AutoCAD काय आहे आणि कसे शिकावे?
तुम्हाला माहित आहे का AUTOCAD काय आहे? हे काय असते आणि याचा वापर कुठे केला जातो? जर तुम्ही Engineering field मधून आहात तर तुम्ही नक्कीच या AutoCAD शब्दाला ऐकून असाल. AutoCAD हा एक Computer aided drafting software program आहे ज्याचा वापर घरे, पूल आणि computer chips सारख्या खूप गोष्टींच्या BluePrints बनवण्यासाठी केला जातो.
हे एक 2D आणि 3D Computer aided drafting software Application असतो ज्याला मुख्यतः architecture, construction आणि manufacturing साठी गरजेचे असणारे engineering plans ची BluePrint बनवण्यासाठी उपयोगात आणले जाते.
इंटरनेट विश्वात AutoCAD या क्षेत्राच्या विषयी जास्त माहिती नसल्याने आम्ही हि माहिती तुमच्यापर्यंत मराठीत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. AutoCAD काय आहे या विषयी आम्ही या आर्टिकल च्या माध्यमातून सर्व काही माहिती पोहोचविण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय जेणेकरून आर्टिकल पूर्ण वाचल्यानंतर तुमच्या मनातील सर्व शंका नक्कीच संपुष्टात येतील.
ऑटोकॅड काय आहे? (What is AutoCAD in Marathi)
AutoCAD चा फुल फॉर्म हा Automatic Computer Aided Design आहे. याचा native file format हा .dwg असतो. याचा उपयोग मुख्यतः इमारतीचे प्लान्स, architecture डिझाईन, construction आणि निर्मिती साठी इंजिनियरिंग प्लान्स बनवण्यासाठी होतो.
यालाच drafting application असे देखील म्हणले जाते. या software ला Autodesk या कंपनीने develope आणि market केले होते. सर्वात आधी डिसेंबर १९८२ मध्ये AutoCAD ला एक DESKTOP app स्वरुपात रिलीज केले गेले.
त्या वेळी ज्या microcomputers मध्ये internal graphics controllers असत त्यात देखील वापरता येत असे. AutoCAD येण्याच्या आधी commercial CAD programs हे mainframe computers किंवा minicomputers मध्ये run केले जात असत.
यामध्ये प्रत्येक CAD operator म्हणजेच user हा एका वेगळ्या graphics terminal मध्ये काम करतात. पुढे २०१० मध्ये AutoCAD ला मोबाईल आणि वेब app च्या दृष्टीने release केले गेले. यालाच लोक AutoCAD 360 या नावाने देखील ओळखतात. जे professional लोक AutoCAD वापरत असतात त्यांना drafters म्हणले जाते.
AutoCAD चा इतिहास (History of AutoCAD)
AutoCAD हा एक technical शब्द एका program मधून घेतलेला आहे.याची सुरुवात हि 1977 मध्ये सुरु झालती आणि १९७९ मध्ये यालाच Interact CAD या नावाने release केले गेले. याला AutoCAD च्या सुरुवातीच्या काही documents मध्ये MicroCAD या नावाने देखील REFER केले गेले आहे.
AutoCAD चे पहिले version हे 1982 मध्ये demonstrate केले गेले आणि डिसेंबर मध्ये release केले गेले. AutoCAD हे flagship product म्हणून मार्च 1986 मध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध बनले होते.
सध्याची गोष्ट लक्षात घेतली तर AutoCAD चे 24 वे major version release केले गेले आहे.
AutoCAD करण्यासाठी Best Computer कसा असावा?
फक्त AutoCAD नव्हे तर इतरही सर्व softwares जे Autodesk कडून येतात ते सर्व resource intensive असतात. त्यामुळे यांना run करायला powerful computer ची गरज असतेच. कारण AutoCAD मध्ये अनेक गोष्टी एकाच वेळी handle कराव्या लागतात. यात 3D मोडेलिंग, सिव्हील आणि architectural tasks यांचा समावेश होतो. अशात यांना smoothly run करण्यासाठी तुमच्या संगणकाची system हि powerful असायला हवी.
फक्त तुम्हाला AutoCAD run करायचे असेल आणि multitasking नसेल करायची तर तुम्हाला एक नॉर्मल laptop किंवा pc सहज चालून जाईल परंतु multitasking देखील असेल तर मग तुम्हाला High-end PC कडे जावे लागेल. High-end PC मध्ये seamless आणि lag free performance मिळवू शकता आणि जेणेकरून तुमचे काम देखील लवकर आणि सहज होऊ शकेल.
ऑटोकॅड कसे शिकणार?
AutoCAD हा काही छोटा कोर्स नाहीये. जर तुम्हाला पूर्ण ज्ञान न्हावे असेल तर हेच योग्य राहील कि तुम्ही एखादी institute जॉईन करून AutoCAD शिकाल. याशिवाय तुम्ही युट्युब ची देखील मदत घेऊ शकता. युट्युब वर तुम्हाला AutoCAD चे basic व्हिडीओ बघायला मिळतील ज्यांच्या मदतीने तुम्ही AutoCAD वापरायचे कसे हे शिकू शकता.
AutoCAD संबंधित किती व कोणते कोर्स आहेत?
AutoCAD मध्ये खूप सारे कोर्स असतात, यात तुमच्यावर अवलंबून असते कि तुम्ही कोणता कोर्स करू इच्छिता. तुमच्या गरजेनुसार आणि शिक्षणाला अनुसरून खालील प्रकारात AutoCAD चे कोर्स हे विभागलेले आहेत.
AutoCAD चे Courses:
Advance Course in CADD ( हा तीन महिने कालावधीचा Certificate Program आहे)
AutoCAD ( हा 2 महिने कालावधीचा Certificate Program आहे)
Advanced AutoCAD Course ( हा तीन महिने कालावधीचा Certificate Program आहे)
Diploma in AutoCAD ( हा दोन महिने कालावधीचा UnderGraduate Diploma Program आहे)
Master Diploma in Architectural CADD ( हा दोन महिने कालावधीचा Post Graduate Diploma Program आहे)
काही common courses ची लिस्ट
चला काही कोर्सेस विषयी जाणून घेऊयात ज्यामध्ये तुम्हाला काय शिकवले जाते आणि त्याचा फायदा काय याविषयी थोडक्यात माहिती घेऊयात.
Introductory AutoCAD Course
Introductory Courses मध्ये विद्यार्थ्यांना AutoCAD च्या INTERFACE, MENU आणि टूलबार सोबत commands विषयी मुलभूत माहिती दिली जाते. या कोर्सेस मधून विद्यार्थ्याला professional drafting projects कसे बनवले जातात व त्यांचे execution कसे होते याविषयी संपूर्ण माहिती मिळते.
यासोबत विद्यार्थ्यांना स्वतःचे 2D डिझाईन कसे बनवायचे हे देखील शिकवले जाते. याशिवाय मुलभूत शैलींमध्ये drawing, editing,layering आणि plotting याविषयी देखील शिकवले जाते.
Intermediate AutoCAD Course
पहिल्या Introductory AutoCAD मध्ये शिक्षण झाल्यावर विद्यार्थ्यांना Intermediate AutoCAD ची ट्रेनिंग दिली जाते. यात खूप साऱ्या गोष्टी समाविष्ठ असतात जसे कि hatching, dimensioning, cross-references, tables आणि block attributes, इत्यादी.
विद्यार्थ्यांना 3D डिझाईन विषयी ओळख करून दिली जाते व सोबतच drafting skills देखील शिकवल्या जातात. हि सर्व Advanced AutoCAD Course ची तयारी असते.
Advanced AutoCAD Course
Advanced AutoCAD Course हे मुख्यतः 3D डिझाईनवर focus करतात. यात 3D डिझाईन बनवण्यासाठी navigation आणि modeling tools यांचा देखील वापर केला जातो. विद्यार्थी यात अनेक नवीन concept शिकतात जसे की lighting, mapping आणि solid model creation होय. या courses ,मध्ये विद्यार्थ्याला 3D मॉडेल्स च्या importing आणि scanning images विषयी ट्रेनिंग दिली जाते.
Graphics Creating चे AutoCAD Courses
हा एक असा कोर्स असतो ज्यात graphics production विषयी म्हणजेच AutoCAD चा वापर करून illustration आणि web design projects विषयी demonstration केले जाते. यात AutoCAD चा वापर हा विद्यार्थ्यांना इतर सोफ्टवेअर जसे कि Adobe Photoshop, Adobe Illustrator आणि autodesk impression सोबत एकत्रित करून शिकवला जातो.
स्किल्स विषयी बोलायचे झाले तर correcting photographs, manipulating करणे आणि depth of field विषयी ट्रेनिंग दिली जाते.
AutoCAD चे ट्रेनिंग प्रोग्राम्स
AutoCAD चे सर्व कोर्स हे तुम्ही ऑनलाईन किंवा वर्ग पद्धतीत फिजिकली पूर्ण करू शकता. यात AutoCAD आणि Autodesk चे सर्व certificate programs येत असतात. तुम्हाला हे सर्व कोर्स एका विशिष्ठ कालावधीमध्येच पूर्ण करावे लागतात.
AutoCAD च्या माध्यमातून Career Options काय आहेत ?
AutoCAD चा वापर हा सर्वात जास्त drafters आणि इतर professional जे design आणि construction वर काम करतात त्यांच्याद्वारे केला जातो. चला अशाच काही करियर संधींविषयी जाणून घेऊयात ज्यांच्यामध्ये तुम्हाला AutoCAD असेल तर फायदाच होईल.
Drafter बनू शकता
Drafter हे technical illustrations बनवत असतात. यात product बनवत असताना सर्व engineering आणि manufacturing specifics ला महत्व दिले जाते. या कामामध्ये AutoCAD हे त्या drafters ची त्याच्या technical drawing ही develope आणि store करण्याच्या कामात मदत करत असते.
यात देखील एका Drafter कडे त्या सर्व गोष्टींविषयी माहिती असायला हवी ज्या drafting techniques, manufacturing theory आणि engineering मध्ये प्रमुख असतात.
यात ऑटोकॅड चा वापर करून drafter चा हा देखील फायदा होतो की याच्या मदतीने drafter खूप वेगाने आणि सहज designs देऊ शकतो आणि गरज असेल तर त्यात सहज बदल देखील करता येतो. Drafting हे प्रोफेशन एक सर्वात वेगाने वाढणारी प्रोफेशन आहे आणि यांची प्रत्येक वेळी गरज पडते.
Architect बनू शकता
ARchitecture चे कामच असते की building, houses, bridges यांचे architecture ची design देणे. ते directly clients सोबत काम करतात ज्यामुळे ते त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करू शकतात.
याच्या सोबत construction साठी गरजेचे असणारे plans देखील develope करता येतात. त्यामुळे जास्तकरून architect हे design करण्यासाठी ऑटोकॅड चाच वापर करतात.
Architect ची सॅलरी ही त्याच्या स्किल्स आणि experience वर आधारित असते.
Interior Designer बनू शकता
Interior designers चे मुख्य काम असते की building चया इंटर्नल appearance ला design करणे. म्हणजेच बिल्डिंग तयार झाल्यानंतर त्याची आतली बाजू कशी दिसेल याच्याविषयी डिझाइन देता येते. यात design बनवत असताना building codes आणि safety regulations विषयी देखीलसर्व काही बघावे लागते.
जास्तीत जास्त interior designers हे AutoCAD चा वापर करत असतात. याचा वापर करणे खूप सोपे असते आणि यात अनेक असे Features असे आहेत जे designer ला guide करत असतात.