अवनी लेखरा बायोग्राफी मराठी || Avani Lekhara Biography in Marathi
टोकियो पॅराऑलम्पिक मध्ये सुवर्णपदक मिळवणारी ही सुवर्णकण्या अवनी लेखरा! भारताकडून पॅराऑलम्पिक मध्ये सुवर्णपदक जिंकणारी ही पहिली भारतीय महिला ठरली आहे. अवनी लेखरा या शूटर आहेत. त्यांनी टोकियो पॅराऑलम्पिक मध्ये आर-2 महिला गटात 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग एसएच 1 स्पर्धेमध्ये अंतिम सामान्यांपर्यंत जाऊन तिथे विजय मिळविला.
अवनी लेखरा बायोग्राफी मराठी - Avani Lekhra Biography in Marathi
संपूर्ण नाव (Full Name)- अवनी प्रवीण लेखरा
वडील (Father Name)- प्रवीण लेखरा
आई (Mother Name)- श्वेता लेखरा
जन्म तारीख (Birth Date)- 8 नोव्हेंबर 2001
वय (Age)- 20
उंची (Height)- 5 फूट 3 इंच (160 सेमी)
शिक्षण (Education) - वकिली
शहर (City)- जयपूर
खेळ (Sports)- नेमबाजी (shooting)
प्रशिक्षक (Coach)- सुमा सिद्धार्थ शिरूर
अवनी लेखरा जन्म आणि बालपण- Avani Lekhara Birth and Childhood
प्रवीण लेखरा आणि श्वेता लेखरा यांच्या घरात अवनी यांचा जन्म झाला. 8 नोव्हेंबर 2001 रोजी अवनी यांचा जन्म हा जयपूर येथे झाला. अवनी यांचा जन्म झाला तेव्हा त्या अपंग नव्हत्या. वयाच्या 11 व्या वर्षी 2012 साली एक मोठा अपघात झाला. या अपघातात त्यांचा कमरेखालील भाग निकामी झाला आणि अवनी व्हील चेअर ला खिळून राहिल्या. अवनी यांचा हा अपघात झाल्यानंतर देखील त्यांच्या वडिलांनी त्यांना खेळाची आवड जोपासायला प्रोत्साहन दिले.
अवनी लेखरा शिक्षण - Education of Avani Lekhara
अवनी लेखरा यांचे शिक्षण हे राजस्थान मधून झाले. सध्या त्या कायद्याचे म्हणजे Law चे शिक्षण घेत आहेत.
अवनी लेखरा यांचे करियर - Career of Avani Lekhara
अवनी या त्या झालेल्या अपघातानंतर खचून गेल्या होत्या परंतु 2015 साली अभिनव बिंद्रा यांच्याकडून प्रेरणा घेत त्यांनी शूटिंग साठी सुरुवात केली. एकदा त्यांनी या क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये विजेतेपद मिळविले. भारताकडून महिलांमध्ये पॅराऑलम्पिक मध्ये सुवर्ण पदक मिळविणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. त्यांनी शेवटच्या स्पर्धेत 249.6 गुण मिळवत वर्ल्ड रेकॉर्ड सोबत बरोबरी देखील केली आहे.
अवनी यांना महिला गटात 50 मीटर एअर रायफल स्टँडिंग मध्ये कांस्यपदक देखील जिंकले आहे. भारताला पॅराऑलम्पिक मध्ये त्यांनी एकूण 2 पदके जिंकून दिली आहेत. टोकियो पॅराऑलम्पिक 2020 मध्ये अवनी यांना भारताचा ध्वज घेऊन शेवटच्या मिरवणुकीत सन्मान देखील मिळाला.
अवनी यांनी ही कामगिरी करत भारताची मान गर्वाने उंचावली आहे.
शूटिंग खेळात जागतिक क्रमवारी देखील असते. 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 या पॅरा स्पोर्ट्स शूटिंग रँकिंग मध्ये त्या 5 व्या क्रमांकावर आहेत.
अवनी लेखरा यांचे प्रशिक्षक - Coach of Avani Lekhara
सुमा सिद्धार्थ शिरूर हे अवनी लेखरा यांचे प्रशिक्षक आहेत.
आज आपण अवनी लेखरा या भारताच्या सुवर्ण कन्येविषयी माहिती घेतली. Avani Lekhara Biography in Marathi / Avani Lekhara information in Marathi. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट च्या माध्यमातून नक्की कळवा.