हेडफोन/ इअरफोन तुमच्या कानासाठी घातक ।। Earphones Harmful to Ears ?
आपण २१ व्या शतकाच्या गोष्टी करतो आहे तर असे वाटते आहे कि हा मनुष्य विश्वाला पूर्णपणे नष्ट करूनच थांबेल. कुठेही बघायला गेले तरी देखील आपल्याला प्रत्येक ठिकाणी कुठल्या तरी प्रकारची टेक्नॉलॉजी हि नक्कीच बघायला मिळते. २ वर्षांचा मुलगा असो कि ६०-७० वर्षांचे वयोवृद्ध, सर्वांना या टेक्नॉलॉजिने जणू आपल्या ताब्यात घेतले आहे. बघायला गेले तर या टेक्नॉलॉजीच्या येण्याने अनेकांची कामे सोपी झाली आहेत परंतु त्यासोबत त्याचे धोके देखील वाढले आहेत. आज अशाच एका तंत्रज्ञानाच्या विषयी म्हणजे हेडफोन किंवा इअरफोन विषयी आपण जाणून घेणार आहोत.
इअरफोन किंवा हेडफोन हे असे डिव्हाईस आहे ज्याला आजची युवा पिढी सतत वापरत आहे आणि त्यामुळे या इअरफोन किंवा हेडफोन तुमच्या शरीराला कसे घातक आहेत याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. आपण सर्व लोक हे वापरत जरी असलो तरी देखील यामुळे आपल्या शरीरात आणि मुख्यतः आपल्या डोक्यात खूप घातक गोष्टी यामुळे घडतात हे आपल्याला माहित पण नसते.
Facts about Use of Earphones in Marathi
१. हेडफोन जर तुम्ही वापरत असाल तर कधीच ९० डेसिबल पेक्षा जास्त आवजात त्यावर ऐकू नका. ९० डेसिबल पेक्षा जास्त आवजात जर तुम्ही ऐकले तर तुम्ही लवकर बहिरे होऊ शकता. १०० डेसिबल पेक्षा जास्त ध्वनी तीव्रतेचे संगीत जर तुम्ही १५ सेकंद पेक्षा जास्त वेळ ऐकत असाल तर सावधान! यामुळे तुमची ऐकण्याची पूर्ण क्षमता जावू शकते.
२. सध्या एक सर्व्हेक्षण झाले त्यानुसार जे लोक दिवस किंवा रात्री जास्त आवाज करून संगीताचा आनंद घेतात त्यांचे कान सुन्न पडतात. जर तुमचा कान सुन्न पडला तर तुम्हाला काही वेळ बाहेरील आवाज ऐकायला देखील अडचण येईल. काही काळानंतर तुम्हाला पुन्हा नॉर्मल गोष्टी ऐकायला येतात. त्यामुळे एक लक्षात ठेवा कि संगीत ऐकायची हि सवय तुम्हाला बहिरे बनवू शकते.
३. हेडफोन शेअर केल्याने इअर इन्फेक्शन होऊ शकते. जर आपण शेअर करत असू तर मग आपल्या कानातील किंवा दुसऱ्याच्या कानातील बॅक्टरीया या इअरफोन ला लागून पसरू शकतात.
४. जास्त आवाज संगीत ऐकण्याची तुम्हाला आवड असेल तर ती बदलली पाहिजे कारण याने तणाव वाढतो. याने रक्तदाब वाढतो आणि रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण देखील वाढते.
५. सध्या सर्व कंपन्या या हेडफोन निर्मितीत स्पर्धा करत आहेत. प्रत्येक कंपनी असा दावा करते कि त्यांनी बनवलेला हेडफोन हा सर्वोत्कृष्ट आहे. या स्पर्धेत असे डिव्हाईस बनवले जात आहेत ज्यामधून हवा देखील कानामध्ये जात नाही. जर आपण अशाच प्रकारचे डिव्हाईस वापरत राहिलो ना तर काही काळाने अशी वेळ येईल कि तुम्ही सध्या जितके कानाने ऐकू शकता तितके तुम्हाला ऐकूच येणार नाही.
Earphone / Headphone che dusparinam
६. जे लोक अशा प्रकारची उपकरणे वापरतात त्यांच्याकडून तुम्ही नक्कीच ऐकले असेल कि कान दुखतो. कानामध्ये बझिंग सारखे आवाज देखील ऐकायला येत असतात. त्यामुळे आपल्याला त्रास होतो परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने पुढे जाऊन आपल्याला प्रॉब्लेम वाढतात.
७. हे इअरफोन किंवा हेडफोन वापरत असताना इलेकट्रीक मॅग्नेटिक वेव्ह टायर होतात आणि जे मेंदूशी संबंधित प्रॉब्लेम तयार करतात. जे इअरफोन वापरतात त्यांच्यामध्ये या समस्या जास्त दिसून येतात.
८. तुम्ही एखाद्या खोलीत बसला असाल तर खिडकी उघडून एकदा रस्त्यावर नजर फिरवा, तुम्हाला दिसेल कि अनेक लोक रस्त्यावर चालताना, गाडी चालवताना देखील हेडफोन चा वापर करत असतात. यामुळेच अनेक अपघात देखील होतात. कधी कधी अशा लोकांना वाचविण्यासाठी इतरांचा जीव धोक्यात जातो.
९. जास्त आवाजात संगीत ऐकल्याने बाहेरील जगाशी तुमचा संबंध तुटतो. त्यामुळे असे देखील अनुभवले गेले आहे कि योग्यप्रकारे न ऐकल्यामुळे खूप महत्वाची कामे देखील चुकीची होतात. ज्यामुळे तुम्हाला अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
१०. जे लोक सतत जोरदार आवजात संगीत ऐकतात त्यांच्या शरीरातील प्रत्येक नस हि बांधीत झालेली असते. ज्यामुळे आपली शरीरात होणाऱ्या प्रत्येक त्रासाला हे दोन उपकरण जबाबदार असू शकतात.
तुम्हीच सांगा आता हेडफोन लावून बसने किती योग्य आहे? जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर नक्की कमेंट मध्ये कळवा आणि महत्वाचा वाटला असेल तर नक्की शेअर करा.