लिनक्स काय आहे, इतिहास आणि फायदे - What is Linux, History and Pros in Marathi

लिनक्स काय आहे, इतिहास आणि फायदे - What is Linux, History and Pros in Marathi 

तुम्हाला माहीत आहे का लिनक्स काय आहे? आपण या लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमचा काय वापर करू शकतो? तुम्ही कोणतेही gadget घ्या ते स्मार्टफोन पासून कार पर्यंत, सुपर कॉम्प्युटर असेल किंवा घरातील वस्तू या सर्वांमध्ये Linux ही Operating System उपलब्ध आहे. आपल्याला जरी या विषयी माहिती नसेल तरी देखील आपण ती वापरत आहोत. 

Linux येऊन जवळपास 30 वर्षांहून अधिक कालावधी झाला आहे. 90 च्या दशकात हे आपल्या सर्वांमध्ये पहिल्यांदा आले. याच्या उपयुक्तते मुळे प्रत्येक device मध्ये याचा वापर जास्तीत जास्त होऊ लागला आणि Linux ही बादशहा बनली. 

लिनक्स काय आहे, इतिहास आणि फायदे - What is Linux, History and Pros in Marathi

ज्या लोकांनी
Linux Operating System पहिल्यांदा वापरलेली असेल त्यांना याच्या उपयोगांविषयी माहिती देखील असेल. परंतु जे लोक आजही याच्या उपयुक्तते विषयी परिचित नाहीत त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की आपण जे डिव्हाईस कायम वापरतो त्या सर्वांमध्ये Linux वापरली जाते. त्यासोबत ही संपूर्ण internet servers मध्ये वापरली जाते, इतकेच नव्हे तर stock exchanges मध्ये ही Linux वापरतात. 

मुख्य रूपाने एक reliable, secure आणि error free operating system असल्या कारणाने लिनक्स कर्नल सर्व लोक वापरू इच्छितात. आणखी एक गोष्ट म्हणजे हे पूर्णपणे open source आहे आणि free देखील आहे, ही गोष्ट developers ला स्वतःच्या पद्धतीने customization करायला मदत करतात. 

तर आम्ही आज विचार केला की Linux काय आहे याविषयी तुम्हाला पूर्ण माहिती देऊयात ज्यामुळे तुम्हाला देखील या उत्तम Open Source Operating System विषयी पूर्ण माहिती प्राप्त होईल. तर उशीर कोणत्या गोष्टीसाठी करायचा चला जाणून घेऊयात की लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम काय आहे? 

लिनक्स काय आहे? - Linux Operating System in Marathi 

लिनक्स हे Unix Operating system मधील एक Popular Version आहे. हे एक open source software आहे कारण याचा source code हा internet वर free मध्ये उपलब्ध आहे. यासोबत तुम्ही याला पूर्णपणे फ्री मध्ये वापरू शकता, सांगण्याचे तात्पर्य हेच की हे पूर्णपणे मोफत आहे. 

Linux ला Unix ची Compatibility लक्षात घेऊन design केलेले आहे. त्यामुळे याची functionality list ही सुरुवातीच्या Unix सोबत मिळती जुळती आहे. Linux OS ही OPEN Source असल्याने developers तिला आपल्या गरजेनुसार customize करू शकतात. त्यासोबतच ही कॉम्प्युटर साठी खूप reliable operating system आहे. 

Linux चा मालक कोण आहे? 

Linux ची licensing open source आहे त्यामुळे Linux फ्री मध्ये available आहे. तरी देखील Linux चा tredmark हा त्याचे निर्माते Linus Torvalds यांच्या कडे आहे. Linux Os चा Source Code चा copyright हा individual authors च्या नावावर आहे. त्यामुळे याला सार्वजनिक रूपाने GPLv2 Licence सोबत ठेवले आहे. 

कारन लिनक्स च्या पाठीमागे खूप मोठ्या समूहाचा हात आहे आणि यात योगदान देखील दिलेले आहे. याला develop करायला खूप वर्षे गेली. अशात ज्यांनी ज्यांनी योगदान दिले आहे त्यांच्याशी संपर्क करणे possible नाहीये त्यामुळे Linux चे Licence हे GPLv2 च्या अंतर्गत जोडले गेले आहे. 

Linux ची सुरुवात कशी झाली? 

1991 साली Linus Torvalds यांनी Linux बनवले. तेव्हा ते University of Helsinki चे विद्यार्थी होते. Torvalds यांनी Linux ला एक free आणि Minix OS चा open source alternative म्हणून बनवले होते. Linux हे minix os च्या जवळपास सारखेच होते आणि याला academic मध्ये वापरले जात होते. 

त्यांनी सर्वात आधी याचे नाव Freax ठेवायचा विचार केला परंतु त्यांच्या सर्व्हर च्या administrator ने directory चे नाव हे Torvalds यांचे पहिले नाव आणि Unix हे नाव combine करून LINUX ठेवले. हे नाव ऐकायला देखील चांगले वाटले त्यामुळे बदलले नाही. 

Linux ऑपरेटिंग सिस्टमचे Components 

लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम चे मुख्य स्वरूपात 3 components आहेत. 

  1. Kernel 

हे Kernel लिनक्स चा core part आहे. हे operating system मध्ये होणाऱ्या सर्व activities साठी responsible आहे. यात दुसरे modules देखील असतात आणि ते underlying hardwares सोबत directly interact करत असतात. Kernel low level hardware details ची माहिती system or application programs पर्यंत पोहोचण्यापासून थांबवते. याला तुम्ही abstraction behaviour म्हणतात. 

  1. SYstem Library 

SYstem library त्या special functions किंवा programs ला म्हणले जाते ज्यांचा वापर करून Application Programs किंवा system utility Kernel च्या Features ला Access करते. या libraries operating system च्या प्रति सर्व functionality implement करतात आणि त्यांना असे करण्यासाठी Kernel Modules code access rights ची गरज पडत नाही. 

  1. System Utility 

SYstem Utility त्या programs ला म्हणतात जे दुसरे specialized आणि individual level task करण्यासाठी कार्यरत असतात. 

Linux चे फायदे 

इथे आम्ही तुम्हाला लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम च्या काही महत्वाच्या features विषयी सांगणार आहोत.  

  1. Portable 

Portability चा अर्थ असा होतो की हे software कोणत्याही hardware मध्ये सारखेच काम करू शकेल. Linux Kernel आणि Application Programs हे सर्व Hardware Platforms ला support करतात. 

  1. Open Source 

Linux Source code हा freely available आहे आणि हा एक Community based Development Project आहे. Linux Operating system ची capacity वाढवण्यासाठी multiple Team Collaboration करून काम करतात, याने Linux कायम evolve होत आहे. 

  1. Multi-User 

Linux ही एक Multi User system आहे. म्हणजेच एकाच वेळी अनेक युजर्स system resources जसे की memory, RAM, Application Programs यांचा वापर करू शकतात. 

  1. Multiprogramming 

Linux एक multiprogramming system आहे. म्हणजेच एकाच वेळी यावर multiple applications हे run होऊ शकतात. 

  1. Hierarchical File System 

Linux आपल्याला एक standard file structure देते ज्यामुळे system files किंवा user files सहज arrange करता येतात.  

  1. Shell 

Linux एक special interpreter program देखील देते ज्याचा वापर करून operating system च्या commands या execute करता येतात. यासोबत याचा वापर दुसरे वेगवेगळे operations, call application Programs करण्यासाठी देखील केला जातो. 

  1. Security 

Linux user साठी खूप चांगले security feature देत असते. यात user ला password protection, Controlled access आणि काही files साठी data encryption हे देखील मिळते.  

Linux Commands in Marathi 

जर तुम्ही linux पहिल्यांदा वापरणार असाल आणि तुम्हाला Linux विषयी माहिती देखील नाहीये तर तुम्हाला basic Common Linux Commands विषयी माहिती नक्की असायला हवी. 

इथे आम्ही तुम्हाला लिनक्स कमांडस इन मराठी याची लिस्ट देणार आहोत जी तुम्हाला पुढे खूप कामी येईल. लक्षात ठेवा की आम्ही इथे फक्त कमांड लिस्ट आलेली आहे , यात त्यांचा syntax विषयी काही नाहीये. Syntax विषयी तुम्ही इतर पोस्ट मध्ये बघू शकता आणि रे सोपे आहे. 


Sr.No. 

Command 

Function 

1 

ls: 

हे Current Directory Content ला list करते. 

2 

cd: 

याच्या मदतीने तुम्ही तुमची current directory बदलू शकता. 

3 

cat: 

याने तुम्ही file मधील content हा screen वर display करू शकता. सोबत text files ला कॉपी आणि combine देखील करू शकता. 

4 

history: 

मदतीने आपण executed command list स्क्रीनवर बघू शकतो 

5 

chmod: 

File permission बदलू शकतो 

6 

chown: 

याने तुम्ही file owner बदलू शकतात 

7 

clear: 

Fresh start करण्यासाठी तुम्ही याच्या मदतीने screen clear करू शकता. 

8 

df: 

याने तुम्ही used आणि available disk space बघू शकता. 

9 

date: 

यांच्या मदतीने तुम्ही current system date आणि time display करू शकता. 

10 

du: 

याच्या मदतीने हे जाणून घेऊ शकता की कोणती file किती जागा घेत आहे. 

11 

file: 

याने तुम्ही उपलब्ध file च्या type of data ला जाणून घेऊ शकता 

12 

find: 

याने तुम्ही तुमच्या file मध्ये कोणतीही term search करू शकता 

13 

man: 

याच्या मदतीने तुम्ही specific command साठी help display करू शकता 

14 

cp: 

याने तुम्ही files किंवा folders copy करू शकता 

15 

mv: 

याने तुम्ही files आणि Directory या rename आणि move करू शकता 

16 

mkdir: 

याने तुम्ही नवीन directory बनवू शकता 

17 

lpr: 

याने तुम्ही कोणत्याही file चे content print करू शकता 

18 

less: 

याच्या सहाय्याने तुम्ही file content हे page by page बघू शकता. 

19 

tar: 

याने तुम्ही कोणत्याही file ला compress, create आणि extract tar file करू शकता. 

20 

grep: 

यात तुम्ही एका file मध्ये string search करू शकता 

21 

ssh: 

याच्या मदतीने तुम्ही remote machine सोबत contact आणि login (encrypted आणि secure) करू शकता 

22 

su: 

याने तुम्ही दुसऱ्या user मध्ये switch करतात 

23 

rmdir: 

याने तुम्ही directory remove करू शकता 

24 

rm: 

याने तुम्ही files आणि directories ज्या empty किंवा non empty असतील त्या remove करू शकता. 

25 

pwd: 

याच्या मदतीने तुम्ही Current user working directory display करू शकता 

26 

ps: 

याच्या मदतीने तुम्ही running process id सोबत दुसरी माहिती display करू शकता 

27 

passwd: 

याने तुम्ही user password बदलू शकता. 

28 

more: 

कोणतेही file ही page by page display करू शकता 

29 

kill: 

याने तुम्ही कोणतीही process ही process id च्या मदतीन kill करू शकता. 

30 

gzip: 

याने तुम्ही एक compressed file with .gz extension create करू शकता. 

31 

unzip: 

File unzip किंवा Uncompress करू शकता 

32 

shutdown: 

याने मशीन shutdown करू शकता 

33 

free: 

याचा वापर हा dhow साठी केला जातो. 

34 

top: 

CPU usage नुसार top process यातून show होते. 

35 

who: 

याने तुम्ही current user ची information display करू शकता. 

36 

whereis: 

याने तुम्ही कोणत्याही command ची location जाणून घेऊ शकता( ती कुठे store आहे) 

37 

whatis: 

याने तुम्ही command information ही single line मध्ये बघू शकता 

38 

tail: 

याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही file चे शेवटच्या 10 lines print करू शकता 

39 

wget: 

याने कोणतीही file इंटरनेट वरून download करता येते आणि कुठेही store करता येते. 


Windows vs Linux : Key Difference 


Windows 

Linux 

Windows मध्ये वेगवेगळे data drives जसे की C: D: E यांचा वापर हा files आणि folders store करण्यासाठी केला जातो. 

Linux हे tree सारख्या hierarchical files system चा वापर करते 

WIndows मध्ये different drives असतात जसे की C, D, E 

इथे कोणतेही वेगळे drive नसतात. 

Hard Drives, CD ROMs, Printers यांना device म्हणतात 

तर Linux मध्ये Peripherals जसे की Hard Drives, CD ROMs, Printers यांना files समजले जाते 

इथे 4 प्रकारचे user account types असतात 

  1. Administrator 

  1. Standard 

  1. Child 

  1. Guest 

इथे 3 प्रकारचे user account types असतात 

  1. Regular 

  1. Root 

  1. Service Account 

इथे Administrator user कडे Computers चे सर्व administrative Privileges असतात 

Linux मध्ये केवळ root user हा super user असतो, त्याच्याकडे सर्व administrative privileges असतात. 

इथे 2 समान नावाच्या files एका फोल्डर मध्ये ठेऊ शकत नाही. 

Linux मध्ये file naming convention हे case sensitive असते. त्यामुळे तुम्ही दोन समान नावाच्या files वेगळ्या casing सोबत एका folder मध्ये ठेऊ शकता. 

Windows मध्ये My Documents ही default home directory असते. 

Linux मध्ये सर्व users साठी user/home/username directory create केली जाते. याला त्याची home directory म्हणले जाते. 

हे closed source software आहे. 

हे open source software आहे. 

हे जास्त secure नसतात आणि Virus malware worms attack हे इथे साधारण असतात. 

हे खूप जास्त secure असतात आणि इथे virus attack चा काही प्रभाव नसतो. 

हे single user आणि Multi tasking साठी आहे. 

हे multi user आणि multi tasking साठी आहे. 


Distribution काय आहे? 

Linux Operating system चे खूप सारे वेगवेगळे version आहेत. हे सर्व प्रकारच्या users साठी उपयुक्त आहेत. इथे नवीन user पासून तर hardcore user पर्यंत सर्वांसाठी version उपलब्ध आहेत. याच versions ला distributions म्हणून संबोधले जाते.  

सर्व Linux distributions हे सहज free मध्ये download केले जाऊ शकता. त्यांना एखाद्या disk मध्ये burn करून त्यांना नंतर install देखील करता येते. 

इथे सर्वात प्रसिद्ध Linux Distributions विषयी जाणून घेऊयात: 

  • Ubuntu Linux 

  • Linux Mint 

  • Arch Linux 

  • Deepin 

  • Fedora 

  • Debian 

  • openSUSE 

हे सर्व distributions वेगवेगळ्या features सोबत उपलब्ध आहेत, तुम्हाला देखील तुमच्या गरजेनुसार त्याची निवड करायची आहे. 

जास्त Resources साठी 

जर तुम्हाला Linux विषयी जास्त काही जाणून घेऊ इच्छिता तर आम्ही खाली काही websites च्या links दिलेल्या आहेत ज्या तुम्हाला यया OS विषयी आणखी जास्त माहिती देऊ शकतील. 

  • Linux.com : इथे तुम्हाला linux विषयी सर्व माहिती प्राप्त होऊ शकते. (news, how-tos, answer, forums आणि इतर) 

  • Linux.org : इथे Linux Kernel विषयी तुम्हाला सर्व माहिती मिळेल. ( यासोबत Beginner, Intermediate आणि Advanced Level Tutorials देखील उपलब्ध आहेत.) 

  • Howtoforge : इथे Linux Tutorials 

  • Linux Knowledge Base and Tutorials : Linux-tutorial.info  

Linux Operating System ही Virus/Malware Free आहे का? 

याचे उत्तर हे नाही आहे. जगात कोणतीच अशी os नाहीये जी 100% viruses आणि malwares पासून immune असते. लिनक्स मध्ये अजून कोणताही widespread malware infection झालेले नाही.  

ही गोष्ट खरी आहे की जर windows user सोबत जर तुलना केली तर Linux Os वापरणारे users खूप कमी आहेत. MAlware आणि viruses चा मुख्य उद्दिष्ट असते की mass destruction! त्यामुळे कोणताही programmer किंवा hacker या गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवणार नाही कारण त्याचा जास्त काही फायदा नाही. त्यामुळे linux मध्ये जास्त viruses नसतात. 

Linux Architecturally खूप जास्त strong असते त्यामुळे security threats बाबतीत जास्त immune असते. लक्षात ठेवा की Linux Kernel असते आणि GNU/Linux एक OS आहे. 

Technically विचार केला तर Linux System ला root न करता password setting करू शकत नाही. याचा अर्थ असा की guest सोडता प्रत्येक Linux user कडे एक password असतो. तर windows user हा कोणत्याही password नसताना देखील देखील वापर करतात. 

या सर्व गोष्टींमुळे Linux Operating System मध्ये Virus आणि Malwares चा धोका खूप कमी असतो. 

Applications of Linux Operating System 

  • Linux movie industry ची एक render farm बनून खूप मदत करते. इथे लाखो मशीनवर कायम movies सुरू असतात. 

  • TV System मध्ये Linux चा वापर हा menu system मध्ये करतात. 

  • सर्व android mobile phones हे Linux प्लॅटफॉर्म वर चालतात. 

  • Linux वापरून तुम्ही स्वतःच्या घराला automate करू शकता. 

  • सर्व internet connection routers हे Linux वर run होतात. 

  • छोट्या disk storage system देखील manufacturer linux वापरून run करतात. 

  • Web app आणि web hostings देखील 

  • सर्व internet servers, databases, websites देखील Linux operating system द्वारे चालतात आणि maintain केले जातात. 

  • सर्व stock exchanges linux platform वर चालतात. 

  • तुम्ही एका old आणि slow pc ला फास्ट चालवू शकता. 

  • सर्व ATM मध्ये payment process साठी Linux OS वापरतात. 

  • कोणतेही video game machine बनवणे आणि dedicated media center साठी याचाच वापर केला जातो. 

Linux Operating System चे भविष्य 

यात कुठलीही शंका नाहीये की लिनक्स ही भविष्यात वापरली जाणारी OS आहे. याचे कारण म्हणजे सध्या LATEST TECHNOLOGY च्या निर्मिती मध्ये Linux वापरली जाते आहे. आपण कोणतीच future technology ही linux शिवाय विचारही करू शकत नाही. Embedded system हे असेच उदाहरण आहे जिथे Linux चा भरपूर वापर केला जातो. इथे Linux ला मुख्य स्वरूपात applications बनवायला आणि maintain करण्यासाठी वापरले जाते.  

सर्व मोठे organisations हे OS साठी Linux चा वापर करत आहेत. यात असे खूप सारे चांगले features आहेत त्यामुळे याची demand ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यासोबत कित्येक system admin हे आपल्या job profile या windows मधून Linux operating system मध्ये बदल करत आहेत. 

कोणतीही नवीन technology जसे की cloud computing, virtualization, VMware, database administration शिकण्यासाठी तुम्हाला Linux विषयी माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्हाला असे वाटते की Linux Operating System चे भविष्य येणाऱ्या काळात उज्वल आहे. 


Linux Operating System मधून तुम्हाला काय कळते? 

Linux ही अशी एक operating system आहे किंवा एक kernel आहे ज्याला open source licence अंतर्गत distribute केले जाते. याची functionality list ही Unix सारखी आहे. तर kernel हा असा program असतो जो लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम मध्ये उपलब्ध असतो आणि सर्व fundamental stuff करण्यासाठी मदत करत असतो. सोबतच hardware आणि software सोबत communication करण्यासाठी देखील मदत करतो. 


लिनक्स किती प्रकारचे असतात? 

लिनक्स च्या तीन मुख्य distribution family आहेत : १) Debian Family Systems (such as Ubuntu) 

२) SUSE Family Systems (such as openSUSE) 

३) Fedora Family Systems ( such as CentOS)

लिनक्स कमांड काय आहे? 

Linux Command या संगणकाला काही कार्य करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या सूचनांची यादी आहे. यात कॉपी साठी Ctrl+C नसून cp: ही कमांड वापरावी लागते.

लिनक्स चा वापर सर्वात जास्त कुठे होतो? 

Linux चा सर्वात जास्त वापर हा Commercial Networking Devices मध्ये होतो, परंतु आत्ताच्या काळात याचा सर्वात जास्त वापर हा enterprise infrastructure मध्ये होतो.

Linux आणि Windows ऑपरेटिंग सिस्टम मध्ये फरक काय? 

Linux ही open source OS आहे तर Windows OS ही Commercial OS आहे. Linux मध्ये आपल्याकडे source code चा access असतो ज्याला आपण आपल्या पद्धतिने हवे।असेल तर बदलू शकतो. तर Windows मध्ये आपल्याकडे source code चा access नसतो.

लिनक्स ची किंमत किती आहे? 

Linux ची किंमत काहीच नाहीये, हे पूर्णपणे मोफत आहे. आपण कोणतीही फी न देता, हवे असेल तर Linux ला एक पेक्षा जास्त computers मध्ये install करू शकता.

लिनक्स ला अँटीव्हायरस ची गरज असते का? 

नाही, लिनक्स ला कोणत्याही प्रकारे अँटीव्हायरस ची गरज नसते. याचे कारण हेच की linux ऑपरेटिंग सिस्टिम साठी जास्त malwares आणि virus नाहीत. Windows साठी antivirus ची सर्वात जास्त गरज असते. 

लिनक्स ला हॅक केले जाऊ शकते? 

हो, लिनक्स ला हॅक केले जाऊ शकते. यात देखील तुम्हाल virus, trojans, worms आणि इतर प्रकारचे malware बघायला मिळतात. परंतु यांचे प्रमाण खूप जास्त कमी असते.

लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम कोणत्या भाषेत लिहिलेली आहे? 

Linux OS ही मुख्य रुपात C language मध्ये लिहिलेली आहे. जवळपास 97% हुन अधिक powerful supercomputers मध्ये Linux Kernel वापरला असतो. 

Linux चा शोध कोणी लावला? 

Linux चा शोध Linus Torvalds यांनी लावला. 


आज आपण काय शिकलात? 

मला पूर्ण आशा आहे की लिनक्स काय आहे (Linux in Marathi) विषयी पूर्ण माहिती दिली आहे आणि तुम्हाला लिनक्स विषयी सर्व माहिती मिळाली असेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने