माजलगाव धरण - Majalgaon Dam information in Marathi

माजलगाव धरण - Majalgaon Dam information in Marathi

धरणाचे नाव- माजलगाव धरण (Majalgaon Dam)

नदीचे नाव- सिंदफना नदी

ठिकाण-माजलगाव

जिल्हा- बीड

माजलगाव धरण - Majalgaon Dam information in Marathi

Majalgaon Dharan Marathi Mahiti

माजलगाव या तालुक्याच्या ठिकाणी हे धरण आहे. माजलगाव हे धरण जायकवाडी सिंचन प्रकल्पाचा भाग आहे. जायकवाडी धरणातून येणारा एक कालवा या धरणाला येऊन मिळतो. सिंदफना नदीवर हे धरण बांधलेले आहे. 1987 साली या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांच्या यादीत या धरणाचा 15वा क्रमांक येतो. 

धरणाची उंची 31.19 मीटर म्हणजे 102 फूट तर लांबी 6488 मीटर म्हणजे 21286 फूट आहे. माजलगाव धरणाची पाणी साठविण्याची क्षमता 16 टीएमसी म्हणजे 16000 दशलक्ष घनफुट इतकी आहे. माजलगाव धरणाला एकूण 16 दरवाजे आहेत. माजलगाव धरणावर 2250 किलोवॅट वीजनिर्मिती प्रकल्प देखील आहे. शेतीसाठी या धरणाच्या पाण्याचा वापर केला जातो.

माजलगाव धरणाला कसे पोहोचाल?

बीड शहरापासून 65 किलोमीटर अंतरावर आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने