What is Dogecoin in marathi । डॉजकॉइन/ डॉगेकॉइन संपूर्ण माहिती

What is Dogecoin in marathi । डॉजकॉइन/ डॉगेकॉइन संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो तुम्हाला भारतीय रुपया आणि तुमच्या पैकी काही लोकांना बीटकॉइनच्या विषयी देखील माहिती असेल परंतु आजच्या घडीला एक नवीनच कॉइन बाजारात चर्चेचा विषय बनला आहे, त्याचे नाव आहे Dogecoin! मराठीत उच्चार कसा करायचा हे देखील तुम्हीच ठरवा कारण काही लोक याला डॉजकॉइन, काही लोक डॉगकॉइन, डॉजेकॉईन अशा वेगवेगळ्या नावांनी उच्चारतात. 

What is Dogecoin in marathi । डॉजकॉइन/ डॉगेकॉइन संपूर्ण माहिती

भारतीय रुपया हे भारताच्या चलनाशी निगडित आहे तर बिटकॉईन हे ब्लॉकचेन वर आधारित आहे. बिटकॉईन असा दावा करत असते की जगाच्या या व्यवस्थेत काहीतरी ते नवीन घडवून आणणार आहेत परंतु हा Dogecoin हा तर एका meme वर आधारित आहे. खरंच मजाक मजाक मध्ये हा कॉइन बनवला गेला होता. काही काळापूर्वी एक कुत्र्याचा फोटो व्हायरल होत होता त्याचा फोटो घेऊन dogecoin तयार झाला. हे झाले असे की सध्या व्हायरल होत असलेला "पारी हो रही है" meme वापरून कोणीतरी पारी कॉइन बनवून टाकेल! किंवा जो काही meme येईल त्याचा वापर करून कोणीतरी नवीन कॉइन काढेल. हे सर्व काही शक्य आहे आणि तुम्ही देखील असा कॉइन बनवू शकता. कारण एकच आहे की क्रिप्टो करन्सी ही सर्वात वेगळी अशी डीसेंट्रलाईज्ड करन्सी आहे की कोणीही स्वतःचा कॉइन लाँच करू शकतात. 

आपला आजचा विषय dogecoin हा आहे कारण तो इतका जास्त फेमस झाला की एलोन मस्क सारखे मोठे लोक त्या कॉइन ला विकत घ्यायला लागले व त्या कॉइन ला प्रमोट देखील करायला लागले. 

बिटकॉईन प्रसिद्धीला आल्यानंतर काही लोकानो त्यामध्ये कमतरता शोधून काढल्या. यात बिटकॉईन ची देवाणघेवाण करण्यासाठी लागणारा वेळ हा खूप जास्त आहे, बिटकॉईन ची कार्यप्रणाली सुरू राहण्यासाठी खूप जास्त प्रमाणात ऊर्जेची गरज भासते आणि हीच गोष्ट निसर्गासाठी घातक आहे. याशिवाय अन्य कारणांमुळे देखील काही लोकांनी स्वतःचे कॉइन बनवायला सुरुवात केली. जे नवीन कॉइन बाजारात आले त्या सर्वांना Alt-coins म्हणजेच alternative coins म्हणले जाते. यात लाँच होणारे प्रत्येक कॉइन हे बिटकॉईन चे disadvantage संपवण्याचे काम करत आहेत. यात ethrium, litecoin सारखे अनेक कॉइन आहेत ज्यांची चर्चा आपण Alt-coins विषयी माहिती या लेखात घेतली आहे.

जेव्हा हे alt-coins आले तेव्हा लोकांना समजले की कोणीही आपले स्वतःचे कॉइन बाजारात घेऊन येऊ शकतो. काही लोकांनी तर काहीही कारण नसताना स्वतःचे कॉइन बनवायला सुरुवात केली. या नवीन कॉइन मध्ये काही एक फायदा नव्हता त्यांनी फक्त नाव बदलून एक नवीन कॉइन सुरू केला. काही लुटणाऱ्या लोकांनी देखील स्वतःचे कॉइन बनवले आणि त्यांची जाहिरात केली. त्यामुळे लोक त्यात पैसे गुंतवत गेले आणि पुढे लोकांना नुकसान सहन करावे लागले तर त्या scamers ला भरघोस असा फायदा झाला. यालाच Pump and Dump Scheme संबोधले जाते. अनेक लोकांनी स्वतःचे कॉइन सुरू केले, त्यामागील उद्देश हा काहींचा लुटणे हा होता तर कधी कधी फक्त मजेसाठी ते बनवत गेले. 

जे कॉईन्स काहीही अर्थ नसताना बनवले जातात त्यांना shit coins म्हणून संबोधले जाते. कारण हे कॉईन्स या फिल्ड मध्ये जास्त काही योगदान देत नसतात आणि त्यामुळेच त्यांना shit coin म्हणून ओळखले जाते. काही लोक आजही म्हणतात की dogecoin हा एक shitcoin आहे. फरक हा आहे की dogecoin बनवण्यामागील उद्देश हा कुठलाही scam करणे नव्हते तर फक्त एक मजाक होता. 

2013 सालची गोष्ट आहे जेव्हा हा doge meme त्याच्या प्रसिद्धी च्या शिखरावर होता, तेव्हा जॅकसन पालमर , जे एक ऑस्ट्रेलियन मार्केटर होते आणि बिली मार्कस जे IBM मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर होते त्यांनी हा dogecoin डेव्हलप केला. पालमर यांचे म्हणणे आहे की त्यांना ही कल्पना विनोदातून सुचली होती, त्यांनी ठरवले होते की इंटरनेट विश्वात ट्रेंड करणाऱ्या क्रिप्टोकरन्सी आणि doge meme यांना एकत्र करावे. 

Dogecoin ची कोडींग ही सर्व litecoin वर आधारित आहे. Litecoin हा एक alt-coin आहे त्याचे बिटकॉईन वर काही प्रमाणात advantages हे नक्कीच आहेत. याला देवाणघेवाण करण्यासाठी कमी वेळ आणि कमी खर्च लागतो. आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे आजच्या घडीला dogecoin ची मार्केट व्हॅल्यू ही litecoin ला देखील खूप मागे सोडून गेलेली आहे. जर जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी बघितल्या तर पहिल्या 6 मध्ये dogecoin चे नाव येते आहे. 

सर्वात मोठा प्रश्न हा आहे की जो कॉइन विनोदाचा भाग म्हणून बनवला गेला होता तो इतका जास्त प्रसिद्ध कसा झाला? का सर्व लोक या कॉइन ला विकत घेण्याचा मागे लागले आहेत?

पहिले कारण आहे रेडिट! रेडिट वेबसाईटला लोकांनी सुरुवातीला खूप मजाक करत वापरायला सुरुवात केली. जेव्हा एखाद्याला एखादी पोस्ट रेडिट वर आवडली किंवा केलेली कमेंट आवडली तर लोक एकमेकांना टीप म्हणून काही dogecoin देत असत. याला dogebot tip म्हणून संबोधले जायचे. साधारणतः ही टीप 5 dogecoin ची असे व तेव्हा dogecoin ची किंमत ही 0.0002¢ होती. ही किंमत खूप खूप कमी होती परंतु हळूहळू रेडिट वर dogecoin ला टीप म्हणून वापरणे खूप famous होत गेले आणि वर्षे पालटली तशी ही गोष्ट आणखी प्रसिद्धीला आली. Dogecoin ला इतके जास्त वापरात आणले गेले आणि इतके जास्त देवाणघेवाण व्यवहार झाले की त्याची व्हॅल्यू खुप वेगाने वाढत गेली. 

सप्टेंबर 2017 मध्ये टेस्ला चे CEO एलोन मस्क यांनी या कॉइन ला बघितले. एलोन मस्क हे "ट्विटर scambot issue" विषयी जॅकसन पालमर यांना भेटले. ट्विटर वर जे काही क्रिप्टोकरन्सी च्या नावावर फेक अकौंटस आहेत त्यांना आळा घालण्यासाठी एलोन मस्क प्रयत्न करू इच्छित होते. याचे कारण एक होते की अनेक लोक त्यांच्या नावाचा वापर करून ट्विटर वरून लोकांना लुबाडत होते आणि आजही करत आहेत. या गोष्टीवर त्यांनी जॅकसन पालमर यांची मदत मागितली व तेव्हा एलोन मस्क यांना dogecoin विषयी सविस्तर माहिती मिळाली. 7 महिन्यानंतर त्यांनी ट्विट केले की "doge कदाचित त्यांची आवडती क्रिप्टोकरन्सी असेल." तदनंतर मार्च 2020 मध्ये ते ट्विट करतात की "Dogs Rock. They are the best coins."

त्यानंतर येणाऱ्या काळात त्यांनी dogecoin विषयी अनेक ट्विट्स केले जे dogecoin ला डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट प्रमोट करत होते. एलोन मस्क हे विश्वातील सर्वात लोकप्रिय आणि पसंत केले जाणारे अब्जाधीश आहेत. त्यामुळे जेव्हा देखील ते ट्विट करत तेव्हा त्या dogecoin ची किंमत 25% ते 50% सहज वाढत असे. जस जसा वेळ जात गेला, 2020 गेला आणि मग 2021 मध्ये सध्याच्या घडीला dogecoin ची किंमत ही 50 सेंट देखील क्रॉस करून पुढे गेली होती. सर्वात सुपीक काळात dogecoin ने जवळपास 80 बिलियन डॉलर्स व्हॅल्यूएशन गाठली होती. मागील काही काळात याची किंमत पुन्हा कमी झाली आहे. जे लोक या dogecoin ला सपोर्ट करतात त्यांचे टार्गेट आहे की dogecoin ला लवकरच 1$ पर्यंत घेऊन जायचे आहे. याचाच अर्थ असा की 1 dogecoin ची किंमत ही 1 डॉलर बरोबर असेल. 


Dogecoin खरेदी करायची प्रोसेस-

Dogecoin विकत घेण्याची प्रोसेस ही बाकी क्रिप्टोकरन्सी ला खरेदी करण्याचा प्रोसेस सारखीच आहे. तुम्हाला एक क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज प्लॅटफॉर्म वापरावा लागेल.


Dogecoin च्या दैनंदिन जीवनातील वापराविषयी बोलायचे झाले तर Dogecoin च्या टीम ने अनेक ठिकाणी डोनेशन देखील केलेले आहे. त्यांचे सर्वात पहिले दान हे जमाईकन बॉबस्लेज टीम ला $30,000 dogecoin स्वरूपात दिले होते. हे देण्यामागील कारण म्हणजे त्यांना ते 2014 मधील रशियन विंटर ओलांपिक्स मध्ये पाठवू इच्छित होते. त्यानंतर केनिया मध्ये काही पाणी साठवणूक करणाऱ्या प्रकल्पांसाठी आणि काही गरजू मुलांच्या मदतीसाठी dogecoin च्या टीम ने मदत केलेली आहे. 

Dogecoin ची टीम किंवा Community कोण आहे?

रेडिट वर dogecoin चा एक subreddit आहे तिथे असणारे लोक जे dogecoin होल्ड करून आहेत आणि dogecoin ला प्रमोट करत आहेत ते लोक या community मध्ये येतात. 

आजच्या घडीला जर बघितले तर dogecoin एक cultural trend बनला आहे. यात स्वतःची काही किंमत नाहीये कारण हे असेही नाहीये की काहीतरी नवीन तंत्रज्ञानातील गोष्ट घेऊन आलेले आहे किंवा काहीतरी वेगळं आहे. फक्त होत असलेल्या चर्चा आणि त्यांच्या प्रमोशन करणाऱ्या व्यक्तींमुळे dogecoin आज इतका जास्त प्रसिद्ध आहे. ही गोष्ट त्या सर्व लोकांसाठी आहे जे विचार करत आहेत की आपण dogecoin मध्ये पैसे गुंतवावेत आणि त्यांना ते 10 पट, 100 पट किंवा हजार पट मिळतील तर ही पैशांची किती चांगली इन्व्हेस्टमेंट बनेल! 

तुम्हाला हे समजून घ्यायला हवे की cultural trends हे खूप वेगाने वाढतात परंतु एक उच्चाक गाठून ते पुन्हा खालीच येतात. त्यामुळे या बाबतीत देखील असे काही घडेल याची शक्यता नाकारता येत नाही. 

तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे असेल तर तुम्ही कायु शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की यात किती मोठी रिस्क आहे. गुंतवणूक करताना जितकी जास्त रिस्क असते तितकेच जास्त चान्स असतात की तुम्हाला जास्तीत जास्त रिटर्न मिळू शकेल. त्यामुळे असे देखील होऊ शकते की काही वर्षांमध्ये या dogecoin ची किंमत ही 1 डॉलर जाऊ द्या, 100 डॉलर देखील होऊ शकते. आणि असे देखील होऊ शकते की आज 50 सेंट असलेली किंमत 0 होऊन तुमचे पैसे गायब होऊ शकतात. 

इंटरनेट विश्वात cultural trends ला predict करणे जवळपास अशक्य आहे. हे predict करणे म्हणजे असा विचार करणे की संपूर्ण विश्व कसा विचार करेल! हीच गोष्ट मी बिटकॉईन विषयी देखील बोलेल की तुम्ही जितके पैसे सोडून देऊ शकता तितकेच पैसे तुम्ही बिटकॉईन मध्ये गुंतवावेत. जरी पुढे जाऊन बिटकॉईन सुद्धा 0 किंमतीवर आला तरी तुम्हाला जास्त नुकसान व्हायला नको. Dogecoin तर मग बिटकॉईन पेक्ष्या जास्त रिस्की आहे, आणि आम्ही सांगितलेली गोष्ट ही बिटकॉईन पेक्षा dogecoin ला जास्त लागू होते. तरी देखील dogecoin ला स्वतःची एक किंमत आहे कारण ती एक नवीन टेक्नॉलॉजी आहे. 

शेवटी एकच सांगेल की जगात त्याच गोष्टींना किंमत असते ज्यावर लोक विश्वास ठेवतात. त्यामुळे लोकांना ज्या गोष्टीला किंमत द्यावी वाटेल तिलाच किंमत प्राप्त होते. त्यामुळे जर पुढे सर्व म्हणायला लागले की dogecoin ला व्हॅल्यू आहे तर मग सर्व लोक dogecoin विकत घ्यायला सुरुवात करतील आणि dogecoin ची किंमत ही वाढत जाईल. 

ही किंमत वाढायला अनेक कारणे असू शकतात, जसे की कोणी म्हणेल की एलोन मस्क यांचा ब्रँड dogecoin शी जोडलेला आहे त्यामुळे याची किंमत वाढेल. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने