शेरशाह : कॅप्टन विक्रम बत्रा यांचे जीवन चरित्र ।। Captain Vikram Batra Biography in Marathi
1999 साली झालेल्या कारगिल युद्धात पाकिस्तानी सैन्याला सळो की पळो करून सोडणारे आणि युद्धात वीर पराक्रम गाजवणारे शेरशाह म्हणजेच कॅप्टन विक्रम बत्रा! कॅप्टन विक्रम बत्रा यांची पाकिस्तानी सैन्याने खूप जास्त धास्ती त्यावेळी घेतली होती. आता आपल्यासमोर शेरशाह ही सिरीज आल्याने या वीर योध्याचे जीवन थोडे जगासमोर येणार आहे परंतु याआधी देखील ज्यांनी कारगिल किंवा डिफेन्स क्षेत्रात थोडेफार जरी वाचले असेल त्यांना विक्रम बत्रा यांच्याविषयी नक्कीच माहिती असेल.
आज या लेखाच्या माध्यमातून आपण परमवीर कॅप्टन विक्रम बत्रा यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्यांच्या जन्मापासून तर त्यांनी अनुभवलेले शेवटचे रोमांचकारी दिवस देखील आपण आज जाणून घेणार आहोत. चित्रपट किंवा सिरीज या तुम्हाला मनोरंजक बनवून दाखविल्या जातात त्यामुळे या वीर योध्याचे खरे जीवन आज शेरशाह: कॅप्टन विक्रम बत्रा जीवन चरित्र (Captain Vikram Batra Biography in Marathi) या लेखातून समजून घेऊयात.
Captain vikram Batra Jiwan Charitra || Biography of Captain Jiwan Batra in Marathi
संपूर्ण नाव (Full Name)- विक्रम गिरीधारी लाल बत्रा
जन्म (Birthdate)- 9 सप्टेंबर 1974
जन्मस्थळ (Birthplace)- पालमपूर
मृत्यू- 7 जुलै 1999
आईचे नाव- कमल
वडिलांचे नाव- गिरीधारी
भाऊ- विशाल बत्रा
मैत्रिणीचे नाव- डिंपल चीमा
कॅप्टन विक्रम बत्रा यांचा जन्म 9 सप्टेंबर 1974 मध्ये हिमाचल प्रदेश मधील पालमपूर जिल्ह्यातील खोकर नावाच्या एका छोट्याश्या खेड्यात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव गिरीधारी लाल बत्रा तर आईचे नाव कमल कांता बत्रा होते. कॅप्टन विक्रम बत्रा आणि त्यांचे बंधू विशाल बत्रा हे जुळी भावंडे होती. त्यांच्या आई वडिलांनी त्यांना लव आणि कुश ही नावे दिली होती. लव म्हणजे विक्रम आणि कुश म्हणजे विशाल! लव म्हणजेच विक्रम हे त्यांचे बंधू विशाल यांच्यापेक्षा 14 मिनिट आधी जन्मले होते.
विक्रम यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण हे DAV शाळेतून आणि नंतर पुढे पालमपूर येथील सेंट्रल स्कूल मधून मिळविले. आर्मी कॅन्टोनेमेन्ट मध्ये शाळा असल्याने आर्मी चे रुल्स आणि अनुशासन बघत ते मोठे झाले. त्यांचे वडील त्यांना देशभक्तीच्या गोष्टी सांगत असत आणि त्यामुळेच त्यांच्या मनात आर्मीविषयी प्रेम निर्माण झाले. ते अगोदर पासूनच चंचल स्वभावाचे होते. शाळेत असतानाच त्यांचा नेहमी हा प्रयत्न असायचा की ते अव्वल येतील मग ती गोष्ट अभ्यास असो किंवा खेळ! त्यामुळे ते शाळेत असताना सर्व गोष्टींमध्ये तरबेज होते. त्यांची शाळा ही आर्मी कॅन्टोनेमेन्ट मध्ये असल्याने ते कायम आर्मीच्या हालचाली अनुभवत आणि बघत होते.
त्यांनी पुढे जाऊन चंदीगड येथून DAV कॉलेज मधून विज्ञान शाखेत पदवीचे शिक्षण घेतले. त्या कालखंडात ते NCC मधील सर्वात बेस्ट कॅडेट म्हणून देखील निवडले गेले. त्यावेळी ते प्रजासत्ताक दिनाच्या कवयतीचा भाग बनले होते. ते पदवीचे शिक्षण घेत असताना त्यांच्याद्वारे दिलेल्या मर्चंट नेव्ही परीक्षेचा निकाल देखील आला. त्यांनी ही परीक्षा देखील पास केली होती. काही दिवसात त्यांचे भरती लेटर देखील येणार होते. त्यांनी पोलंड जाण्यासाठी देखील सर्व काही तयारी केली होती. परंतु नंतर त्यांच्या मनात काहीतरी विचार आला आणि त्यांनी आईला सांगितले की आई मी मर्चंट नेव्ही मध्ये जाऊ इच्छित नाही, मला इंडियन आर्मी मध्ये भरती व्हायचे आहे. त्यांचा हा निर्णय सर्वांना आवडला नव्हता कारण त्यांनी एक चांगल्या पगाराची मर्चंट नेव्हीची नोकरी नाकारून इंडियन आर्मीची निवड केली होती.त्यांना इंडियन आर्मी मध्ये भरती आता व्हायचेच होते त्यामुळे त्यांनी संपूर्ण मन लावून CDS ची तयारी सुरू केली. याच दरम्यान 1995 च्या दरम्यान जेव्हा विक्रम बत्रा हे उच्च शिक्षण घेण्यासाठी पंजाब युनिव्हर्सिटी मध्ये गेले तेव्हा त्यांची ओळख ही डिंपल चीमा यांच्या सोबत झाली. त्या त्यांच्या इंग्रजी विषयाच्या क्लासमेट होत्या. पुढे जाऊन त्यांची मैत्री ही प्रेमात बदलली आणि त्यांनी लग्न करण्याचा देखील निर्णय घेतला. परंतु पुढे जाऊन जीवनात एक वळण आले, ज्याचा विचार त्या दोघांनी कधीच केला नव्हता. त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाल्यानंतर एका वर्षात म्हणजे 1996 रोजी विक्रम बत्रा यांना आर्मीमध्ये निवडीसाठी इंडियन मिलिटरी अकॅडमी देहाराडून ला जावे लागेल.
6 डिसेंबर 1997 रोजी त्यांना ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर जम्मू काश्मीर येथील सोपोर नावाच्या ठिकाणी आर्मीच्या 13 व्या जम्मू काश्मीर रायफलच्या लेफ्टनंट पदावर नियुक्त केले गेले.
कॅप्टन विक्रम बत्रा यांचे आर्मी जीवन - Army Life of Captain Vikram Batra
1997 मध्ये जेवहा कॅप्टन विक्रम बत्रा यांची 13 व्या जम्मू काश्मीर रायफल बटालियन मध्ये नियुक्ती झाल्यानंतर लगेच विक्रम बत्रा यांचे आर्मी जीवन सुरू झाले होते. त्यांचा संघर्ष तिथूनच सुरू झाला होता. फक्त 18 महिन्यांची नोकरी पूर्ण झाल्यानंतर लगेच कॅप्टन बत्रा यांना कारगिल युद्धावर जावे लागले. कारगिल युद्धात त्यांनी बहादूरी दाखविली. त्यांच्या कारकिर्दीत मिळालेल्या यशाच्या जोरावर ते लेफ्टनंट पासून कर्नल पदावर गेले.
पुढे जाताना त्यांना श्रीनगर लेह मार्गाच्या वर असलेल्या पॉईंट 5140 ला पाकिस्तानी सेनेकडून जिंकून घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. ही काही सोप्पी गोष्ट नव्हती परंतु कॅप्टन बत्रा त्या व्यक्तींपैकी एक होते जे कठिनात कठीण चॅलेंज देखील स्वीकारून पूर्ण करत असत. याच हिमतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर कॅप्टन बत्रा यांनी ठिकाण जिंकून घेतले. पॉईंट 5140 वर विजय मिळविल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की ये दिलं मांगे मोर! आणि हीच गोष्ट सर्वांना प्रेरणा देणारी ठरली. काही काळात शत्रूसाठी हे वाक्य म्हणजे जणू सर्व काही नष्ट करणारे वादळ बनले. सगळीकडे फक्त एकच घोषणा ऐकू येत होती आणि ती म्हणजे 'ये दिलं मांगे मोर!'
पाकिस्तानी सैन्यासाठी एक संकट बनून कॅप्टन बत्रा त्यांना दिसत होते. पाकिस्तानी सैन्याने त्यामुळे कॅप्टन बत्रा यांना एक कोड नेम दिले होते, ते म्हणजे शेर शाह म्हणजेच लायन किंग! 20 जून 1999 रोजी महत्वाचा पॉईंट असलेला 5140 वर विजय मिळविल्यानंतर पॉईंट 4875 ला ताब्यात घेण्याची मोहीम सुरू केली गेली. या मोहिमेची जबाबदारी देखील कॅप्टन विक्रम बत्रा यांच्यावर सोपविली गेली. त्यांनी स्वतःच्या जीवाची फिकीर न करता लेफ्टनंट जनरल अनुज नय्यर आणि साथीदारांच्या सोबत ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी स्वीकारली. या अभियानावर जाण्याच्या आधी 16 जून ला त्यांचे जुळे भाऊ विशाल ला त्रास सेकटर मधून एक पत्र देखील लिहिले होते. त्यात त्यांनी लिहिले होते की, ' प्रिय कुश, आई आणि वडिलांची काळजी घे... इथे काहीही होऊ शकते.'
त्यानंतर ते 7 जुलै 1999 रोजी पॉईंट 4875 वर ताबा मिळविण्यासाठी पुढे सरसावले. जेव्हा ते 7 जुलै ला या पॉइंटवर ताबा मिळविण्यासाठी पुढे गेले तेव्हा अचानक पाकिस्तानी सैनिकांनी अंदाधुंद फायरिंग सुरू केली. जेव्हा कॅप्टन बत्रा यांना कळले की त्यांचे साथीदार हे धोक्याच्या क्षेत्रात आहेत तेव्हा ते एखादया सिंहासारखे पाकिस्तानी सैन्यावर तुटून पडले. या दरम्यान त्यांनी अनेक पाकिस्तानी सैनिक मारले. हे मिशन जवळपास पूर्ण होत आले होते. अशात कॅप्टन बत्रा यांचे लक्ष त्यांचे ज्युनियर साथीदार असणाऱ्या लेफ्टनंट नवीन यांच्यावर गेली. नवीन एका विस्फोटात खूप जबर जखमी झालेला होता. विक्रम बत्रा हे त्यांच्या साथीदाराला खांद्यावर घेऊन पुढे जात होते तेव्हा एका लपून बसलेल्या पाकिस्तानी सैनिकाची गोळी त्यांच्या छातीत येऊन लागली. असे असताना देखील त्यांनी त्यांच्या साथीदाराला सुरक्षित ठिकाणी पोहोचवून बाकी पाकिस्तानी सैनिकांवर तुटून पडले.
शेवटचा श्वास घेण्याआधी त्यांनी 4875 पॉईंट वर तिरंगा फडकवला होता. शहिद होण्याच्या आधी कॅप्टन बत्रा यांचे शब्द होते जय माता दी! जेव्हा 1999 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्या सेनेच्या दरम्यान युद्ध जोरावर होते तेव्हा लेफ्टनंट विक्रम बत्रा हे सुट्टीसाठी त्यांच्या गावी आलेले होते. ते न्यूगल नदी किनारी त्यांच्या मित्रांसोबत कॅफेमध्ये बसलेले होते. तेव्हा त्यांच्या एका मित्राने विचारले की विक्रम आता कारगिल मध्ये युद्ध सुरू झाले आहे, तू तुझी काळजी घे. तेव्हा विक्रम यांनी त्यांच्या मित्राला उत्तर दिले की काळजी करू नको, एकतर मी कारगिल मध्ये तिरंगा फडकवून येईल किंवा त्या तिरंग्याला कफन बनवून तरी येईल! पॉईंट 4875 वर विजय मिळविल्यानंतर कॅप्टन विक्रम बत्रा यांनी त्यांचे दोन्ही वचन जणू पूर्ण केले होते.
कोणत्याही सैनिकांचे बलिदान हे कधीच छोटे किंवा मोठे नसते. परंतु काही वेळा आपल्याला अशा काही सैनिकांच्या पराक्रमाच्या गोष्टी कानावर येतात ज्या ऐकून अंगावर शहारे येतात.
कॅप्टन विक्रम बत्रा पुरस्कार - Captain Vikram Batra Awards
कारगिल युद्धातील साहस आणि पराक्रमाचा सन्मान म्हणून 15 ऑगस्ट 1999 रोजी कॅप्टन विक्रम बत्रा यांना भारतीय सेनेतील सर्वात उच्च समजले जाणारे पदक म्हणजे परम वीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आले. कॅप्टन बत्रा यांनी शहिद होण्याआधी अनेक साथीदारांना वाचविले होते. त्यांच्या विषयी भारतीय सेना प्रमुखांनी सांगितले होते की जर ते जिवंत परत आले असते तर ते भारतीय सेना प्रमुख नक्की बनले असते.
कॅप्टन विक्रम बत्रा चित्रपट - Movies on Captain Vikram Batra
2003 मध्ये आलेल्या LOC कारगिल या बॉलिवूड चित्रपटात अभिषेक बच्चन यांनी कॅप्टन विक्रम बत्रा यांचा रोल केलेला आहे.
आता 2021 मध्ये शेरशाह ही अमेझॉन प्राईमवर सिरीज देखील आली आहे.