अमरावती जिल्ह्याची माहिती || Amravati District Information in Marathi

अमरावती जिल्ह्याची माहिती || Amravati District Information in Marathi

महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा अमरावती हा एक वेगळा जिल्हा निर्माण करण्यात आला. अमरावती जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे महाभारतात देखील या ठिकानाचा उल्लेख आपल्याला आढळतो. मेळघाट व्याघ्रप्रकल्प, चिखलदरा, सेमाडोह प्रकल्प यासारख्या पर्यटन स्थळांनी अमरावती जिल्ह्याला समृद्ध बनवले आहे. याच अमरावती जिल्ह्याविषयी संपूर्ण माहिती मराठीमध्ये (Amravati District Information in Marathi) आपण माहिती जाणून घेणार आहोत. 

AMravati district information in marathi

अमरावती जिल्ह्याचा इतिहास - History of Amravati District

1960 मध्ये महाराष्ट्र  व गुजरात वेगळे झाल्यावर अमरावती हा महाराष्ट्रातील एक जिल्हा बनला.  प्राचीन इतिहासात अमरावती शहराचा उल्लेख महाभारतात आढळतो.महाभारत काळात श्रीकृष्णाने कौंडिण्यपूर या ठिकाणाहून रुक्मिणीचे हरण केले होते. श्रीकृष्णाने हरण करताना अमरावतीच्या एकवीरा देवीच्या तळाखालून ते कौडिण्यपूरपर्यंत भुयार खणले होते ,असे सांगतात.

अमरावती जिल्ह्याची भौगोलिक माहिती- Geographical Information about Amaravati District

अमरावती जिल्हा हा पूर्णपणे दख्खनच्या पठारावर आहे.हा महाराष्ट्रातील उत्तरेकडील जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याचे विभाजन 14 तालुके आणि 6 उपविभाग यांमध्ये करण्यात आले आहे. 


अमरावती जिल्ह्यात कापसाची मोठी बाजारपेठ आहे. हा जिल्हा विदर्भातील महत्वाचा शैक्षणिक दृष्ट्या प्रगतिशील जिल्हा म्हणून ओळखला जातो. सामाजिक क्षेत्रामध्ये या जिल्ह्याचं नाव खूपच अग्रेसर आहे. 

संत गाडगेबाबा ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ,संत गुलाबराव महाराज ,डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन, डॉक्टर पंजाबराव देशमुख आदी महत्वाच्या व्यक्ती या जिल्ह्यात होऊन गेल्या.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 1935 आली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली.अमरावती जिल्ह्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेले चांदूरबाजार  या तहसिलातील माधान हे गाव श्री गुलाबराव महाराजांची कर्मभूमी आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी होणारे दादासाहेब खापर्डे आणि वीर वामन जोशी याच जिल्ह्यातील होते. 1947 साली डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी अमरावतीजवळ तपोवन येथे जगदंबा कुष्ठधामाची स्थापना केली. अमरावती येथील अंबादेवीचे मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे, म्हणून डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी मंदिर प्रवेश चळवळ सुरू केली. 1932 चाली त्यांनी अमरावती येथे श्रद्धानंद छात्रालय व शिवाजी शिक्षण समितीची स्थापना केली. शिवाजी शिक्षण समिती आज विदर्भातील अग्रणी शिक्षण संस्था आहे.

अमरावती जिल्ह्यातील पर्यटन स्थळे - Tourist Places in Amaravati District 

चिखलदरा :  अमरावती शहरा पासून 90 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.समुद्रसपाटीपासून 36 हजार फूट उंचीवर सातपुड्याच्या कुशीत वसलेले आहे.चिखलदऱ्याच्या परिसरात किचकदरा ,मेळघाट व्याघ्र प्रकल्प ,कोलखास आणि सेमाडोह निसर्गरम्य स्थळे आहेत.

नरनाळा किल्ला ,पंडित नेहरू बॉटनिकल गार्डन इत्यादी वृक्ष आकर्षणाची ठिकाणे आहेत. अलीकडच्या काळात चिखलदरा हे ठिकाण" पॅराग्लायडिंग" साठी हळूहळू उदयास येत आहे. भारतात पॅराग्लायडिंग मोजक्याच ठिकाणी होते. महाराष्ट्रातील हे तिसरे ठिकाण आहे असे म्हणतात.

सालबर्डी चे पर्यटन स्थळ मोर्शी पासून 8 किलोमीटर अंतरावर आहे. येथे महादेवाचे जागृत देवस्थान आहे आणि महानुभाव पंथाचे प्रसिद्ध मंदिर ही येथील काही ठळक आकर्षण आहेत.  


अमरावती जिल्ह्यातील धार्मिक स्थळे - Temples in Amravati District

विदर्भाची प्राचीन राजधानी कुंडीनपूर हे प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. दरवर्षी कार्तिक पौर्णिमेस येथे मोठी यात्रा भरते. रिद्धपूर हे महानुभाव पंथीयांचे प्रमुख तिर्थस्थळ आहे. बहिरा अचलपुर तालुक्यातील बहीरम हे देवस्थान खूप प्रसिद्ध आहे.  येथे  बहिरम म्हणजेच भैरव या देवाची पूजा केली जाते. याशिवाय येथे साडेसहा फूट उंच गणेशमूर्ती देखील आहे. या मंदिरासमोर सहा टन वजनाची घंटा आहे. हे मंदिर सुमारे एकशे पंचवीस फूट उंचीवर आहे.सातपुड्याच्या कुशीतील हे ठिकाण महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमेवर आहे. 

अमरावती शहरात आणखी काही पर्यटन व प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यामध्ये अंबा देवी मंदिर ,एकविरा देवी मंदिर, बांबू उद्यान , श्रीक्षेत्र कोंडेश्वर छत्री तलाव आणि वडाळी तलाव आहे.या जिल्ह्यात 10 अभियांत्रिकी महाविद्यालय आहे.याशिवाय श्री हनुमान व्यायाम  प्रसारक मंडळ अमरावती ही शारीरिक शिक्षण क्षेत्रात जागतिक मान्यता असलेली संस्था आहे. ते अमरावतीचे भूषण देखील आहे. जागतिक दर्जाच्या खेळ सुविधा येथे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. येथे शारीरिक शिक्षणाचा पदवी अभ्यासक्रम चालवला जातो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने