IPL मध्ये कसा पसरला कोरोना? । बायो - बबल कुठे लिक झाला? । IPL परत कधी सुरू होणार? । BCCI ची 'दादा' गिरी
वकांडा म्हणजेच ब्लॅक पँथर चे एक काल्पनिक साम्राज्य! हे व्हायब्रेनियमने बनवलेल्या एका अदृश्य कवचाने संरक्षित केले होते. ज्यामुळे बाहेरील धोकादायक गोष्टी आत प्रवेश करू शकत नव्हत्या. अगदी त्याच प्रकारे सध्याच्या स्थितीत सर्व प्रकारच्या क्रीडा आयोजनाच्या मध्ये बायो-बबल हे सर्व खेळाडूंना कोरोना व्हायरस पासून सुरक्षित ठेवत आहे. अगदी सोप्या भाषेत बोलायचे झालेच तर बायो बबल म्हणजे एक असे वातावरण ज्यामध्ये बाह्य जगात राहणाऱ्या लोकांचा कोणताही संपर्क रहात नाही. त्यात ठेवलेले लोक बाह्य जगापासून पूर्णपणे लांब राहतात.
त्यामुळेच दिल्ली कॅपिटल्स चे कोच रिकी पॉंटिंग यांना वाटले की आता बहुतेक आम्ही देशाच्या सर्वात सुरक्षित ठिकाणी आहोत. पण तसे घडले नाही! आयपीएल 2021 ची सुरुवात ही नियोजित वेळी म्हणजे 9 एप्रिल रोजी धडाक्यात झाली. एकूण 31 सामने बाकी होते आणि एक महिना अगोदरच 4 मे 2021 रोजी BCCI ने एक आपत्कालीन बैठक घेतली आणि फक्त 10 मिनिटात निर्णय घेत जगातील सर्वात मोठी स्पर्धा आयपीएल स्थगित करण्यात आली.
या बैठकीत अनेक सदस्य आयपीएल सुरू ठेवावी असा आग्रह करत होते तरी देखील BCCI चे सचिव असणारे जय शाह यांनी त्या सर्व गोष्टी नाकारत मालिका स्थगित केली. आयपीएल 2020 मध्ये UAE मध्ये बायो बबल मध्येच आयोजित केली गेली होती. त्यावेळी कोणीही पोसिटीव्ह का आला नाही आणि आता 2021 मध्येच का असे घडले?
ज्यावेळी आयपीएल 2021 चे नियोजन केले जात होते तेव्हा अधिकाऱ्यांना असे वाटत होते की त्यांनी कोरोनावर मात केली आहे. भारताचे गृह मंत्री अमित शाह तर म्हणाले होते की भारताचे प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने COVID-19 विरोधातील लढाई यशस्वीपणे लढली आहे. या आयपीएल मध्ये दूर अंतरावर असणाऱ्या 6 शहरांना निवडण्यात आले आणि या शहरांच्या मधील प्रवासाचे अंतर हे जवळपास 6000 किमी होते. मागील वर्षी अंतराच्या तुलनेत जवळ असणाऱ्या 3 शहरांमध्ये हे नियोजन करण्यात आले होते. दोन शहरांच्या मध्ये जास्तीत जास्त 160 किमी इतके अंतर होते. इंडियन फुटबॉल लीग मध्ये एकूण 11 म्हणजेच आयपीएलच्या फक्त 8 संघाच्या तुलनेत अधिक संघ होते. तरी देखील सर्व सामन्यांसाठी एकमेव स्थान म्हणून गोवा निवडण्यात आले. ती मालिका देखील 5 महिन्यांमध्ये आयोजित करण्यात आली आणि या कालावधीत एकही पोसिटीव्ह रुग्ण सापडला नाही. एक यशस्वी मालिका सुरक्षित रित्या पार पाडल्यानंतर अनुभवी आणि फुटबॉल लीगच्या अध्यक्ष नीता अंबानी यांनी बीसीसीआयला संपर्क केला. आयपीएलसाठी देखील त्याच प्रकारची व्यवस्था करण्यात यावी असा सल्ला त्यांनी दिला परंतु त्यांच्या सल्ल्याला नम्रतापूर्वक नकार देण्यात आला. मुंबईचा ब्रेब्रॉन आणि वानखेडे स्टेडियम मधील अंतर इतके कमी आहे की आपण पायी चालत जाऊ शकतो. सोबतच नवी मुंबई मधील DY पाटील स्टेडियम आणि पुण्याच्या MCA स्टेडियम मधील अंतर फक्त 108 किमी आहे. हे चार मैदान एक उत्तम पर्याय होते. मागील वर्षी UAE मध्ये झाला अगदी तसाच प्रवास देखील बस द्वारे सहज होऊ शकत होता. यावर्षी विमानांचा आणि सार्वजनिक विमानतळाचा उपयोग करण्यात आला. यामध्ये तुलना केली असता अधिक धोका होता.
BCCI ने ज्या शहरांची निवड केली त्यांच्या निवडीमागे काही राजकीय हेतू होता का? देशाच्या दोन टोकाला असलेली दोन राज्ये जिथे बायो बबल च्या सीमेची परीक्षा नक्कीच घेतली गेली असती, ती राज्ये होती पश्चिम बंगाल आणि केरळ! या दोन राज्यांमध्ये फुटबॉलचे सर्वात जास्त चाहते असूनही त्यांना ISL चे यजमानपद देण्यात आले नाही. यामागील एकमेव कारण होते की त्या राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुका...
यूएई मध्ये झालेल्या मालिकेत खेळाडूंना संपूर्ण मालिका भर एकाच खोलीत ठेवण्यात आले होते. तर आयपीएल 2021 मध्ये खेळाडूंना वेगवेगळ्या हॉटेल्स मध्ये ठेवण्यात आले होते. याशिवाय प्रवास देखील वेगवेगळ्या विमानांनी करण्यात आला. यामुळे यात आश्चर्य नसावे की जस जशी मालिका रंगात येऊ लागली तसे खेळाडू एका पाठोपाठ एक कोरोना पोसिटीव्ह येऊ लागले. मालिका सुरू होण्याच्या अगोदर काही खेळाडू हे कोरोना पोसिटीव्ह आल्यावरच हे सर्व थांबवायला हवे होते.
आपल्याला या गोष्टीला देखील समजून घ्यायला हवे की भारतात कोरोनाची दुसरी लाट ही त्याच काळात आली होती. आणि या लाटेमुळे खूप जास्त नुकसान झाले होते. जेव्हा UAE मध्ये आयपीएल सुरू झाली होती तेव्हा कोरोना केसेस या 674 कोरोना केसेस वरून 1400 प्रतिदिन इतक्या पोहोचल्या होत्या. भारतात आयपीएल 2021 ला सुरुवात झाली तेव्हा 9 एप्रिल ला 1 लाख 52 हजार नवीन कोरोनाबधित रुग्णांची नोंद झाली. आयपीएल स्थगित झाले त्याच दिवशी हा आकडा 3 लाख 82 हजार इथपर्यंत पोहोचली होती.
मालिका सुरू झाली आणि फक्त 2 च आठवड्यानंतर म्हणजे 26 एप्रिल रोजी रवीचंद्रन अश्विन याने घरी जाण्याचा निर्णय घेतला. भारताच्या या ऑफ स्पिनर रवी अश्विन ने ट्विट केले की तो त्याच्या कुटुंबियांसोबत राहू इच्छितो. त्याच्या कुटुंबातील काही सदस्य हे तेव्हा कोरोना बाधित होते. आरसीबी संघाचे ऍडम झंपा आज केन रिचर्डसन हे दोघे कोव्हिडं निगेटिव्ह आले तरी देखील ते मायदेशी परतले. केकेआर संघातील वरून चक्रवर्ती आणि संदीप वारीयर हे कोरोना पोसिटीव्ह झाल्यामुळे क्वारंटाईन झाले. यामुळे दोन्ही संघातील 3 मे रोजीच्या सामना हा रद्द झाला. लगेच पुढच्या दिवशी दिल्ली कॅपिटल्स चा अमित मिश्रा आणि सनरायजर्स हैद्राबाद संघाचा रिद्धीमान सहा हे कोव्हिडं पोसिटीव्ह झाले. यासोबत चेन्नई सुपर किंगस संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक आणि कर्मचारी देखील कोरोना बाधित झाले. आयपीएल व्यवस्थापन समिती ला जबरदस्तीने 8 पैकी 4 संघ क्वारंटाईन करावे लागले.
सिडनी मॉर्निंग हेराल्ड ला दिलेल्या एका मुलाखतीत ऑस्ट्रेलियन लेग स्पिनर ऍडम झंपा टीका करतो की मी आता पर्यन्त ज्या देखील बबल चा भाग होतो त्यापैकी आयपीएल चा बबल हा सर्वात कमकुवत होता. दुबई मध्ये असताना मी अतिशय सुरक्षित होतो.
आयपीएल 2021 मध्ये अनेक नियमांचे उल्लंघन झाले. आश्चर्य म्हणजे मुंबईच्या वानखेडे स्टेडियम चे 11 मैदानातील कर्मचारी पोसिटीव्ह असल्यावरही ते बायो बबल चा भाग नव्हते! 4 संघाना त्यांच्या निर्धारित क्रमानुसार सरावासाठी अरुण जेटली स्टेडियम मध्ये न पाठवता बबलच्या बाहेरील रोशनारा क्लब मध्ये पाठवण्यात आले. त्यामुळे याठिकाणी असणाऱ्या उत्साहित कर्मचारी आणि नातेवाईकांनी सोशल मीडिया वर सेल्फी टाकण्यासाठी सोशल डीस्टँसिंग चा फज्जा उडवत प्रसाधनगृहात मजल मारली.
BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांनी त्या घटनेचा बचाव करत म्हटले की मँचेस्टर सिटी आणि आर्सेनल चे खेळाडू देखील इंग्लंडच्या प्रीमियर लीगमध्ये कोव्हिडं पोसिटीव्ह झाले होते. दुसरीकडे ISL च्या यशस्वी रित्या पार पडलेल्या ISL मालिकेला BCCI ने दुर्लक्षित केले. IPL आयोजनकर्त्यांनी स्थगितीच्या निर्णयाला सहमती दिली. याचे कारण म्हणजे मालिकेच्या एकूण मूल्यांकनात त्यांनी घसरण बघितली होती आणि ही गोष्ट मागील 8 वर्षांत पहिल्यांदाच घडली होती. प्रक्षेपण कर्ता स्टार क्रिकेटने महसूल गमावला, त्यांनी संपूर्ण मालिकेत जाहिरातींचे स्लॉट्स हे एकूण 3,200 कोटींना विकले होते. पण आता जाहिरातदारांकडून जे सामने झाले त्यात पूर्ण शुल्क आणि इतर सामन्यासाठी अर्धे शुल्कच वसूल करण्यात येईल, त्याचप्रमाणे BCCI ला देखील रद्द केलेल्या सामन्याचे म्हणजेच 54.4 कोटींचा अर्धा हिस्सा मिळेल. पुढे जाऊन आयोजनकर्त्यांना देखील अर्धीच रक्कम मिळेल. खेळाडूंना मात्र आयोजन कर्त्यांकडून पूर्ण शुल्क मिळण्याची शक्यता आहे. त्यांना तीन भागांमध्ये शुल्क दिले जातात, एक जेव्हा मालिका सुरू होते आणि नंतरचे दोन भाग हे मालिका संपल्यावर मिळतात. आयपीएल 2021 चा विमा कव्हर जवळपास 3,500 कोटी इतका आहे. मात्र कोव्हिडं 19 मुळे मालिका स्थगित झाल्यामुळे त्यांना भरपाई मिळणार नाही. काही कंपन्यांनी जोरदार विक्रीची आशा ठेवून उत्पादन वाढवले होते, त्यांना देखील नुकसान सोसावे लागणार आहे. आकडेवारी बघितली तर ही रक्कम 2000 कोटींच्या पुढे जाईल.
यासोबत फँटसी गेमिंग कंपनी आणि सट्टेबाज अँप्स यांचे उत्पन्न हे IPL वर टिकून होते. त्यांनाही नुकसान झाले आहे. काही जणांना याचा फायदा देखील झालेला आहे. OTT आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्म सामन्यांच्या ठराविक वेळेत इतर कार्यक्रम दाखवू शकतात. नुकसान हे सद्यस्थितीत काल्पनिक असून आयपीएल पुन्हा सुरू झाल्यास हे भरून निघेल यात काही शंका नाही.
BCCI ला सर्वात मोठी अडचण ही होती की मालिका कधी संपते, कारण सर्व आंतरराष्ट्रीय संघाचे कार्यक्रम हे ठरलेले असत. लगेचच 4 काऊंटी क्रिकेट क्लब , मिडलसेक्स, सरे, वॉरविकशायर आणि लँकशायर हे यजमानपद स्वीकारण्यास तयार झाले. भारत इंग्लंड ही मालिका संपल्यावर 14 सप्टेंबर नंतर ते शक्य होईल. पण BCCI ला प्रथम प्राधान्य UAE ला देणे सोयीस्कर होते आणि त्यांची निवड करण्यात आली, कारण त्यावेळी भारतात पावसाळा सुरू असेल आणि इतर संघांनादेखील वेळ उपलब्ध आहे.
योगायोगाने आयपीएल 2021 परत एकदा त्याच तारखेला सुरू होईल, ज्या तारखेला आयपीएल 2020 ला सुरुवात झाली होती. शेख साहेबांच्या राज्याला म्हणजे UAE ला तितकीच रक्कम देण्यात येईल पण ती 29 सामन्यांसाठी असेल. मागील वर्षी 100 कोटी एकूण 60 सामन्यांसाठी देण्यात आले होते.
खेळाडूंना आराम करण्यासाठी कमी वेळ मिळेल, कारण भारत इंग्लंड मालिका समाप्ती आणि आयपीएल ची सुरवात यात फक्त 4 दिवसांचा फरक असेल. तसे बघायला गेले तर दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी मधील 8 दिवसांचे अंतर हे कमी केले जाऊ शकते. म्हणून BCCI ने अनौपचारिक रित्या ECB प्रमुख एशले जाईल्स यांच्यासमवेत संपर्क केला. ज्यांनी औपचारिक प्रस्ताव मिळण्यागोदारच त्यास नकार दिला.
यामागे असलेले कारण हे काही वेगळेच होते. ते त्यांचं 8 दिवसांच्या काळात त्यांच्या देशाची द हंड्रेड मालिकेचे उदघाटन करू इच्छित आहेत. ही मालिका त्यांनी मागील वर्षी स्थगित केली होती. कोरोना मुळे झालेले नुकसान ते त्याद्वारे भरून काढतील.
तसे बघितले तर भारतीय क्रिकेट संघाच्या नियोजनातच अनेक त्रुटी आहेत. 22 जूनला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप संपल्यावर दीड महिना म्हणजेच जोपर्यंत इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका सुरू होत नाही तोपर्यंत भारतीय संघ हा इंग्लंड मध्ये हातावर हात ठेवून बसून राहील. ते याच दरम्यान श्रीलंकेसोबत एकदिवसीय मालिका खेळतील. कसोटी मालिकेसाठी हा योग्य सराव असेल का?
भारताचे माजी खेळाडू दिलीप वेंगस्कर म्हणतात की हे नियोजनच चुकीचे आहे. इंग्लंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप नंतर लगेचच कसोटी मालिका खेळायला हवी होती. इंग्लंड संघ या दरम्यान पाकिस्तान आणि बांगलादेश सोबत खेळत आहे आणि हे हास्यास्पद आहे. इतका वेळ काही नसताना अचानक भारत एका पाठोपाठ एक अशा वेगवेगळ्या मालिकांमध्ये सहभाग घेईल. आयपीएलला लवकरात लवकर संपवण्यासाठी 10 डबल हेडर खेळवले जातील. त्यामुळे कदाचित खेळाडूंना दोन सामन्यांमध्ये आराम करण्यासाठी खूप कमी वेळ मिळेल. हे डबल हेडर शक्यतो शनिवारी आणि रविवारी खेळविले जातील. हे खेळाडूंच्या शारीरिक क्षमतेच्या समोर एक आवाहनच असेल. यासोबतील बायो बबल चा एक मानसिक तणाव असेलच! आता पुढे होणाऱ्या आयपीएल मध्ये काही अडचणी आहेत. वेस्ट इंडिजचा कॅरेबियन प्रीमियर लीगचा अंतिम सामना 19 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे आणि त्याच दिवशी IPL परत सुरू होणार आहे. त्यामुळे BCCI ने त्यांच्यासोबत देखील संपर्क केला, आणि याविषयी सांगितले. इंग्लंडचा संघ देखील आयपीएल च्या वेळेस बांगलादेश आणि पाकिस्तान दौऱ्यावर असणार आहेत. यामुळे त्यांचे खेळाडू हे डिसेंबर मध्ये होणाऱ्या वर्ल्ड t20 आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी तयार असू शकतील असे जाईल्स यांचे मत आहे. जाईल्स यांचे म्हणणे आहे की काही खेळाडूंना ब्रेक दिला जाईल परंतु ते आयपीएल किंवा इतर देशात खेळायला जाऊ शकणार नाहीत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अजूनही ठरवले देखील नाहीये की ते त्यांच्या खेळाडूंना IPL च्या बाकी सामन्यांमध्ये खेळतील की नाही?
या सर्व कारणामुळे काही संघांना त्यांच्या स्टार खेळाडूंशिवाय खेळावे लागणार आहे. यावर फ्रांचाईजि मालक हे म्हणताय की त्यांना दुसरे खेळाडू निवडायची संधी द्यावी. दुसरीकडे दादा तर आयपीएलच्या तारखा पुन्हा पुन्हा बदलून त्रस्त आहेत.
आयपीएल मुळे भारताने दोन आंतरराष्ट्रीय दौरे रद्द केले आहेत. त्यामुळे हे स्पष्ट होते आहे की श्रीमंत BCCI मध्ये IPL ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. BCCI ने अजून हा देखील निर्णय घेतलेला नाहीये की ते भारत वर्ल्ड टी 20 स्पर्धेसाठी यजमानपद स्वीकारणार आहेत की नाही! जर UAE मध्ये आयपीएल नंतर लगेच वर्ल्ड टी 20 मालिका खेळली गेली तर ICC च्या नियमांच्या अनुसार दोन्ही मालिकांमध्ये 10 दिवसांचे कमीत कमी अंतर हे असायलाच हवे. आयपीएल 12 तारखेला संपेल तर 18 पासून टी 20 वर्ल्ड कप सुरू होणार आहे. भारताने जर वर्ल्ड टी 20 कप स्पर्धेचे आयोजन केले तर यजमान पद स्वीकारून हे दाखवून द्यायला हवे की भारत कोरोना मुक्त मालिका आयोजित करण्यासाठी सक्षम आहे.