Berber Granaries : Worlds Oldest Banking System । जगातील सर्वात प्राचीन बँक
वाळवंटी आणि पहाडी भागात वसलेली एक जगातील सर्वात प्राचीन बँक आहे. ही बँक आफ्रिकेमधील मोरोक्को या देशाच्या दक्षिणेला वसलेली आहे. याच बँकेविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
डोंगराळ भागात असलेल्या या बँकांचा उपयोग हा तेथील स्थानिक रहिवासी करत असत. अन्नधान्य पासून तर दागिने आणि संपत्तीच्या कागडपत्रांपर्यंत जे काही त्यांच्याकडे किमती सामान असेल ते याच बँकांमध्ये जमा असत. डोंगराच्या कुशीत बसलेल्या या बँकांना त्या काळी खुल सुरक्षित मानले जात असे.
जगातील सर्वात प्राचीन बँक सिस्टम ला अगादिर म्हणून संबोधले जाते. अगादीर ला त्या काळातील एक खजिना म्हणून संबोधले जाते. हे त्या काळात एखाद्या बँक सारखेच होते. इथे गहू आणि इतर अन्नधान्य देखील ठेवले जात असत कारण त्या काळात त्याला पैशासारखीच किंमत होती. सोबतच संपत्तीची कागदपत्रे आणि चांदीचे दागिने देखील इथे असत.
लामीने नावाने ओळखला जाणार एक माणूस तिथे असत. त्याला अगादीर चा सुरक्षकर्ता म्हणून ओळख होती. एक समिती आहे जी अगादीर च्या व्यवस्थापणाविषयी माहिती ठेवते. हीच समिती संचालनाचे नियम आणि अटी बनवत असते. हे सर्व नियम लाकडाच्या फळीवर लिहिले जात असत. यात अगादीर विषयी सर्व नियम आणि व्यवस्थापणेचे नियम देखील समाविष्ट आहेत.
अगादीर आणि तिथे असणाऱ्या गोष्टींना फक्त निसर्गापासून नव्हे तर इतर प्रत्येक धोक्यापासून वाचवण्याचा प्रयत्न हा केला जात असे. यासाठी किल्ल्यासारखे क्षेत्र बनवले जात असे. लोक लूटमार, दुष्काळ किंवा इतर धोक्यांपासून आपल्या संपत्तीला वाचविण्यासाठी याचा वापर करत असत. लाकडाच्या ज्या फळ्यांवर बँकेच्या नियमांविषयी माहिती आहे त्यांच्याच मदतीने अभ्यासक या बँकेच्या सुरू होण्याच्या तारखेचा अंदाजा लावत आहेत.
काही संशोधक असे म्हणतात की हे जे काही सार्वजनिक कोठार आहे हे बँकेच्या उदयाचे मुख्य ठिकाण आहे. कारण आपण जेव्हा बँक म्हणतो तेव्हा ती अशी जागा असते जिथे तुमची संपत्ती ही सुरक्षित राहू शकते. या बँकांच्या सुरुवातीच्या काळाविषयी माहिती मिळवणे कठीण आहे. सध्या संशोधक जाणून आहेत की जेव्हा या बॅंका सुरू केल्या गेल्या तेव्हा हे लाकडी दस्तावेज बनवले गेले, ज्यावर त्यांच्या व्यवस्थेविषयी माहिती दिलेली आहे. सर्वात जुनी फळी ही 1492 मध्ये लिहिली गेलेली आहे. या बँकांची सुरुवात तर या अगोदर म्हणजेच जेव्हा त्या भागात वस्ती झाली तेव्हाच केली गेली असावी.
या बँकांची सुरुवात कधी झाली हे आजही सांगणे कठीण आहे. या प्रकारच्या इमारती या अँटी एटलास च्या डोंगरांपासून सुआस च्या मैदानांपर्यंत पसरलेल्या आहेत. मोरोक्को च्या सांस्कृतिक मंडळाने या इमारती राष्ट्रीय वारसा म्हणून नोंदणी साठी अभियानाची सुरुवात केलेली आहे. त्यांचा प्रयत्न हा या इमारती युनेस्को च्या वारसा यादीत समाविष्ठ करण्याचा देखील आहे.