कॉम्प्युटर आणि कॅलक्युलेटर मधील फरक- Calculator vs Computer Difference
कॉम्प्युटर आणि कॅलक्युलेटर मध्ये फरक काय आहे? तसे तर कॉम्प्युटर आणि कॅलक्युलेटर या दोन्ही मशीन मनुष्याचे काम सोप्पे करण्यासाठी बनवण्यात आलेल्या आहेत. परंतु जेव्हा उपयोग काय आहे ही गोष्ट येते तेव्हा या दोन्ही मध्ये खूप जास्त फरक आपल्याला बघायला मिळतात. कॉम्प्युटर आणि कॅलक्युलेटर मधील फरक हे या लेखाच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या पॉईंट्स च्या माध्यमातून समजून सांगितले आहेत. त्यामुळे ही पोस्ट पूर्ण वाचा.
कॉम्प्युटर आणि कॅलक्युलेटर यांच्यातील फरक जाणून घेण्याआधी कॉम्प्युटर काय आहे? आणि कॅलक्युलेटर काय आहे? हे जाणून घेणे गरजेचे आहे. या दोन्ही मशीन विषयी जाणून घेतल्यानंतर आपण त्यांच्यातील फरक आणखी चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो.
कॉम्प्युटर हे असे इलेक्ट्रिक डिव्हाईस आहे ज्याच्या मदतीने data आणि information स्टोअर, अरेंज आणि कॅलक्युलेट देखील केली जाते. डेटा कंट्रोल करत असताना कॉम्प्युटर दुसऱ्या डिव्हाईस ला देखील कंट्रोल करू शकतो. सोप्प्या भाषेत सांगायचे झाले तर कॉम्प्युटर input device द्वारे दिल्या जाणाऱ्या डेटा ला प्रोसेस करून त्याचा रिझल्ट युझर पर्यंत पाठवण्याचे काम करते.
कॅलक्युलेटर काय आहे?
कॅलक्युलेटर एक छोटेसे यांत्रिक मशीन आहे ज्याच्या मदतीने मोठं मोठी गणिते करता येतात. ही एक अशी मशीन आहे जी वापरकर्त्याला मोठं मोठया गणिती क्रिया सहज सोडवण्यासाठी मदत करतात. कॅलक्युलेटर सहज कोणीही विकत घेऊ शकते.
आजच्या काळात तर मोबाईल आणि कॉम्प्युटर वर देखील कॅलक्युलेटर यायला लागले आहेत. हे कॅलक्युलेटर इतके छोटे असतात की त्यांना खिशात घेऊन कुठेही जात येते. मोठं मोठ्या संख्यांची बेरीज, वजाबाकी किंवा इतर सर्व गणिती क्रिया करण्यासाठी कॅलक्युलेटर चा वापर हा केला जातो.
कॉम्प्युटर व कॅलक्युलेटर मधील फरक
बघायला गेलं तर कॉम्प्युटर आणि कॅलक्युलेटर या दोन्हीना माणसाचे काम सोपे करण्यासाठी बनविण्यात आलेले आहे. दोन्हीही गोष्टी या वापरकर्त्या द्वारे दिलेल्या डेटा ला प्रोसेस करून रिझल्ट काढण्याचे काम करत असतात. परंतु तरी देखील दोन्ही मध्ये खूप जास्त फरक आहे.
कॉम्प्युटर एक मोठे डिव्हाईस आहे तर कॅलक्युलेटर हे छोटे डिव्हाईस आहे. कॉम्प्युटर मध्ये अंकांच्या व्यतिरिक्त इतर अनेक कॅलक्युलेशन हे करता येतात आणि दुसऱ्या प्रकारचे काम देखील केले जाते परंतू कॅलक्युलेटर मध्ये फक्त अंकांची क्रिया करता येते.
ये कॉम्प्युटर आणि कॅलक्युलेटर मधील सर्वात प्राथमिक फरक आहेत.
याशिवाय कॉम्प्युटर आणि कॅलक्युलेटर मध्ये इतर खूप सारे फरक बघायला मिळतात.
मुद्दा | Calculator | Computer |
Calculation करण्याची Complexity | Moderate | High |
Memory | Less | More |
इतर कार्य | नाही करता येत | सहज करता येतात |
Programming Languages | यात कोणत्याच programming language ची कन्सेप्ट नाहीये | यात खूप साऱ्या programming languages मिळतात. |
कॉम्प्युटर आणि कॅलक्युलेटर मध्ये फरक काय आहेत?
कॉम्प्युटर आणि कॅलक्युलेटर मधील फरक खाली दिलेल्या पॉईंट्स च्या माध्यमातून सांगत आहे.
कॉम्प्युटर Numbers वर काम करतेच सोबत कॉम्प्युटर alphabets वर देखील काम करते. तर कॅलक्युलेटर ला फक्त numbers ची प्रक्रिया करता येते.
कॉम्प्युटर च्या सहाय्याने कोणत्याही गोष्टीची क्रिया केल्यानंतर ती एकाच वेळी वेगवेगळ्या रिझल्ट्स च्या माध्यमातून दाखवता येते. तर कॅलक्युलेटर मध्ये कोणत्याही गोष्टीवर क्रिया केल्यानंतर ते फक्त एकच रिझल्ट दाखवू शकते.
कॉम्प्युटर वेगवेगळ्या प्रोग्रॅम्स च्या मदतीने कार्य करत असते तर कॅलक्युलेटर मध्ये कोणत्याही प्रकारचा प्रोग्रॅम काम करत नाही. कॅलक्युलेटर प्रोग्रॅमच्या शिवाय आपले कार्य करत असतो.
कॉम्प्युटर ची मेमरी ही कॅलक्युलेटरच्या तुलनेत खूप जास्त मोठी असते. हेच कारण आहे की कॉम्प्युटर मध्ये प्रोसेस केला जाणारा डेटा हा मेमरी मध्ये स्टोअर केलेला असतो. कॅलक्युलेटरच्या जवळ खूप कमी मेमरी असते त्यामुळे प्रक्रिया केल्यानंतर कॅलक्युलेटर मध्ये असलेला डेटा आपोआप डिलीट केला जातो.
कॉम्प्युटर मध्ये दोन प्रकारच्या मेमरी असतात, स्थायी व अस्थायी आणि कॅलक्युलेटर मध्ये फक्त अस्थायी स्वरूपाची मेमरी असते.
कॉम्प्युटरचा वापर खूप वेगवेगळी कामे करण्यासाठी केला जातो जसे project बनवणे, ईमेल करणे, व्हिडिओ बनवणे किंवा एडिट करणे, व्हिडीओ कॉल करणे, ऍप्लिकेशन बनवणे, सॉफ्टवेअर बनवणे, ग्राफिक्स बनवणे या कामासाठी केला जातो. तर कॅलक्युलेटर चा वापर हा फक्त आकडेमोड करण्यासाठी होतो.
कॉम्प्युटरच्या मदतीने वेगवेगळ्या प्रकारचे ग्राफिक्स बनवले जातात परंतु कॅलक्युलेटर च्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे ग्राफिक्स बनवता येत नाहीत.
कॉम्प्युटरच्या मदतीने इतर डिव्हाईस देखील कंट्रोल केले जाऊ शकता. जसे की पेनड्राइव्ह, प्रोजेक्टर, प्रिंटर, स्पीकर, मायक्रोफोन ,इत्यादी परंतु कॅलक्युलेटर च्या माध्यमातून असे काही डिव्हाईस कंट्रोल करता येत नाहीत.
कॉम्प्युटर मध्ये प्रोसेस केली जाणारी माहिती ही सॉफ्ट कोपी मधून हार्ड कॉपी मध्ये बनवता येते तसे काही आपल्याला कॅलक्युलेटर मध्ये करता येत नाही.
कॉम्प्युटरची स्क्रीन ही वेगवेगळ्या आकारात आढळते तर कॅलक्युलेटर ची स्क्रीन ही एका छोट्या आयताकृती पट्टी इतकीच असते.
कॉम्प्युटर स्क्रीनवर नंबर कॅलक्युलेशन व्यतिरिक्त इमेज, व्हिडिओ, ग्राफिक्स देखील बघता येतात परंतु कॅलक्युलेटर च्या स्क्रीन वर फक्त नंबर्स बघितले जाऊ शकता. कॅलक्युलेटर स्क्रीनवर कोणत्याही प्रकारे व्हिडिओ किंवा ग्राफिक्स बघता येत नाही.
कॉम्प्युटर मध्ये ज्या स्क्रीनचा वापर केला जातो त्याला मॉनिटर म्हटले जाते. डेस्कटॉप कॉम्प्युटर मध्ये मॉनिटर आणि कीबोर्ड हे वेगवेगळे असतात. लॅपटॉप कॉम्प्युटर मध्ये स्क्रीन ही लॅपटॉपच्या कीबोर्डला कनेक्ट असते परंतु सर्व प्रकारचे डेस्कटॉप कॉम्प्युटर सारखेच काम करते. कॅलक्युलेटर मध्ये स्क्रीन अगोदरपासून attach असते.
कॉम्प्युटर हे असे उपकरण आहे त्याचा वापर सूचना संग्रहित करण्यासाठी केला जातो आणि पुढे वापरकर्त्याने दिलेल्या सूचना नुसार त्यावर प्रक्रिया केली जाते. कॅलक्युलेटरचा वापर हा गणिती आणि बीजगणिती क्रिया करण्यासाठी केला जातो.
कॅलक्युलेटर नावाचा प्रोग्राम कॉम्प्युटर मध्ये कॅलक्युलेटरची फॅसिलिटी देतो तसे कॅलक्युलेटरचे नाही.
FAQ
कॅलक्युलेटर हे कॉम्प्युटर असते का?
कॅलक्युलेटरला आपण मिनी कॉम्प्युटर म्हणू शकतो. कारण कॅलक्युलेटर एक अस छोटंसं डिव्हाईस असत ज्याचा वापर mathematical calculations साठी केला जाऊ शकतो. तर संगणकाच्या म्हणजे कॉम्प्युटरच्या सहाय्याने आपण अनेक गुंतागुंतीची कामे करू शकतो.
कोण जास्त फास्ट असते कॉम्प्युटर की कॅलक्युलेटर?
कॉम्प्युटर कॅलक्युलेटर च्या तुलनेत खूप जास्त फास्ट असते.
जगातील पहिला कॉम्प्युटर हा कॅलक्युलेटर होता?
हो, जगातील पहिला कॉम्प्युटर हा कॅलक्युलेटर होता. त्याचे नाव होते Pascaline. याला Arithmetic Machine म्हणून देखील ओळखले जाते. याची रचना आणि बनवण्याचे काम हे 1642 ते 1644 दरम्यान French Mathematician Philosopher Blaise Pascal यांनी केले होते.
जगातील पहिले कॅलक्युलेटर कोणते आहे?
जगातील पहिले Calculator हे Pascaline आहे. हे असे पहिले मशीन होते जे Arithmetic Operation करण्यासाठी सक्षम होते.
आपण कॅलक्युलेटरला कॉम्प्युटर म्हणू शकत नाही का?
एक Computer त्या सर्व गोष्टी करू शकतो जे Calculator करू शकत नाही. म्हणजे कॅलक्युलेटर हे logical आणि highly complex problems सोडवण्यासाठी सक्षम नाही.
जगात पहिले कॉम्प्युटर आले की कॅलक्युलेटर?
सर्वात पहिले कॅलक्युलेटर आले आणि नंतर त्यात आणखी सुधारणा करत कॉम्प्युटर बनले.
मला आशा आहे तुम्हाला आमचे हे काम आवडले असेल. कॉम्प्युटर आणि कॅलक्युलेटर मधील फरक हा लेख तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट मध्ये कळवा.