बाहुलीचे घर || Doll House Story Marathi
संध्याकाळचे जवळपास ३ वाजले होते. रिंकू तिच्या घराच्या मागे उभी होती. ती तिची मैत्रीण नीलम ची वाट बघत होती, नीलम आणि रिंकू सोबत खेळणार होत्या.
थोड्याच वेळात नीलम देखील आली. थोद्य्वेल दोघींनी कॉम्प्युटर गेम खेळले आणि नंतर दोघींनी ठरवले कि ते बाहुलीचे घर बनवणार!
नीलम ने सर्व सामान गोळा केले आणि रिंकू देखील तिच्या घरातून सर्व खेळण्या घेऊन आली.बाहुलीचे घर बांधले जाऊ लागले. एकूण ३ खोल्या बांधल्या गेल्या आणि त्यातील एक ड्रोइंग रूम होती. त्यात एक छोटासा सोफा ठेवला गेला. एका टेबलावर सुंदर फुलदाणी ठेवल्यानंतर बेडरूम बांधण्यास सुरुवात झाली.
बाहुलीला पलंगावर झोपवले गेले. तिच्या बाजूला एक कपाट आणि काही पुस्तके देखील ठेवण्यात आली.
स्वयंपाक घरात सर्वत्र सामना विखुरले गेले. एक कामवाली बाई देखील तिथे साफसफाई करण्यासाठी ठेवण्यात आली. घराच्या मुख्य दरवाजावर एक कुत्रा देखील राखण करण्यासाठी ठेवण्यात आला.
मागच्या दरवाज्याला लागून एक रस्ता बनवण्यात आला. त्यावर अनेक गाड्या, ट्रक्स आणि पायी चालणारे लोक उभे करण्यात आले. त्यांचे बाहुलीच घर पूर्ण बनले.
घर बनवण्यामध्ये दोन्ही मैत्रिणी इतक्या गुंग झाल्या होत्या कि त्यांना वेळेचे भान राहिले नाही. त्यांना तेव्हा लक्षात आले जेव्हा शेजारची मोना त्यांना लक्ष देऊन बघत होती. संध्याकाळ होत चालली होती.घरात त्यांच्या आईने दोघींना नाश्ता करण्यासाठी आवाज दिला. दोघी देखील लगेच घरात गेल्या. मोना त्याच संधीची वाट बघत होती. मोना ने या आधी देखील अनेक वेळा रिंकू चे घर तोडले होते. तिला कायम त्रास व्हायचा कारण रिंकू कायम सुंदर बाहुलीचे घर बनवत असे.
नीलम नाश्ता करून तिच्या घरी गेली. रिंकू जेव्हा तिच्या घराच्या मागे आली तेव्हा तिला दिसले कि तिचे बाहुलीचे घर मोडलेले होते. तिच्या काही खेळणी देखील तुटल्या होत्या. तिला समजले कि हे काम इतर कोणाचे नसून त्या मोनाचेच असणार आहे. तिचे तुटलेले बाहुलीचे घर बघून तिला खूप दुःख झाले. रीन्कुच्या डोळ्यांमध्ये पाणी आले. तिच्या अनेक तासांच्या मेहनतीला मोनाने काही क्षणात मोडले होते. मोना ने याआधी देखील असे अनेक वेळा केले होते. तिने रागात मोनाचा बदला घेण्याचं ठरवले.
पुढील दिवशी मोना तिच्या घराच्या परीसरात बाहुलीचे घर बनवण्यात व्यस्थ होती. तिच्याकडे तितके चांगल्या खेळणी नव्हत्या. त्यामुळे रिंकूच्या तुलनेत तिचे घर तितके चांगले बनले नव्हते. मोना ने देखील खूप मेहनत घेऊन ते घर बनवले होते. घर बंव्ल्यानान्त्र ती तिच्या घरात निघून गेली. ती घरात जाताच रिंकू गुपचूप तिच्या घराकडे जाऊन तिचे घर उध्वस्त करून स्वतःच्या घरी येते.
रिंकूला वाटत होते कि तिच्या अशा करण्याने तिच्या मनाला शांती मिळेल. परंतु चोरून एखाद्याची मेहनत बरबाद केल्यानंतर कशाला आनंद आणि समाधान होईल? रिंकू चे मन इतके अस्थिर झाले कि तिने दुपारचे जेवण देखील केले नाही. ती टेबलवर आई वडिलांच्या सोबत जेवायला बसली परंतु तिच्या घशाच्या खाली घासाच उतरत नव्हता.
