फ्रेंडशिप डे का साजरा केला जातो? || Why to Celebrate Friendship Day?

फ्रेंडशिप डे का साजरा केला जातो? || Why to Celebrate Friendship Day?

Friendship-Day-Marathi

आपल्यापैकी सर्व लोक हे फ्रेंडशिप डे (Friendship Day) साजरा करत असतो परंतु हा दिवस का साजरा केला जातो याविषयी आपल्याला माहिती नसते. असेही असू शकते की तुम्ही याविषयी एकदा सुदधा विचार केला नसेल परंतु तुम्हाला हे नक्कीच माहीत आहे की मित्रांशिवाय जीवन अपूर्ण आहे. मैत्री हे नाते रक्ताचे नसले तरी हे नाते आपल्या कुटुंबातील नात्याइतकेच महत्वाचे असते. 

त्यामुळे आपण आज या लेखाच्या माध्यमातून मैत्री दिवस, फ्रेंडशिप दिवस म्हणजेच Freindship Day विषयी माहिती जाणून घेणार आहोत. आजच्या काळात अमेरिकेसोबतच भारतात देखील फ्रेंडशिप डे हा साजरा केला जातो. सर्व वयाच्या पुरुषांकडून आणि महिलांकडून हा दिवस आपण अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा करत असतो. यालाच आपण मैत्रीचा सण देखील म्हणू शकतो.

परंतु फ्रेंडशिप डे खरोखर काय आहे? याचा इतिहास काय आहे? हा दिवस का साजरा केला जातो? फ्रेंडशिप डे चे महत्व काय आहे? या विषयी आपल्याला माहिती नसेल तर आज या लेखातून प्रत्येक व्यक्तीला जो friendship day साजरा करतो आहे त्याला माहिती नक्कीच मिळेल. चला तर मग जाणून घेऊयात फ्रेंडशिप डे काय असतो आणि तो का साजरा केला जातो?

फ्रेंडशिप डे म्हणजे काय? - What is friendship Day in Marathi

फ्रेंडशिप डे ज्याला मराठीमध्ये मैत्री दिन म्हणून संबोधले जाते. हा दिवस प्रत्येक मित्रांसाठी एक विशेष दिवस असतो. प्रेम आणि बंधुता असलेल्या मैत्रीच्या नात्यात या दिवशी सर्व मित्र एकत्र येऊन सेलिब्रेशन करत असतात.

मित्रांनो या दिवसाला सध्याच्या सोशल युगात खूप जास्त महत्व प्राप्त झालेले आहे. प्रत्येक वर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी हा फ्रेंडशिप डे साजरा केला जात असतो. सुट्टी असल्याने सर्व मित्र एकत्र येऊन या दिवसाला Fun Day बनवून साजरा करत असतात. खरं तर हा दिवस आपल्याला आपल्या मित्रांचे आपल्या आयुष्यातील महत्व समजून सांगत असतो.

फ्रेंडशिप डे का साजरा केला जातो? 

Friendship Day आपण यासाठी साजरा करत असतो कारण या माध्यमातून आपण आपल्या मित्रांना सांगत असतो की तुमचे माझ्या आयुष्यात महत्व किती जास्त आहे. या दिवसाच्या माध्यमातून आपल्या मित्राच्या प्रति आपल्या असलेल्या भावना, प्रेम आणि आपलेपण आपण शेअर करत असतो. हा दिवस पूर्णपणे मित्र आणि मैत्री यालाच अर्पण केलेला असतो.

त्यामुळे हा दिवस आपल्यासाठी आणि आपल्या मित्रांसाठी आपल्या मैत्रीला एका वेगळ्या स्तरावर घेऊन जाण्यासाठी मदत करत असतो आणि त्यामुळेच खूप जास्त महत्वाचा असतो. यातून आपल्या मैत्रीत आपलेपणा येतो आणि आपली मैत्री आणखी घट्ट होते. या दिवशी आपण आपल्यातील थोडेफार वाद असतील तर ते दूर करून आपल्या जुन्या आठवणींमध्ये रमायचे असते. कारण मैत्री हे जगातील सर्वात श्रेष्ठ नाते आहे याशिवाय दुसरे काहीच श्रेष्ठ नसते.

Friendship Day कसा साजरा केला जातो? How to Celebrate Friendship Day in Marathi

मित्र यादिवशी एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधत असतात. फ्रेंडशिप डे टीशर्ट गिफ्ट देणे, ज्या मित्रांना आपण सध्या भेटू शकत नाही त्यांना व्हिडीओ कॉल वैगेरे करून शुभेच्छा देऊन आपण हा दिवस साजरा करत असतो. बघायला गेले तर मैत्रिमधील प्रत्येक दिवस हा खास असतो, परंतु आपल्याला या धावपळीच्या आयुष्यात त्या मित्रांना भेटण्यासाठी त्यांच्याशी बोलण्यासाठी देखील वेळ नसतो. त्यामुळे या फ्रेंडशिप डेच्या दिवशी आपण वेळ काढून आपल्यात काही वाद असतील तर ते विसरून एकत्र येऊन हा दिवस साजरा करायचा असतो. 

आजकाल Friendship Day च्या दिवशी मित्र एकत्र येऊन कँटीन, हॉटेल्स आणि कॅफे मध्ये पार्टी करत अष्टतास. यात ते त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या करत असतात. सोशल मीडिया वर अनेक संदेश आपण मित्रांना पाठवून आपल्या भावना देखील या दिवशी व्यक्त करू शकतो.

फ्रेंडशिप डे कधी साजरा केला जातो? - Friendship Day 2021 Date

फ्रेंडशिप डे हा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी प्रत्येक वर्षी साजरा केला जातो. यावर्षी म्हणजे 2021 मध्ये Friendship Day हा 1 ऑगस्ट 2021 रोजी साजरा केला जाईल. 

तुम्हाला याशिवाय हे देखील जाणून घ्यायला हवे की युनायटेड नेशन द्वारे World Friendship Day हा 30 जुलै रोजी साजरा केला जातो. परंतु संपूर्ण जगात आणि भारतात देखील फ्रेंडशिप डे हा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. 

जगभरात प्रत्येक देश हा दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करत असतो. काही काळापूर्वी भारतात हा दिवस पाश्चिमात्य संस्कृतीला धरून साजरा करण्यास सुरुवात झाली. आता मनात हा प्रश्न येत असेल की या फ्रेंडशिप डे ला सुरुवात कशी झाली? चला आता या फ्रेंडशिप डे चा इतिहास जाणून घेऊयात.

Friendship Day चा इतिहास - History of Friendship Day

फ्रेंडशिप डे साजरा करण्याची सुरुवात ही 1958 साली झाली. पहिल्यांदा पैराग्वे मध्ये एक दिवस हा आंतरराष्ट्रीय मैत्री दिन म्हणून साजरा करण्यात आला. परंतु त्यावेळी फ्रेंडशिप डे साजरा करण्याची पद्धती ही वेगळी होती. ग्रीटिंग कार्ड्स च्या माध्यमातून मित्रांना फ्रेंडशिप डे च्या शुभेच्छा देण्याची पद्धत तेव्हा होती. जस जसा इंटरनेट आणि इतर सोशल मीडिया समोर येऊ लागल्या तसा हा दिवस इतर राष्ट्रांमध्ये देखील साजरा केला जाऊ लागला. 

सगळ्यात आधी डॉ रामन आर्टिमियो ब्रॅको यांनी फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा विचार मांडला. मैत्री साठी आयोजित केलेल्या एका बैठकीत वर्ल्ड मैत्री क्रुसेड सुरू झाले. वर्ल्ड मैत्री क्रुसेड ही अशी गोष्ट आहे ज्यामध्ये जाती, धर्म रंग यावर काहीही भेदभाव न करता जगामध्ये मैत्रीला प्रोत्साहन दिले जाते.

फ्रेंडशिप डे ची सुरुवात कशी झाली? 

यामागे एक सुंदर कथा आहे. 1935 साली अमेरिका सरकारने एका व्यक्तीला त्याच्या गुन्ह्यासाठी मारले. या गोष्टींमुळे त्या मारल्या गेलेल्या व्यक्तीच्या मित्राने मनाला लावून घेतले आणि तो आघात त्याला सहन न झाल्याने त्याने आत्महत्या केली. आणि त्यामुळे मैत्रीसाठी दिलेल्या या बलिदानाला लक्षात ठेवण्यासाठी अमेरिकन सरकारने ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी हा फ्रेंडशिप डे साजरा करण्याचे ठरवीले. तेव्हा पासून हा मैत्री दिवस म्हणजेच फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. 

याशिवाय मैत्री संबंधी अनेक दिवस आपण साजरे करत असतो ते खालीलप्रमाणे,

राष्ट्रीय मैत्री दिवस - ऑगस्ट मध्ये पहिला रविवार

महिला मैत्री दिवस - ऑगस्ट मध्ये तिसरा रविवार

आंतरराष्ट्रीय मैत्री दिन - (मे महिन्यातील तिसरा आठवडा)?


फ्रेंडशिप डे का साजरा केला जातो? 

मैत्रीचे नाते हे एक अनमोल नाते आहे! आपल्याला भूतकाळातील मैत्रीच्या नात्याची गोष्ट आपल्याला सांगितली जाते. परंतु आता काळ बदलला आहे परंतु त्या जुन्या गोष्टींना धरून आजही आपल्याला मैत्रीच्या नात्याशी निगडित प्रेरणादायी घटना बघायला मिळतात. 

या दिवशी आपण आपल्या मित्रांना आपल्या हृदयाशी गळाभेट घेऊन मैत्री दिनाच्या शुभेच्छा देत असतो. या दिवशी आपण आपल्या मित्रांना फ्रेंडशिप बँड बांधून साजरा करतो. तो बँड आपल्याला आपले मैत्रीचे नाते सतत लक्षात ठेवायला भाग पाडते.

Friendship Day हा आपल्यासाठी इतका महत्वाचा का असतो?

ते मित्रच असतात जे आपल्याला कठीण प्रसंगात देखील हसवू शकता.

ते मित्रच आहेत ज्यांच्यासोबत आपण खूप सहज मिळून मिसळून जातो आणि आपल्या मनातील प्रत्येक भावना शेअर करू शकतो.

ते मित्रच आहेत जे आपल्यासाठी सतत देवाकडे प्रार्थना करत असतात.

ते मित्रच असतात जे आपल्याला स्वतःवर विश्वास नसताना आपल्यावर विश्वास ठेवतात.

ते मित्रच असतात जे आपल्याला जीवन जगायला शिकवतात आणि कायम आपल्या चेहऱ्यावरील हसू बनून असतात.

ते मित्रच असतात जे आपल्याला भावनिक किंवा आर्थिक संकटात देखील साथ देत असतात.

हेच मित्र तेव्हा देखील उभे असतात जेव्हा आपल्या सोबत कोणीच नसते, इतकेच काय तर आपण चुकीचे असलो ना तरी ते आपली बाजूने उभे असतात. त्यांचे आणि आपले काही एक नाते नसते तरी देखील ते आपल्यासाठी इतके काही करतात की ते आपल्याला रक्ताच्या नात्यांपेक्षा जास्त महत्वाचे असतात. ते लोक खरंच खूप नशीबवान असतात त्यांना खूप चांगले मित्र भेटतात.


FAQ 

सर्वात पहिला फ्रेंडशिप डे कधी साजरा केला गेला?

संपूर्ण जगभरात फ्रेंडशिप डे हा 1958 साली साजरा केला गेला.

फ्रेंडशिप डे कधी साजरा केला जातो?

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने