दुधगंगा धरण / काळम्मावाडी धरण - Dudhganga Dam / Kalammawadi Dam information in Marathi
धरणाचे नाव- दुधगंगा धरण / काळम्मावाडी धरण (Dudhganga Dam / Kalammawadi Dam)
नदीचे नाव- दुधगंगा नदी
ठिकाण- काळम्मादेवी
जिल्हा- कोल्हापूर
Dudhganga Dharan / Kalammawadi Dharan Marathi Mahiti
राधानगरी तालुक्यातील कळम्मादेवी गावाजवळ हे धरण आहे. त्यामुळे या धरणाला कळम्मादेवी धरण असे देखील म्हणले जाते. दुधगंगा या नदीवर हे धरण बांधलेले आहे. 1983 साली हे बांधकाम पूर्ण झाले. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांच्या यादीमध्ये या धरणाचा 11 वा क्रमांक लागतो.
दुधगंगा धरणाची उंची 73 मीटर म्हणजे 239 फूट आहे. धरणाची लांबी 1280 मीटर म्हणजे 4200 फूट आहे. दुधगंगा धरणाची पाणी साठविण्याची क्षमता ही 27 टीएमसी म्हणजे 27000 दशलक्ष घनफुट आहे. या धरणाला एकूण 5 दरवाजे आहेत.
दुधगंगा धरणाला कसे पोहोचाल?
दुधगंगा हे धरण राधानगरी शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर आहे. कोल्हापूर शहरापासून हे धरण 54 किलोमीटर अंतरावर आहे.