सुमित अँटील बायोग्राफी मराठी || Sumit Antil Biography In Marathi

सुमित अँटील बायोग्राफी मराठी || Sumit Antil Biography In Marathi

नीरज चोप्रा यांनी भारताला ऑलम्पिक मधील भालाफेक खेळात सुवर्णपदक मिळवून दिले आणि त्यांचाच आदर्श ठेवत सुमित अँटील (सुमित अंतिल) यांनी देखील टोकियो पॅराऑलम्पिक मध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. आज आपण याच सुमित अँटील यांच्याविषयी संपूर्ण माहिती मराठी मध्ये (Sumit Antil Biography information in Marathi)जाणून घेणार आहोत.

सुमित अँटील बायोग्राफी मराठी || Sumit Antil Biography In Marathi

सुमित अँटील बायोग्राफी मराठी - Sumit Antil Biography In Marathi

संपूर्ण नाव (Full Name)- सुमित अंतिल / अँटील

जन्म तारीख (Birth Date)- 7 जुन 1998

वय (Age)- 23 वर्षे

जन्म ठिकाण (Birth Place)- सोनिपत, हरियाणा

खेळ (Sports)- भालाफेक (Javelin Throw)

उंची (Height)- 5 फूट 10 इंच

सुमित अँटील यांचा जन्म आणि बालपण- Sumit Antil Birth and Childhood

7 जून 1998 रोजी सुमित अंतिल यांचा जन्म हरियाणा मधील सोनिपत येथील खेवडा या गावामध्ये झाला. ते लहानपणी पासून कुस्तीपटू बनू इच्छित होते आणि त्यांनी त्याची तयारी देखील सुरू केली होती. भारतीय खेळाडू योगेश्वर दत्त यांना ते आदर्श मानत असत. 

काही वर्षांपूर्वी झालेल्या रस्ते अपघातात त्यांना त्यांचा एक पाय गमवावा लागला. त्यांनतर त्यांचे कुस्तीपटू व्हायचे स्वप्न भंगले. त्यांना अनेक दिवस घरात अंथरुणाला खिळून राहावे लागले.

सुमित अँटील यांचे करियर - Career of Sumit Antil

2019 साली झालेल्या विश्व पॅरा स्पर्धेत त्यांना रौप्यपदक मिळाले होते. त्यासोबत त्यांनी टोकियो पॅराऑलम्पिक साठी देखील स्थान मिळविले होते.

टोकियो पॅराऑलम्पिक मधील सुमित अँटील यांचे प्रदर्शन - Sumit Antil in Tokyo Paralympics

सुमित अँटील यांनी javelin throw म्हणजे भालाफेक खेळात पहिल्याच प्रयत्नात 66.95 मीटर भाला फेकत वर्ल्ड रेकॉर्ड देखील तोडला आहे. यासोबत त्यांना सुवर्णपदक मिळाले आणि हे भारताचे या स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक होते. 

सुमित यांनी या स्पर्धेत स्वतःचेच रेकॉर्ड तोडले. त्यांनी पहिल्या प्रयत्नात 66.95 मीटर भाला फेकला, जो स्वतःमध्येच एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. त्यानंतर दुसऱ्या थ्रो मध्ये त्यांनी 68.08 मी भाला फेकला. यात सुधारणा होत 5 व्या थ्रो मध्ये त्यांनी 68.55 मीटर भाला फेकला. मध्ये त्यांनी तिसऱ्या थ्रो मध्ये 65.27 मी , चौथ्या थ्रो मध्ये 66.71 मी तर शेवटचा सहावा थ्रो हा फाऊल राहिला.


आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण सुमित अँटील यांच्याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली आहे. Sumit Antil Biography in Marathi. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. जी माहिती सध्या उपलब्ध नाहीये ती आम्ही मिळाल्यावर नक्की अपडेट करू!

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने