दोन लाखाहून अधिक शासकीय पदे रिक्त । अशी होणार भरती -जाणून घ्या
तुम्ही MPSC मधील राज्यसेवा देत असाल किंवा सरळसेवेची परीक्षा देत असाल किंवा संयुक्त गट परीक्षा देत असाल किंवा आरोग्य विभागाची एखादी परीक्षा देत असाल किंवा पोलीस भरती असेल तरी तुम्हाला त्या विभागाच्या अंतर्गत किती पदे रिक्त आहेत हे माहीत असणे खूप गरजेचे आहे.
एक नवीन बातमी येते आहे की दोन लाखाहून अधिक शासकीय पदे ही रिक्त आहेत, मग ती कोणत्या विभागात आहेत? तर खाली सविस्तर माहिती देत आहे जी संपूर्ण वाचण्याचा प्रयत्न करा.
गृह विभागात सर्वाधिक रिक्त पदे
सर्वात आधी गृह विभाग म्हणजे काय हे लक्षात घेऊयात आणि यात कोणती पदे असतात हे देखील जाणून घेऊयात. गृह विभागात क्लास वन मध्ये DYSP, ACP त्यांच्या खाली PSI आणि पोलीस ही सर्व पदे येतात. गृहविभागात 24 हजार 581 पदे रिक्त आहेत.
आरोग्य विभागाच्या भरती विषयी सध्या जास्त चर्चा आहे आणि सार्वजनिक आरोग्य विभागात 20 हजार 544 पदे रिक्त आहेत. यासोबत जलसंपदा या विभागात देखील 20 हजार 873 पदे रिक्त आहेत.
महासंचालक यांनी काही काळापूर्वी 2000 PSI ची पदभरती विषयी वक्तव्य दिलेले होते. त्यामुळे PSI ची मोठी भरती कधीही निघू शकते.
पदे रिक्त असताना होतीये कंत्राटी भरती
लोकसत्ता वृत्तपत्राच्या एका लेखानुसार राज्य शासकीय कार्यालये आणि जिल्हा परिषदांची मिळून इतकी सर्व पदे रिक्त असताना देखील राज्य शासनाकडून फक्त कंत्राटी कामगार भरती केली जाते आहे. याशिवाय राज्य शासन सहज पणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत भरती करू शकते आहे.
शासकीय कार्यालये आणि जिल्हा परिषद मिळून रिक्त पदांचा सविस्तर तपशील-
अ वर्ग : 10 हजार 545 जागा
ब वर्ग : 20 हजार 999 जागा
क वर्ग : 1 लाख 27 हजार 505 जागा
ड वर्ग : 40 हजार 944 जागा
वरील सविस्तर माहिती ही डिसेंबर 2019 ची यादी आहे. आता त्यानंतर खूप काळ लोटला आहे आणि असंख्य जागा आता खाली झाल्या असणार आहेत. महापरीक्षा संकेतस्थळ वरून भरती प्रक्रिया झालेली नाहीये.
जिल्हा परिषदा मधील रिक्त पदे-
सरळसेवा - 1 लाख 41 हजार 329 पदे
पदोन्नती मार्फत - 58 हजार 864 पदे
जिल्हा परिषदा मधील एकूण मंजूर पदे-
सरळसेवा - 7 लाख 80 हजार 523 पदे
पदोन्नती - 3 लाख 18 हजार 581 पदे