Alexa Rank काय आहे आणि कशी वाढवायची?

Alexa Rank काय आहे आणि कशी वाढवायची? 

कदाचित तुम्हाला Alexa Rank काय आहे? याविषयी माहिती असेल, कारण जर तुम्ही Blogging Field मधून असाल तर तुम्हाला Alexa Rank काय आहे, कसे काम करते आणि का गरजेची आहे याविषयी माहिती नक्की असेल. जर तुम्हाला माहीत नसेल तर आजचे हे आर्टिकल खूप जास्त informational असेल. 

प्रत्येक Blogger हे जाणून घेऊ इच्छितो की आपल्या website ची alexa ranking कशी वाढवता येईल? कारण हा एक महत्वाचा factor आहे ज्याच्या माध्यमातून visitors ला आपल्या blog कडे आकर्षित करत येते आणि सोबतच वाचकांना असे देखील भासते की तुमचा blog हा professional आहे. 

Alexa Rank काय आहे आणि कशी वाढवायची?

जर
तुमची Alexa Rank चांगली असेल तर तुमचा blog Traffic लवकर Improve होतो.
 

जर तुमची alexa rank चांगली असेल तर संभावना असते की इतर blogger तुमच्या blog ची लिंक reference म्हणून देतील, याचाच अर्थ असा की तुम्हाला तुमच्या niche च्या blog domain कडून quality backlinks सहज मिळतील. 

आज इथे या लेखातून, Alexa Rank म्हणजे काय आणि ती improve कशी करायची याविषयीची माहिती तुम्हाला मिळेल 

तुम्ही जर नवीन ब्लॉगर असाल तर तुम्हाला हा लेख वाचून Alexa Rank विषयी महत्वाची basic माहिती नक्की प्राप्त होईल, ही माहिती तुम्हाला तुमच्या blog ची ranking वाढवण्यासाठी नक्की मदत करेल. तर वेळघालवता चला सुरू करूया 

Alexa Rank काय आहे - What is Alexa Rank in Marathi 

ALexa Rank ही अशी ranking आहे जी दाखवते की internet वर तुमची site इतर sites च्या तुलनेत किती popular आहे. दुसऱ्या websites च्या तुलनेत तुमच्या site ची position देखील दाखवते. 

Alexa Rank हे website popularity चे एक मोजमाप आहे. इथे millions of Websites या popularity च्या basis वर rank केल्या जातात. ज्या website चा alexa rank हा 1 असतो ती सर्वात popular website असते. 

ही rank हे देखील दर्शवते की बाकी वेबसाईटच्या तुलनेत तुमची website कशी perform करते आहे. हा आपल्या competitive analysis मध्ये एक benchmarking score बनतो. 

ही rank calculate करण्यासाठी proprietary methodology चा वापर केला जातो. यामध्ये तुमच्या साईटचा मागील 3 महिन्याच्या estimated traffic आणि visitors ची engagement यांना combine केले जाते. 

Traffic आणि engagement यांना global panel मध्ये लोकांच्या browsing behaviour वरून estimate केले जाते. हे internet users साठी एक sample असते. 

ALexa rank ही measure करताना आपल्या site ची तुलना दुसऱ्या site सोबत करत असते, त्यामुळे ही rank फक्त तुमच्या site ला येणाऱ्या traffic वर आधारित नसून यात दुसऱ्याच्या website च्या traffic मध्ये होणाऱ्या बदलांचा देखील समावेश असतो. 

हेच महत्वाचे कारण असते की काही लोक म्हणतात, आमच्या साईटवर चांगल्या प्रकारे traffic असताना देखील आमची अलेक्सा रँकिंग कमी होते. 

Alexa चा इतिहास - History of Alexa in Marathi 

1996 साली अलेक्सा सुरू करण्यात आली. अमेझॉन.कॉम ही एक California Based Subsidiary Company आहे. (याच कंपनीला 1999 मध्ये अमेझॉन ने Acquire केले) त्या काळात ही कंपनी वेगवेगळ्या toolbars आणि web browser extensions च्या माध्यमातून Commercial web traffic data जमवण्यात specialize होती 

अलेक्सा च्या काही महत्वाच्या previous activity आहेत त्यात असे databases होते जे अशा प्रकारे serve करत असत की ज्याच्या मदतीने Wayback Machine बनवला जाऊ शकेल. आता या search facility ला बनवणे बंद करण्यात आले आहे. 

आता त्यांचा Alexa Rank जी अशी metric आहे जी websites ला rank करते त्यांच्या प्रसिद्धीच्या क्रमानुसार लावले जाते, यात मागील 3 महिन्याच्या performance विचारात घेतला जातो. 

Alexa Rank ला improve करने गरजेचे असते का? 

हो, तुमच्या blog साठी अलेक्सा रँक ला improve करण्यासाठी खूप important असते. जर तुम्ही एक ब्लॉगर आहात तर तुम्हाला खूप जास्त important आहे की तुमच्या वेबसाईटची alexa rank improve करणे खूप गरजेचे आहे. 

हे जास्त गरजेचे यासाठी आहे कारण Alexa Rank तुम्हाला Authority देत असते. Advertisers आणि readers च्या मनात त्यामुळे एक चांगले impression बनते आणि आपल्याला revenue वाढायला मदत होत गेली. 

बरेच वाचक हे पहिल्यांदा तुमची अलेक्सा रँक बघत असतात आणि त्यांना ते चांगले वाटले तरच ते तुमचे content वाचतात आणि तुमच्या blog ला follow करायला सुरुवात करतील. काही लोक तुमच्या ब्लॉग पोस्टवर backlink साठी comment करतात आणि हीच गोष्ट तुमच्या page rank ला improve करण्यासाठी मदत करतील. 

Alexa Rank कशी check कराल? 

ALexa Rank चेक करण्यासाठी तुम्ही direct alexa.com वर जाऊ शकता. Page च्या top right corner मध्ये search bar बघायला मिळेल. 

इथे तुम्हाला तुमच्या website चा URL टाकायचा आहे आणि Find बटनावर क्लिक करायचे आहे. हे तुमच्या blog चा सर्व डाटा दाखवेल आणि सोबतच तुमची रँक देखील दाखवेल. 

You can also check your Alexa Rank by using this URL 

Alexa Traffic Rank विषयी 6 Myths ज्यावर आपण विश्वास ठेवतो! 

लोक काय बोलतील याला आपण थांबवू शकत नाही, त्यांना तर फक्त असा बोलण्यासाठी विषयच हवा असतो. तसेच या Alexa Rank सोबत खूप सारे misconception म्हणजेच Myths किंवा गैरसमज आहेत. 

खूप सारे लोक या myths ला खरं समजून जातात. Alexa ची Ranking System ही 1988 साली सुरू झाली. मग काय याच विषयी अनुसरून अनेक myths बनायला सुरुवात झाली. 

चला तर मग अशा misconceptions विषयी जाणून घेऊयात ज्यामुळे rank improve करता येऊ शकते. 

Myth #1: Alexa फक्त त्याच लोकांचा traffic measure करते ज्यांनी browser मध्ये Alexa Toolbar Install केलेला असतो. 

हे चुकीचे आहे! Alexa ची measurement ही browser extensions आणि plugins च्या मोठ्या आणि diverse set च्या पॅनलशी निगडीत असते 

ज्या वेबसाईटवर Alexa Certified Code हा install असतो तिथून Alexa Directly त्या website च्या visitors कडून traffic data measure करत असतो. या स्थितीत त्यांच्याकडे browser extension असेल किंवा नसेल याचा काही एक संबंध नसतो. 

Myth #2: Alexa केवळ internet marketers आणि site owners ला measure करतो. 

हे देखील पहिल्या myth सोबत निगडित आहे जे योग्य नाहीये. Alexa ची traffic ही panel based असते जी वेगवेगळ्या browser extensions च्या डेटा चा वापर करते आणि यामुळे जास्तीत जास्त लोकांचा डेटा दाखवत असते. 

Myth #3: Claiming My Site केल्याने rank वर परिणाम होतो. 

Site ला claim केल्याने त्यांचा ranking वर काहीही फरक पडत नाही. त्यामुळे फक्त आपली ranking वाढेल म्हणून आपली site claim करणे चुकीचे आहे. 

तसे Claiming Your Site (ही एक फ्री सर्व्हिस आहे) च्या माध्यमातून तुम्ही तुमच्या site चे description आणि contact information ही up-to-date ठेऊ शकता. यामुळे तुम्ही कधीही कोणतीही चांगली बिझनेस संधी miss करणार नाही. Alexa वर प्रत्येक महिन्यात जवळपास 10 करोड पेक्षा जास्त लोक visit करत असतात. 

Myth #4: Alexa Widget install करून Rank Improve होते. 

नाही, अलेक्सा widget फक्त तुमच्या visitors ला तुमची अलेक्सा रँक promote करण्यासाठी तुम्हाला allow करते. या widget चा वापर हा site ची ट्राफिक measure करण्यासाठी होत नाही. 

Myth #5: जर माझ्या site ची traffic ही एखाद्या दिवशी वाढली तर माझ्या ranking मध्ये automatically सुधारेल. 

हे गरजेचे नाही. ही global alexa rank प्रत्येक दिवशी update होते. परंतु ही मुख्यत्वे अवलंबून असते तुमच्या वेबसाईटवर येणाऱ्या मागील 3 महिन्यांच्या ट्राफिक वर. 

अशा वेळी एक दिवसाचा traffic तुमच्या website ला rank करण्यासाठी हा फक्त एक छोटासा भाग असतो. सोबतच तुमच्या site ची ranking ही दुसऱ्या site च्या ranking वर देखील अवलंबून असते. त्यामुळे दुसऱ्याच्या website वर येणाऱ्या traffic चा परिणाम हा तुमच्या site च्या ranking वर नक्की होतो. 

Myth #6: जर तुम्ही alexa ला पैसे दिले तर तुमची rank चांगली होते. 

मुळीच नाही, ही खरी गोष्ट आहे की alexa चे marketing stacks तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर जास्त Traffic आणण्यासाठी opportunity discover करायला मदत करू शकता आणि हेच पुढे तुम्हाला एक चांगली rank देऊ शकेल. 

जर तुम्ही Alexa Certify Code तुमच्या website मध्ये install केले तर alexa तुमच्या website च traffic डायरेक्ट measure करू शकेल. अन्यथा estimate करून केले जाते 

Direct measurement तुमच्या वेबसाईटला एक चांगली आणि accurate rank देत असते. परंतु जास्त accurate याचा अर्थ चांगली rank असा होत नाही.

Alexa Rank कशी Improve करायची? 

तर Alexa Ranking वाढवण्यासाठी तुम्ही तयार आहात का ? 

आम्ही तुम्हाला अशा काही tips सांगणार आहोत ज्या तुमच्या blog ची अलेक्सा रँक वाढवायला मदत करतील. 

चला तर मग या tips विषयी जाणून घेऊयात. 

  1. आपल्या blog ची traffic वाढवा 

हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे जो आपल्या website ची alexa rank वाढवायला मदत करेल. कारण alexa तुमच्या blog ला rank ही traffic च्या अनुसार देत देत असते. जर तुम्हाला दररोज जास्तीत जास्त traffic मिळत राहिली तर Alexa तुमची Rank नक्की improve करेल. 

आमचे असे मत आहे की जर तुमची traffic ही हळू हळू वाढत गेली तर alexa rank देखील वाढत जाईल. 

असे केले तर एक छोटीशी blog traffic वाढली तरी ranking मध्ये खूप जास्त बदल आपल्याला बघायला मिळेल. 

  1. तुमच्या site मध्ये Average Time 

अलेक्सा रँक वाढवण्यासाठी हा दुसरा महत्त्वाचा फॅक्टर आहे. कारण अलेक्सा हे देखील चेक करतो की वापरकर्ता तुमच्या website वर किती वेळ देतो आहे. 

त्यामुळे तुमचे content हे engaging बनवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून यूजर जास्तीत जास्त वेळ तुमच्या post मध्ये राहील आणि finally तुमचा average time देखील वाढेल. 

काही tips जेणेकरून यूजर जास्तीत जास्त वेळ तुमच्या site वर राहील: 

  • Inbound Link: हा एक चांगला पर्याय आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या user ला तुमच्या site मध्ये engage करू शकता. यात तुम्ही तुमच्या दुसऱ्या post चा URL एका post मध्ये वापरू शकता. त्यानंतर user तुमच्या post मध्ये जास्त वेळ घालवतील. लक्षात ठेवा की त्याशी related post ची लिंक तिथे द्यावी. 

  • Related Post: तुम्ही काही Related post plugins चा वापर देखील wordpress मध्ये करू शकता. याच्या मदतीने blog post च्या संदर्भात इतर related post शेवटी दाखवल्या जातील. याच्या मदतीने पहिली पोस्ट वाचून झाल्यावर दुसऱ्या पोस्ट ला वाचण्यासाठी यूजर सहज switch करू शकतो 

या दोन्ही steps चा वापर करून आपण user ला जास्तीत जास्त वेळ आपल्या site वर ठेऊ शकतो. 

  1. Average Page View Per Visitor 

जर तुमचा average page view per visitor चांगले आहेत तर हे तुम्हाला Alexa Rank वाढायला मदत करेल. त्यामुळे प्रयत्न करा की तुमचे Average Page View हे वाढतील. यासाठी तुम्ही वर दिलेल्या inbound links आणि Related post या दोन पद्धतींचा वापर करू शकता. 

  1. Original Content Produce करा 

ALexa Rank ला वाढवण्यासाठी आपले content हे original असायला हवे. जर तुमचे content हे original असेल तर प्रत्येक दिवशी तुमची Alexa रँक improve होत राहील. त्यामुळे कायम प्रयत्न करा की original content ब्लॉग मध्ये add करत जावे. 

Expert Advice:  

Alexa देखील Google प्रमाणे intelligence algorithm चा वापर करते. कधीच कोणत्याही दुसऱ्या blog ची पोस्ट ही कॉपी करू नका अन्यथा तुम्ही Alexa Rank देखील drop होईल आणि सोबतच Google देखील तुमच्या पोस्ट index करणे बंद करेल. 

  1. आपल्या site मध्ये Alexa Widget टाका 

हे एक सर्वसाधारण लॉजिक आहे की आपण आपल्या site मध्ये Alexa Widget टाकले तर यूजरला तुम्ही encourage करता त्यावर क्लिक करण्यासाठी. जेव्हा कोणी त्यावर क्लिक करेल तर त्याचा फायदा तुम्हाला मिळेल. त्यामुळे प्रयत्न करा की तुमच्या site मध्ये Alexa Widget असेल 

  1. आपल्या blog साठी Quality Backlinks 

Backlink मिळवण्यासाठी दुसऱ्यांच्या blog वर comments करणे हे खूप सोपे काम असते. यात तुम्हाला फक्त दुसऱ्या popular blog वर जाऊन comment करायची असते. जेव्हा कोणी तुमच्या website लिंक वर किंवा प्रोफाइल वर क्लिक करेल तेव्हा तो तुमच्या blog वर redirect केला जातो. 

त्यामुळे तुम्हाला तुमच्या blog चा URL हा website field मध्ये जी comment box च्या खाली असते त्यात specify करणे गरजेचे आहे 

Note: 

लक्षात ठेवा की तुमचा blog URL हा directly comment box मध्ये वापरू नका, हे spam म्हणून मानले जाते. आपल्या blog चा URL हा फक्त Comment box मध्ये खाली दिलेल्या Website या field मध्येच दयावा. 

  1. Alexa साठी Review Article लिहा 

Alexa विषयी एक Review Article लिहिल्याने तुम्हाला 100% Alexa Rank improve होण्यासाठी मदत होईल. कारण आजकाल Alexa हा खूप Common Keyword बनला आहे जे Google वर खुप जास्त search केले जाते. 

त्यामुळे जर Alexa साठी तुम्ही एखादा Review लिहीत असाल तर ते unique असेल तर तुम्हाला तुमचा blog traffic वाढवण्यासाठी मदत नक्की मिळणार आहे. आणि आपण बघितले की हेच तुम्हाला Alexa Rank वाढवायला मदत करेल. 

यासोबत तुम्ही alexa ला एक backlink देखील देऊ शकता ज्याने आपल्याला blog ची traffic वाढायला देखील मदत होईल. आणि एक महत्वाची गोष्ट अलेक्सा तुमचे आर्टिकल चांगले असेल तर  Suggest देखील करू शकते. 

  1. Blog ला Regularly Update ठेवा 

Internet वर तुमच्या niche शी निगडित खूप सारे blogs आहेत त्यामुळे जर तुम्ही सातत्य ठेवून लिहिले नाही तर तुमची alexa rank कमी होऊ शकते. 

एकदा तुमची alexa rank कमी झाली की त्याला पुन्हा पहिल्या rank वर घेऊन जाणे खूप कठीण असते. त्यामुळे आमचे विचार वापरले तर blog ला regular basis वर update करत रहा. याने तुमची rank down होणार नाहीहळूहळू वाढत राहील. 

कमीत कमी आठवड्यात एक Article Post करत जा आणि प्रयत्न करा की तुमच्या जुन्या articles ला देखील update करत रहा. 

विश्वास ठेवा, जर आम्ही सांगितलेल्या टिप्स तुम्ही योग्य पद्धतीने फॉलो केल्या तर फक्त Alexa Ranking नव्हे तर तुमच्या blog वरील traffic देखील वाढेल.

आज आपण शिकलो  

आम्हाला आशा आहे की तुम्हाला Alexa Rank काय आहे (What is Alexa Rank in Marathi) या विषयी सर्व माहिती समजली असेल. आम्ही सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. ALexa Rank कशी improve करायची याविषयी देखील टिप्स तुम्हाला समजल्या असतील 

तुमचे जे काही प्रश्न असतील किंवा जी काही माहिती असेल ती आम्हाला खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने