ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवता येतात? - How to earn money from Blogging in Marathi
काय तुम्ही देखील त्या लोकांपैकी आहेत जे जाणून घेऊ इच्छिता की ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवतात? तर आजचे हे आर्टिकल तुमच्यासाठी खूप जास्त माहिती देणारे असेल, त्यामुळे हे आर्टिकल पूर्ण आणि लक्ष देऊन वाचा.
जर तुम्ही वरील ऐकून म्हणत असाल की Blogging मधून पैसे मिळवणे खुप सोप्पे असेल तर तसे नाहीये. हा एक गोष्ट 100% खरी आहे की blogging कोणीही करु शकते, यासाठी तुमच्याकडे कोणत्याही डिग्रीची किंवा क्वालिफिकेशनची गरज नसते.
फक्त तुमच्याकडे काहीतरी लिहिण्यासाठी interesting गोष्ट असायला पाहिजे आणि सोबत खूप सारे धैर्य आणि dedication असायला पाहिजे. यामुळे तुम्ही तुमचा blog योग्य प्रकारे बनवू शकता व त्यात चांगल्या प्रकारे traffic मिळू शकेल. आता एक महत्वाचा प्रश्न समोर येतो तो म्हणजे सर्वजण Blogging मधून पैसे कमवतात का? याचे उत्तर हो देखील आहे आणि नाही देखील आहे. याचे कारण म्हणजे नवीन bloggers ला थोडा जास्त कालावधी लागतो पैसे कमावण्यासाठी तर जे पहिल्यापासून ब्लॉगिंग करतात त्यांना पैसे कमावण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागत नाही.
आजच्या या आर्टिकल "ब्लॉग वरून पैसे कसे कमावता?" मध्ये तुमच्यासमोर असे काही प्रकार आणि पद्धती आहेत ज्यातुन तुम्ही सहज blogging च्या माध्यमातून पैसे कमावू शकता. परंतू यासाठी तुम्हाला थोडा patience आणि खूप मेहनतीची गरज आहे. कारण कोणतीच गोष्ट सोपी नसते तिला सोप्पी बनवावी लागते.
ब्लॉगिंग काय आहे?
ब्लॉगिंग करण्याचा अर्थ होतो की आपल्या blog वर नवनवीन आर्टिकल add करणे. माझ्या म्हणण्याचा उद्देश असा आहे की तुम्हाला एखाद्या विषयात सर्वकाही चांगले माहीत आहे किंवा तुम्ही तूमचे अनुभव दुसऱ्यांसोबत शेअर करू इच्छिता तर तुम्ही ते तुमच्या डायरी मध्ये लिहू शकता किंवा ते एखाद्या ब्लॉग किंवा website वर लिहू शकता. तर याच लिहिण्याच्या प्रक्रियेला ब्लॉगिंग म्हटले जाते.
ब्लॉग खूप प्रकारचे असतात जसे की Personal Blog, Food Blog, tech blog, Finance Blog, Travel Blog, Motivation Blog, इत्यादी. तुम्हाला ज्या विषयात आवड आहे त्याविषयाचा तुम्ही blog बनवू शकता. अट एकच आहे की तुम्हाला कोणाचीही Copy करायची नाहीये, तुम्हाला जे काही येते त्यावर ब्लॉग लिहायला सुरुवात करायची आहे. याचा फायदा असा होतो की तुमच्या ब्लॉग मधील माहिती ही कायम Unique असते.
ही होती ब्लॉगिंग विषयी थोडीफार माहिती चला तर आता जाणून घेऊयात की ब्लॉग मधून पैसे कसे कमवायचे?
ब्लॉग मधून पैसे कसे कमवतात (2021)
आपल्या ब्लॉग मधून पैसे कमावण्याचे खूप सारे प्रकार आहेत ज्याने तुम्ही तुमचा ब्लॉग monetize करू शकता. लक्ष देण्यासारखी गोष्ट ही आहे की तुमच्या level ची blogging आणि आपल्या ब्लॉग प्रकाराला समजून त्यांचा वापर करावा लागतो.
आपल्या level ची ब्लॉगिंग म्हणजे याचा संबंध तुमच्या experience आणि blogging style सोबत आहे. ही प्रत्येकाची वेगवेगळी असते आणि असायलाच हवी.
1) Google Adsense आणि दुसरे Ads Monetization
तसे तर internet वर तुम्हाला खूप वेगवेगळे ad networks वापरण्यासाठी मिळू शकतील. परंतु यातील तुम्हाला असे network निवडावे लागेल जे तुमच्या blog साठी योग्य असेल जे तुम्हाला सोप्या पद्धतीने आणि वेळेला pay करत असेल.
आमच्या मते हे दोन ad network जास्त popular आहेत:
Google Adsense (हे गुगलचे product आहे)
Media.net
तुमच्याकडे या ad network कडून approval घेण्यासाठी एका blog ची गरज असणार आहे. ते automatically तुमच्या content नुसार ads show करत असतात. यात ads या आता जास्तीत जास्त युजर इंटरेस्ट वरून दाखवल्या जातात. सर्व नवीन bloggers हे या method चा वापर करून आपल्या blog ला monetize करतात कारण यातून त्यांना recurring income मिळत असते.
जर तुम्हाला या नेटवर्क ला वापरायचे असेल तर त्यासाठी सुरुवातीला त्यांचे approval घेण्यासाठी तुम्हाला apply करावे लागेल. एकदा त्यांचे approval मिळाले की तुम्ही तुमच्या येणाऱ्या ट्राफिक नुसार चांगले पैसे कमावू शकता.
2) Affiliate Marketing च्या माध्यमातून
Affiliate marketing हे आजच्या घडीला Bloggers च्या मध्ये खूप जास्त फेमस आहे. याचे कारण म्हणजे यात तुम्हाला जास्त काही करावे लागत नाही, फक्त काही links आपल्या blog मध्ये add कराव्या लागतात. जर कोणी त्या links वर click करून जर कोणी काही गोष्टी किंवा services विकत घेत असेल तर तुम्हाला त्याचा पैसा मिळतो.
इथे आम्ही काही प्रसिद्ध affiliate programs/ Affiliate marketing Marketplace विषयी सांगितले आहे, त्यांना तूम्ही आवडले असेल तर जॉईन करू शकता.
Amazon Affiliate Program
यात तुम्हाला जे product recommend करायचे आहे त्याची unique affiliate link share करायची असते.जेव्हा कोणी ती गोष्ट खरेदी करत तेव्हा त्याचे commission तुम्हाला मिळते.
Hosting Affiliates
जर तुम्ही ब्लॉगर असाल आणि Blogging niche मध्ये काम करत असाल तर तुम्ही काही hosting providers चे affiliate programs join करू शकता. कारण बरेच Viewers हे जाणून घेऊ इच्छिता की तुम्ही कोणती होस्टिंग वापरत आहात. अशात तुम्ही hosting affiliate मधून चांगल्या प्रकारे पैसे कमावू शकता.
Blogging Tools Affiliate
आपण हवं तर Blogging Tools जसे की Theme, Seo Tools इत्यादी गोष्टी recommend करून त्यातून affiliate income generate करू शकता.
आपल्या ब्लॉग मधून लाखो रुपये कमवण्यासाठी Affiliate Marketing ही खूप चांगली पद्धत आहे.
3) Sponsored Post च्या माध्यमातून
Paid Reviews किंवा Sponsored post च्या माध्यमातून तुम्ही extra पैसे मिळवू शकता. हे यावर अवलंबून असते की तुमचा ब्लॉग किती मोठा आहे, किती Popular आहे, त्यावर traffic किती येते, इत्यादी गोष्टींवर. जेवढे चांगले तुमचे हे statistics असतील तितके जास्त पैसे तुम्ही sponsored पोस्ट साठी charge करू शकता.
आम्ही काही ब्लॉग्स असे देखील बघितले आहेत की जे एका पोस्ट साठी 100$ पर्यंत पैसे घेतात.
4) Service देऊन
जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडे काही अशा skills आहेत ज्याची गरज दुसऱ्यांना आहे, तर तुम्ही त्या services दुसऱ्यांना देऊन पैसे कमवू शकता.
उदाहरणार्थ तुम्ही काही सर्व्हिस देऊ शकता जसे की Content Writing, Logo Creation, Site Optimization इत्यादी. जर तुम्ही अशा सर्व्हिसेस देऊ इच्छिता तर तुम्हाला अशाच services ची list तुमच्या ब्लॉग वर द्यावी लागेल. ही लिस्ट तुम्हाला अशा ठिकाणी द्यावी लागेल जिथे युजरचे लक्ष लगेच जाईल. एकदा तुम्ही याला सुरुवात केली की तुम्हाला या सर्वांचे ज्ञान होत राहील.
5) Ebooks विक्री करून
मी असे खूप सारे ब्लॉगर्स बघितले आहेत जे त्यांचे expertise आणि experience एका eBook च्या माध्यमातून देतात. ते त्यांचे हे प्रोडक्ट् सहज विकत असतात. यासाठी तुम्हाला तुमच्या आतील expertise शोधाव्या लागतील आणि त्यांना एका पुस्तकाचे रूप द्यावे लागेल.
तुम्ही तुमचे ebook हे तुमच्याच platform वर विकू शकता किंवा Amazon वर देखील विक्री करू शकता.
6) Direct Advertising च्या माध्यमातून
ही बात 100% खरी आहे की सध्याच्या काळात bloggers साठी Adsense हे माध्यम Best Advertising Platform आहे. परंतु याचे काही limitations देखील आहेत. सर्वात मोठी limitation ही आहे की तुम्हाला मिळणारी Per Click साठी किंमत!
अशात जर तुम्हाला Direct Advertisements मिळत असतील तर Adsense ad units च्या जागेवर Direct Ads लावून तुम्ही चांगले पैसे कमावू शकता.
जर तुमचा ब्लॉग प्रसिद्ध असेल तर मोठ्या कंपन्या तुम्हाला स्वतःहून direct advertisement साठी संपर्क करत असतात.
7) Sponsored Social Media Post च्या माध्यमातून
जर social media वर तुमचे followers जास्त असतील तर तुम्हाला खूप brands सहज प्रोमोशन साठी मिळतील. कारण brands अशा sponsored social media पोस्ट्स साठी खूप जास्त पैसे देतात.
तुम्ही post आणि repost साठी देखील चांगले पैसे आकारू शकता. त्यासाठी सुरुवातीला तुम्हाला तुनच्या social media account वर चांगले काम करून लोकांची engagement देखील बनवावी लागेल.
8) Online Courses विकून
आजच्या काळात online courses ची demand खूप जास्त आहे. अशात हे online courses बनवणे देखील खूप सोपे झाले आहे. यासाठी फक्त तुम्हाला योग्य tools आणि technology विषयी माहिती असायला हवी.
आजच्या धावपळीच्या आयुष्यात लोकांना असे कोर्सेस हवे आहेत जे ऑनलाइन असतील, मग ते paid असले तरी ते विकत घेतात. जर तुमच्या content ला लोक पसंती देत असतील तर तुम्ही तुमचे online courses नक्की लाँच करू शकता.
हे काही प्लॅटफॉर्म आहेत ज्यांचा वापर तुम्ही courses बनवण्यासाठी आणि विक्रीसाठी करू शकता:
LearnDash
New Kajabi
Teachable
9) आपला Blog विकून
जर तुम्हाला blog बनवने जमते आणि तुम्हाला काही keywords वर तुमचा ब्लॉग rank देखील करता येत असेल तर तुम्ही तो ब्लॉग वाटले तर Flippa वर विकू शकता.
Flippa एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही तुमचा blog सहज विकू शकता. इथे तुम्हाला तुमच्या blog च्या credibility अनुसार buyers मिळतात. जर तुमच्याकडे adsense approved ब्लॉग असेल तर त्यासाठी इथे तुम्हाला आणखी चांगले पैसे मिळतात.
ब्लॉग मधून किती पैसे मिळतात?
आता तुम्हाला कळले असेल की Blogging मधून तुम्हाला सहज लाखो रुपये कमावता येऊ शकता. परंतु हे सर्व bloggers साठी वेगवेगळे असू शकते.
याचे कारण म्हणजे यासाठी खूप साऱ्या गोष्टी कारणीभूत असतात जसे की तुमचा blog कोणत्या niche वर आहे, तुमच्या blog ची traffic कशी आहे, तुमच्या blog ला monetize करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केलेला आहे.
यासोबत तुम्हाल हे देखील समजून घ्यावे लागेल की ब्लॉग मधून पैसे मिळवण्यासाठी थोडा वेळ लागतो परंतु एकदा तुमच्या ब्लॉगवर चांगल्याप्रकारे ट्राफिक यायला लागले की तुम्हाला चांगली कमाई होईल यात शंका नाही.
Blogging सोबत तुम्हाला इतरही income source विषयी विचार करायला हवा म्हणजेच Multiple streams of Income! म्हणजे एकमेकांची भरपाई तुम्हाला नक्की करता येईल.
ब्लॉग मधून किती पैसे मिळतात?
ब्लॉग मधून पैसे कमावण्याची कोणतीही सीमा नाहीये. तुम्ही जितकी जास्त मेहनत कराल तितकी जास्त ट्राफिक येईल आणि ट्राफिक अनुसार तुम्हाला पैसे मिळतील.
ब्लॉग मधून पैसे कसे मिळतात?
ब्लॉग मधून पैसे कमवायचे खूप मार्ग आहेत जसे Adsense, Affiliate Marketing, Paid Post, इत्यादी.
ब्लॉग मधून किती कमाई होऊ शकते?
ब्लॉग मधून लाखो आणि करोडो रुपये कमावता येतात.
आज काय शिकला?
आम्हाला आशा आहे की आमचा हा लेख ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवतात तुम्हाला आवडला असेल. आमचा कायम हा प्रयत्न असतो की वाचकांना Blogging मधून पैसे मिळवण्याच्या पद्धती विषयी माहिती परिपूर्ण मिळावी जेणेकरून त्यांना इंटरनेटवर जाऊन दुसऱ्या साईट वरून माहिती घ्यावी लागनार नाही.
खुपचं छान माहीती दिली आहे. धन्यवाद ...
उत्तर द्याहटवा