Earn 30K by Work From Home (Flipkart Part Time Job) ।। घरबसल्या कमवा 30 हजार रुपये प्रति महिना
घरी बसून काहीतरी काम करून तुम्हाला जर चांगले पैसे कमवायचे असतील तर आज तुमच्यासाठी एक अशीच नोकरी घेऊन आलो आहे ज्यात तुम्हाला फक्त मोबाईल आणि इंटरनेट कनेक्शन यांची आवश्यकता असेल. हा जॉब करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारे वयाची अट नाहीये त्यामुळे लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत सर्वजण हे करू शकता.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा जॉब करण्यासाठी तुम्हाला 1 रुपया देखील गुंतवणूक करावी लागणार नाहीये. तुम्हाला भारतातील एका मोठ्या कंपनीच्या सोबत काम करण्याची संधी मिळणार आहे.
चला तर मग जाणून घेऊयात Earn 30K by Work From Home ।। घरबसल्या कमवा 30 हजार रुपये प्रति महिना
मित्रानो आज आपण Shopsy by Flipkart विषयी जाणून घेणार आहोत. फ्लिपकार्ट ने स्वतःचे shopsy नावाचे app सुरू केले आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही स्वतःचा बिझनेस सुरू करू शकता.
Start your own online business या हेडलाईन ने सुरू होणाऱ्या या जॉब मध्ये तुम्ही महिना 30000 रुपये कमवू शकता आणि हे पूर्णपणे zero investment प्लॅन आहे.
NDTV च्या एका वृत्तानुसार यातून जवळपास 25 मिलियन नवीन इंटरप्रेनर हे तयार होणार आहेत. यामध्ये सर्व काही गोष्टी अशा तुम्हाला त्यांच्याकडून मिळणार आहे. आपल्या मराठी माणसांचा एक चांगला व्यवसाय यातून सुरू होऊ शकतो. तुम्हाला यात फक्त त्यांची जाहिरात करायची आहे. फ्लिपकार्ट च्या नावाने हे तुम्हाला करायचे नाहीये तर तुमचा स्वतःचा ब्रँड आहे म्हणून तुम्हाला यात यशाच्या संधी जास्त आहेत.
Shopsy Model Information
तुम्हाला इथे browse करायचे आहे म्हणजे समोर जर दिवाळी येत आहे तर दिवाळी विषयी प्रोडक्ट्स तुम्हाला इथे बघायला मिळतील. हे प्रोडक्ट्स तुम्हाला निवडायचे आणि share करायचे आहेत. यात तुम्ही फेसबुक, वेबसाईट यांच्या माध्यमातून शेअर करू शकता.
तुमची वेबसाईट असेल तर तुम्ही त्यावर तुमच्या कॅटेगरी रिलेटेड प्रोडक्ट्स देऊ शकतात. तुम्ही हे प्रोडक्ट्स ऑर्डर करून तुमच्या घरी घेऊन येऊ शकता आणि मग त्यांना देऊ शकता किंवा डायरेक्ट त्यांच्या पत्त्यावर तुम्ही हे प्रोडक्ट्स पोहोचवू शकता.
Amazon Affiliate विषयी तुम्हाला माहीत असेल परंतु ते तुम्हाला फेसबुक व्हाट्सअप सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर शेअर करता येत नाही. Shopsy तुम्हाला ती संधी देखील देत आहे जेणेकरून सहज तुम्हाला तुमचे प्रोडक्ट्स विकता येतील.
Why Shopsy?
इथे तुम्हाला 15 करोड पेक्षा जास्त प्रोडक्ट्स आहेत ज्यांना तुम्ही प्रमोट करू शकता. इथे भरपूर प्रकार आहेत जेणेकरून तुम्ही तुमची कॅटेगरी आणि सिजन यानुसार प्रोडक्ट्स प्रमोट करु शकता. हे सर्व प्रोडक्ट्स विश्वासू पुरवठा दारांकडून आहेत त्यामुळे तुम्हाला त्या प्रोडक्ट्स मध्ये काहीही प्रॉब्लेम येण्याची शक्यता खूप कमी आहे.
भारतात अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि मिंत्रा या तीन वेबसाईटवर लोकांचा जास्त ट्रस्ट आहे.
प्रोडक्ट्स ची डिलिव्हरी ही 7 दिवसांमध्ये मिळणार आहे त्यामुळे तुमच्याकडे एक चांगली संधी आहे.
Earning कशी सुरू करणार? || Start earning with Flipkart Shopsy
प्लेस्टोअर वर तुम्हाला shopsy app मिळून जाईल किंवा इथे लिंक वर क्लिक करून देखील तुम्ही app डाउनलोड करू शकता.
https://play.google.com/store/apps/details?id=com.flipkart.shopsy
डाउनलोड केल्यानंतर app ओपन करायचे आहे.तिथे तुम्हाला शेअर ऑर्डर आणि अर्ण असे नाव दिसेल.
फ्लिपकार्ट वर जर तुमचे अकाउंट असेल तर त्याच अकाउंट ला दिलेल्या नंबर द्वारे इथे सुरुवात करायची आहे. याचा फायदा हाच होतो की याद्वारे तुम्हाला काही पॉईंट्स मिळाले तर स्वतःच्या खरेदीसाठी याचा पुढे फायदा होणार आहे.
आता तुम्हाला जे प्रोडक्ट् शेअर करायचे आहे त्यावर तुम्ही क्लीक करून त्यांच्याविषयी माहिती आणि कमिशन किती आहे ते बघू शकता.
ते प्रोडक्ट्स तुम्ही whatsapp वर देखील शेअर करू शकता. स्वतःला तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची असेल तरी तुम्हाला यात डिस्काउंट अधिक मिळून जाईल.
ज्या व्यक्तीसाठी तुम्हाला ऑर्डर करायचे आहे त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची लिंक ही जात नाही, फक्त फोटो आणि त्या प्रोडक्ट्स ची माहिती त्या व्यक्तीपर्यंत जाते.
*महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रोडक्ट्स वर तुम्हाला 7 दिवसांची रिप्लेसमेंट वॉरंटी मिळते आहे, त्यामुळे त्याविषयी तुम्हाला जास्त काही काळजी करण्याची गरज नाहीये.
जास्त लीड कशी मिळवावी? || How to get more lead?
Whatsapp च्या माध्यमातून जास्त लीड मिळवणे शक्य नाहीये त्यामुळे स्वतःची फ्री मध्ये वेबसाईट बनवून देखील तुम्ही सुरुवात करू शकता. फेसबुक मार्केटिंग हा देखील एक वेगळा आणि उपयुक्त पर्याय आहे. इंस्टाग्राम वर देखील तुम्ही स्वतः हे सर्व काही करु शकताय. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पुढे जाऊन करावी लागू शकते त्यामुळे तुम्ही थोडेफार पैसे यातून सहज कमावू शकता.
पैसे कसे मिळणार? । How to Withdraw from Shopsy?
या उपक्रमात तुम्हाला पैसे हे फ्लिपकार्ट कॉईन्स च्या स्वरूपात मिळणार आहेत. तुमचे पैसे हे तुम्हाला रिटर्न पिरियड संपल्यानंतर मिळणार आहेत.
जेव्हा तो 8 किंवा 15 दिवसाचा कालावधी संपेल त्यानंतर तुम्हाला गिफ्ट व्हाउचर मिळून जाईल. बँक ट्रान्सफर आणि UPI सारखे इतर पेमेंट मोड ते लवकरच ऑन करणार आहेत. इतर पेमेंट मोड हे 20 ऑगस्ट पासून सुरू होणार आहेत, त्यामुळे आता देखील तुम्ही earning सुरू करून नंतर पैसे हे कॅश स्वरूपात काढू शकताय.