भारतातील प्रसिद्ध बँक चोरी | Biggest Bank Robbery of India in Marathi
हा विनोद तुम्ही कधी नक्की ऐकला असेल की 2 चोर बँक लुटल्यानंतर मुद्देमालासोबत घरी गेले. एक चोर दुसऱ्या चोराला म्हणतो की चल मोजूयात किती पैसे आहेत? त्यावर दुसरा म्हणतो की सोड, टीव्ही लाव, बातम्यांमध्ये सांगतीलच किती आहेत!
नवी मुंबई, नोव्हेंबर 2017
एक लॉकरमध्ये तार घातल्यानंतर एक चोर म्हणतो की हे तर रिकामे आहे! दुसऱ्यामध्ये घातल्यानंतर हे एकदम भरलेले आहे. जवळपास चार करोड तीस लाखांची चोरी झाली. येत्या सोमवारी सकाळी बँकेत सुरुवात झाल्यावर लक्षात येते की दरोडा पडला होता पोलिसांना बोलावण्यात येते. पोलीस तिथे असलेल्या भुयाराचा मार्ग कुठे जातो आहे हे बघायला लागले. जवळपास 25 फूट भुयाराच दुसरं टोक हे एका रिकाम्या दुकानात उघडते. त्यानंतर चौकशी करण्याचे आदेश दिले जातात की हे दुकान कोणी भाड्याने घेतले आहे हे तपासा!
पोलीसांनी शोध लावला, आणि जेव्हा पोलीस त्या मिळालेल्या पत्त्यावर पोहोचले तेव्हा विचारले की जिना बच्चन प्रसाद आहेत का? त्यावर उत्तर मिळाले की तो तर ऑगस्ट मध्येच मरण पावला. हे चोर चलाख निघाले, त्यांना हे माहीत होते की जिना प्रसाद लवकर मरणार आहे म्हणून त्यांच्याच नावाचा वापर केला. पोलिसांनी तपास पुढे हलवत घटनास्थळाचा आसपास असणाऱ्या मोबाईल टॉवर्स चे रेकॉर्ड शोधायला सुरुवात केली.
पोलिसांनी सेल फोन रेकॉर्ड मधून एक गोष्ट शोधून काढली. त्या रात्री कोणीतरी एकाने घटनास्थळावरून एक फोन केला होता. या रेकॉर्ड मध्ये सापडलेला संदेश असा होता कि, मी लवकर धुळ्यात येतोय मेरी जान! पोलिसांनी त्या महिलेच्या नंबरवर कॉल केला. त्यावरून असे समजले की ती एक व्यावसायिक सेक्स वर्कर होती, ती मुंबई मधील घाटकोपर मेट्रो स्टेशनवर 18 नोव्हेंबर ला भेटणार होती.
पोलिसांनी सापळा रचला, परंतु ते चोर तिथून पळाले आणि पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. चोर पोलिसांचा हा खेळ एखाद्या चित्रपटप्रमाणे वाटत होता. जवळपास 5 किलोमीटर पर्यंत हा पाठलाग सुरूच होता. पोलिसांना त्यांची गाडी ट्राफिक जाम असल्याने पकडण्यात यश आले. लवकरच त्या चोरांनी सर्व काही कबूल केले. यातील सरदार हा फिश विक्रेता होता आणि त्याला शॉर्टकट ने अधिक चांगले जीवन जगायचे होते. त्याची आणि त्यांच्या गुन्हेगार साथीदारांची भेट पुण्यातील जेलमध्ये झाली होती. जिथे त्याने 4 वर्ष शिक्षा भोगली होती.
या बँक दरोड्याची योजना त्यांनी 6 महिने आधी आखली होती. सर्वात आधी त्यांनी दरोड्यासाठी उपयुक्त असे ठिकाण शोधले. त्यांनी युट्युब व्हिडीओ बघून बँक कशी लुटता येईल याची शिक्षण घेतले. बँक लॉकरच्या जवळ त्यांनी नकली कागदपत्रांचा वापर करून एक दुकान भाड्याने घेतले. त्यांनी तिथे आतून खोदकाम करायला सुरुवात केली आणि न
जर कोणी येत असेल तर सूचित करायला बाहेत एक मनुष्य देखील ठेवला. मुंबई शहरात कुठे ना कुठे खोदकाम सुरूच असते, त्याचा आवाज आणि प्रदूषण यामुळे सगळेच जण त्रासलेले आहेत. त्यामुळे लोक मनोरंजनासाठी बोलतात की दरोडेखोरांना मुंबई मेट्रोच्या खोडकामाचे काम द्यायला हवे होते, तयांनी कोणत्याही आवाजशिवाय किंवा कोणालाही त्रास न होता भुयार खोदले असते.
लुटलेला माल विकण्यासाठी मुंबईतील जवेरी बाजारपेठेत दुकाने लावली जातात, परंतु पोलीस मागे लागले आहेत आणि जास्त वेळ थांबता येणार नाही म्हणून ते दुकान बंद केले जातात. नंतर अर्ध्यापेक्षा कमी रक्कम ही जप्त करण्यात आली.
भविष्यात अशा दुर्घटनांना रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी बँकांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे. जेणेकरून बँका स्वतःला सुरक्षित ठेऊ शकतात. अशाच प्रकारचा गुन्हा आपल्या देशात 2014 साली हरियाणा येथील सोनिपथ येथे देखील घडला होता. दरोडेखोरांनी 125 फूट भुयार खोदून लॉकर लुटले होते. पुढे ते गुन्हेगार देखील पकडले गेले. 2007 साली केरळ मधल्या कोझिकोड येथे धूम पिक्चर ने प्रेरित होऊन बँकेच्या खाली असलेल्या रेस्टॉरंट च्या माध्यमातून चोरांनी लोकर्स लुटले होते. पोलिसांच्या हातून हे गुन्हेगार देखील सुटू शकले नव्हते.
फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन नुसार अमेरिकेत 2016 मध्ये झालेल्या 4000 पेक्षा जास्त बँका मध्ये झालेल्या चोऱ्यांपैकी 60% चोर पकडले गेले होते. भारतातील मोठ्या चोऱ्या या ताबडतोब पकडल्या गेल्या, त्यामुळे हेतू जर चुकीचा असेल तर सावध रहा!