Small Town Business Ideas :लहान शहरांमध्ये कमी गुंतवणुकीत अधिक नफा देणारे 5 बिझनेस

Small Town Business Ideas :लहान शहरांमध्ये कमी गुंतवणुकीत अधिक नफा देणारे 5 बिझनेस

कोरोना या महामारीच्या संकटामुळे अनेक लोकांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्यात आणि आता कुठे थोडेफार सुरळीत होत आहे तर फक्त मोठ्या शहरांमध्ये रोजगार आणि बिझनेसच्या संधी आहेत. परंतु छोट्या शहरांकडे किंवा गावांकडे पाहिले तर तिथे काय बिझनेस करता येऊ शकतो? हे प्रश्न अनेकांच्या मनामध्ये असतो. काही व्यवसाय असेही आहेत की जे तुम्ही छोट्या शहरांमधून किंवा गावामध्ये रहाता असाल तरी करू शकता. असेच काही व्यवसाय आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. हे व्यवसाय सुरू करून सुरुवातीला थोडासा नफा आणि नंतर त्याला वेगळ्या उंचीवर घेऊन जाऊन अधिकाधिक नफा मिळवू शकता.

Small Town Business Ideas :लहान शहरांमध्ये कमी गुंतवणुकीत अधिक नफा देणारे 5 बिझनेस

छोट्या शहरांमध्ये सुरू करता येणारे बिझनेस (Small Town and Village Business Ideas)

तुमच्यासाठी काही खास व्यवसायांची यादी घेऊन आलेलो आहे जी तुम्ही अगदी काही रुपये देऊन सुरू करू शकता.

हार्डवेअर चे दुकान

गावात किंवा लहान शहरामध्ये तुम्ही रहात असाल तरी देखील तुम्हाला हार्डवेअर चे दुकान उघडण्याची संधी आहे. लहान शहरांमध्ये हार्डवेअर चे दुकान शोधून देखील सापडत नाही आणि एखाद्याला त्या वस्तू हव्या असतील तर त्याया वस्तू खरेदी करण्यासाठी जवळच्या शहरात जावे लागते. अशात जर तुम्ही तुमच्याच गावात हार्डवेअर चे दुकान खोलले आणि यात दोरी, चैन, स्टेपलर, तारा, इतर साहित्य, पाईप आणि वेगवेगळ्या प्रकारचे हातोडे, खिळे, टेप आनि इतर हार्डवेअर संबंधित वस्तू ठेवाल तर कमी वेळेत जास्त फायदा मिळवण्याच्या शक्यता नाकारता येत नाहीत.

लोकांच्या गरजेनुसार तुम्हाला सर्व सामान ठेवावे लागेल, जेणेकरून लोक तुमच्याकडे येऊन मोकळ्या हाताने माघारी जाणार नाहीत.

सौरऊर्जा व्यवसाय कसा सुरू करायचा?

रेडिमेड कापड दुकान

छोट्या शहरांमध्ये आपल्याला रेडिमेड आणि लेटेस्ट कपडे असणारे दुकान खूप कमी बघायला मिळतात. एक अशी दुकान तुम्ही सुरू करू शकता की ज्यामध्ये लहान मुलांचे, मुलींचे, महिलांचे आणि पुरुषांचे नवीन नवीन डिझाईनचे कपडे मिळू शकतील. जर तुम्ही स्वतःचा हा व्यवसाय सुरू केला तर तुम्ही कमी कालावधीमध्ये खूप चांगल्या प्रकारे मार्जिन मिळवून चांगला नफा मिळवू शकता. छोट्या शहरांमधील तरुणाई ही सतत लेटेस्ट ट्रेंड्स आणि फॅशन असलेले कपडे मागणी करत असतात. अशा वेळी तुम्ही ते कपडे स्वतःच्या दुकानात ठेऊ शकता. जर तुम्ही नवीन ट्रेंड सोबत रहाल आणि योग्य दर ठेवाल तर शेजारच्या तालुक्यांमधून देखील तुमच्याकडे ग्राहक येतील व लवकरच प्रसिद्धी मिळेल.

दूध संकलन आणि विक्री केंद्र

आजच्या घडीला डेअरी प्रोडक्ट्स ची मागणी खूप जास्त वाढत आहे. अशात वाढती दुधाची गरज भागविण्यासाठी लोक डेअरी कडे किंवा दूध सेन्टर कडे जातात. ग्रामीण भागात शेतकरी लोक हे खूप मोठ्या प्रमाणात दुधाचे उत्पादन घेतात. अशाच प्रकारे ते दूध तुम्ही संकलन करून विक्री करण्यासाठी दूध संकलन आणि विक्री केंद्र आपल्या शहरात सुरू करू शकता. या व्यवसायात तुम्ही अनेक फायदे प्राप्त करू शकतात. तुम्ही दूध संकलन करून थेट विक्री तर करूच शकता परंतु काही दूध हे तुम्ही दूध डेअरी ला देखील पाठवू शकता. यातून शेतकऱ्यांचा देखील फायदा होऊ शकेल व तुम्हाला देखील या व्यवसायात चांगला फायदा होईल.

खते व बियाणांचे दुकान

छोट्या शहरांमध्ये अनेक गावांची बाजारपेठ असते. परंतु कृषी क्षेत्राविषयी तशी दुकाने ही कमीच असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना कधी कधी कीटकनाशके, बियाणे आणि खते घेण्यासाठी बाहेर जावे लागत असते. तुम्ही तुमच्या शहरात कृषी विषयक सेवा केंद्र सुरू करून शेतकऱ्यांची मदत करू शकता. तुम्हाला या व्यवसायात नफा चांगला होऊ शकतो आणि या व्यवसायाला सुरू करण्यासाठी लायसन्स ची गरज असते. तुमचे कृषी क्षेत्रात शिक्षण झालेले असेल तर हे लायसन्स सहज मिळते.

पिठाची गिरणी

आजच्या काळात शहरातील लोक हे रेडिमेड पीठ विकत घेतात परंतु तरी देखील ग्रामीण भागात आजही गिरणीतून पीठ दळून आणण्याची प्रथा आहे. आता घरोघरी छोट्या गिरण्या आलेल्या आहेत त्यामुळे हा व्यवसाय थोडा कमी झाला आहे. या व्यवसायाला जोड म्हणून तुम्ही शेवाई, आणि इतर उन्हाळी पदार्थ बनवून देण्याचे केंद्र सुरू करू शकता. 

साधी गिरणी सोबत तुम्ही मिरची कुटून आणि धनापावडर बनवून देणारे मशीन देखील ठेऊ शकता. या व्यवसायात नफा ठीकठाक मिळत असतो परंतु आपल्या भागातील विजेचे वेळापत्रक चांगले असेल तर हा व्यवसाय चांगला चालू शकतो.

तेलाचा घाना

आजच्या घडीला लोक जास्तीत जास्त नैसर्गिक गोष्टी ग्रहण करणे पसंद करत आहेत. लोक आता रेडिमेड तेल घेण्यापेक्षा स्वतः समोर तेलाच्या घाण्यातून काढलेले तेल ग्रहण करणे पसंत करतात. तेलाचा घाना तसा आता कमी किंमत मध्ये उपलब्ध होतो आणि त्यामुळे तुम्ही छोट्या प्रमाणात हा व्यवसाय सुरू करू शकतात. शहरातील लोक देखील यासाठी गावाकडे येत असतात.

याशिवाय महिलांसाठी अनेक व्यवसाय देखील आहेत जे तुम्ही करू शकता. 

आपली गावाकडील परंपरा अशी असते की सर्वांना सोबत घेऊन चालायचे असते आणि वर सांगितलेले सर्व व्यवसाय हे तुम्ही सामूहिक रित्या देखील करू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने