आता नंबर प्लेट बदलणार, राज्य नव्हे तर देशाचे नाव येणार! || New Bharat Series BH
आपण आजतागायत एखाद्या वाहनाला त्याच्या नंबरप्लेट वरून कोणत्या राज्यातील आहे हे सहज ओळखत होतो परंतु आता ते अशक्य होणार आहे. भारत सरकारने आता वाहनांची नोंदणी करण्यासाठी नवीन भारत सिरीज किंवा बीएच (BH) सिरीज सुरू केली आहे. म्हणजे आता वाहन कोणत्या राज्याचे आहे हे कळणार तर नाहीच आणि आपल्याला कोणत्याही राज्यात स्थलांतरित झाल्यानंतर देखील आपल्या वाहनाचे पुन्हा पुन्हा रजिस्ट्रेशन हे करावे लागणार नाही. संपूर्ण भारतात वाहनांसाठी एकच रजिस्ट्रेशन सिरीज असेल.
26 ऑगस्ट 2021 रोजी केंद्र सरकारच्या केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक सूचना जारी केली आहे. त्यामुळे आता भारतात राज्यात स्थलांतर करताना वाहनांचे पुन्हा रजिस्ट्रेशन करणे यासारखे काम करावे लागणार नाही. या सुचनेच्या अनुसार भारतात आता भारत सिरीज म्हणजे बीएच सिरीज सुरू करण्यात आली आहे.
भारत सिरीज थोडक्यात - Bharat (BH) series Short Info
विभाग- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
योजनेचे नाव - भारत मालिका (BH) वाहनांची नंबर प्लेट
दिनांक- 28/08/2021
लाभ- भारतीय व्यक्ती
लाभार्थी- संरक्षण कर्मचारी, केंद्र व राज्य सरकार कर्मचारी, केंद्र अंडी राज्य सार्वजनिक उपक्रम कर्मचारी, खाजगी क्षेत्रातील अशा कंपन्या ज्यांचे खाते हे 4 किंवा अधिक राज्यात आहेत.
नोंदणी सुरुवात- 15 सप्टेंबर 2021
संकेतस्थळ- www.morth.nic.in
भारत सिरीज मराठी माहिती - Bharat Series Information In Marathi
वाहन नोंदणी ही नवीन बीएच सिरीज नुसार आता होऊ शकतात. यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, केंद्र आणि राज्य सरकारचे काही उपक्रम त्यासोबत संरक्षण क्षेत्राशी संबंधित आणि खाजगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना ऐच्छिक रूपाने सुरुवातीला हे बीएच सिरीज चे नंबर देण्यात येतील. आता ज्यांची अशी नोंदणी झालेली आहे त्या वाहनांना प्रत्येकी 2 वर्षानंतर मोटार वाहन शुल्क भरावे लागणार आहे. वाहनांची नोंदणी ही केंद्रीय असल्याने तो व्यक्ती देशातील कोणत्याही राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात देखील वाहनांची परत नोंदणी न करता मुक्तपणे वावरू शकणार आहेत.
भारत सिरीज मध्ये देखील 14 वर्षे झाल्यानंतर आपल्या वाहनाला वार्षिक स्तरावर आपल्याला आधीच्या रकमेच्या अर्ध्या रकमेत मोटार वाहन शुल्क भरून नोंदणी करून घ्यावी लागणार आहे. लोक याआधी नवीन राज्यात गेल्यावर नोंदणीसाठी असणारे त्रास लक्षात घेता वाहनांची नोंदणी करून घेत नव्हते. परंतु आता भारत सिरीज असेल तर पुन्हा नोंदणी करण्याचीही गरज नसेल.
खाजगी कंपन्या ज्या 4 किंवा त्याहून अधिक राज्यांमध्ये आहेत त्यांचे कर्मचारी हे या भारत सिरीज चा लाभ घेऊ शकतात.
भारत सिरीज मधील नंबर कसे असतील? (bharat series vehicle in Marathi)
बीएच सिरीज ही आता खालीलप्रमाणे नंबर देत आहेत.
YY BH 4144 XX
आता यामध्ये YY हा रजिस्ट्रेशन साल असेल. म्हणजे 2021 मधील 21 हा अंक तिथे असेल. BH हा भारत सिरीजचा कोड असेल. त्यानंतर 4 अंकी एखादा क्रमांक हा 0000 ते 9999 पर्यंत असेल. शेवट असलेले XX मध्ये AA ते ZZ पर्यंत अक्षरे असतील.
एका गाडीचा नंबर हा 21 BH 1234 MS असा असू शकतो.