कलमोडी धरण || Kalmodi Dam Information in Marathi

कलमोडी धरण || Kalmodi Dam Information in Marathi

धरणाचे नाव- कलमोडी धरण / अरलकलमोडी धरण (Kalmodi Dam / Aralkalmodi Dam)

नदीचे नाव- अरळा नदी

ठिकाण- खेड

जिल्हा- पुणे

Kalmodi Dharan Marathi Mahiti

Kalmodi Dharan Marathi Mahiti

खेड तालुक्यातील कलमोडी गावाजवळ हे धरण आहे. अरळा नदीवर या धरणाचे बांधकाम करण्यात आले असल्याने या धरणाला अरलकलमोडी या नावाने देखील ओळखले जाते. अरळा नदी भीमा नदीची उपनदी आहे.भीमाशंकर परिसरात पडणारे पावसाचे पाणी हा या धरणाचा स्रोत आहे. 2007 साली या कलमोडी धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. 

कलमोडी या धरणाची उंची 40.6 मीटर म्हणजे 133 फूट तर लांबी 104 मीटर म्हणजे 341 फूट इतकी आहे. धरणाची एकूण पाणी साठविण्याची क्षमता 1.51 टीएमसी म्हणजे 1510 दशलक्ष घनफुट इतकी आहे. धरणाला एकूण 8 दरवाजे आहेत. 

कलमोडी धरणाचे पाणी पुढे चासकमान या धरणात अरळा नदीच्या मार्फत जाते. 

कलमोडी धरणाला कसे पोहोचाल?

राजगुरूनगर या शहरापासून हे धरण 42 किलोमीटर अंतरावर आहे. पुणे शहरापासून अरलकलमोडी हे धरण 85 किलोमीटर अंतरावर आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने