Top 5 High Return Investment in India Marathi || सर्वाधिक नफा देणाऱ्या भारतातील 5 गुंतवणूक

Top 5 High Return Investment in India Marathi || सर्वाधिक नफा देणाऱ्या भारतातील 5 गुंतवणूक

सध्या आपल्यासमोर अनेक गुंतवणूक करण्यासाठी मार्ग उपलब्ध आहेत आणि त्यामुळे प्रत्येकाच्या समोर हा प्रश्न असतो की असे कोणते ठिकाण आहे जिथे आपण पैसे गुंतवले तर कमीत कमी कालावधी मध्ये आपल्याला जास्तीत जास्त पैसा मिळु शकेल? याचेच उत्तर म्हणून आज कमी कालावधीत जास्तीत जास्त रिटर्न देणारे 5 मार्ग बघणार आहोत.

Top 5 High Return Investment in India Marathi || सर्वाधिक नफा देणाऱ्या भारतातील 5 गुंतवणूक

आज आपण जे 5 जास्तीत जास्त रिटर्न देणारे मार्ग बघणार आहोत त्यामध्ये रिस्क देखील तितकी जास्त आहे. योग्य अभ्यास आणि निर्णय जर तुम्ही घेऊ शकलाआ तर तुम्हाला यातून नक्कीच चांगला रिटर्न मिळून फायदा होईल. 

1 आयपीओ मध्ये गुंतवणूक करा - Invest in IPO

IPO म्हणजे Initial Public Offering होय. सध्या मार्केट मध्ये IPO चा पूर आलेला आहे. यातील सर्व आयपीओ तुम्हाला पैसे कमावून देतील असे नाही. त्यामुळे चांगले रिटर्न हवे असतील तर आयपीओचा चांगला अभ्यास असणे गरजेचे आहे. तुम्हाला जर एखादा लॉटरी मध्ये आयपीओ मिळाला तर कमीत कमी कालावधीत तुम्ही खूप जास्त नफा मिळवू शकता. 

उदाहरण द्यायचे झालेच तर IRCTC ही कंपनी IPO मध्ये आली तेव्हाच तिची किंमत 320 रुपये होती परंतु ती 10 दिवसात शेअर मार्केट मध्ये लिस्ट झाल्यानंतर तिची किंमत ही 644 झाली. म्हणजे ज्यांनी सुरुवातीला गुंतवणूक केली असेल त्यांना 10 दिवसात 101% प्रॉफिट झाला असेल.

अशाच प्रकारे बर्गर किंग या कंपनीची आयपीओ इश्यू प्राईज ही 60 रुपये होती आणि शेअर मार्केट मध्ये लिस्ट झाल्यानंतर हीच किंमत 115 रुपये झाली. इथे देखील कमी कालावधीत 92% प्रॉफिट झाला. अशीच काही गोष्ट झोमॅटो कंपनीच्या विषयी झाली आणि त्यांची किंमत 76 वरून 115 झाली. म्हणजे इथे देखील 10 दिवसात 51% प्रॉफिट झाला असता. आयपीओ विकत घेत असताना सेव्हिंग किंवा डिमॅट खात्यातून आयपीओ घ्यावा लागतो.

2 सेक्टर म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करा - Invest in Sector Mutual Fund

काही म्युच्युअल फंड कंपन्या या विशिष्ट सेक्टर मध्ये गुंतवणूक करतात. यामध्ये बँकिंग सेक्टर, आयटी सेक्टर या वेगवेगळ्या सेक्टर मध्ये गुंतवणूक केली जाते. हे सेक्टर म्युच्युअल फंड बऱ्यापैकी चांगले रिटर्न्स देतात. इथे देखील रिस्क असते परंतु जसे आपण आधी पण सांगितले की जर आपण योग्य अभ्यास करून सेक्टर म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केली तर आपण कमी कालावधीत खूप चांगला प्रॉफिट कमावू शकतो. 

सेक्टर म्युच्युअल फंडचा फायदा हा असतो की मार्केट जरी डाऊन ट्रेंड मध्ये असेल तरी देखील सेक्टर म्युच्युअल फंड हे अपट्रेंड मध्ये असू शकतात. बँकिंग सेक्टर मध्ये जर गुंतवणूक केलेले सेक्टर म्युच्युअल फंड असतील तर मागील जवळपास 10 वर्षांपासून खूप चांगला परफॉर्मन्स आहे. 

3 स्मॉल कॅप म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करा- Invest in Small Cap Mutual Funds

स्मॉल कॅप स्टॉक हे भविष्यकाळातील मिड कॅप स्टॉक असतात. जे सुरुवात करत आहेत आणि ज्यांच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी जास्त पैसे नाहीत ते लोक स्मॉल कॅप स्टॉक कडे वळतात. या स्मॉल कॅप स्टॉक मध्ये कमी वेळात जास्त पैसे कमावून देण्याची क्षमता असते. 

सर्वात मोठे आव्हान हे असते की स्मॉल कॅप स्टॉक कसा निवडावा? कारण सर्व स्मॉल कॅप स्टॉक हे नफा मिळवून देतात असे नाही. यावर पर्याय म्हणजे स्मॉल कॅप म्युच्युअल फंडस! स्मॉल कॅप म्युच्युअल फंड हे छोट्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करतात. यातून तुम्हाला जास्त फायदा हा होऊ शकतो. कोणत्याही चांगल्या स्मॉल कॅप स्टॉक मध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर 8 ते 10 वर्षात तुम्हाला 12 ते 25 % रिटर्न मिळू शकतात. यामध्ये रिस्क असते कारण हे सर्व काही शेअर मार्केट वर अवलंबून असते.

4 डायरेक्ट इक्विटी स्टॉक मध्ये गुंतवणूक करा- Invest in Direct Equity Stocks

आपण जर 21 वर्षांपूर्वी बघितले जर सेन्सेक्स हा 4500 वर होता. आजच्या घडीला 2021 मध्ये सेन्सेक्स 60000 वर गेलेला आहे. म्हणजे जवळपास 13 पट जास्त झाला आहे. निफ्टी विषयी सांगायचे झाले तर निफ्टी 21 वर्षांपूर्वी 1500 तर आज 17000 आहे. ही सर्व शेअर मार्केटची कमाल आहे. शेअर मार्केट मध्ये तुम्ही कोणत्याही कंपनीचे शेअर विकत घेऊ शकता. यात स्मॉल कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅप असे काही शेअर फंड असतात. जर तुम्ही एखाद्या चांगल्या blue chip stock मध्ये गुंतवणूक केली तर वर्षाला 15 ते 30% रिटर्न सहज मिळू शकतात. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला डिमॅट खाते लागते. हे खाते तुम्ही आता फ्री मध्येही उघडू शकता.

5 टॅक्स सेव्हिंग ELSS म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करा- Invest in Tax Saving ELSS Mutual Funds

ELSS म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला डबल फायदा मिळतो. 80 C च्या अंतर्गत तुम्ही दीड लाखापर्यंत टॅक्स वाचवू शकता. सर्वात महत्वाचे म्हणजे FD पेक्षा जास्त म्हणजे 12 ते 15% रिर्टन हे फंड तुम्हाला देऊ शकतात. या फंड साठी 3 वर्षांचा लॉकिंग कालावधी असतो आणि या तीन वर्षात तुम्ही गुंतवलेली रक्कम काढू शकत नाही. इतर अनेक टॅक्स सेव्हिंग पर्याय आहेत परंतु यातील ELSS म्युच्युअल फंड हे सर्वात जास्त रिटर्न देतात. 


या काही 5 मार्गांनी तुम्ही तुमचे पैसे गुंतवणूक रिटर्न मिळवू शकता. हे सर्व मार्ग धोक्याचे देखील आहेत त्यामुळे चांगला अभ्यास करून किंवा एखाद्या आर्थिक सल्लागाराची मदत घेऊन तुम्ही यात गुंतवणूक ही करू शकता. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने