मैदानात घुसणार हा जार्वो कोण आहे? | Who is Jarvo 69?

मैदानात घुसणार हा जार्वो कोण आहे? | Who is Jarvo 69?

जार्वो अर्थात डेनियल जार्व्हीस! तुम्ही क्रिकेट पहात असाल तर हे नाव तुम्ही ऐकले असेल. जार्वो कोणी क्रिकेटर नाहीये तर तो मैदानावरचा घुसखोर आहे. 

मैदानात घुसणार हा जार्वो कोण आहे? | Who is Jarvo 69?

जार्वो म्हणजे भारताचा 12 वा खेळाडू! तो एक इंग्लंडमध्ये राहणार क्रिकेट प्रेमी आहे. यांची चर्चा यामुळे जास्त होत आहे कारण ते एकदा नाही तर दोनदा मैदानात आले. 

लंडनच्या ओव्हल वर भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान सुरू असलेल्या कसोटी सामन्यांच्या दुसऱ्या दिवशी जार्वो पुन्हा मैदानावर आला होता. इंग्लंडच्या पहिल्या डावादरम्यान 34 व्या ओव्हर मध्ये हा प्रकार घडला. 

भारताचा गोलंदाज उमेश यादव हा बॉलिंग करत असताना जार्वो पिच कडे धावत आला. या प्रकारामुळे सामना 5 मिनिट थांबला होता. यापूर्वी झालेल्या 2 कसोटी सामन्यात देखील जार्वो ने असे कृत्य केले होते. जार्वो भारताच्या इनिंग मध्ये रोहित शर्माची विकेट गेल्यानंतर पॅड घालून मैदानात आला होता. त्यांनतर सुरक्षा रक्षकांनी त्याला ओढत मैदानाच्या बाहेर नेले. ओव्हल वर तर त्याने इंग्लंडच्या जॉनी बेअरस्ट्रोला धक्का देखील दिला होता. खेळाडूला हल्ला करण्याप्रकरनी त्याला आता अटक करण्यात आली आहे आणि तो साऊथ लंडन पोलिसांच्या ताब्यात आहे.

जार्वो आता कधीच मैदानात येऊ शकणार नाही कारण त्यांच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली आहे. 

इंग्लंड बोर्ड म्हणते की पिच वर कोणी शिरलेले मान्य केले जाणार नाही. खेळाडूंच्या सुरक्षिततेचा प्रश्न असेल तर कधीही तडजोड केली जाणार नाही असेही ते म्हणतात. याआधी लॉर्ड कसोटीच्या तिसऱ्या दिवशी जार्वो भारतीय संघासोबत मैदानात घुसला व कर्णधार ज्या प्रमाणे फिल्डिंग लावतो त्याप्रमाणे तो इशारे देखील करू लागला. 

लॉर्ड्सच्या घटनेनंतर जार्वो ने एक ट्विट केले होते की भारताकडून खेळणारा तो पहिला गोरा खेळाडू आहे! ट्विटरच्या बायो मध्ये जार्वो ने तो कॉमेडियन, फिल्म मेकर आणि प्रांक स्टार असल्याचे म्हंटले आहे. एरवी खेळाच्या मैदानावर असे प्रांकस्टार घुसत असल्याच्या घटना घडत असतात, परंतु हे अत्यंत धोकादायक असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी सोशल मीडियावर दिली आहे. एखाद्या व्यक्तीला वारंवार मैदानावर कसे येऊ दिले जाऊ शकते असे प्रश्न विचारले जात आहेत. 

इंगलंडच्या मैदानांवर असे प्रकार घडत असतील तर तेथील सुरक्षा किती कठोर आणि योग्य आहे ही गोष्ट बघायला हवी. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने