उस्मानाबाद जिल्ह्याची माहिती || Osmanabad District Information in Marathi

उस्मानाबाद जिल्ह्याची माहिती || Osmanabad District Information in Marathi

Osmanabad direct information in marathi

मराठवाड्याचा ऐतिहासिक वारसा लाभलेला हा उस्मानाबाद जिल्हा! रामायनापासून या जिल्ह्याचा इतिहास आपल्याला बघायला मिळतो. बालाघाट पर्वतरांगेच्या कुशीत वसलेला उस्मानाबाद जिल्हा नळदुर्ग सारख्या किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे. याच उस्मानाबाद जिल्ह्याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. Osmanabad District Information in Marathi

उस्मानाबाद जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती - Geographical Information about Osmanabad District in Marathi

उस्मानाबाद जिल्ह्याचा बहुतांश भाग खडकाळ तर उर्वरित भाग सपाट असुन बराचसा भाग बालाघाट नावाच्या लहान पर्वताने व्यापला आहे. समुद्र सपाटीपासून या जिल्ह्याची उंची सुमारे 600 मीटर इतकी आहे.या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 7512.4 चौरस किलोमीटर इतकी आहे.तर येथील लोकसंख्या सुमारे 16,57,576 इतकी आहे . या जिल्ह्यात उस्मानाबाद, तुळजापूर ,उमरगा ,लोहारा, कळंब ,भूम, परांडा आणि वाशी असे एकूण 8 तालुके आहे .येथील वातावरण साधारणपणे कोरडे असते .मराठवाड्यातील या जिल्ह्यांच्या तुलनेत उस्मानाबाद जिल्ह्यांमधील उन्हाळ्यातील तापमान कमी असते.

उस्मानाबाद जिल्ह्याविषयी महत्वाच्या गोष्टी - Important Points about Osmanabad District

उस्मानाबाद जिल्हा महाराष्ट्रातील मराठवाडा या विभागात येतो .या शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे .उस्मानाबाद चा इतिहास रामायण काळापासून आढळतो .वनवासात असताना काही काळ रामाने या ठिकाणी वास्तव्य केल्याचे सांगतात .उस्मानाबाद शहरानजीक पापनाश येथे सीतेची न्हाणी आहे .उस्मानाबादला मौर्य ,सातवाहन, राष्ट्रकूट यांचे राज्य होते.तसेच यादवांचे देखील राज्य होते .त्यानंतर उस्मानाबाद, बहामनी आणि विजापूर संस्थानात आले.1948 पर्यंत उस्मानाबाद हैदराबाद संस्थानात होते .हैदराबादच्या सातवा निजाम मीर उस्मान अली खान यांच्या सन्मानार्थ उस्मानाबाद चे नाव देण्यात आले .

उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्वाची ठिकाणे - Important Places in Osmanabad District

अनेक महत्वाची पर्यटन व धार्मिक स्थळे आहेत .त्यामध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला नळदुर्ग किल्ला ,उस्मानाबाद लेणी ,परंडा किल्ला आहे. श्री तुळजाभवानी मंदिर हे  ही येथे प्रसिद्ध आहे . तेर म्हणजे तगर  यांचा प्रामुख्याने समावेश होतो. श्री संत गोरोबा काका तेर यांचे येथे मंदिर आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील किल्ले - Forts in Osmanabad District

नळदुर्ग किल्ला :

हा किल्ला उस्मानाबाद शहरापासून सुमारे 46 किलोमीटर अंतरावर आहे. येथे असलेले नळदुर्ग किल्ल्यातील पाणी महाल प्रेक्षणीय व प्रसिद्ध आहे. नळदुर्ग हा किल्ला अडीच किलोमीटर घराचा असून अजूनही तो सुस्थितीत आहे. या किल्ल्याजवळ वाहणाऱ्या बोरी नदीचे पाणी अडवून, दुर्ग रक्षणासाठी केलेला प्रयोग फक्त येथेच आढळतो.300-400 वर्षापूर्वी देखील लष्करी शास्त्र किती पुढारलेले होते याचा हा सबळ पुरावाच आहे . पावसाळ्यात या पाणीमहालवरून पडणाऱ्या पाण्याचे दृश्य बघण्यासाठी लाखो पर्यटक येथे गर्दी करतात. 

परांडा किल्ला:

कल्याणीच्या चालुक्यांच्या काळात परिमंड म्हणजेच परांडा हा एक महत्त्वाचा परगणा होता. बहामनी राजवटीत मोहम्मद शहा महामनी चा पंतप्रधान होता. महमूद गवान याने हा किल्ला बांधला होता. इसवी सन सोळाशे च्या सुमारास हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. त्यानंतर 1628 आली शहाजी राजांनी तो किल्ला ताब्यात घेतला. दोन वर्षे तो त्यांच्या ताब्यात होता .इसवी सन 1630 मध्ये तो विजापूरच्या आदिलशहाकडे गेला .त्यांच्याच मुरार नावाच्या सेनापतीने या किल्ल्यातील प्रसिद्ध मुलुखमैदान तोफ 1632 साली विजापूर येथे नेली.

उस्मानाबाद जिल्ह्यातील धार्मिक स्थळे - Temples in Osmanabad District

श्री तुळजाभवानी मंदिर

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे तुळजापूर येथे वास्तव्य आहे .तुळजापूर हे गाव सोलापूर -औरंगाबाद रस्त्यावर आहे.सोलापूर हुन 42 किलोमीटर अंतरावर आणि उस्मानाबादहून 22 किलोमीटर अंतरावर आहे.हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार घेऊन ,हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद देणारी आई तुळजापूरची देवी .भवानी माता, महिषासुर मर्दिनी ,तुकाई ,रामवरदायिनी ,जगदंबा आदी नावांनी ओळखली जाते .जगदंबा मातेची मूर्ती गंडकी शिळेची असून त्याला अष्टभुजा आहे.आश्विन व चैत्र पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते.यात्रेला देशभरातून लाखो भाविक येतात.तेर उस्मानाबाद शहरापासून 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावी प्राचीन संस्कृतीच्या पाऊलखुणा आजही स्पष्ट जाणवतात .प्राचीन काळात परदेशाशी व्यापार संबंध असलेले तेर हे गाव प्रख्यात राष्ट्रीय संत गोरोबा काका कुंभार यांच्यामुळे महाराष्ट्राला ज्ञात आहेत. या गावात त्यांची जुने राहते घर आहे.तेरणा नदीच्या काठावर त्यांची समाधी मंदिर आहे .याशिवाय येथील काही मंदिरे स्थापत्यशास्त्राच्या बांधकामामुळे प्रसिद्ध आहेत .गावाच्या आग्नेय दिशेला श्री नृसिंहाचे एक जुने मंदिर आहे ,तर गावाच्या मध्यभागी त्रिविक्रमाच्या भव्य अशा मूर्ती समोर भगवान विष्णूची मूर्ती आहे . 

नळदुर्ग येथे जवळच असलेले खंडोबा मंदिर प्रसिद्ध आहे.हे महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

उस्मानाबाद शहरातील दर्गा :

उस्मानाबाद मध्ये हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहमतुल्ला आले यांची दर्गा शहरातील मध्यभागी आहे.दरवर्षी येथे उरूस असतो.या निमित्ताने येथे मोठी यात्रा भरते त्यासाठी लाखो भाविक देशविदेशातून येतात.

कळंब तालुक्यातील येडेश्वरी देवी : 

कळंब हे जिल्ह्यातील व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे .ते मांजरा नदीच्या काठावर वसलेले आहे .कळंब पासून वीस किलोमीटर अंतरावर येरमाळा येडेश्वरी देवीचे मंदिर आहे .नवसाला पावणारी देवी अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे .

दत्त मंदिर संस्थान ,रुईभर: 

उस्मानाबाद पासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर स्थित आहे.श्री क्षेत्र रुईभर येथे दत्त महाराजांचा एक अतिभव्य मंदिर आहे .या मंदिराचे बांधकाम काळा पाषाणातील असून त्यावर अत्यंत सुबक व उठावदार नक्षीकाम केले आहे . 

रामलिंग मंदिर : 

हे भगवान शिवशंकर प्रसिद्ध मंदिर आहे.ते उस्मानाबाद शहरापासून सुमारे 20 किलोमीटरच्या अंतरावर सोलापूर- औरंगाबाद या रोडवरील येडशी या गावात आहे.याच ठिकाणी दुर्गा देवीचे पुरातन मंदिर आहे .श्रावण महिन्यात येथे मोठ्या प्रमाणावर भक्तगण येतात .तसेच भरपूर पाऊस पडल्यावर येथील धबधबा हा सर्वांनाच आकर्षित करतो .हा भाग डोंगराळ प्रदेशातून वनराईने नटलेला आहे . येथे अनेक वन्यजीव देखील आढळतात .त्यामुळे या भागाला रामलिंग अभयारण्य म्हणून घोषित केले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळे - Tourist Places in Osmanabad District

धाराशिव लेणी : 

उस्मानाबाद शहरापासून हे आठ किलोमीटर अंतरावर धाराशिव नावाची जैन लेणी आहे आहे. ही एक प्राचीन लेणी आहे. उपलब्ध कागदपत्रावरून ही लेणी सातव्या शतकातील असावी अशी मान्यता आहे. केले निल व महा नेला नावाच्या विद्यधरणी निर्माण केली होती. पहिली लेणी पश्चिमेला लहान व अपूर्ण अवस्थेत आहे. त्यांच्या बाजूला दुसरी लेणी आहे.त्याला वरंडा असून त्याचे छत बत्तीस खांबांनी पेलून धरले आहे. आतल्या बाजूस भगवान पार्श्वनाथाची भव्य मूर्ती आहे. प्रवेशद्वाराजवळ भव्य कुंडे असून त्यात बारमाही स्वच्छ व गार पाणी असते.

उस्मानाबाद शहराच्या बाहेर हातलादेवी मंदीर आहे.हे मंदिर हतलाई नावाने ओळखले जाते.उस्मानाबाद जिल्हा शेळ्यांसाठी देखील प्रसिद्ध आहे.उस्मानाबादी शेळी संपूर्ण महाराष्ट्रात उत्कृष्ट दर्जाची शेळी मानली जाते. उस्मानाबादी शेळी चे चवदार मटन देखील प्रसिद्ध आहे.या मटणाचा शेरवा किंवा रस्सा वैशिष्ट्यपूर्ण आहे .मटन शिजवलेल्या गरम पाण्यात हळद ,तिखट, काळा मसाला ,मिरची ,लसूण ,अद्रक ,कोथिंबीर आदी वस्तू टाकून त्यापासून बनवलेला शेरवा येथे लोकप्रिय आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने