Raw Agent कसे बनतात? । How to become a RAW agent?
जेव्हा कधी आपण RAW Agents विषयी ऐकत असतो तेव्हा जेम्स बॉण्ड सारखी फिलिंग आपल्याला येत असते. तेच थ्रिल, स्किल्स आणि पॅशन आपल्याला दिसायला लागतात. RAW Agents देखील आपल्यासाठी जेम्स बॉण्ड सारखेच असतात. हे लोक देशाला कोणत्याही संकटातून वाचवायचे असेल तर स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाहीत. आपल्या देशाच्या सुरक्षेमध्ये यांचे योगदान हे खूप जास्त मोठे असते.
रवींद्र कौशिक, आर एन काओ, अनिल दसमाना, अजित डोवाल, रवींद्र सिंग आणि एम के धार हे काही असे नाव आहेत ज्यांना देशाचे खरे हिरो म्हणता येईल. कारण हे त्या जेम्स बॉण्ड पेक्षा कमी नाहीत, कारण हे देखील ग्रेट Raw Agents आहेत. अशात जर तुम्ही देखील Raw Agents ला स्वतःचे idol (आदर्श) समजत असाल आणि स्वतः देखील raw agent बनून देशाच्या सुरक्षेसाठी उभे राहू इच्छिता तर तुम्हाला हे जाणून घ्यायला हवे की RAW Agent कसे बनता येते. सोबतच RAW agent म्हणून काम करण्यासाठी तुम्हाला काय गोष्टी गरजेच्या असतात. या सर्व गोष्टी या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे.
RAW म्हणजे काय?
RAW ही भारताची एक गुप्तचर संघटना आहे. RAW चा फुल फॉर्म आहे Research and Analysis Wing! यालाच अनुसंधान और विश्लेषण विंग म्हणून देखील ओळखले जाते. RAW ही भारताची आंतरराष्ट्रीय गुप्तचर संघटना आहे. RAW ची स्थापना ही 1968 मध्ये करण्यात आली. RAW चे Head Quarter हे नवी दिल्ली येथे स्थित आहे. RAW माहिती गोळा करणे, आतंकवादाला आळा घालणे आणि सिक्रेट ऑपरेशन पार पाडण्यासाठी काम करते. ऑपरेशन मेघदूत, ऑपरेशन कॅक्टस, ऑपरेशन स्मायलिंग बुद्धा, ऑपरेशन चाणक्य हे RAW चे ऑपरेशन होते. ही संस्था न्यायव्यस्थेच्या बाहेर आहे आणि यांना संसदेला उत्तर देणे भाग नाहीये. ही संस्था केवळ पंतप्रधान यांच्याकडे विषय मांडते आणि त्यांचेच ऐकते.
RAW मध्ये भरती कसे व्हाल?
RAW Agent बनून देशाची सुरक्षा करणे ही खूप मोठी जबाबदारी आहे. त्यामुळेच RAW Agent बनण्याची प्रक्रिया देखील तितकी कठीण असते. सुरुवातीला RAW मध्ये फक्त ट्रेन झालेले ऑफिसर्स असत. हे सर्व ऑफिसर्स हे इंटेलिजन्स ब्युरो च्या एक्स्टर्नल विंग ला जोडलेले असत. त्यानंतर मिलिटरी, पोलीस आणि इंडियन रेक्रुट सर्व्हिसेस मधून देखील भरती करण्यात येऊ लागली. 1983 मध्ये RAW ने त्यांचे एक सर्व्हिस कॅडर बनवले. त्यालाच Research and Analysis Service नाव देण्यात आले. यात RAW मध्ये सहभागी होण्यासाठी लेखी परीक्षा आणि मुलाखतीतून जावे लागते.
यासाठी उमेदवाराला सेन्ट्रल स्टाफिंग स्कीम अंतर्गत येणाऱ्या वर्ग अ च्या सिव्हिल सर्व्हिसेस च्या परीक्षा द्यायला हव्या. सिव्हिल सर्व्हिसेस दिल्यानंतरच पात्र उमेदवार हे RAW ची लेखी परीक्षा देऊ शकतात. या उमेदवारांकडे 20 वर्षाचा सर्व्हिस मधील अनुभव असणे गरजेचे आहे.
RAW Agents ची ट्रेनिंग कशी होते?
देशाला प्रत्येक अंतर्गत आणि बाह्य धोक्यांपासून वाचवणाऱ्या या सुपर हिरो ची ट्रेनिंग खूप कठीण असते. त्यांना अति धोक्याच्या ठिकाणी काम करायचे असते. यात त्यांना स्वतःच्या ओळखीला लपवून मिशन पूर्ण करायचे असते. यांना बेसिक आणि ऍडव्हान्स ट्रेनिंग देखील दिली जाते. बेसिक ट्रेनिंग ही केवळ 10 दिवसांची असते आणि यात त्यांना RAW च्या खऱ्या विश्वाशी ओळख करून दिली जाते. या दरम्यान त्यांना Space Technology, Information Security, Energy Security, Scientific Knowledge, Financial, Economic आणि Geo Strategic Analysis समजून सांगितले जातात.
दुसऱ्या देशांच्या गुप्तचर संघटना जसे की CIA, ISI आणि MI6 च्या केस स्टडी देखील करून घेतल्या जातात. बेसिक ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर ऍडव्हान्स ट्रेनिंग घेतल्या जातात. यात फिल्ड इंटेलिजन्स ब्युरो मध्ये पाठवले जाते. म्हणजेच FIB कडे त्यांना जावे लागते. ही ट्रेनिंग एक ते दोन वर्षांची असते. FIB मध्ये त्यांना सांगितले जाते की कशा प्रकारे जंगल आणि थंड हवामानाच्या प्रदेशात सर्व्हाइव्ह करता येते, सिक्रेट ऑपरेशन कसे मॅनेज केले जातात, कशा प्रकारे अटक होण्यापासून वाचता येते आणि जर पकडलेच गेले तर कारवाई ला कशा प्रकारे सामोरे गेले पाहिजे. मिशन ऑपरेट करणे, कॉन्टॅक्ट बनवणे यासारख्या सर्व गरजेच्या गोष्टींची ट्रेनिंग त्यांना दिली जाते. हे सर्व त्यांना ट्रेन आणि स्कील्ड RAW Agent बनवण्यासाठी असते.
एका RAW Agent ला कायम मिशन वर जाण्यासाठी तयार असावे लागते. त्यासोबत एका छोट्याश्या नोटीस वर देखील एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्याची तयारी देखील ठेवावी लागते. त्यांना त्यांची ओळख ही मित्र आणि परिवार यांच्या पासून देखील लपवून ठेवावी लागते.
RAW Agents ची नोकरी ही काही पर्मनंट नोकरी नसते. RAW Agent बनण्यासाठी खूप साऱ्या स्किल्स असणे गरजेचे असते. जसे की लोकांशी सहजपणे बोलू शकणे, पटकन बोलू शकणे म्हणजेच Quick Communication Skills, Self Management, Self Motivation, Professionalist, Personal Integrity आणि सर्वात महत्वाचे म्हणजे देशाच्या सुरक्षेसाठी काहीही करण्याची तयारी!
RAW Agent बनण्यासाठी Eligibility
RAW Agent बनण्यासाठी उमेदवार हा भारतीय नागरिक असायला हवा. उमेदवाराचा कोणताही गुन्हेगारी भूतकाळ नसावा. उमेदवाराला ड्रग ची नशा नसावी. उमेदवाराचा शैक्षणिक रेकॉर्ड हा चांगला असावा आणि त्याने एखाद्या चांगल्या नामांकित विद्यापीठातून शिक्षण घेतलेले असावे. उमेदवारांची कमीत कमी एका परदेशी भाषेवर पकड असायला हवि. उमेदवार हा 20 वर्ष सर्व्हिस मध्ये अनुभवाचा असावा.
RAW Agent बनणे ही खूप गर्वाची गोष्ट आहे परंतु तुम्ही RAW agent बनण्याविषयी तेव्हाच विचार करा जेव्हा तुम्हाला देशासाठी काहीही करण्याची आवड असेल, तुम्ही त्यासाठी जीव देखील देऊ शकता, तुम्ही हार्ड वर्क करू शकता, कठीण काळात स्वतःला सांभाळू शकता आणि काहीही प्रकाशझोतात न येता आपल्या मिशन ला एक सामान्य नागरिक बनून पूर्णत्वाला नेऊ शकता.