युट्युब (YouTube) चा शोध कोणी लावला? || YouTube History Marathi

युट्युब (YouTube) चा शोध कोणी लावला? || YouTube History Marathi

आम्हाला खात्री आहे कि आपल्यापैकी खूप सारे लोक असे असतील ज्यांना माहित देखील नसेल कि युट्युबचा (YouTube) शोध कोणी आणि कधी लावला आहे? मित्रानो युट्युब हा एक ऑनलाईन व्हिडीओ शेअरिंग साठी बनलेली गोष्ट आहे. यालाच आपण जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्च इंजिन देखील म्हणू शकतो.गुगल नंतर हेच एक ठिकाण आहे जिथे तुम्ही कोणत्याही क्षेत्राशी निगडीत माहिती हि व्हिडिओ स्वरुपात बघू शकता आणि शेअर देखील करू शकता.

युट्युब (YouTube) चा शोध कोणी लावला? || YouTube History Marathi

युट्युब च्या माध्यमातून आपण लाईक आणि कमेंट देखील देऊ शकतो. युट्युब वरून पैसे देखील कमावता येतात. युट्युब वरून पैसे कसे कमवायचे?

अशा असंख्य गुणांनी भरपूर असलेली वेबसाईट कधी आणि कोणी सुरु केली याविषयी तुम्हाला माहिती आहे का? जर नसेल माहित तर आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण याविषयी जाणून घेणार आहोत.

युट्युब काय आहे? What  is YouTube?

युट्युब (YouTube) हि एक ऑनलाइन व्हिडीओ शेअरिंग वेबसाईट आहे ज्यावर आपण मोफत असंख्य व्हिडीओ बघू शकतो. जर तुमच्याकडे काही कला असेल तर तुम्ही त्याच्या व्हिडीओ देखील तिथे अपलोड करू शकता. या platform ला PayPal च्या तीन जुन्या कर्मचाऱ्यांनी सुरु केले. त्यांनी युट्युब ची सुरुवात हि अमेरिकेमधून केली.

YouTube चे मुख्यालय हे San Bruno, कॅलिफोर्निया इथे स्थित आहे. युट्युब (YouTube) तुम्हाला व्हिडीओ अपलोड करणे, शेअर करणे, कमेंट करणे, लाईक करणे, रिपोर्ट करणे आणि सबस्क्रायबर मिळवणे या सुविधा देते.

यात तुम्ही कोणत्याही क्षेत्राच्या विषयी जसे कि शिक्षण, स्वास्थ्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, व्यवसाय, टीव्ही शो, चित्रपट, डोक्युमेंट्री आणि असंख्य इतर व्हिडीओ टाकू शकतात. 

युट्युब (YouTube) चा शोध कोणी लावला?

युट्युब YouTube चा शोध हा PayPal मध्ये काम करणाऱ्या तीन व्यक्तींनी लावला. त्यांची नावे Chad Hurley, Steve Chen, Jawed Karim होय. YouTube ची सुरुवात हि San Bruno, कॅलिफोर्निया मध्ये फेब्रुवारी 2005 मध्ये झाली.

युट्युबचे CEO कोण आहे?

सध्याच्या काळात सीईओ हे Susan Wojcicki हे आहेत. युट्युब ची एक वर्षाची कमाई हि 15 बिलियन पेक्षा जास्त आहे. हि आकडेवारी गुगल ने 3 फेब्रुवारी 2020 रुजी स्वतः समोर आणली.

युट्युबचा शोध कधी लागला?

युट्युब ची सुरुवात हि १४ फेब्रुवारी म्हणजेच वेलंटाइन डे च्या दिवशी अमेरिकेतील San Bruno California मध्ये झाला.

युट्युबचा शोध कसा लागला?

चाड हर्ले, स्टीव्ह चेन आणि जावेद करीम या PayPal च्या तीन जुन्या कर्मचाऱ्यांनी 14 फेब्रुवारी 2005 रोजी सैन ब्रुनो कॅलिफोर्निया येथे YouTube ची सुरुवात केली. तिघांच्याही शिक्षणाविषयी माहिती म्हणजे Chad यांनी पेन्सिल्वेनिया मधील इंडियाना युनिव्हर्सिटी मधून designing विषयी शिक्षण घेतलेले होते. जावेद आणि स्टीव्ह यांनी युनिव्हर्सिटी ऑफ इलेनोइस उर्बना चैम्पिगन येथून कॉम्प्युटर सायन्स केले होते.त्यांना त्यांच्या क्षमतेची जाणीव होती फक्त एकदा त्याला चालना मिळण्याची गरज होती, म्हणून त्यांनी PayPal मध्ये सुरुवातीला जॉब देखील केला.

युट्युबच्या सुरुवात होण्यामागील गोष्ट 

युट्युबच्या सुरुवातीच्या पाठीमागे खूप सुंदर गोष्ट जोडलेली आहे. युट्युब च्या फाऊनडर ने एकदा त्यांच्या मुलाखतीत ती सांगितलेली आहे.

जावेद करीम सांगतात कि युट्युब बनवायच्या मागे आयडिया हि दोन व्हिडीओ शोधायला झालेल्या त्रासामुळे आली. Janet Jackson यांची 2004 साली आलेली super bowl inccident हि व्हिडीओ त्यांना बघायची होती. यात स्टेज परफॉर्मन्स करत असताना jackson यांचे काही शरीर एक्स्पोज झाले होते.

दुसरा व्हिडीओ हा 2004 मध्ये हिंद महासागरात आलेल्या सुनामीचा होता. त्यांना या दोन्ही व्हिडीओ न मिळाल्याने त्यांना एक व्हिडीओ शेअरिंग platform बनवायची आयडिया मिळाली.

एका दुसऱ्या माहिती अनुसार युत्त्यूब बनवायचा विचार Founders Chad आणि Stev यांच्या मनात 2005 च्या सुउर्वातीच्या महिन्यांमध्ये आला होता. हि आयडिया त्यांना Stev यांच्या घरी सुरु असलेल्या एका डिनर पार्टी दरम्यान आली. या पार्टी दरम्यान अनेक व्हिडीओ बनवल्या गेल्या आणि त्या शेअर करण्यासाठी खूप समस्या आल्या, यातूनच एक व्हिडीओ शेअरिंग platform बनवायची आयडिया आली. हि अशी वेबसाईट असणार होती जिथे लोक कमीत कमी त्यांच्या व्हिडीओ शेअर तरी करू शकतील.

आणखी एक गोष्ट समोर येते त्यात चैन आणि हार्ले सांगतात कि युट्युब सुरु करण्याची प्रेरणा एका ऑनलाईन डेटिंग व्हिडीओ वेबसाईट वरून मिळाली ज्याचे नाव hot and not होते. या वेबसाईटवर सुंदर स्त्रियांना एक आकर्षक व्हिडीओ अपलोड करून त्याबदल्यात त्यांना $100 दिले जात असत. यातच बदल करत काहीतरी सुरु करावे हि कल्पना त्यांच्या डोक्यात होती. 

युट्युबच्या नावातील वाद 

कोणतीही गोष्ट वाद न होता सुरु होत असेल तर त्याच्या सफलतेत काही अर्थ राहत नाही किंवा ती सफलच होत नाही. अशाच प्रकारे युट्युबची सुरुवात देखील वादामध्येच झाली. आणि तेव्हा वेबसाईटची सुरुवात ही utube.com या मिळत्याजुळत्या डोमेन मधून झाली.

utube चे मालक असणारे universal tube rollforn equipment यांनी YouTube वर दावा ठोठावला. दाव्याचे कारण हे होते कि youtube चे युझर हे स्पेलिंग मिस्टेक मुळे utube.com वर जात होते. यामुळे utube वर जास्त ट्राफिक येऊन ओव्हरलोडिंग होत होती. पुढे जाऊन utube ने त्यांचे डोमेन नेम बदलत ते www.utubeonline.com ठेवले.

युट्युबला कोणी किती किमतीत विकत घेतले?

युट्युबला गुगलने नोव्हेंबर 2006 मध्ये खरेदी केले. गुगल ने युट्युबच्या संस्थापक सदस्यांना आणि गुंतवणूकदारांना $1.65 बिलियन इतकी रक्कम दिली. तेव्हा पासून युट्युब हि गुगलच्या सह कंपनी म्हणून काम करते आहे.

युट्युब पैसे कसे कमावतो?

युट्युब आपल्याला काही काळापूर्वी सर्व काही free मध्ये देत होते आता काही पैसेद युट्युब घेते परंतु तरी देखील आपल्या मनात प्रश्न असतो कि युट्युब स्वतः पैसे कसे कमावते. आपण युट्युब वर ads बघत असतो तेव्हा युट्युब त्या ad दाखवण्यासाठी काही रक्कम त्या creator ला देऊन स्वतःला त्याचा काही हिस्सा ठेवते आणि पैसे कमावते.

युट्युबची सर्वात मोठी व्हिडीओ कोणती आहे?

युट्युब वर असणाऱ्या सर्वात लांबीच्या म्हणजे मोठ्या व्हिडीओ चे नाव हे "the longest video on YouTube" आहे. हि व्हिडीओ 566 तास 31 मिनिट 21 सेकंद इतकी मोठी आहे. हि व्हिडीओ तुम्हाला पूर्ण बघायची असेल तर जवळपास 25 दिवस तुम्हाला लागतील.

युट्युब वर सर्वात पहिला व्हिडीओ कोणाचा होता?

युट्युब वर असणारा पहिला व्हिडीओ हा युट्युबचे co-founder असणाऱ्या जावेद करीम यांनी टाकला होता. 23 एप्रिल 2005 रोजी त्यांनी "ME AT THE ZOO" या नावाने टाकला होता. हा व्हिडीओ त्यांनी SAN DIEGO ZOO नावाच्या प्राणी संग्रहालयात रेकॉर्ड केला होता.

युट्युब इतके जास्त प्रसिद्ध का आहे?

जेव्हा कधी आपल्याला व्हिडीओ बघावी वाटते तेव्हा सर्वात आधी आपल्यासमोर नाव येते ते म्हणजे युट्युब! इथे आपल्याला शिक्षण पासून ते मनोरंजन पर्यंत सर्व विषयांच्या व्हिडीओ सहज मिळतात. 

हे सर्व काही आपल्याला मोफत मिळत असते आणि जर तुमच्याकडे काही असेल तर ते तुम्ही इतरांपर्यंत सहज पोहोचवू शकता. युट्युबच्या माध्यमातून आपल्याला पैसे देखील कमावता येतात. त्यामुळे लोक पैशासाठी देखील युट्युब कडे बघतात. काही लोक तर सध्या युट्युब कडे करियर च्या संधी म्हणून देखील बघत असतात.

आज आपण काय शिकलो?

मित्रानो आज आपण युट्युब च्या शोधाच्या विषयी सर्व काही माहिती जाणून घेतली आहे. आम्हाला आशा आहे कि तुम्हाला हे आर्टिकल युट्युब (YouTube) चा शोध कोणी, कधी आणि कसा लावला? आवडले असेल. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने