नंदुरबार जिल्ह्याची संपूर्ण माहिती || Nandurbar District Information in Marathi

नंदुरबार जिल्ह्याची संपूर्ण माहिती ||  Nandurbar District Information in Marathi


महाराष्ट्राच्या खानदेश प्रदेशात हा नंदुरबार जिल्हा येतो. सातपुडा पर्वतांच्या रांगेत हा जिल्हा वसलेला आहे. 1 जुलै 1998 रोजी धुळे जिल्ह्याचा काही भाग वेगळा होऊन नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली. 

नंदुरबार भागात पूर्वी नंदराज राजाचे राज्य होते. त्यामुळे हे शहर एकेकाळी नंद्रनगरी म्हणून ओळखले जात असे. येथील प्रमुख आदिवासी जमातींचा मोठा इतिहास नंदुरबार ला लाभलेला आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात इथे 1942 साली शिरीशकुमार नावाचा युवक पोलिसांची गोळी लागून हुतात्मा झाला. त्याच्या नावाने शहरात हुतात्मा चौक आहे. नंदुरबार शहराच्या जवळ चौपाळे नावाचे एक खेडेगाव आहे.  या गावात संत दगाजी बापू यांचा जन्म झाला. आजन्म ब्रह्मचारी राहून त्यांनी नंदुरबारला भक्तीचा मार्ग दर्शविला. येथील लोक त्यांना बापू म्हणून ओळखत. 

नंदुरबार जिल्ह्याची संपूर्ण माहिती ||  Nandurbar District Information in Marathi

नंदुरबार जिल्ह्याची भौगोलिक माहिती - Nandurbar District Geographical Information

नंदुरबार जिल्हा हा महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश या तीनही राज्यांच्या सीमेजवळ असून क्षेत्रफळ 5034 चौरस किलोमीटर इतके आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या दक्षिणेला धुळे जिल्हा आहे. नंदुरबार जिल्ह्यात एकूण 6 तालुके आहेत. यात नवापूर, शहादा, तळोदा, अक्राणी, अक्कलकुवा व नंदुरबार यांचा समावेश होतो. या जिल्ह्याची 2011 च्या जनगणनेच्या अनुसार लोकसंख्या ही 16 लाख 48 हजार आहे. हा भाग आदिवासी लोकांच्या विविध जमातींनी नटलेला व निसर्गाच्या विविध रूपाने सजलेला आहे. येथे भिल्ल, पावरा, टोकरे कोळी, कोकणा-कोकणी, गावित, मावची या प्रमुख आदिवासी जमाती आहेत. येथे होळी हा प्रमुख सण साजरा केला जातो. 

याहाकी देवमोगरा माता ही येथील आदिवासींचे प्रमुख कुलदैवत आहे. 


नंदुरबार जिल्ह्यातील नद्या - Rivers in Nandurbar District

तापी आणि नर्मदा या जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत. उदाई, गोमाई, पाताळगंगा, रंगवली, शिवण या इतर काही नद्या आहेत. नंदुरबार हा सातपुड्यातील तापी खोऱ्यात वसलेला महाराष्ट्र राज्यातील अति उत्तरेकडील जिल्हा आहे. 


सारंगखेडा येथे होणार उत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रात घोडा मार्केट साठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यातील शिक्षण संस्था मध्ये एकलव्य विद्यालय, डी आर हायस्कुल म्हणजे श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कुल, डॉ काणे गर्ल्स हायस्कुल, नंदुरबार तालुका विधायक समितीचे GTP म्हणजेच गजमल तुळशीराम पाटील कॉलेज, यशवंत विद्यालय आणि श्रीमती हिराबेन गोविंददास श्रॉफ हायस्कुल याचा प्रामुख्याने समावेश होतो. 

नंदुरबार मधील टिळक वाचनालय देखील प्रसिद्ध आहे. 


नंदुरबार मधील धार्मिक स्थळे - Temples in Nandurbar District

अस्तंभा, नंदुरबार-

अस्तंभा हे नंदुरबार मधील महत्वाचे धार्मिक स्थळ आहे. हे ठिकाण अक्राणी तालुक्यात आहे. येथे फक्त दिवाळीला भेट देता येते. दिवाळीला येथे मोठा उत्सव भरतो. साधारण 10 ते 15 दिवस हा उत्सव चालतो. 

उनपदेव-

उनपदेव येथील गरम पाण्याचे झरे हे अडावाद या गावापासून 6 किलोमीटर अंतरावर शहादा या तालुक्यात आहेत. इथे असलेल्या मंदिरातील प्रमुख झरा हा गरम पाण्याचा झरा आहे. इथे असलेल्या गोमुखातून वर्षभर गोड पाणी वाहते. 

प्रकाशा (दक्षिण काशी)-

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात तापी, गोमटी आणि पुलिदा या तीन नद्यांच्या संगमावर वसलेले प्रकाशा हे अतिपवित्र तीर्थक्षेत्र आहे. याला त्यामुळे दक्षिण काशी म्हणतो. इथे महादेवाचे प्रत्यक्ष वास्तव्य आहे असे मानले जाते. उत्तर काशी इतकेच महत्व या ठिकाणाला दिले जाते. महादेवाची इथे 107 हुन अधिक मंदिरे आहेत. 

खोडाई माता-

तापी नदीचे पाणी एका रात्रीत आणून सूर्योदयाच्या आत माझे मंदिर बांधा असा आदेश देवीने दिला. परंतु हे शक्य झाले नाही तेव्हा देवीने झोपून आपल्या शरीराने नदीचे पाणी आडवले. यामुळे हे स्थान प्रसिद्ध झाले. 

यहाकी देवमोगरा माता-

मोलगी येथे हे मंदिर आहे. ही माता आदिवासींची कुलदेवी आहे.

कोचरमाता मंदिर, शहादा

देवमोगरा मंदिर, खापर

आदिवासी देवी मंदिर, मालदा मोगरा

आदिवासी संत गुलाम बाबा आश्रम, रानजांपूर

बालाजी मंदिर, नंदुरबार


नंदुरबार येथील पर्यटन स्थळे - Tourist Places in Nandurbar District

तोरणमाळ-

हे ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण होय. येथे यशवंत तलाव , सीता खायी म्हणजेच दरी, हिरवेगार निसर्गसौंदर्य आणि धबधबे अशी अनेक वैशिष्ट्य बघायला मिळतात. 

मोलगी-

मोलगी येथील डाब हे थंड हवेचे ठिकाण आहे. हे ठिकाण नयनरम्य आहे.

दंडापेश्वर पार्क

हुतात्मा गार्डन


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने