स्त्रियांसाठी घरबसल्या करता येणारे 5 व्यवसाय || 5 Home Business Ideas for Women's in Marathi

स्त्रियांसाठी घरबसल्या करता येणारे 5 व्यवसाय || 5 Home Business Ideas for Women's in Marathi

अनेक महिला या गृहिणी असतात किंवा त्या कुठे नोकरीला जरी असतील तरी त्यांचा स्वतःचा एक व्यवसाय असावा असे त्यांचे स्वप्न असते. त्यासाठी आज आपण घरबसल्या करता येणार 5 व्यवसाय बघणार आहोत. हे व्यवसाय मुख्यतः स्त्रियांसाठी आहेत. आमच्या या लेखाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आणि सर्व महाराष्ट्रातील स्त्रियांना एक पैसे कमावण्याचे माध्यम मिळून त्या स्वावलंबी आणि सक्षम बनू शकतील.

स्त्रियांसाठी घरबसल्या करता येणारे 5 व्यवसाय || 5 Home Business Ideas for Women's in Marathi

शॉर्टकट मध्ये जर तुम्हाला पैसा कमवायचा असेल तर हा लेख तुम्ही मुळीच वाचू नका कारण यात तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे. प्रत्येक गोष्ट करताना त्यासाठी मेहनत ही लागते. मेहनत केली तरच आपल्याला यश मिळू शकते. 

1 बेकरी प्रोडक्टस 

आपण लॉकडाऊन मध्ये बघितले असेल की प्रत्येक घरोघरी  केक बनविण्यासाठी सुरुवात झाली आहे. अनेकांनी त्याचे चांगले मार्केटिंग केले आणि आज त्यांचा त्यातून एक व्यवसाय निर्माण झाला आहे. 

कोरोना काळात लोकांसाठी महिलांनी सुरू केलेला हा व्यवसाय फायद्याचा ठरला. आता तुम्ही बेकरी प्रोडक्ट मध्ये केक, चॉकलेट, बिस्कीट हे घरी बनवून त्याची चांगल्या प्रकारे मार्केटिंग करून विक्री करू शकतात. तुम्हाला येत नसेल तर त्या गोष्टी तुम्ही युट्युबवर बघून शिकून घेऊ शकता.

2 युट्युब चॅनल

तुमच्याकडे एखादी कला असेल मग ती काहीही असो, जेवण चांगले बनवता येतंय, डान्स येतोय, चित्रकला येते, लिहिता चांगलं येत तर मग तुम्ही तुमचे युट्युब चॅनल सुरू केलेच पाहिजे. अनेक मराठी युट्युबर आज त्यांची कला आणि प्रतिभा युट्युबवर दाखवून लाखो रुपये कमवता आहेत. 

तुम्हाला याविषयी सांगायचे झालेच तर आपली आजी यांचा आदर्श तुम्ही नक्कीच घेऊ शकता. इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारे पैसे गुंतवण्याची गरज नसते.

3 खानावळ किंवा चटकदार पदार्थांचा व्यवसाय

कोरोना काळात आणि तीव्रता कमी झाल्यानंतर देखील लोक हॉटेल मध्ये जायला घाबरतात. अशा काळात तुम्ही फायदा घेऊन टिफिन व्यवसाय सुरू करू शकता. टिफिन व्यवसायात तुम्ही पदार्थ बनवून ते घरपोहोच करू शकतात. 

तुमची आधीच खानावळ जर असेल तर तुम्हाला याचा अधिक फायदा होईल. आता कॉलेज देखील सुरू होतील त्यामुळे मेस तुमची अगदी चांगल्या प्रकारे चालेल.

4 शेअर मार्केट

शेअर मार्केट म्हणले की लोकांना वाटते जुगार आहे. परंतु हा जुगार तेव्हा असतो जेवहा आपण काहीच माहिती न घेता या शेअर बाजारात उतरतात. शेअर मार्केट मध्ये फक्त ट्रेडिंग मध्ये पैसे कमवता येतात असे नाही. यात गुंतवणूक म्हणून देखील तुम्ही बघू शकता. 

एखाद्या कंपनीच्या शेअर मध्ये  पैसे गुंतवून तुम्ही पैसे कमावू शकता. याशिवाय ज्यांना आणखी माहिती आहे ते लोक दररोज या शेअर मार्केट मधून हवा तितका नफा सहज कमावू शकता.

तुम्हाला आमच्या वेबसाईटवर शेअर मार्केट विषयी अधिक माहिती देणारे लेख मिळून जातील. 

5 ऑनलाइन बिझनेस

सध्या आपल्याला कळून आले आहे की भविष्यात सर्व काही ऑनलाइन होणार आहे. शिक्षण व्यवस्थेपासून इतरत्र सर्व ठिकाणी आपल्याला लॉकडाऊन काळात ऑनलाइन मुळे मदत झालेली आपल्याला दिसते. 

महिला घर बसल्या कोणताही व्यवसाय ऑनलाइन सुरू करू शकता. साडी, ड्रेस मटेरियल, मेकअप सामान, दैनंदिन जीवनात आणि स्वयंपाक घरात लागणाऱ्या वस्तू या सर्व गोष्टी तुम्ही ऑनलाइन विक्री करू शकता. मार्केटिंग साठी तुम्ही फेसबुक पेज, इन्स्टाग्राम हँडल यांचा वापर करू शकता. Whatsapp ग्रुप वर तुम्ही चांगल्या प्रकारे ग्राहकांपर्यंत पोहोचू शकता. 


न घाबरता आणि भविष्यात काय होईल याची चिंता न करता सुरुवात करा. एकदा सुरुवात झाली की आपोआप तुम्हाला अडचणी सोडवण्यासाठी मार्ग सापडतील. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने