कर्ज लवकर कसे फेडायचे? || How To Repay Your Loan Faster in Marathi?

कर्ज लवकर कसे फेडायचे? || How To Repay Your Loan Faster in Marathi?

कर्ज हा विषय डोक्याला सतत टेन्शन देणाराच असतो. त्यात कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि अनेकांचे व्यवसाय देखील बंद पडले. अशा काळात कर्जाचे हफ्ते भरणे अनेकांना कठीण झालेले आहे. आता मात्र थोडेफार सुरळीत झालेले आहे आणि त्यामुळे कर्जाचे हफ्ते कसे फेडायचे हा प्रश्न अनेकांच्या समोर आहे. तुम्हाला कर्जाचे हफ्ते लवकरात लवकर आणि जास्त टेन्शन न घेता कसे फेडता येतील याविषयी आज आम्ही माहिती देणार आहोत. 4 युक्त्या आम्ही सांगणार आहोत त्या वापरल्या तर तुम्ही कर्ज लवकरात लवकर फेडू शकाल.

कर्ज लवकर कसे फेडायचे? || How To Repay Your Loan Faster in Marathi?

कर्ज म्हणजे Loan! याचे प्रकार असतात जसे की होम लोण( गृह कर्ज), पर्सनल लोन, क्रेडीट कार्ड लोन, पर्सनल लोन, ग्राहक कर्ज जे वस्तू विकत घेण्यासाठी घेतले जाते, कार लोन आणि इतरही अनेक... 

1 जास्त व्याजदर असलेल्या लोनला आधी प्राधान्य द्या

समजा तुम्ही अनेक लोन घेतलेले आहेत त्यात कार लोन, होम लोन, क्रेडिट कार्ड लोन आहे. या प्रत्येक कर्जावरील व्याजदर हे वेगळे असेल. काही लोन चे व्याज हे जास्त तर काही लोन चे व्याज हे कमी असते. ज्या कर्जाचा सर्वात जास्त व्याजदर आहे त्याला फेडण्यासाठी तुम्हाला सर्वात जास्त प्राधान्य द्यायचे आहे. समजा क्रेडिट कार्ड चे व्याजदर आहेत 12 टक्के आणि होम लोनचे व्याजदर हे 10% आहे तर क्रेडिट कार्ड वरील लोन कसे लवकर संपवता येईल याला तुम्ही प्राधान्य द्यायला हवे. क्रेडिट कार्ड आणि पर्सनल लोनचे व्याजदर हे जास्त असतात आणि त्यामुळे यांना फेडण्यासाठी जास्त प्रयत्न तुम्ही केले पाहिजे. जर तुम्ही हे कर्ज लवकर फेडले तर तुमचे जास्त पैसे देखील जात नाहीत. 

2 जे सहज फेडता येईल असे कर्ज लवकर फेडून टाका.

हा मार्ग बघायला गेलं तर पहिल्या युक्तीच्या अगदी विरुद्ध आहे. हा मार्ग प्रभावी आहे. जे कर्ज तुम्हाला फेडता येते आहे ना ते फेडून मोकळे झालेलं कधीही चांगलच असत. जर समजा तुमच्यावर 2 लाखाचे पर्सनल आणि 60 हजारांचे क्रेडिट कार्ड लोन आहे तर तुम्हाला पर्सनल लोन पेक्षा क्रेडिट कार्डचे लोन फेडणे सोपे दिसतेय. क्रेडिट कार्डचे लोन लगेच फेडून मोकळे व्हा. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि बाकीचे लोन फेडण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन देखील मिळते. 

3 होम लोन दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करा किंवा तुमच्या बँकेला व्याजदर कमी करायला सांगा.

तुम्ही ज्या बँकेकडून गृह कर्ज म्हणजे होम लोन घेता त्या बँका तुम्हाला न सांगता कधीही त्यावरील व्याजदर वाढवू शकतात. त्यामुळे तुम्ही एकदा होम लोन घेतले की पुढे कायम त्याच्यावर किती व्याजदर आहे हे बघितले पाहिजे. 

होम लोन मध्ये दोन प्रकारचे इंटरेस्ट असतात. पहिला म्हणजे फिक्सड इंटरेस्ट आणि दुसरा म्हणजे फ्लोटिंग इंटरेस्ट. फ्लोटिंग इंटरेस्ट मध्ये व्याजदर कमी जास्त होत असतात. याचाच फायदा बँका घेतात. नवीन कस्टमर असेल तर त्यांना कमी व्याजदर लावले जातात आणि मग त्याचा परिणाम म्हणजे तुमचा व्याजदर वाढतो. अशा वेळी बँकेला तुम्ही विनंती करू शकता की त्यांनी तुमचा व्याजदर कमी करावा. हे करण्यासाठी बँक तुम्हाला काही फी मागेल आणि ती तुम्ही दिली तर लगेच काम होऊन जाते आणि तुमचे पुढे जाणारे अनेक रुपये वाचतात. 

बँक जर ऐकत नसेल तर तुम्ही तुमचे होम लोन दुसऱ्या बँकेत जिथे व्याजदर कमी आहे तिथे ट्रान्सफर करू शकता. या प्रकियेत कमी वेळ जातो परंतु अशाने लाखो रुपये वाचतात.

4 कमी व्याजदाराच्या लोनवर टॉप अप करून बाकीची कर्जे फेडा.

ही युक्ती देखील जास्त कर्ज असेल तर काम करते. अनेक लोकांनी ही युक्ती वापरून कर्जे फेडलेली आहे. जर तुमच्यावर जास्त व्याजदर असलेले काही लोन आहेत जसे की पर्सनल लोन, कार लोन, क्रेडिट कार्ड लोन तर कमी व्याजदर असलेल्या लोनवर टॉप अप लोन घेऊन ती रक्कम जास्त व्याजदर असलेल्या लोनला फेडण्यासाठी वापरायची आहे.

म्हणजे जर समजा तुम्ही 8% व्याजदरात होम लोन घेतलेले आहे व दुसरे काहीतरी लोन हे 18% व्याजदराने आहे. तर मग तुम्ही 8% व्याजदर असलेल्या लोन वर टॉप अप लोन घेऊज 18% व्याजदर असलेले लोन फेडू शकता. यामुळे तुम्ही जे जास्त व्याजदर देताय ते कमी होऊन तुमच्या हातात जास्त पैसे राहतील.


तुम्हाला यातील जी युक्ती आवडली किंवा पटली असेल ती तुम्ही नक्की फॉलो करा आणि त्यानुसार वागाल तर मग तुमचे कर्ज लवकरात लवकर नक्की फेडण्यास मदत होईल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने