भाविना पटेल बायोग्राफी मराठी || Bhavina Patel Biography in Marathi
भाविना हसमुख पटेल संपूर्ण माहिती, टेबल टेनिस खेळाडू, टोकियो पॅराऑलम्पिक पदक विजेती, परिवार आणि करियर (Bhavina patel Tokyo Olympics Silver Medal Winner Biography in Marathi)
भाविना पटेल या भारतीय पॅरा टेबलटेनिस खेळाडू आहेत. व्हीलचेअर वर असताना देखील भारताला टेबल टेनिस मध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकवून दिलेले आहे. भारतासाठी त्यानु यावेळी टोकियो पॅरा ऑलम्पिक मध्ये देखील भाग घेतला होता. यामध्ये त्यांनी जेव्हा सेमिफायनल मध्ये चांगली कामगिरी केली तेव्हाच त्यांना चांगली प्रसिद्धी मिळाली. टोकियो पॅराऑलम्पिक मध्ये त्यांना रौप्यपदक देखील मिळाले. आपल्याला भाविना विषयी विजयाच्या आणि सध्याच्या गोष्टी माहीत आहेत परंतु भाविना यांचे आधीचे आयुष्य आणि त्यांचा संघर्ष आज आपण जाणून घेणार आहोत.
भाविना पटेल बायोग्राफी मराठी - Bhavina Patel Biography in Marathi
संपूर्ण नाव (Full Name)- भाविना हसमुख भाई पटेल
टोपणनाव (NickName) - भाविना
खेळ (Sport)- टेबल टेनिस पॅरा
जन्म तारीख (BirthDate)- 6 नोव्हेंबर 1986
वय (Age)- 34 वर्षे
जन्म स्थळ (Birth Place)- मेहसाना, गुजरात, भारत
पत्ता (Home Town)- मेहसाना, गुजरात, भारत
धर्म (Religion) - हिंदू
जाती (Caste)- गुजराती
कोच (Coach)- ललन दोषी आणि तेजलबेन लाखीया
आवड (Hobbies)- भटकंती
वैवाहिक स्थिती (marriatal Status) - विवाहित
भाविना पटेल यांचे सुरुवातीचे जीवन - Bhavina Patel Early Life
भाविना पटेल यांचे संपूर्ण नाव हे भाविना हसमुख पटेल आहे. 6 नोव्हेंबर 1986 मध्ये गुजरात मधील मेहसाना जिल्ह्यातील सुधीया गावात भाविना यांचा जन्म झाला. भाविना यांचे खेळाप्रति आवड ही खूप चांगली आहे आणि त्या खेळासाठी स्वतःला इतक्या झोकून देत होत्या की त्यामुळे त्या ऑलम्पिक पर्यंत गेल्या आणि विजयी देखील झाल्या. भाविना या एका गुजराती परिवाराचा भाग आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव हे हसमुख भाई पटेल आहे.
भाविना पटेल यांचे शिक्षण - Bhavina Patel Education
भाविना पटेल यांच्या शिक्षणाविषयी अजून इंटरनेटवर जास्त काही माहिती उपलब्ध नाहीये. त्यांचे शिक्षण हे गुजरात मध्येच झाले असावे असा अंदाज आहे.
भाविना पटेल यांचे करियर - Career of Bhavina Patel
भाविना पटेल या टेबल टेनिस खेळाच्या चॅम्पियन आहेत. भाविना यांनी सिंगल आणि डबल दोन्ही प्रकारात मॅच खेळलेल्या आहेत.
ऑक्टोबर 2013 मध्ये झालेल्या Womens single Class 4 at the asian para table tennis championship मध्ये भाविना ने भारतासाठी रौप्यपदक जिंकले होते.
2017 मध्ये चीनमध्ये झालेल्या International Table Tennis Federation Asian Para Table Tennis Championship मध्ये त्यांनी त्यांच्या विरोधी खेळाडूला 3-0 ने पराभूत करत कांस्यपदक जिंकले होते. टोकियो पॅराऑलम्पिक 2020 मध्ये मध्ये भाविना यांनी सेमिफायनल जिंकून फायनल मध्ये प्रवेश केला होता. चीनच्या झुओ यिंग यांच्याविरोधी त्यांना अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागला परंतु त्यांनी सिल्व्हर पदक प्राप्त केले. त्यांनी जगातील दोन नंबरचे पॅराऑलम्पिक खेळाडू झंग मियो यांना देखील सेमिफायनल मध्ये पराभूत केले.
भाविना पटेल- टोकियो पॅराऑलम्पिक 2020 - Tokyo Olympic 2020
भाविना यांनी यावेळी इतिहास बनविला आहे. पॅरा टेबल टेनिस फायनल मध्ये क्लास 4 मध्ये जागा मिळविणाऱ्या भाविना पटेल या पहिल्या भारतीय इंडियन पॅरा खेळाडू आहेत.
भाविना पटेल परिवार - Bhavina Patel Family
भाविना या गुजराती परिवारातील हिस्सा आहेत. त्यांचे वडील हे हसमुख पटेल हे आहेत. त्यांच्या कुटुंबात त्यांची बहीण आणि आई देखील आहेत परंतु त्यांच्याविषयी जास्त माहिती उपलब्ध नाही.
भाविना पटेल यांचे कोच आणि ट्रेनिंग - Bhavina Patel Coaching and Training
भाविना पटेल यांना ललन दोषी आणि तेजलबेन लाखिया यांनी प्रशिक्षण दिले आहे.
भाविना पटेल पती व वैवाहिक जीवन - Bhavina Patels Husband and Married Life
सोशल मीडियावर उपलब्ध असलेल्या माहितीच्या अनुसार त्यांचा विवाह निकुल पटेल यांच्याशी झालेला आहे. ते बिझनेसमन आहेत. त्यांचे पती त्यांना या खेळासाठी सपोर्ट करतात असे त्यांनी एकदा सोशल मीडियावर सांगितलेले आहे.
भाविना पटेल यांच्याविषयी तथ्य - Bhavina Patel Interesting Facts
1) भाविना पटेल या सर्वात प्रसिद्ध पॅरा टेबल टेनिस खेळाडू आहेत.
2) भाविना पटेल यांना प्राणी आवडतात.
3) भाविना यांना फिरायला देखील आवडते.
4) टोकियो पॅराऑलम्पिक 2020 मध्ये रौप्यपदक जिंकले.
FAQ
भाविना पटेल या कोणता खेळ खेळतात?
टेबल टेनिस
भाविना पटेल यांना कोणता आजार आहे?
पोलिओ
भाविना पटेल यांच्या पतीचे नाव काय आहे?
निकुल पटेल
भाविना पटेल यांचे कोच / प्रशिक्षक कोण आहेत?
ललन दोषी आणि तेजलबेन लाखिया