महत्वाचे पुरस्कार 2020-21 || Important Awards of 2020-21 in Marathi
भारतातील आणि जगातील 2020-21 साली दिले गेलेलं महत्वाचे पुरस्कार आज आपण या लेखाच्या माध्यमातून बघनार आहोत. यात तुम्हाला पुरस्कार, विजेता आणि पुरस्कार देण्याचे कारण याविषयी सविस्तर माहिती ही मिळणार आहे. स्पर्धा परीक्षांचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्हाला हा व्हिडीओ अतिशय उपयुक्त ठरेल.
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार -
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा लोकमान्य टिळक ट्रस्ट कडून देण्यात येतो. 2021 सालचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा 'डॉ सायरस पुनावाला' यांना देशातील आरोग्य क्षेत्रात तसेच लस निर्मितीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल देण्यात आला आहे.
डॉ ए पी जे अब्दुल कलाम शास्त्रज्ञ पुरस्कार-
भारताचे 11 वे राष्ट्रपती असणारे डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या नावाने दिला जाणार हा डॉ ए पी जे अब्दुल कलाम शास्त्रज्ञ पुरस्कार आहे. अमित केसरवानी यांना डॉ ए पी जे अब्दुल कलाम शास्त्रज्ञ पुरस्कार देण्यात आला आहे. वैज्ञानिक विकास, मानवता आणि विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी योगदानाची मान्यता म्हणून त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रख्यात अभियंता पुरस्कार 2020-
प्रख्यात अभियंता पुरस्कार म्हणजे Eminent Engineer Award 2020 हा रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) असणारे व्ही के यादव यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
IGBC सुवर्ण प्रमाणपत्र मिळविणारे महाराष्ट्रातील पहिले रेल्वे स्थानक-
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)
IGBC - indian green building council
महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2020-
हा पुरस्कार आरोग्यसेवा, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोक प्रशासन, विज्ञान, समाजसेवा या क्षेत्रांत केलेल्या विशेष योगदानाबद्दल देण्यात येत असतो. आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2020 ने सन्मानित करण्यात आले आहे.
2000 मध्ये आशा भोसले यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, 5 मे 2008 रोजी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
SKOCH मुख्यमंत्री पुरस्कार-
वाय एस जगनमोहन रेड्डी (आंध्रप्रदेश)
जागतिक शिक्षक पुरस्कार 2020-
या पुरस्कारामध्ये 7 कोटी रुपये देखील मिळत असतात. याला ग्लोबल टीचर अवॉर्ड असे म्हणले जाते. सोलापूर मधील रणजितसिंग डिसले यांना हा पुरस्कार मिळाला आहे. भारताला हा सन्मान पहिल्यांदा मिळाला आहे. क्यू आर कोड वापरलेली पुस्तके ही एक वेगळी संकल्पना त्यांनी राबवली असून तिचा फायदा पूर्ण देशातील विद्यार्थ्यांना होत आहे.
तानसेन सन्मान 2021-
पंडित सतीश व्यास यांना तानसेन सन्मान 2021 ने सन्मानित करण्यात आले आहे. महान शास्त्रीय संगीतकार तानसेन यांचा सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.
वरिष्ठ वैज्ञानिक पुरस्कार 2020-
वरिष्ठ वैज्ञानिक पुरस्कार 2020 म्हणजे Senior Scientist 2020 पुरस्काराने डॉ समीर डमारे यांना सन्मानित करण्यात आले.
कलिंगा रत्न सन्मान 2020-
विश्वभूषण हरीचंदन (आंध्रप्रदेश राज्यपाल)
सरस्वती सन्मान 2020-
डॉ शरणकुमार लिंबाळे यांना सरस्वती सन्मान 2020 हा पुरस्कार देण्यात आला आहे. के के बिरला फाउंडेशन कडून हा पुरस्कार देण्यात येतो. देशातील 22 भाषांमध्ये असलेल्या पुस्तकांचे अवलोकन करून दरवर्षी एका व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येतो.
व्यास सन्मान 2020-
व्यास सन्मान हा ज्ञानपीठ पुरस्कारानंतर साहित्य क्षेत्रातील दुसरा सर्वोच पुरस्कार आहे. के के बिरला फाउंडेशनने या पुरस्काराची सुरुवात 1991 मध्ये केली. शरद पगारे यांना व्यास सन्मान 2020 मिळाला आहे.
एशियामनी बेस्ट बँक पुरस्कार 2021-
HDFC बँक
साहित्य गौरव सन्मान 2021-
रमेश पोखरियाल
ई- गव्हर्नस साठी स्कॉच चॅलेंजर पुरस्कार-
आदिवासी व्यवहार मंत्रालय
ऑस्कर 2021 मधील सर्वोत्कृष्ट चित्रपट-
Nomadland
2020 जगातील ट्री सिटी-
हैद्राबाद
सुभाषचंद्र बोस आपदा प्रबोधन पुरस्कार 2021-
डॉ राजेंद्र भंडारी
जागतिक अन्न पुरस्कार 2021-
डॉ. शकुंतला हरकसिंघ
वाईल्ड इनोव्हेटर अवॉर्ड 2021-
डॉ क्रिती के कारंथ (पहिल्या आशियाई महिला)
फॉर्ब्स द्वारे जगातील सर्वोत्तम बँक -
DBS बँक
सर्वोत्तम राज्य निवडणूक आयोग-
गुजरात
सर्वोत्तम राज्य वित्त आयोग-
केरळ
2020 चा ऑक्सफर्ड हिंदी शब्द-
आत्मनिर्भरता
अमेरिकन लिजन ऑफ एक्सलांस अवॉर्ड 2021-
नरेंद्र मोदी
AIFF पुरुष फुटबॉलर ऑफ इअर-
संदेश झिंगण
अखिल भारतीय फुटबाल महासंघ (All India Football Federation)
स्थापना- 23 जून 1937
अध्यक्ष- प्रफुल्ल पटेल
उपाध्यक्ष- सुब्रता दत्ता
मुख्यालय- नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक 2021-
डेव्हिड डिओप - At Night All Blood Is Black
International Booker Prize 2021 हा पुरस्कार इंग्लिश मध्ये अनुवादित आणि युके किंवा आयर्लंड मध्ये प्रकाशित केलेल्या एका पुस्तकासाठी दरवर्षी पुरस्कार दिला जातो.
2020 साली हा पुरस्कार मेरिके लुकास रिजनवेल्ड यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
ई- पंचायत पुरस्कार 2021-
उत्तरप्रदेश राज्याला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. या यादीत आसाम आणि छत्तीसगड हे राज्य दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.
नेल्सन मंडेला जागतिक मानवतावादी पुरस्कार 2021-
रुमाना सिन्हा सहगल
विविध साहित्य पुनर्वापर करून हिरवी उत्पादने आणि नॉन बायो डिग्रेडेबल साहित्य करण्याच्या योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय रेंजर पुरस्कार-
महिंदर गिरी (श्रेणी अधिकारी: राजाजी व्याघ्र प्रकल्प - उत्तराखंड)
WHO महासंचालक विशेष पुरस्कार 2021-
हर्षवर्धन (माजी आरोग्य मंत्री)
न्यूयॉर्क सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2021 - सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार-
अनुपम खेर ( लघुपट - Happy Birthday)
2020 गांधी शांती पुरस्कार-
शेख मुजीबुर रहमान यांना त्यांच्या उत्कृष्टतेची ओळख सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात योगदान, अहिंसक आणि इतर गांधीवादी पद्धती माध्यमातून परिवर्तन कार्यासाठी गांधी शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
2021 चे वन्यजीव छायाचित्रकार-
रॉबर्ट इर्विन
VLCC फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2020-
मनसा वाराणसी (तेलंगणा)
जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण नेतृत्व पुरस्कार-
नरेंद्र मोदी
51 वा दादासाहेब फाळके पुरस्कार-
रजनीकांत
Order of Rising Sun पुरस्कार-
श्यामला गणेश (जपानी शिक्षक)
युनेस्को जागतिक प्रेस स्वातंत्र्य पारितोषिक 2021-
मारिया रेसा
वर्ल्ड कोरिओग्राफी पुरस्कार 2020 ने सन्मानित भारतीय-
सुरेश मुकुंद (पहिले भारतीय)
69 व्या मिस युनिव्हर्स 2020-
अँड्रीया मेझा
2021 च्या ICC हॉल ऑफ फेम मध्ये नाव असलेला भारतीय-
विनू मंकड
जीडी बिरला सन्मान-
सुमन चक्रवर्ती
इंटरनॅशनल बिझनेस बुक ऑफ द इअर पुरस्कार 2021-
नितीन राकेश आणि जेरी विंड
युरोपियन आविष्कारक पुरस्कार 2021-
सुमिता मित्रां
जागतिक अन्न पुरस्कार 2021-
शकुंतला हर्क
आर्लाईन पॅच ग्लोबल व्हिजन पुरस्कार 2021-
गीता मित्तल ( जम्मू काश्मीर हाय कोर्टच्या माजी सरन्यायाधीश आणि हा पुरस्कार मिळविणाऱ्या पहिल्या भारतीय न्यायाधीश)
बीबीसी जीवन गौरव पुरस्कार-
अंजु बॉबी जॉर्ज
बीबीसी इंडियन स्पोर्टवूमन ऑफ द इअर-
कोनेरू हंपी (बुद्धिबळ)
बीबीसी उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार- (Emerging Player)
मनू भाकर (नेमबाज)