आईने तिला विचारले कि काय झाले रिंकू? यावर रिंकू शांत राहिली. आईला वाटले कि उन्हामध्ये जास्त वेळ खेळल्याने कदाचित रिंकू शांत झाली आहे. तिने रिंकूला तिच्या रूम मध्ये झोपवले. मोना चे बाहुलीचे घर तोडल्याने तिला खूप जास्त पश्चाताप होत होता. ती विचार करत होती कि काय होत जर माझ आणि मोना चे पटत नसेल? आणि वाईटाच्या सोबत वाईट केल्याने काही फायदा? याच विचारात रिंकू खूप वेळ कूस बदलत राहिली. तिकडे आई आणि वडील जेवण करून झोपले होते. घरात शांतता होती.
गुपचूप रिंकू घरातून बाहेर पडली आणि मोनाच्या घराच्या परिसरात आली. मोना च्या घराचा मागचा दरवाजा बंद होता. मोना चे मोडलेले बाहुलीचे घर रिंकूकडे बघत होते.
रिंकू ला असे वाटू लागले कि ते बाहुलीचे घर उभे राहून रिंकूला विचारणार आहे कि का तू मला तोडलेस? रिंकू ने लगेच त्या बाहुलीला उचलले आणि तिच्यावरील धूळ झटकत तिला प्रेमाने कुरवाळू लागली. मोनाने कधी विचारही केला नसेल कि रिंकू तिचे बाहुलीचे घर मोडून टाकेल. हि जाणीव रिंकूला खूप लाजवत होती.रिंकूला समजत नव्हते कि या चुकीचे प्रायश्चित्त ती कशी करणार होती.
खूप विचार केल्यानंतर रिंकूला एक कल्पना सुचली. तिने ठरवले कि ती मोना चे बाहुलीचे घर स्वतःच्या खेळण्यांनी बनवेल.
ती लगेच तिच्या घराकडे येऊन स्वतःचे खेळणे घेऊन मोनाच्या घराकडे आली. पहिल्यांदा तिने एक मोठा परिसर बनवला. त्यात तिने ड्राइंग रूम, बेडरूम आणि किचन बनवले. सर्व काही तिने तसेच बनवले जसे तिने आणि नीलम ने काल बनवले होते. एक कुत्रा देखील घराची राखण करण्यासाठी ठेवण्यात आला.
रिंकू तिच्या कामात इतकी व्यास्तः होती कि तिला मोनाच्या बाहेर येण्याची चाहूल देखील लागली नाही. जेव्हा मोनाने घराचा दरवाजा उघडून बाहेर बघितले तेव्हा तिला दिसले कि रिंकू तिच्या बाहुलीच्या घरासोबत काहीतरी करत होती. हे बघून मोनाला आश्चर्य वाटले. हे आश्चर्य आणखी वाढले जेव्हा तिने बघितले कि रिंकू तिच्या स्वतःच्या खेळण्यांनी मोनाचे बाहुलीचे घर बनवत होती.
मोनाला जाणवले कि जेव्हा संधी मिळेल तेव्हा ती रिंकूचे घर मोडत होती परंतु रिंकू तर स्वतःच्या खेळण्यांनी तिचे घर सजवत होती.
आता मोनाला स्वतःच्या कार्यावर पश्चाताप होत होता. ती उगाचच कोणाशीही लढत होती. याच वेळी थोडासा आवाज ऐकून रीन्कुने मागे बघितले. रिंकू म्हणाली कि, मोना मला माफ कर . दुपारी मी तुझे बाहुलीचे घर तोडले. हे मी तुझा बदला घेण्यासाठी केले होते. परंतु तुझे बाहुलीचे घर तोडल्यानंतर मला खूप दुःख झाले. संपूर्ण दुपार मी विचार करत राहिली कि मी माझ्या चुकीचे प्रायश्चित कसे करू? त्यामुळे मी तुझे बाहुलीचे घर पुन्हा बनवत आहे. मला आशा आहे कि टू माझ्याविषयी नाराज नसशील आणि मला माफ करशील.
मोनाला रिंकूचे शब्द आतपर्यंत लागत होते.तिने आजपर्यंत कधीच स्वतःच्या चुकांवर विचार देखील केलेला नव्हता. रिंकू चे वागणे तिला तिने केलेल्या चुकांची कबुली देऊन माफी मागायला मजबूर करत होते. शेवटी तिने रिंकूला सांगितले कि, रिंकू मी खूपव आईत मुलगी आहे. मी उगाच तुमच्याशी भांडण करत आणि तुमचे बाहुलीचे घर तोडत होते. परंतु मी आता तुला वचन देते कि मी आजनंतर तुमचे घर देखील तोडणार नाही आणि तुझ्याशी आणि इतर कोणाशीच भांडणार नाही. टू माझी मैत्रीण बनणार ना? रिंकू कशाला नाही म्हणणार. त्यानंतर त्या दोघी खूप चांगल्या मैत्रिणी बनल्या.