चंद्रपूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती || Chandrapur District Information in Marathi

चंद्रपूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती || Chandrapur District Information in Marathi

महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागात असलेला हा जिल्हा ज्याला इंग्रज चांदा असे संबोधत असत. स्वातंत्र्यानंतर 1964 च्या सुमार पुन्हा त्याचे नाव चंद्रपूर करण्यात आले. चंद्रपूर ही गोंड राजांची राजधानी होती. 17 व्या शतकात नागपूरच्या भोसले मराठ्यांनी चंद्रपूर ताब्यात घेतले. चंद्रपूर जिल्ह्याला काळ्या सोन्याची भूमी असे म्हणतात. इथे अनेक कोळस्याच्या खाणी व अनेक चुन्याच्या खाणी आहेत.

चंद्रपूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती || Chandrapur District Information in Marathi

याशिवाय या जिल्ह्यातील महत्वाच्या उद्योगांमध्ये बल्लारशहा कागद उद्योग, महाराष्ट्र राज्य औष्णिक विद्युत निर्मिती, अल्ट्राटेक, अंबुजा, माणिकगड व ए सी सी या सिमेंट कंपन्या देखील आहेत. ताडोबा व्याघ्र प्रकल्प हे या जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन केंद्र असून बाबा आमटे यांचा आनंदवन आश्रम देखील याच जिल्ह्यात आहे. 

चंद्रपूर जिल्ह्याची भौगोलिक माहिती - Geographical Information of Chandrapur District

चंद्रपूर जिल्ह्याचे एकून क्षेत्रफळ सुमारे 11,443 चौरस किलोमीटर आहे. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 15 तालुक्यांचा समावेश होतो. यामध्ये चंद्रपूर, मुल, सावली, भद्रावती, वरोरा, चिमुर, ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, गोंड पिंपरी, पोंभुरणा, राजुरा, कोरपना, बल्लारशहा आणि जिवती या तालुक्यांचा समावेश होतो. येथील लोकसंख्या सुमारे 21 लाख 94 हजार 262 इतकी आहे. मराठी भाषेसोबत इथे गोंडी, कोलामी व हिंदी या भाषा देखील बोलल्या जातात. 

चंद्रपूर जिल्ह्याचे पर्जन्यमान हे सुमारे 1398 मिमी इतके आहे. या जिल्ह्याचे तापमान हे किमान 7.1 डिग्री सेल्सियस तर कमाल तापमान हे 47.2 डिग्री सेल्सियस असते. जिल्ह्याचे हवामान हे उष्ण असते व मुख्यतः इथे उन्हाळा हा खूप कडक असतो.  इथे हिवाळा हा कमी कालावधीचा पण सौम्य असतो. 


चंद्रपूर जिल्ह्यातील नद्या व धरणे- Rivers and Dams in Chandrapur District

चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा नदी, इरई नदी, वैनगंगा नदी, अंधारी नदी,पैनगंगा नदी या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. या सर्व नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात.  या नद्यांवर इरई धरण, चारगाव धरण, अमल नाला धरण, जिवती धरण, मानोरा धरण व घोडझरी धरण ही काही महत्वाची धरणे देखील आहेत.


चंद्रपूर जिल्ह्यात मुख्यतः तांदूळ, कापूस, सोयाबीन, गहू, तूर, मूग, उडीद आणि मिरची या पिकांचे उत्पादन घेतले जाते. चंद्रपूर हा जिल्हा लोकप्रिय आदिवासी लोकनृत्य दंडर, गोंडी, किर्तम आणि रीला यांच्यासाठी प्रसिध्द आहे. 


चंद्रपूर जिल्ह्यातील धार्मिक स्थळे - Temples in Chandrapur District

दीक्षाभूमी, चंद्रपूर-

दीक्षाभूमी हे चंद्रपूर शहरातील आणि नागपूरच्या दीक्षाभूमी खालोखाल भारतातील बौद्ध धर्मियांचे प्रमुख बौद्ध तिर्थस्थळ आहे. इथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 16 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्या तीन लाखांपेक्षा अधिक अनुयायांना नवयान बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. 

महाकाली मंदिर-

सुमारे 16 व्या शतकात गोंड राजघराण्यातील आदिवासी राजा धंद्या राम साह यांनी हे प्राचीन मंदिर बांधले. इथे चैत्र पौर्णिमेला महाकाली ची भरणारी यात्रा अतिशय प्रसिद्ध आहे. 

भद्रावती जैन मंदिर-

शिल्पकला आणि नक्षीकामासाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे.

अंचलेश्वर मंदिर-

गोंड किल्ल्यासमोर हे भगवान महादेवाचे मंदिर आहे.


चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे - Tourist Places in Chandrapur District

ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प-

ताडोबा हे पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले आहे. यात ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि अंधारी अभयारण्य आहे. 1955 मध्ये महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान व ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प हे भारतातील 28 वे व्याघ्रप्रकल्प बनले. वाघांची उपस्थिती इथले मुख्य आकर्षण आहे. 

आनंदवन आश्रम, वरोरा-

1951 मध्ये बाबा आमटे यांनी आनंदवनाची स्थापना केली. कुष्ठरोगी रुग्णांसाठी हे सामुदायिक पुनर्वसन केंद्र म्हणून आनंदवनची ओळख आहे. 

घोडा झरी तलाव-

नागभीर तालुक्यात हा तलाव आहे. इथे बोटिंग करता येते.


चंद्रपूर जिल्ह्यातील गडकिल्ले- Forts in Chandrapur District

चंद्रपूर किल्ला-

गोंड राजाचा किल्ला आहे. 15 व्या शतकाच्या शेवटी आणि 16 व्या शतकाच्या सुरुवातीला हा किल्ला गोंड राजांनी बांधला. 

माणिकगड किल्ला-

9व्या शतकात आदिवासी नागा राजे यांनी माणिकगड हा किल्ला बांधला होता. 

बल्लाळपुर किल्ला-

बल्लाळपुर हा किल्ला खांडक्या बल्लाळशाह याने वर्धा नदीच्या पूर्वेकडील बेटावर बांधला. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने