffet

श्रीमंत होण्याचे 5 नियम - वॉरन बफेट || Top 5 Rules to get Rich by Warren Buffet

वॉरन बफेट यांच्या विषयी आपण सर्व जाणून असालच? वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी पहिला शेअर विकत घेणारे आणि सध्या जगातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या तीन क्रमांकामध्ये नाव असलेले हे अवलिया! लहानपणी मित्रांमध्ये अगदी आत्मविश्वासाने ते बोलून गेले होते की जर मी वयाच्या 30 व्या वर्षापर्यंत अब्जाधीश झालो नाही तर मी आत्महत्या करेल. काय तो आत्मविश्वास आणि त्यांचे स्वप्न? त्याला पूर्ण करण्यासाठी घेतलेली मेहनत देखील आपण बघायला हवी. 

श्रीमंत होण्याचे 5 नियम - वॉरन बफेट || Top 5 Rules to get Rich by Warren Buffet

जेव्हा ते 16 वर्षांचे होते तेव्हा त्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांहुन अधिक पैसे ते कमवत होते. आज इतके जास्त श्रीमंत असताना देखील ते त्यांच्या जुन्या 3 BHK फ्लॅट मध्येच राहतात. तर मग याच अवलिया कडून आज आपण श्रीमंत आणि यशस्वी होण्याचे 5 नियम जाणून घेणार आहोत.

1 फक्त एका उत्पन्नावर अवलंबून राहू नका, उत्पन्नाचे अनेक मार्ग निर्माण करा.

ही गोष्ट अनेकांना संभ्रमात टाकणारी असते कारण इथे धड एक मार्ग चांगले उत्पन्न देत नाही मग असे अनेक मार्ग कसे निर्माण करायचे? आपल्याकडील संस्कृती हीच आहे की आपल्याला लहानपणी एकच गोष्ट सांगितलेली असते की नीट शाळा शिक, शिकून मोठा हो आणि एखादी चांगली नोकरी सुरू कर! बस....

कधी आपल्याला साईड इनकम असावी किंवा व्यवसाय करावा याविषयी सांगितलेच जात नाही. वॉरन बफेट यांची मुख्य Berkshier कंपनीच्या अंतर्गत 60 कंपन्या आहेत.  त्यामुळे यात एका कंपनीचा तोटा जरी झाला तरी बाकी कंपन्या तो भरून काढतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही एका इनकम स्रोतावर अवलंबून राहणार नाही तेव्हाच तुम्हाला इतर स्रोत शोधायला मदत मिळेल परंतु जर तुम्ही म्हणाला की हे शक्यच नाहीये तर मग मात्र अपयश हे नक्कीच येईल. तुम्ही मनाने हरलात तर मग मात्र तुम्हाला कोणी जिंकवू शकत नाही.

आत्ताच बसून विचार करा की जास्त पैसे कमवण्यासाठी अजून काय काय करता येईल? तुम्हाला अनेक पर्याय सुचतील. हाच विचार तुम्ही तुमच्या मुलांवर देखील बिंबवायला सुरुवात करा की त्यांना मोठे होऊन फक्त नोकरी नाही तर उत्पन्नाचे अनेक पर्याय निर्माण करायचे आहेत. 

2 तुम्ही जर अशा गोष्टींवर खर्च करत असाल ज्याची तुम्हाला गरज नाही, तर लवकरच तुम्हाला गरज असलेल्या गोष्टी विकाव्या लागतील.

खर्च कसा करावा?

हे वॉरन बफेट यांचे वाक्य खरंच आयुष्य बदलणारे आहे. जेव्हा आपण यावर विचार करू तेव्हा आपल्याला कळते की आपण अशा किती अनावश्यक गोष्टींवर खर्च केलेला आहे? हा नियम ज्यांना समजतो ते आयुष्यात नक्की यशस्वी होतात. आपल्याकडे असे अनेक लोक आहेत ज्यांचा पगार कमी आहे मात्र तरी देखील ते iPhone वापरतात. त्यांच्या घरात तुम्हाला अनेक चैनीच्या वस्तू बघायला मिळतील. आपण आश्चर्याने त्यांना विचारायला गेलो तर कळते की EMI! कर्ज काढून चैन पूर्ण केली जात आहे. 

आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृती मध्ये असे देखील लोक आहेत जे कर्ज काढून लग्न मोठे करतात. त्या मुलीचा बाप आयुष्यभर त्याचे हफ्ते भरत असतो. दोन्ही स्थितीत जर समजा त्यांच्या घरावर एखादी आपत्ती आली तर मग काय करावे लागेल? त्यावेळी त्यांना गरजेच्या वस्तू विकाव्या लागतील. 

3 पैशाची बचत कशी करावी?

पैशे बचतीचे वॉरन बफेट 2 प्रकार सांगतात. पहिली म्हणजे गरिब लोकांची पद्धत आणि दुसरी म्हणजे श्रीमंत लोकांची पद्धत!

गरीब लोकांची पद्धत ही असते की त्यांच्याकडे आलेले पैसे पहिले तर ते सर्व खर्च करतात आणि जे काही पैसे वाचतात त्यांची मग ते बचत करतात. गरीब मानसिकता असलेले लोक पैसे आले की त्याची उधळपट्टी करतात. उरलेली खूप छोटी रक्कम बचत केली जाते.श्रीमंत लोक पैसे आल्यानंतर पहिले बचत किती आहे हे ठरवतात आणि तितकी बचत करून जो पैसा उरेल त्यालाच खर्च करतात. गरीब मानसिकतेच्या पूर्ण उलट श्रीमंत लोक हे आधी आलेल्या पगारातून ठराविक रक्कम गुंतवणूक करतात किंवा बचत करतात. मग जे काही उरते त्यावर ते खुश राहून हवे त्याच गोष्टी खरेदी करतात. 

4 रिस्क कशी घायची?

रिस्क घेणे म्हणजे सगळं काही पणाला लावणे असा आपला समज असतो. वॉरन बफेट सांगतात की जर तुम्हाला नदी किती खोल आहे हे बघायचे असेल तर नदीत दोन्ही पाय कधीच टाकू नका, एक पाय नदीत टाकून बघा आणि अंदाज घ्या!

रिस्क घ्यायची म्हणजे काय करायचे? तर तुम्ही जी गुंतवणूक करताय त्यातून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे आणि कमीत कमी नुकसान झाले पाहिजे. त्याने अस व्हायला नको की ती रिस्क तुम्हाला संपवून टाकेल. 

उदाहरण म्हणजे जर समजा तुम्हाला एक नविन व्यवसाय सुरू करायचा आहे तर मग तुम्ही तो व्यवसाय सुरू करून त्यात नुकसान झाले तरी देखील आज जे आयुष्य जगता आहात ते जगू शकता का? हा विचार नेहमी करत जा.  आपले कुटुंब आपण सांभाळू शकतो का? व्यवसाय बंद पडल्यानंतर मी खचून तर जाणार नाही ना? हे सर्व एकदा निवांत बसून विचार करा. या सर्वांचे उत्तर हो असेल तर मग ही रिस्क घ्यायला काही हरकत नाही.

समजा तुमच्याकडे 5 लाखांची सेव्हिंग आहे तर मग तुम्ही त्यातील 1 ते 2 लाख रुपये रिस्क घेऊ शकता. व्यवसाय तोट्यात जरी गेला तरी देखील बाकी 3 लाख रुपये तुम्हाला वाचवू शकतात.

5 वस्तू कधी विकत घ्याव्यात?

वस्तू विकत घेत असताना डिस्काउंट मागून घ्या किंवा वस्तू घ्यायची असेल तर नेहमी मोठ्या सेलची वाट बघा. सेल जेव्हा मोठा असतो तेव्हाच तुम्हाला वस्तू खूप कमी किंमतीत मिळू शकतात आणि याचा फायदा तुम्हाला होतो. 

श्रीमंत लोक कायम असेच करतात आणि ते कुठेही गेले तरी देखील डिस्काउंट मागून घेतात. ऑनलाइन फ्लॅटफॉर्म वर अशा सेल्स दरम्यान तुम्ही वस्तू विकत घेऊ शकतात.


वॉरन बफेट यांचे हे 5 नियम जर तुम्ही पाळले तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणी थांबवू शकणार नाही. लवकरच तुम्ही देखील चांगल्या प्रकारे बचत करू शकता आणि तुम्हाला तुम्ही केलेल्या खर्चावर कधीच पश्चाताप होणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने