लसीकरण सर्टिफिकेट काढा व्हॉट्सअप वर | Covid 19 Vaccine Certificate Download on Whatsapp in Marathi
Covid 19 ची लस आपण घेतो परंतु आपल्याला आता फक्त स्टेट्स ला ठेवायला नाही तर महत्वाच्या ठिकाणी सुद्धा या लसीकरणाच्या प्रमाणपत्राची गरज असते. अशात वेबसाईटवर जाऊन लसीकरण प्रमाणपत्र हे मिळते परंतु आता सरकारने तुम्हाला हे प्रमाणपत्र ऑनलाइन व्हॉट्सअप च्या माध्यमातून देखील देण्याचा निर्णय घेतला आहे. तर मग आज हे कोरोना लसीकरण प्रमाणपत्र घरबसल्या तुम्ही कसे डाउनलोड करणार ते ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून हे आपण बघणार आहोत.
व्हॉट्सअप वर कोव्हिड लसीकरणाचे प्रमाणपत्र कसे मिळवायचे? - How to get Covid 19 Vaccination Certificate on Whatsapp in Marathi
1) आपल्या मोबाईल मध्ये 9013151515 हा क्रमांक सेव्ह करा.
2) नंबर सेव्ह करताना कोणतेही नाव वापरा- उदा: कोव्हिडं प्रमाणपत्र, Covid Certificate, Vaccine Certificate, इत्यादी
3) व्हॉट्सअप वर जाऊन तुम्ही ज्या नावाने तो नंबर सेव्ह केला असेल ते सर्च करा किंवा व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट मध्ये त्याला शोधा.
4) आता तुम्हाला या नंबर वर "Covid Certificate" हा मेसेज पाठवायचा आहे.
Covid 19 Vaccination Certificate download from Whatsapp
5) तुम्हाला मेसेज पाठवल्यानंतर लगेच तुम्हाला लस घेताना दिलेल्या मोबाईल नंबर वर एक OTP येईल. हा 6 अंकी OTP तुम्हाला 3 मिनिटांच्या आत या नंबर वर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे.
6) तुमचा OTP हा व्हेरिफाय केला जाईल.
7) तुमचा OTP योग्य असेल तर तुम्हाला त्या मोबाईल नंबर वर जी नावे रजिस्टर आहेत ती दिसतील.
8) त्यामध्ये तुमचे नाव तुम्हाला शोधून त्याचा आकडा मेसेज करायचा आहे. म्हणजे 1 नंबरला तुमचे नाव असेल तर तुम्हाला 1 पाठवायचा आहे.
9) तुम्हाला लगेच pdf स्वरूपात तुमचे कोव्हिड प्रमाणपत्र मिळून जाईल.
How to Download Vaccination Certificate on Whatsapp?
तुम्हाला हा लेख माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्रांसोबत हा नक्की शेअर करा. तुम्हाला ही नवीन माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा!