आयुष्यात योग्य निर्णय कसा घ्यावा? श्रीकृष्णाने सांगितलेला मार्ग || How to Take Right Decision in Life By Lord Krishna

आयुष्यात योग्य निर्णय कसा घ्यावा? श्रीकृष्णाने सांगितलेला मार्ग || How to Take Right Decision in Life By Lord Krishna

एक निर्णय तुमचे संपूर्ण आयुष्य ठरवत असतो. एक चांगला म्हणजेच योग्य निर्णय तुम्हाला एक यशस्वी मनुष्य बनवू शकतो आणि तोच निर्णय जर चुकीचा असेल तर तुमचे आयुष्य देखील बरबाद होऊ शकते. आज आपण जे आयुष्य जगतो आहे ते सर्व काही भूतकाळातील निर्णयांचे फळ आहे. जसे आजचे आयुष्य भूतकाळातल्या निर्णयांवर अवलंबून आहे त्याच प्रमाणे उद्याचे आयुष्य हे आजच्या निर्णयांवर अवलंबून आहे. त्यामुळे तुम्ही आज जे निर्णय घ्याल त्यावर तुमचे भविष्य अवलंबून आहे.

आयुष्यात योग्य निर्णय कसा घ्यावा? श्रीकृष्णाने सांगितलेला मार्ग || How to Take Right Decision in Life By Lord Krishna

आयुष्यात तुम्ही निर्णय कसे घेता या गोष्टीला फार महत्व आहे. भगवतगीता आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवते आणि याच भगवतगीते मध्ये श्रीकृष्णाने निर्णय कसा घ्यावा यासाठी नियम सांगितलेले आहेत. हे महत्वाचे नियम आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जेणेकरून वाचकांना आयुष्यात योग्य निर्णय घ्यायला नक्कीच मदत होऊ शकेल.

1 कोणताही निर्णय भावनांच्या आधारावर घेऊ नका.

महाभारतात अर्जुनाने कौरवांच्या सोबत युद्धास नकार दिला होता. याचे कारण एकच होते की तो त्यांच्याशी भावनिक दृष्ट्या जोडला गेलेला होता. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने त्याला योग्य ते मार्गदर्शन केले. 

आजच्या युगात उदाहरण द्यायचे झाले तर आपल्याला सोशल मीडियावर जास्तीत जास्त वेळ घालवायला आवडते परंतु त्याऐवजी जर आपल्याला करियर साठी काहीतरी स्किल्स निवडायला सांगितल्या तर ते मात्र आपल्याला कंटाळवाणे वाटते. आपल्याकडे स्किल्स असतील तर आपले भविष्य हे उज्वल असेल. मात्र आपण भावनांच्या आहारी जाऊन जास्तीत जास्त वेळ हा मोबाईल वर सोशल मीडियासाठी देतो. त्यामुळे कोणताही निर्णय घेत असताना भावनांच्या आहारी कधीच जाऊ नका. 

एखादी गोष्ट करत असताना भलेही आपल्याला मजा येत असेल परंतु ती गोष्ट आपल्या हिताची असेल असे नाही. मुलांना मोबाईल वर गेम खेळायला मजा येते परंतु हे त्यांच्या हिताचे नाहीये. हे सर्व काही भावनिक आहे आणि भावना म्हणजेच तुमच्या फिलिंगस या तात्पुरत्या असतात. 

2 अति आनंदी, अति उत्साही किंवा अति दुःखात असताना निर्णय घेऊ नका.

भगवान श्रीकृष्ण गीतेच्या सहाव्या अध्यायात सांगतात की आपल्याला आयुष्यात समतोल राखता आला पाहिजे. कोणताही निर्णय घेत असताना तो अति आनंदात किंवा अति दुःखात घेऊ नका. आपण जेव्हा अति आनंद किंवा दुःख असताना निर्णय घेतो तेव्हा ते निर्णय जवळपास चुकीचे ठरतात. 

तुम्ही स्वतः अनुभव घेतला असेल की जेव्हा तुम्ही अति आनंदात किंवा अति उत्साहात असता तेव्हा कोणी काहीही विचारले की तुम्ही त्याला लगेच होकार देतात. याच्याच उलट म्हणजे जेवहा तुम्हाला दुःख झालेले असते तेव्हा तुम्ही एखादी चांगली संधी देखील नाही म्हणून डावलून देतात. 

वैज्ञानिक दृष्ट्या विचार केला तर आपला मेंदू हा अति आनंदात किंवा अति दुःखात वेगळ्या प्रकारे काम करत असतो. त्यामुळे अशा वेळी कोणताही निर्णय घ्यायचे टाळावे. 

3 निर्णय घेत असताना परिणामांचा जास्त विचार करू नका.

भगवतगीता जर तुम्ही अभ्यासली तर त्यामध्ये निष्काम कर्म करत राहणे या गोष्टीवर जास्तीत जास्त भर दिलेला आहे. याचाच अर्थ असा होतो की कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपण आपले कर्म हे करत रहावे. 

आपल्याला ज्यावेळी काही चांगले परिणाम दिसत नाही तेव्हा आपण कर्म करणे बंद करून टाकतो. सर्वात योग्य उदाहरण द्यायचे झाले तर व्यायाम! आपण व्यायाम सुरू करतो आणि काही दिवसात परिणामांची अपेक्षा करतो. परिणाम दिसले नाही की आपण आपले कर्म म्हणजे व्यायाम बंद करतो.

कोणताही निर्णय घेत असताना परिणाम आपल्या हातात नाहीये असेच ठरवून निर्णय घेत जा. पूर्णपणे फळ जे भेटेल त्यावर अवलंबून देखील राहू नका. तुम्हाला जे फळ मिळवायचे आहे त्यासाठी तुम्हाला काय करता येईल? तुम्हाला मार्ग बदलावा लागेल का? हे देखील जाणून घ्या आणि मग त्यानुसार तुमच्या मार्गात बदल करा. परंतु कधीही परिणाम मिळाला नाही म्हणून कर्म करणे बंद करू नका.

4 जे समाजासाठी चांगले ते तुमच्यासाठी चांगले!

भगवान श्रीकृष्ण सांगतात की जे समाजासाठी चांगले नाही ते तुमच्यासाठी देखील चांगले नाही. निर्णय घेत असताना समाजाचा विचार करायला शिका. जेव्हा एखादा निर्णय तुमच्यासाठी चांगला असेल परंतु समाजासाठी घातक असेल असा निर्णय घेणे टाळा. 

जेव्हा तुम्ही स्वतःचे घर स्वच्छ ठेवण्यासाठी घरातील कचरा बाहेर इतरत्र टाकता आणि त्यातून दुर्गंधी पसरून रोगराई पसरू शकते.  आता ही गोष्ट समाजासाठी चांगली नाहीये आणि त्यामुळे परिणाम म्हणून तुमच्यासाठीही चांगली नसेल. कारण यातून होणाऱ्या रोगाराईने तुम्ही व तुमचे कुटुंबिय देखील शिकार होऊ शकतात.

5 योग्य मार्गदर्शन हे चांगला निर्णय घ्यायला मदत करते.

निर्णय घेत असताना तुम्हाला अडचण येत असेल किंवा मनात दूविधा स्थिती निर्माण होत असेल तेव्हा तुमच्या विश्वासातील लोकांशी बोलण्यास संकोच करू नका. मार्गदर्शन करणारा कोणीही असू शकतो. तुमचे कुटुंबातील सदस्य, मित्र किंवा तुमचे सहकारी देखील तुमचे मार्गदर्शक असू शकतात. 

अर्जुन हा वीर योद्धा होता. तो तेव्हढाच चाणाक्ष देखील होता. युध्दाच्या प्रसंगी मात्र तो गोंधळला होता. त्यावेळी त्याने मार्गदर्शक म्हणून श्रीकृष्णाला निवडले आणि त्यांचा सल्ला घेतला. 

जेव्हा आपण संभ्रमात असतो तेव्हा जो आपल्याला योग्य मार्गदर्शन करू शकतो अशा व्यक्तीकडे जाऊन मार्गदर्शन नक्की घ्या.


आमची इतकी खात्री नक्कीच आहे की जर तुम्ही हे सर्व नियम पाळले तर तुम्हाला आयुष्यात निर्णयांचा पश्चाताप नक्कीच होणार नाही व तुमचे सर्व निर्णय हे योग्यच असतील!

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने