कोयना धरण - Koyana Dam Information in Marathi

कोयना धरण - Koyana Dam Information in Marathi 

धरणाचे नाव- कोयना धरण / शिवाजी सागर (Koyna Dam)

नदीचे नाव- कोयना नदी

ठिकाण-कोयनानगर

जिल्हा- सातारा

कोयना धरण - Koyana Dam Information in Marathi

Koyna Dharan Marathi Mahiti

भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त वीजनिर्मिती करणाऱ्या जलविद्युत प्रकल्पांच्या यादीतील हे कोयना धरण आहे. महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात हे धरण आहे. कृष्णा नदीची उपनदी असणाऱ्या कोयना  नदीवर हे धरण बांधण्यात आलेले आहे. 

1956 ते 1964 या काळात या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. कोयना धरणाची उंची 103.2 मीटर म्हणजे 339 फूट आहे. या धरणाची लांबी 807.2 मीटर म्हणजे 2648 फूट आहे. कोयना धरणाची पाणी साठविण्याची क्षमता 105 टीएमसी म्हणजे 105000 दशलक्ष घनफुट आहे. 

कोयना धरणावर 20 मेगावॅट चे 2 टर्बाईन, 70 मेगावॅट चे 4 टर्बाईन, 75 मेगावॅट चे 4 टर्बाईन, 80 मेगावॅट चे 4 टर्बाईन, 250 मेगावॅट चे 4 असे एकूण 10 टर्बाईन बसवलेले आहेत. यातून एकूण 1960 मेगावॅट इतकी वीजनिर्मिती केली जाते. भारतातील सध्याच्या घडीला हा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. तेहेरी या जलविद्युत प्रकल्पाचे जेव्हा काम पूर्ण होईल आणि तो पूर्ण क्षमतेने काम करायला लागेल तेव्हा मात्र कोयना प्रकल्प दुसऱ्या स्थानावर येईल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने