अशिक्षित लोकांसाठी बिझनेसच्या आयडिया | Business Ideas for Uneducated Peoples in Marathi

अशिक्षित लोकांसाठी बिझनेसच्या आयडिया | Business Ideas for Uneducated Peoples in Marathi

अशिक्षितांसाठी बिझनेस आयडिया (कमी शिकलेल्या लोकांसाठी बिझनेस) (Business Ideas for uneducated in marathi) (kami shiklelya lokansathi Business Ideas)

आपल्या अवतीभवती अनेक कमी शिकलेले लोक आहेत, त्यांच्या कमी शिकण्याच्या मागे त्यांची न शिकण्याची इच्छा नाही तर काहीतरी अडचण असते. काही लोकांकडे शिक्षणासाठी पैशांचा अभाव असतो तर काहींकडे साधने उपलब्ध नसतात, घरची परिस्थिती काही योग्य नसते तरी देखील या सर्व कारनांमुळे त्या व्यक्तीला इतर समाजाकडून कायम अपमानाचा सामना करावा लागतो. आज असे काही व्यवसाय घेऊन आलो आहे जे करून कमी शिकलेला व्यक्ती देखील आत्मनिर्भर बनू शकतो. चला तर आजच्या या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात की अशिक्षित किंवा कमी शिकलेले व्यक्ती देखील कोणते व्यवसाय करू शकतात.

अशिक्षित लोकांसाठी बिझनेसच्या आयडिया | Business Ideas for Uneducated Peoples in Marathi

कमी शिकलेल्या लोकांसाठी व्यवसाय (Business Ideas for Illiterate)

कमी शिकलेले, अशिक्षित किंवा परिस्थितीने अशिक्षित बनवले आहे अशा लोकांसाठी खाली काही व्यवसाय आहेत जे करून ते स्वतःला आत्मनिर्भर बनवू शकता..

पिण्याच्या पाण्याचा पुरवठा

सध्याच्या काळात प्रदूषण खूप जास्त वाढले आहे. लोक सध्याच्या घडीला फिल्टर केलेलं पाणी सोडता पित नाहीत. प्रत्येक व्यक्ती हा काळजी घेत आहे. अशा काळात थोड्याफार तंत्रज्ञानाचा वापर करून कोणीही शुद्ध पाणी पुरवठ्याचे काम करू शकतात. सध्याच्या काळात लोक देखील पिण्याच्या पाण्यासाठी एकतर प्लास्टिक बॉटल बंद पाणी मागवतात किंवा कॅन देखील मागवला जातो. मागणी असताना तुम्ही जर हा व्यवसाय सुरू केला आणि लोकांना योग्य आणि उत्तम सुविधा दिली तर हा व्यवसाय खूप जास्त फायद्यात घेऊन जाऊ शकतो.

चहाची टपरी

चहा म्हणजे आपल्या देशातील खुप मोठा छंद आहे. देशात करोडो चहा प्रेमी आहेत. लोक सकाळची सुरुवात ही चहा ने करतात आणि पुढे जाऊन देखील दिवसभरात थकवा आला की चहा पिणे पसंद करतात. ऑफिसला जाणारे लोक दिवसातून 2 ते 3 वेळा चहा नक्की पितात. त्यामुळे एखाद्या कार्यालयाच्या ठिकाणी, कॉलेज जवळ अशा काही ठिकाणी चहा स्टॉल सुरू केला तर तिथे गर्दी आधीच असेल. या ठिकाणी जवळपास तुम्ही बघाल तर चहा चे स्टॉल हे सगळे अशिक्षित लोकांचेच असतात आणि ते खूप जास्त पैसे कमवतात. 

या व्यवसायात गुंतवणूक ही कमी आहे आणि जर व्यवसाय योग्य ठिकाणी असेल तर दिवसाला 1000 पेक्षा जास्त प्रॉफिट नक्की मिळत जाईल.

गाडी धुवायचे सेंटर

आज प्रत्येकाचे आयुष्य धावपळीचे झाले आहेत आणि या काळात स्वतःच्या गाड्या धुवायला देखील जमत नाही. अशात आपण आपल्या गाड्या या गाडी धुवायच्या सेंटरला देत असतात. त्यात अशा प्रकारे व्यवसाय करून कमी शिकलेल्या व्यक्ती देखील चांगल्या प्रकारे पैसे कमावू शकतात. यालाच जोडून तुम्ही गॅरेज देखील सुरू करू शकतात ज्यात लोकांच्या गाड्यांमध्ये काही बिघाड असेल तर तो दुरुस्त करायचे काम देखील सुरू करू शकतात. 

पंचर काढणे आणि हवा भरण्याचा व्यवसाय

हा व्यवसाय म्हणजे कमी नफा देणारा आहे तरी देखील धुलाई सेंटर ला जोडून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. या व्यवसायात तुम्हाला गुंतवणूक ही थोडी जास्त करावी लागेल परंतु ती एक वेळा करायची गुंतवणूक असेल. यात जास्त काही पुन्हा पुन्हा गुंतवणूक करावी लागत नाही. हा व्यवसाय जरी छोटा असेल तरी देखील हायवेवर याची जास्त गरज असते आणि तिथे तुम्हाला जास्तीत जास्त फायदा हा होऊ शकतो.

पाणी पुरी व्यवसाय

पाणी पुरी म्हणले की तोंडाला पाणी येते. अनेकदा आपल्याला भैया लोक पाणी पुरीचा व्यवसाय करताना दिसतात परंतु आपण देखील अशिक्षित असाल किंवा शिक्षण कमी झालेले असेल तर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी काही हरकत नाही. काम कोणतेही छोटे नसते त्याला आपण मोठे करायचे असते. कधी तरी अशी देखील वेळ येते जेव्हा एखादा पाणीपुरी वाला खूप मोठा होतो आणि स्वतःचा ब्रँड तयार करतो, हीच गोष्ट पान विक्री करणे आणि चहा सोबत घडलेली आहे. येवले अमृततुल्य आणि तारांगण सारखे मोठे ब्रँड आपण अनुभवतो आहे.

वरील व्यवसायाच्या सोबत आणखी काही वेगळे आणि युनिक व्यवसाय लवकरच घेऊन येतो आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने