पुणे जिल्ह्यातील धरणे || Dams From Pune District information in Marathi

पुणे जिल्ह्यातील धरणे || Dams From Pune District information in Marathi

पुणे जिल्हा हा शैक्षणिक दृष्ट्या समृद्ध असा जिल्हा... जणू शिक्षणाचे माहेरघरच! याच पुणे जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या सीमेवर एकूण 28 धरणे आहेत. याच सर्व धरणांविषयी आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. 

Dams in pune district

1) कलमोडी धरण / अरलकलमोडी धरण

कलमोडी हे धरण खेड तालुक्यात असणाऱ्या कलमोडी गावाच्या जवळ आहे. राजगुरूनगर शहरापासून 42 किलोमीटर अंतरावर हे धरण आहे. पुणे शहरापासून 85 किलोमीटर अंतरावर हे धरण आहे. कलमोडी हे धरण अरळा या नदीवर असल्याने या धरणाला अरलकलमोडी असे देखील म्हणले जाते. अरळा नदी भीमेची उपनदी आहे. धरणाचे बांधकाम हे 2007 साली पूर्ण झाले. 

धरणाची उंची ही 40.6 मीटर म्हणजे 133 फूट आहे. धरणाची लांबी ही 104 मीटर म्हणजे 341 फूट इतकी आहे. धरणाला एकूण 8 दरवाजे आहेत. धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ही 1.51 टीएमसी म्हणजे 1510 दशलक्ष घनफुट आहे. 


2) घोड धरण / चिंचणी धरण

शिरूर तालुक्यातील चिंचणी गावाजवळ हे धरण आहे. शिरूर शहरापासून हे धरण 30 किलोमीटर अंतरावर आहे. पुणे शहरापासून या धरणाचे अंतर हे 78 किलोमीटर आहे. घोड धरण हे घोड नदीवर बांधलेले आहे. धरणाचे बांधकाम हे 1965 साली पूर्ण झाले. घोड धरणाची उंची ही 29.6 मीटर म्हणजे 97 फूट तर लांबी 3300 मीटर म्हणजे 10800 फूट आहे. घोड अर्थात चिंचणी या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ही 7.64 टीएमसी म्हणजे 7640 दशलक्ष घनफुट इतकी आहे. घोड धरणाला एकूण 29 दरवाजे आहेत. धरणातून जाणाऱ्या 2 कॅनल च्या माध्यमातून शेतीला पाणीपुरवठा हा केला जातो.


3) पानशेत धरण

पानशेत हे धरण पानशेत गावाच्या शेजारी आहे.पुणे शहरापासून पानशेत धरण हे 43 किलोमीटर अंतरावर आहे. धरणाचे बांधकाम हे 1960 च्या दरम्यान पूर्ण झाले. धरणाचे बांधकाम पूर्ण झाले नव्हते त्यामुळे 12 जुलै 1961 साली पानशेत धरण फुटले. यामुळे पुणे शहराला पुराचा खूप मोठा फटका बसला होता. धरणाचे बांधकाम हे पुन्हा 1972 साली करण्यात आले. पानशेत धरणाचे बांधकाम हे आंबी नदीवर केले गेलेले आहे. धरणाचे बांधकाम हे दगड माती आणि काही प्रमाणात सिमेंट चा वापर करून बांधण्यात आलेले आहे. 

धरणाची उंची ही 63.56 मीटर म्हणजे 208 फूट इतकी आहे. धरणाची लांबी ही 1039 मीटर म्हणजे 3409 फूट आहे. धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ही 10.7 टीएमसी म्हणजे 10700 दशलक्ष घनफुट इतकी आहे. धरणाच्या पाणीसाठ्याला म्हणजेच जलाशयाला तानाजी सागर म्हणून ओळखले जाते. 


4) वरसगाव धरण

वरसगाव धरण हे पुणे शहरापासून 45 किलोमीटर अंतरावर आहे. हे धरण देखील पानशेत धरणाच्या शेजारीच आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार साखळी धरण प्रकल्पातील हे एक महत्वाचे धरण आहे. धरणाचे बांधकाम हे मोशी नदीवर केलेले आहे. 1976 साली धरणाचे बांधकाम करण्यात आले. धरणाची उंची ही 63.4 मीटर म्हणजे 208 फूट तर लांबी 785 मीटर म्हणजेच 2575 फूट आहे. धरणाची पाणी साठविण्याची क्षमता ही 13.21 टीएमसी म्हणजे 13210 दशलक्ष घनफुट आहे. धरणाला एकूण 5 दरवाजे आहेत. धरणाच्या जलाशयाला वीर बाजी पासलकर जलाशय म्हणून ओळखले जाते. 


5) टेमघर धरण

पुणे शहरापासून 46 किलोमीटर अंतरावर लव्हर्डे गावाजवळ हे टेमघर धरण आहे. 2000 साली धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. धरणाचे बांधकाम हे मुठा नदीवर करण्यात आलेले आहे. धरणाची उंची 42.5 मीटर म्हणजे 139 फूट तर लांबी ही 1075 मीटर म्हणजे 3527 फूट आहे. धरणाची पाणी साठविण्याची क्षमता ही 3.61 टीएमसी इतकी आहे. धरणाला एकूण 5 दरवाजे आहेत.


6) खडकवासला धरण

पुणे शहरापासून 16 किलोमीटर अंतरावर खडकवासला गावाच्या शेजारी खडकवासला धरण आहे. धरणाचे बांधकाम हे ब्रिटिश कालीन आहे. 1869 साली धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. पानशेत धरण 1961 साली प्रचंड पावसामुळे फुटले आणि त्याचे पाणी खडकवासला धरणाला आल्यामुळे हे धरण देखील पाण्याच्या दबावामुळे फुटले. पुढे या धरणाचे बांधकाम हे 1976 ते 1984 दरम्यान पुन्हा बांधण्यात आले. धरणाचे बांधकाम हे मुठा नदीवर आहे. खडकवासला धरणाची उंची ही 32.9 मीटर म्हणजे 108 फूट इतकी आहे. खडकवासला धरणाची लांबी ही 1539 मीटर म्हणजे 5049 फूट आहे. धरणाचा पाणीसाठा हा 1.98 टीएमसी म्हणजे 1980 दशलक्ष घनफुट इतकी आहे. धरणाला एकूण 11 दरवाजे आहेत.


7) उजनी धरण

पुणे शहरापासून 160 किलोमीटर अंतरावर टेमभुर्णी गावानजीक उजनी धरण आहे. धरणाचे बांधकाम 1969 साली सुरू होऊन ते बांधकाम 1980 साली पूर्ण झाले. उजनी धरणाची बांधणी ही भीमा नदीवर करण्यात आलेली आहे. धरण पूर्णपणे पुणे जिल्ह्यात नसून सोलापूर पुणे सीमेवर हे धरण आहे. धरणाची उंची ही 56.4 मीटर म्हणजे 185 फूट आहे तर लांबी ही 2534 मीटर म्हणजे 8314 फूट आहे. धरणाचा एकूण पाणीसाठा हा 117 टीएमसी म्हणजे 11700 दशलक्ष घनफुट आहे.उजनी धरणाला एकूण 41 दरवाजे आहेत. उजनी धरणाच्या पाणीसाठ्याला यशवंत जलाशय असे म्हणले जाते. या धरणातून 12 मेगावॅट क्षमतेने वीजनिर्मिती केली जाते. धरणातून 2 कॅनल द्वारे शेतीसाठी पुरवठा केला जातो. उजनी धरण बांधल्यामुळे आता आपल्याला तिथे असणारे पळसनाथ हे प्राचीन मंदिर बघायला मिळत नाही, ते पाणलोट क्षेत्रात पाण्याखाली बुडून जाते.


8) भामा आसखेड धरण

पुणे शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर खेड तालुक्यात आसखेड गावशेजारी हे धरण आहे. धरणाचे बांधकाम हे भामा नदीवर असल्याने आणि शेजारील गाव आसखेड असल्याने धरणाला भामा आसखेड धरण म्हणून ओळखले जाते. धरणाचे बांधकाम हे 2000 साली पूर्ण झाले. या धरणाची उंची 51 मीटर म्हणजे 167 फूट तर लांबी 1425 मीटर म्हणजे 4675 फूट आहे. धरणाची एकूण पाणी साठविण्याची क्षमता ही 10 टीएमसी म्हणजे 1000 दशलक्ष घनफुट आहे. धरणाला एकूण 4 दरवाजे आहेत. 


9) वीर धरण

पुणे शहरापासून 60 किलोमीटर अंतरावर पुरंदर तालुक्यात वीर गावाशेजारी वीर हे धरण आहे. खरंतर हे धरण सातारा जिल्ह्यात आहे, परंतु पुणे सातारा सीमेवर हे धरण असल्यामुळे या लिस्ट मध्ये देखील आहे. या धरणाच्या पाण्याचा उपयोग पुणे जिल्ह्याला जास्त प्रमाणात होतो. 1965 साली धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. नीरा नदीवर वीर धरणाचे बांधकाम करण्यात आलेले आहे. 


10) मुळशी धरण

पुणे शहरापासून 40 किलोमीटर अंतरावर मुळशी गावानजीक मुळशी धरण आहे. 1927 साली टाटांनी हे धरण बांधले. मुळा नदीवर या धरणाची बांधणी केलेली आहे. मुळशी धरणाची उंची ही 48.8 मीटर म्हणजे 160 फूट तर लांबी 1533.38 मीटर म्हणजे 5030 फूट आहे. धरणाचा एकूण पाणीसाठा हा 23 टीएमसी म्हणजे 2300 दशलक्ष घनफुट इतका आहे. मुळशी धरणाला एकूण 7 दरवाजे असून या धरणातून 300 मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. 


11) पवना धरण

पवना हे धरण पुणे शहरापासून 54 किलोमीटर अंतरावर आहे. 1972 साली या धरणाचे बांधकाम पवना नदीवर पूर्ण झाले. पवना धरणाची उंची ही 42.37 मीटर म्हणजे 139 फूट इतकी आहे. धरणाची लांबी 1329 मीटर म्हणजे 4360 फूट इतकी आहे. पवना धरणाचा पाणीसाठा हा 8.51 टीएमसी इतका आहे. पवना धरणाला एकूण 6 दरवाजे आहेत. पवना धरणाचा परिसर हा विसापूर, लोहगड, तुंग आणि तिकोना या किल्ल्यानी वेढलेला आहे. 


12) डिंभे धरण

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील आंबेगाव शेजारी हे डिंभे धरण आहे. डिंभे हे धरण पुणे शहरापासून साधारणतः 106 किलोमीटर अंतरावर आहे. धरणाचे बांधकाम हे 1992-93 साली पूर्ण झाले. धरणाची निर्मिती ही घोड नदीवर करण्यात आलेली आहे. धरणाची उंची 67.21 मीटर म्हणजे 220 फूट तर लांबी 852 मीटर म्हणजे 2795 फूट इतकी आहे.  धरणाची पाणी साठविण्याची क्षमता ही 12.4 टीएमसी म्हणजे 12400 दशलक्ष घनफुट इतका आहे. डिंभे धरणाला एकूण 5 दरवाजे आहेत. 


13) चासकमान धरण

चासकमान धरण हे खेड तालुक्यात आहे. पुणे शहरापासून हे धरण 70 किलोमीटर अंतरावर आहे. 2002 साली धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. चासकमान हे धरण भीमा नदीवर बांधण्यात आलेले आहे. चासकमान धरणाची उंची ही 46 मीटर म्हणजे 151 फूट तर लांबी ही 738 मीटर म्हणजे 2421 फूट इतकी आहे. धरणाची पाणी साठविण्याची क्षमता ही 7.5 टीएमसी म्हणजे 7500 दशलक्ष घनफुट इतकी आहे. या धरणाला 5 दरवाजे आहेत. 


14) भुशी धरण

भुशी हे धरण लोणावळा शहराच्या शेजारी आहे. पुणे शहरापासून हे धरण साधारणतः 70 किलोमीटर अंतरावर आहे. लोणावळ्यात असलेले हे धरण म्हणजे पर्यटकांसाठी खास आकर्षण आहे. इंग्रजांच्या काळात भारतीय रेल्वेने सुरू केलेल्या वाफेवरील रेल्वे इंजिन साठी लागणाऱ्या पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून 1860 मध्ये हे धरण बांधण्यात आले. भुशी धरणाची निर्मिती ही इंद्रायणी नदीवर केलेली आहे. 


15) गुंजवणी धरण

पुणे शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर हे गुंजवणी धरण आहे. 2000 साली या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. धरणाची उंची ही 52.82 मीटर म्हणजेच 173 फूट इतकी आहे. तर धरणाची लांबी ही 1730 मीटर म्हणजे 5680 फूट आहे. धरणाची पाणी साठविण्याची क्षमता ही 3.7 टीएमसी म्हणजे 3700 दशलक्ष घनफुट आहे. गुंजवणी धरणाला एकूण 2 दरवाजे आहेत. 


16) माणिकडोह धरण

पुणे शहरापासून हे धरण 106 किलोमीटर अंतरावर आहे. धरणाचे बांधकाम हे 1984 साली पूर्ण झाले. कुकडी नदीवर या धरणाचे बांधकाम करण्यात आलेले आहे. धरणाची उंची 51.8 मीटर म्हणजे 170 फूट तर लांबी 930 मीटर म्हणजे 3050 फूट आहे. धरणाची पाणी साठविण्याची क्षमता ही 10.15 टीएमसी म्हणजे 10150 दशलक्ष घनफुट इतकी आहे. माणिकडोह धरणाला एकूण 5 दरवाजे आहेत. 


17) पिंपळगाव जोगा धरण

पुणे शहरापासून 116 किलोमीटर अंतरावर हे पिंपळगाव जोगा धरण आहे. धरणाचे बांधकाम हे 1999 साली पूर्ण झाले. कुकडी नदीची उपनदी असणाऱ्या पुष्पावती नदीवर हे धरण बांधण्यात आलेले आहे. धरणाची उंची 28.6 मीटर म्हणजे 94 फूट तर लांबी ही 1560 मीटर म्हणजे 5120 फूट इतकी आहे. धरणाची एकूण पाणी साठवण्याची क्षमता ही 8.32 टीएमसी म्हणजे 8320 दशलक्ष घनफुट इतकी आहे. धरणाला एकूण 5 दरवाजे आहेत.


18) नाझरे धरण

नाझरे हे धरण पुणे शहरापासून 51 किलोमीटर अंतरावर आहे. हे धरण 1974 साली बांधण्यात आले. कऱ्हा नदीवर या धरणाची निर्मिती करण्यात आलेली आहे. धरणाची उंची ही 22.54 मीटर म्हणजे 73 फूट तर लांबी 2021 मीटर म्हणजे 6630 फूट आहे. धरणाची पाणी साठविण्याची क्षमता ही 0.79 टीएमसी म्हणजे 790 दशलक्ष घनफुट इतकी आहे. 


19) आंद्रा व्हॅली धरण

पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे गावाशेजारी हे धरण आहे. पुणे शहरापासून साधारण 50 किलोमीटर अंतरावर हे धरण आहे. 2003 साली हे धरण बांधण्यात आले. आंद्रा नदीवर धरण बांधले असल्याने याला आंद्रा व्हॅली धरण असे नाव ठेवण्यात आले आहे. आंद्रा व्हॅली धरणाची उंची ही 40.45 मीटर म्हणजे 132 फूट इतकी आहे. धरणाची लांबी 330 मीटर म्हणजे 1080 फूट आहे. धरणाची पाणी साठविण्याची क्षमता ही 2.94 टीएमसी म्हणजे 2940 दशलक्ष घनफुट इतकी आहे. धरणाला 8 दरवाजे आहेत. 


20) भाटघर धरण

पुणे शहरापासून 52 किलोमीटर अंतरावर हे धरण आहे. धरणाचे बांधकाम हे 1928 साली पूर्ण झाले. नीरा नदीची उपनदी असणाऱ्या वेळवंडी नदीवर भाटघर धरण बांधण्यात आलेले आहे. धरणाची उंची सुमारे 57.92 मीटर म्हणजे 190 फूट तर लांबी 1625 मीटर म्हणजे 5331 फूट इतकी आहे. धरणाची पाणी साठविण्याची क्षमता ही 23.75 टीएमसी म्हणजे 23750 दशलक्ष घनफुट इतकी आहे. भाटघर धरणाला एकूण 81 दरवाजे आहेत. यातील 45 दरवाजे हे स्वयंचलित आहेत. इंग्रजांच्या काळात बांधकाम झाले असल्याने त्या काळात या धरणाला लॉइड या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या नावावरून लॉइड धरण असे ठेवण्यात आले होते. भाटघर धरणातून 16 मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. 


21) नीरा देवघर धरण

पुणे शहरापासून 71 किलोमीटर अंतरावर हे नीरा देवघर धरण आहे. 2000 साली या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. नीरा नदीवर या धरणाची निर्मिती करण्यात आलेली आहे. धरणाची उंची 58.53 मीटर म्हणजे 192 फूट तर लांबी 2430 मीटर म्हणजे 7970 फूट आहे. धरणाची पाणी साठविण्याची क्षमता 11.91 टीएमसी म्हणजे 11910 दशलक्ष घनफुट आहे. नीरा देवघर धरणाला 5 दरवाजे आहेत. 


22) चिलेवाडी धरण

चिलेवाडी हे धरण पुणे घरापासून 121 किलोमीटर अंतरावर आहे. 2000 साली धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. कुकडी नदीची उपनदी असणाऱ्या मांडवी नदीवर हे धरण बांधण्यात आलेले आहे. चिलेवाडी धरणाची उंची 62.56 मीटर म्हणजे 205 फूट तर लांबी 440 मीटर म्हणजे 1440 फूट इतकी आहे. चिलेवाडी धरणाचा पाणीसाठा हा 0.96 टीएमसी म्हणजे 960 दशलक्ष घनफुट इतका आहे. या धरणाला 3 दरवाजे आहेत. 


23) येडगाव धरण

पुणे शहरापासून 88 किलोमीटर अंतरावर हे शहर आहे. 1977 साली हे धरण बांधण्यात आले. कुकडी नदीवर येडगाव हे धरण बांधण्यात आलेले आहे. धरणाची उंची 29.74 मीटर म्हणजे 97.6 फूट तर लांबी 4511 मीटर म्हणजे 14800 फूट इतकी आहे. धरणाची पाणी साठविण्याची क्षमता ही 3.3 टीएमसी म्हणजे 3300 दशलक्ष घनफुट इतकी आहे. येडगाव धरणाला एकूण 11 दरवाजे आहेत. 


24) वाळवण धरण

पुणे शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर हे धरण आहे. लोणावळा शहराच्या शेजारी हे धरण आहे. वाळवण हे धरण 1916 साली टाटांनी बांधले होते. या धरणाचे बांधकाम हे इंद्रायणी नदीवर केलेले आहे. वाळवण धरणाची उंची 26.36 मीटर म्हणजे 86.5 फूट तर लांबी 1356 मीटर म्हणजे 4449 फूट इतकी आहे. धरणाचा एकूण पाणीसाठा 2.56 टीएमसी म्हणजे 2560 दशलक्ष घनफुट इतका आहे. 


25) वडज धरण

वडज धरण हे जुन्नर शहराशेजारी आहे. पुणे शहरापासून हे धरण 89 किलोमीटर अंतरावर आहे. 1983 साली वडज हे धरण बांधण्यात आले. घोड नदीची उपनदी असणाऱ्या मीना नदीवर हे धरण बांधण्यात आलेले आहे. धरणाची उंची ही 30.7 मीटर म्हणजे 101 फूट तर लांबी 1875 मीटर म्हणजे 6152 फूट इतकी आहे. धरणाची पाणी साठविण्याची क्षमता ही 1.27 टीएमसी म्हणजे 1270 दशलक्ष घनफुट इतकी आहे. धरणाला 5 दरवाजे आहेत.  


26) वाडीवाळे धरण

हे धरण देखील लोणावळा शहराच्या शेजारी आहे. पुणे शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर हे धरण आहे. 1999 साली हे धरण बांधण्यात आले. धरणाची निर्मिती ही कुंडली नदीवर केलेली आहे. धरणाची उंची ही 29 मीटर म्हणजे 95 फूट तर लांबी 485.64 मीटर म्हणजे 1593 फूट आहे. धरणाची पाणी साठविण्याची क्षमता ही 1.44 टीएमसी म्हणजेच 1440 दशलक्ष घनफुट इतकी आहे. 


27) ठोकरवाडी धरण

पुणे शहरापासून हे धरण 61 किलोमीटर अंतरावर आहे. 1922 साली हे धरण बांधण्यात आले. ठोकरवाडी हे धरण इंद्रायणी नदीवर बांधण्यात आलेले आहे. धरणाची उंची ही 59.44 मीटर म्हणजे 195 फूट तर लांबी 741 मीटर म्हणजे 2431 फूट आहे. धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ही 12.84 टीएमसी म्हणजे 12840 दशलक्ष घनफुट इतकी आहे. या धरणावर 72 मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्प देखील उभारण्यात आलेला आहे. 


28) शिरोटा धरण

पुणे शहरापासून साधारणतः 60 किलोमीटर अंतरावर हे धरण आहे. 1920 साली हे धरण बांधण्यात आले होते. इंद्रायणी नदीवर हे धरण बांधण्यात आलेले आहे. धरणाची उंची ही 38.71 मीटर म्हणजे 127 फूट तर लांबी 2212 मीटर म्हणजे 7257 फूट इतकी आहे. धरणाची एकूण पाणी साठवण्याची क्षमता ही 6.57 टीएमसी म्हणजे 6570 दशलक्ष घनफुट इतकी आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने