रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रेरणादायी कथा । Short Stories of Ravindranath Tagore in Marathi
महान कवी आणि लेखक रवींद्रनाथ टागोर यांनी खूप गोष्टी लिहिलेल्या आहेत. या कथा फक्त मुलांचे मनोरंजन करत नाहीत तर एक चांगली शिकवण देखील देतात. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या काही कथांमधून छोट्या आणि प्रेरणादायी अशा कथा आज आपल्यासमोर सादर करत आहे. या कथा खास करून मुलांसाठी लिहिलेल्या आहेत परंतु प्रत्येक वयाचा व्यक्ती यातून शिकवण घेऊ शकतो.
आम्ही मुलांसाठी मराठी कथांची एक मालिका बनवलेली आहे तुम्ही ती देखील बघू शकता.
Ravindranath Tagore short stories in Marathi
तसे बघायला गेले तर रवींद्रनाथ टागोर यांनी खुप साऱ्या प्रसिद्ध कविता, कादंबऱ्या आणि गोष्टी लिहिलेल्या आहेत परंतु त्यांनी लिहिलेल्या छोट्या गोष्टी या नक्कीच मुलांना प्रेरणा देणाऱ्या होत्या. आम्ही आमच्याकडून त्या सर्व कथा तुमच्यापर्यन्त पोहोचवण्याचा एक प्रयत्न करतो आहे.
चला तर मग सुरुवात करूयात - A Short Story by Ravindranath Tagore!
1. लालची कुत्रा
एका जंगलात सर्व प्राणी खूप आनंदात राहत होते. त्या जंगलात एक कुत्रा देखील होता. तो कुत्रा खूप जास्त लालची होता. त्याला जितके काही खायला मिळत असे ते त्याला कमी पडत होते. कुत्रा कायम इतर प्राण्यांना उल्लू बनवून त्यांचे अन्न देखील स्वतः खात असे.
सर्व प्राणी त्या कुत्र्यामुळे खूप त्रासले होते. एकदा खूप कडाक्याचे ऊन असताना सर्व प्राण्यांनी ठरवले की या कुत्र्याला चांगली शिक्षा द्यायची. त्यासाठी त्यांनी एक प्लॅन देखील बनवला. सर्व प्राण्यांनी एक मीटिंग बोलावली आणि त्यात कुत्र्याला देखील बोलावले. सर्व प्राणी बोलत होते की तलावाच्या जवळ एक नवीन कुत्रा आला आहे आणि त्याच्याकडे भरपूर अन्न आहे. जो कोणी त्या कुत्र्याला पराभूत करेल त्याला सर्व अन्न मिळेल अशी चर्चा सुरु होती.
प्राण्यांच्या या चर्चा ऐकून तो लालची कुत्रा खूप खुश झाला. त्याला वाटले की त्या कुत्र्याला सहज उल्लू बनवून तो त्याचे अन्न काढून घेईल, हे तर त्याच्या डाव्या हाताचा खेळ आहे. तो कुत्रा लगेच तलावाकडे जायला लागला, त्याला वाटेत एक हाड पडलेले आढळले. त्याने ते हाड देखील उचलले आणि तो वेगाने तलावाकडे गेला.
जेव्हा त्याने तलावात डोकावून बघितले तेव्हा त्याला एक कुत्रा तोंडात हाड घेऊन दिसला. हा कुत्रा त्या तलावातील कुत्र्यापासून त्याचे हाड हिसकावून घेऊ इच्छित होता. त्यामुळे त्याने कसलाही विचार न करता त्या कुत्र्याला मारण्यासाठी तलावात उडी मारली. तलावात उडी मारल्यावर त्याला अंदाज आला की तो कुत्रा नव्हता तर त्याच प्रतिबिंब होते. परंतु तोपर्यंत उशीर झालेला होता. तो कुत्रा बुडायला लागला आणि अखेरीस त्याचा बुडून मृत्यू झाला.
शिकवण- लालच ही नेहमी वाईट फळ देते.
2. तहानलेल्या कावळ्याची कथा
खूप भयंकर तापमान असणारा तो दिवस होता. सर्व लोक उन्हाने आणि गरमीने त्रस्त झाले होते. याच उन्हाळ्याच्या दिवसात एक कावळा देखील त्रस्त होऊन इकडे तिकडे भटकत होता. त्याला खूप जोराची तहान लागली होती. परंतु त्याला कुठेच पाण्याचा काहीच स्रोत सापडत नव्हता.
कधी तो कावळा विहिरीच्या शोधात असे तर कधी तो एखादे मडके तरी भेटते का हे शोधत होता. खूप फिरून देखील त्याला पाणी मिळाले नाही. इतक्या वेळ पाण्याच्या शोधत भटकल्याने तो थकला आणि एका झाडावर जाऊन बसला.
कावळा खूप जास्त थकला होता. जेव्हा तो निराश होऊन झाडावर बसला तेव्हा त्याला एका घराच्या समोर एक मडके दिसले. कावळा पटकन उडून त्या घड्याच्या जवळ जाऊन बसला. त्याला त्या घड्यात म्हणजेच मडक्यात थोडेसे पाणी दिसले परंतु ते तळाला होते. त्या कावळ्याची चोच तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हती. त्यामुळे त्याने पाण्याला वर आणण्यासाठी एक युक्ती केली.
त्याने एक एक करत दगड त्या घड्यामध्ये टाकायला सुरुवात केली. दगड टाकल्याने त्या घड्यात असलेले पाणी हळू हळू वर आले. कावळ्याने ते पाणी पिऊन तहान भागवली.
शिकवण- प्रयत्न करणाऱ्यांचा पराभव कधीच होत नाही.
3. कष्टाळू मुंगीची कथा
एकेकाळी एका गावामध्ये एक मुंगी आणि एक नाकतोडा (टोळ) रहात होते. दोघेही खूप चांगले मित्र होते आणि सोबत ते खूप मस्ती करत असत. ती मुंगी खूप जास्त कष्टाळू आणि मेहनती होती. याउलट तो नाकतोडा खुप जास्त आळशी होता, त्याला काम करणे आवडत नसे. तो संपूर्ण दिवस इकडे तिकडे फक्त भटकतच असे.
अशात बघता बघता उन्हाळ्याचे दिवस आले. उन्हाळा बघून दोघेही मुंगी आणि नाकतोडा खुश झाले. मुंगी मस्ती कमी करत खाण्यासाठी काहीतरी गोळा करायला सुरूवात केली. तर तो नाकतोडा अजूनही मस्तीच करत राहिला. तो मुंगीला म्हणत असे की बघा तुम्ही किती मेहनत करताय आणि आम्ही तर किती खुश आहोत आणि मस्ती करतोय.
नाकतोड्याच हे बोलणे ऐकून मुंगी उत्तर देते की आम्ही हे हिवाळ्याची तयारी म्हणून गोळा करतोय जेणेकरून आम्हाला तेव्हा मेहनत करावी लागणार नाही. हे ऐकून नाकतोडा त्या मुंग्यांचा मजाक उडवतो आणि त्यांच्यावर हसतो.
काळ उलटला आणि उन्हाळा जाऊन आता हिवाळा सुरू झाला. हिवाळ्यात सर्व मुंग्या त्यांच्या वारुळात बसून अन्न घेत होत्या आणि मस्ती करत होत्या. बाहेर तो नाकतोडा थंडीने कुडकुडत बसलेला होता. मुंग्यांना त्या नाकतोड्याची दया आली आणि त्यांनी त्याला वारुळात बोलावले. नाकतोड्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने त्या मुंग्यांची देखील माफी मागितली.
शिकवण- कष्टाचे फळ हे मधुरच असते.
4. मूर्ख माकडाची गोष्ट
खूप वर्षांपूर्वी एक खूप प्रसिद्ध व्यापारी हा रामपूर नावाच्या छोट्याश्या गावातून प्रवास करत होता. त्या व्यापाऱ्याकडे एक सुंदर आणि छोटे माकड होते. व्यापारी त्या माकडाला स्वतःचा मित्र समजत असे आणि तो सतत त्याच्या सोबतच असे. ते माकड त्या व्यापाऱ्याने सांगितलेली प्रत्येक गोष्ट ऐकून घेऊन समजून घेत असे.
परंतु त्याची बुद्धी आणि विचार करण्याची शक्ती ही माकडासारखीच होती. उन्हाळ्याच्या दिवसात व्यापारी जेवण करून आरामात झोपला होता. त्याचे माकड देखील त्याच्याच शेजारी झोपलेले होते. तो व्यापारी झोपलेला होता तेव्हा त्याच्या नाकावर एक माशी उडत उडत येऊन बसली. माशीच्या आवाजाने त्या व्यापाऱ्याची झोप मोडत होती त्यामुळे तो पुन्हा पुन्हा तिला हकलण्याचा प्रयत्न करत होता. तो आवाज ऐकून ते माकड देखील उठले आणि त्याने देखील त्या माशील हकलण्याचा प्रयत्न केला.
ती माशी खूप जास्त जिद्दी होती! ती पुन्हा पुन्हा त्या व्यापाऱ्याच्या नाकावरच जाऊन बसत असे. माकड पुन्हा पुन्हा त्या माशीला हकलण्याचा प्रयत्न करत असे. तो कधी हवेने त्या माशीला हकलत असे तर कधी आवाज करून!
असंख्य प्रयत्न करून देखील तो त्या माशीला हकलवू शकला नाही. जेव्हा ती माशी व्यापाऱ्याच्या नाकावर होती तेव्हा त्या माकडाने तिला एकाच टोल्यात हतोड्याने मारायचा विचार केला. शेजारी असलेला हातोडा त्याने उचलला आणि जोरात त्या व्यापाऱ्याच्या नाकावर मारला. याने ती माशी तर मेली नाही परंतु त्या व्यापाऱ्याचे नाक मात्र तुटले!
शिकवण- मूर्खांशी मैत्री कधीच चांगली नसते, त्याने आपण स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतो.
5. कोल्ह्याला द्राक्षे आंबट
एका जंगलात सर्व प्राणी गुण्यागोविंदाने रहात होते. त्या जंगलात एक खूप मोठे आणि फळे लागलेलं द्राक्षाचे झाड होते. त्या झाडाचे द्राक्ष हे खूप गोड आणि मधुर होते. असे वाटत होते की ते द्राक्ष नाहीत तर अमृत आहेत!
सर्व प्राणी ते द्राक्ष खाऊन खूप जास्त आनंदी होत असत. त्या झाडाविषयी ऐकून एक कोल्हा देखील त्या झाडाच्या जवळ येऊन पोहोचला. द्राक्ष खाण्यासाठी तो खूप उद्या मारू लागला. परंतु ते द्राक्षाचे झाड हे उंच होते.
त्याच्या असंख्य प्रयत्नांनंतर देखील त्याला ते द्राक्ष हाताशी लागले नाही. त्याने त्याला ते द्राक्ष न मिळाल्याने तो म्हणायला लागला की मला द्राक्ष खायचेच नाहीत, ते तर आंबट आहेत!
शिकवण - नाचता येईना अंगण वाकडे
लोकांना एखादी गोष्ट मिळाली नाही तर लोक त्याच्यात दोष दाखवला लागतात.
