Laptop vs Desktop : Which one is Best? । लॅपटॉप की डेस्कटॉप : काय बेस्ट आहे?

Laptop vs Desktop : Which one is Best? । लॅपटॉप की डेस्कटॉप : काय बेस्ट आहे?

मित्रांनो आपण जेव्हा कधीही संगणक घ्यायचा विचार करत असतो तेव्हा आपल्या मनात हा प्रश्न नक्कीच येतो की मी डेस्कटॉप घेऊ की लॅपटॉप घेऊ? तर मग आज याच प्रश्नाचे उत्तर अगदी सोप्या भाषेत इथे देणार आहे जेणेकरून तुम्हाला सहज कळून जाईल की तुम्हाला लॅपटॉप घ्यायचाय की PC कडे जायचे आहे. 

Laptop vs Desktop : Which one is Best? । लॅपटॉप की डेस्कटॉप : काय बेस्ट आहे?

सर्वात आधी डेस्कटॉप पीसी काय असतो आणि लॅपटॉप काय असतो हे तुम्हाला सर्वांना माहितीच असेल. तरी देखील पुन्हा एकदा सांगतो की डेस्कटॉप पीसी हा हेवी असतो आणि तो तुमच्या डेस्क वर ठेवावा लागतो. म्हणजे हा तुम्हाला एकाच जागेवर वापरावा लागतो. तर लॅपटॉप विषयी सांगायचे झाले तर लॅपटॉप हा पोर्टेबल म्हणजेच कुठेही घेऊन जाऊन जिथे वाटेल तिथे ठेऊन वापरता येतो. आजच्या काळात तर 1 ते 1.5 किलो या रेंजचे लॅपटॉप देखील आलेले आहेत.

लॅपटॉप तुम्ही कुठेही घेऊन शकता ही गोष्ट जरी खरी असली तरी देखील कायम लॅपटॉप हाच बेस्ट ऑपशन आहे का? तर नाही. जर तुम्ही गेमर असाल तर तुमच्यासाठी गेमिंग लॅपटॉप देखील उपलब्ध आहेत परंतु तुम्हाला जो एक्सपिरियन्स गेमिंग Pc वर मिळणार आहे तो लॅपटॉप कधीच देऊ शकणार नाही. त्यामुळे Desktop PC vs Laptop हे comparison म्हणचे POWER vs PORTABILITY असे असणार आहे.


सर्वात महत्वाचा फरक म्हणजे डेस्कटॉप पीसी मध्ये तुम्हाला कायम पॉवर ची गरज असते. म्हणजे तुम्हाला पीसी सतत इलेक्ट्रिक पॉईंट ला कनेक्ट ठेवावा लागतो आणि लॅपटॉप ला तुम्ही एकदा चार्ज करून त्याची बॅटरी 4 ते 5 तास किंवा काही लॅपटॉप 6 ते 8 तास देखील चालतात. तुमच्याकडे इन्व्हर्टर जरी असेल तरी ते हेवी असायला हवे कारण डेस्कटॉप चा SMP हा 660 वॅट पेक्षा जास्त पॉवर घेत असतो आणि स्क्रीन देखील 100 ते 150 वॅट पॉवर घेत असते. 

तुम्हाला जर भविष्यासाठी देखील प्लॅनिंग करायचे असेल तर डेस्कटॉप पीसी हा बेस्ट पर्याय आहे. तुम्ही जो डेस्कटॉप पीसी घेतला असेल तो कदाचित असेंबल केला असेल किंवा अगोदरच असेंबल होऊन आलेला असेल. म्हणजेच जर आज तुमच्या पीसी मध्ये 8 जीबी रॅम असेल आणि तुम्हाला 16 किंवा 24 जीबी करायची असेल तर ते खूप सोपे जाते. फक्त ती रॅम काढून दोन्ही सारख्या रॅम टाका किंवा जो स्लॉट ओपन आहे तिथे रॅम टाकून द्या, तुमचा पीसी जास्त रॅम सोबत फास्ट झालेला असेल! लॅपटॉप मध्ये हे करणे कठीण आहे कारण ते थोडे अवघड जाते आणि करणे देखील खूप खर्चिक आहे. लॅपटॉप मध्ये मदरबोर्ड वर सर्व काही सोल्डर केलेले असते जेणेकरून त्याची साईझ आणखी छोटी करता येते. लॅपटॉप मध्ये रॅम आणि हार्ड डिस्क या दोन गोष्टी बदलता येतात पण प्रोसेसर सारख्या गोष्टी शक्य नसतात. डेस्कटॉप मध्ये तुमचा मदरबोर्ड जर compatible असेल तर तुम्हाला सहज प्रोसेसर देखील बदलता येतो. सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला डेस्कटॉप मध्ये ग्राफिक्स कार्ड बदलता येते आणि जास्त मेमरी ची आणि हेवी ग्राफिक्स कार्ड टाकता येते परंतु लॅपटॉप मध्ये ते मुळीच शक्य नसते.

डिस्प्ले हा देखील एक महत्वाचा फॅक्टर आहे. तुम्ही मोठ्यात मोठा लॅपटॉप जरी घेत असाल तरी तुम्हाला 17 इंच ही मोठी स्क्रीन मिळेल. डेस्कटॉप पीसी मध्ये तुम्ही तुम्हाला हवी तितकी मोठी स्क्रीन बसवून घेऊ शकता ते देखील 4k मध्ये देखील!

परफॉर्मन्स च्या बाबतीत डेस्कटॉप पीसी हा लॅपटॉप ला कधीच मागे सोडून जातो. तुम्ही हिट डिसीपेशन किंवा रॉ पॉवर विषयी बोलला तेव्हा तुम्हाला डेस्कटॉप पीसी जास्त चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो. तुम्हाला परफॉर्मन्स सर्वात जास्त महत्वाचा असेल तर लॅपटॉप कडे तुम्हाला जाण्याची देखील गरज नाहीये. लॅपटॉप चा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो पोर्टेबल आणि छोटा असतो. छोटा असल्यामुळे त्याचे सर्व कम्पोनंट हे देखील छोटे असतात आणि सर्व काही एकमेकांना जोडून ठेवलेले असल्याने हिट डिसीपेशन होतच नाही. आम्ही असे म्हणत नाही की लॅपटॉप परफॉर्मन्स देत नाही, गेमिंग लॅपटॉप देखील आहेत जे चांगला परफॉर्मन्स देतात परंतु ते डेस्कटॉपच्या तुलनेत कुठे तरी नक्कीच कमी पडतात.

कस्टमायझेशन मध्ये डेस्कटॉप पीसी मध्ये तुम्हाला वाटेल ते कस्टमायझेशन तुम्ही करू शकता. आणखी एक प्रश्न आलाच आहे तर सांगतो की असेंबल घ्यायला पाहिजे की असेंबल केला पाहिजे? तर याचे उत्तर म्हणजे तुम्हाला थोडीफार देखील माहिती असेल तर तुम्ही असेंबल केला पाहिजे कारन त्यात तुमचे पैसे देखील वाचतात आणि चांगला पीसी देखील तुम्ही बनवू शकता. जर तुम्ही टेक पर्सन नसाल तर प्रिअसेंम्बल पीसी घेत जा.

आता कॉस्ट विषयी बोलायचे झाले तर तुम्हाला परफॉर्मन्स हवा असेल तर डेस्कटॉप पीसी घ्या तुम्हाला प्रत्येक पैशाची व्हॅल्यू मिळून जाईल. म्हणजेच 25000 रुपयांचा पीसी तुम्हाला जे देऊ शकेल ते 25000 चा लॅपटॉप देऊ शकणार नाही. दुसरी एक गोष्ट म्हणजे तुम्ही आज डेस्कटॉप पीसी घेतला तर पुढे जाऊन त्याला अपग्रेड करू शकताय. म्हणजे यात तुम्ही कम्पोनंट नुसार अपग्रेड करू शकता तर लॅपटॉप मध्ये असे होत नाही. तुम्हाला एका लिमिट नंतर संपूर्ण लॅपटॉप बदलावा लागेल. 

तुम्ही जर प्राईज आणि आऊटपुट यांचा रेशो घ्याल तर तुम्हाला डेस्कटॉप पीसी जास्त फायदा करून देईल. पोर्टेबल आणि बॅटरी यामुळे तुम्हाला लॅपटॉप देऊ शकेल. तुम्हाला काय महत्वाचे आहे यावर तुम्हाला डेस्कटॉप आणि लॅपटॉप मध्ये निवडायचे आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने