गडचिरोली जिल्ह्याची संपूर्ण माहिती || Gadchiroli District Information in Marathi
महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ विभागातील हा महत्वाचा जिल्हा आहे. 26 ऑगस्ट 1982 मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन गडचिरोली या जिल्ह्याची निर्मिती झाली. गडचिरोली या जिल्ह्याला नक्षल प्रभावित जिल्हा म्हणून ओळख आहे. आपल्याकडे एखाद्या अधिकाऱ्यांची बदली करायची धमकी देताना गडचिरोलीला टाकेल हा शब्द नक्कीच येतो! महाराष्ट्र राज्यात मुख्यत्वे आदिवासी, डोंगरदऱ्या यांनी व्यापलेला हा जिल्हा आहे. गडचिरोली जिल्हा हा 76% जंगलाने व्यापलेला आहे. त्यामुळे हा जिल्हा थोडासा मागासलेला देखील आहे. या घनदाट जंगलांमध्ये नक्षल समर्पित लोक हे आश्रय घेतात व लपून असतात. गडचिरोली जिल्ह्यात मुख्यतः गोंडी, माडिया,मराठी, हिंदी, तेलगू, बंगाली, छत्तीसगडी या भाषा बोलल्या जातात.
गडचिरोली जिल्ह्याची भौगोलिक माहिती - Gadchiroli District Geographical Information in Marathi
गडचिरोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे 14,412 चौरस किलोमीटर आहे. गडचिरोली जिल्ह्यातील पर्जन्यमान हे सरासरी 1430.8 मिलिमीटर इतके आहे. हा जिल्हा पठारी असून याची समुद्रसपाटीपासून उंची 217 मीटर आहे.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण 12 तालुके आहेत. यात अहेरी, आरमोरी, एटापल्ली, कुरखेडा, कोरची, गडचिरोली, चामोर्शी, देसाईगंज (वडसा), धानोरा, भामरागड, मुलचेरा आणि सिरोंचा यांचा समावेश होतो.
2011 च्या जनगणनेच्या अनुसार या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या सुमारे 10,72,942 इतकी आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील नद्या व धरणे - Rivers and Dams from Gadchiroli District
वैनगंगा, गोदावरी, प्राणहिता आणि दीना या गडचिरोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या प्रमुख नद्या आहेत. गाढवी, खोब्रागडी, पाल वेलोचना, कठाणी, शिवणी, पोर, दर्शनी, पर्लकोटा, पामुलगौतम आणि इंद्रावती नदी या इतर नद्या आहेत.
गडचिरोली जिल्हा बांबूची झाडे आणू तेंदूपानांकरिता प्रसिद्ध आहे. भात हे या जिल्ह्यातील मुख्य पीक आहे. इथे भातगिरण्या देखील जास्त आहेत. गडचिरोली जिल्ह्यात कागद कारखाने देखील आहेत. या जिल्ह्यात जास्त मोठे उद्योग मात्र नाहीत. गडचिरोली जिल्ह्यात कोसाचे उत्पादन होते. कोसा उत्पादन केंद्र हे आरमोरी या ठिकाणी आहे.
गडचिरोली जिल्ह्यात रेल्वेचे जाळे खूप छोटे आहे. 18.5 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग या जिल्ह्यातून जातो. देसाईगंज इथेच फक्त एक रेल्वे स्टेशन आहे. याला वडसा स्थानक म्हणून ओळखले जाते.
गडचिरोली जिल्ह्यातील धार्मिक स्थळे- Temples in Gadchiroli District
मार्कंडा देव-
भगवान शंकराचे हे लोकप्रिय स्थान आहे. चामोर्शी उपविभागात चामोर्शी तहसील अंतर्गत हे देवस्थान येते. या ठिकाणी सुमारे 1000 इतकी लोकसंख्या आहे. वैनगंगा नदीच्या काठावर हे गाव वसलेले आहे. महाशिवरात्रीला या ठिकाणी भगवान शंकराची मोठी यात्रा याठिकाणी भरते.
प्रशांत धाम-
1935 मध्ये कार्तिक स्वामी महाराजांनी हे मंदिर बांधले.
गडचिरोली जिल्ह्यातील गडकिल्ले - Forts in Gadchiroli District
वैराळगड किल्ला-
स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुना असलेला विटांच्या बांधणीतील किल्ला आजही आपले लक्ष वेधून घेतो.
गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटन स्थळे- Tourist Places in Gadchiroli District
लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा-
डॉ प्रकाश बाबा आमटे यांच्या अथक परिश्रमाने स्थापन केलेला हा रुग्ण सेवेसाठी प्रकल्प आहे. इथे प्राथमिक सर्व सेवा जसे आरोग्य आणि शिक्षण माडिया आदिवासींपर्यंत प्रकाश आमटे यांनी पोहोचवले आहे.
आमटेज एनिमल आर्क-
प्रकाश आमटे यांनी अनाथ प्राण्यांना सांभाळून त्यांना वाढवत या आमटे अनिमल आर्क ची सुरुवात केली.
बिनागुंडा-
भामरागड तालुक्यात असलेलं हे ठिकाणी धबधब्यासाठी प्रसिद्ध आहे.भामरागड पासून 40 किलोमीटर अंतरावर पूर्वेकडे हे गाव महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर आहे. बिनागुंडा कुओकोडी हे ऐतिहासिक गावे आहेत.
चपराळा वन्यजीव अभयारण्य-
चामोर्शी तालुक्यात हे अभयारण्य आहे. 140 चौरस किलोमीटर क्षेत्रात हे अभयारण्य पसरलेले आहे. अभयारण्यात वाघ, हरीण, चित्ता, जंगली मांजर, अस्वल, जंगली कुत्रा, सांबर आणि इतर अनेक प्राणी आढळतात. इथे अनेक लोकप्रिय आणि धार्मिक स्थळे सुद्धा आहेत.
भामरागड संगम-
हे ठिकाण पामालगौतम, इंद्रावती व पार्लकोटा या तीन नद्यांच्या संगमाने प्रसिद्ध आहे. हे ठिकाण त्याच्या हिरव्यागार आणि घनदाट जंगलांसाठी प्रसिद्ध आहे. माडिया संस्कृती इथे आपल्याला बघायला मिळते. सूर्यास्ताच्या वेळी हे ठिकाण पर्यटकांना अधिक आकर्षित करते. इथे अस्वल, हरीण व इतर वन्य प्राण्यांचा अधिवास देखील आहे.
लक्का मेटा-
पांडवांनी लक्षागृहामध्ये आश्रय घेतला होता. अहेरी तालुक्यात अलापल्ली-सिरोंचा या रोडवर रेवनपल्ली गावापासून 4 किलोमीटर अंतरावर घनदाट जंगलात हे लक्षागृह वसलेले आहे. कौरवांनी जेव्हा पांडवांना या लक्षागृहात ठार मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा कौरवांनी संपूर्ण लक्षागृहाला आग लावली. परंतु हे गृह नैसर्गिक घटकांनी बनलेले असल्याने हे बरेच दिवस जळत राहिले. पांडवांच्या या लक्षागृहाच्या विटा, भग्नावशेष आणि लपविलेले मार्ग या गोष्टी महाभारतातील सत्याची आजही इथे साक्ष देत आहेत.
वडधाम जीवष्म पार्क-
येथील प्राचीन अवशेष हे डायनोसॉर प्राण्यांचे मानले जातात.
वन वैभव अल्लापल्ली-
1953 मध्ये याची स्थापना झाली. अल्लापल्ली पासून 16 किलोमीटर अंतरावर भामरागड रस्त्यावर हे ठिकाण लागते. झाडांच्या त्यांच्या नैसर्गिक स्थितीनुसार अभ्यास करण्यासाठी हे ठिकाण राखून ठेवलेले आहे. जवळपास 6 हेक्टर हा परिसर आहे.
झाडीपट्टी रंगभूमी-
हजारो कलावंत घडविणारी ही रंगभूमी आजही तिचे वेगळेपण जपत आहे.
दीना सिंचन प्रकल्प-
रेगडी या चामोर्शी तालुक्यातील गावात हा प्रकल्प शेतीसाठी बांधलेला आहे. सुंदर व रमणीय असे हे ठिकाण आहे.