विंडोज रजिस्ट्री काय आहे । What is Windows Registry in Marathi

विंडोज रजिस्ट्री काय आहे । What is Windows Registry in Marathi 

तुम्हाला माहीत आहे का विंडोज रजिस्ट्री काय आहे? आपण सर्व लोक Computer वापरता आणि त्या Computer मध्ये विंडोज अवश्य इंस्टॉल असेल. अशात आपण Registry हे नाव नक्की ऐकले असेल. रजिस्ट्री हा विंडोज चा एक महत्वपूर्ण हिस्सा आहे. आपल्या Computer मध्ये इन्स्टॉल होणारे सर्व प्रोग्रॅम आणि Software रजिस्ट्री वर अवलंबून असतात. या software आणि program चा काही भाग हा रजिस्ट्री मध्ये लोड होत असतो. 

विंडोज रजिस्ट्री काय आहे । What is Windows Registry in Marathi

परंतू
तुम्ही फक्त विंडोज रजिस्ट्री विषयी ऐकले असेल, परंतु तूम्हाला माहीत आहे का की ही विंडोज रजिस्ट्री काय आहे, हे काम कसे करते, याची गरज काय आहे, रजिस्ट्री क्लिनिंग ची गरज का आहे? या सर्व विषयांविषयी आज या पोस्ट च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. ही पोस्ट वाचल्यानंतर तुम्ही विंडोज रजिस्ट्री विषयी सर्व काही जाणून घ्याल. तर वेळघालवता चला तर मग सुरू करूयात. जाणून घेऊयात की Windows Registry काय आहे?
 

विंडोज रजिस्ट्री काय आहे - What is Windows Registry in Marathi 

Windows Registry, याला साधारणतः just the registry म्हणून refer केले जाते. ही Microsoft Windows ऑपरेटिंग सिस्टम मधील Configuration Setting च्या Database चा एक संग्रह आहे. 

आपण आपल्या विंडोज मध्ये बरेच गरजेचे software इंस्टॉल केलेले असतील तर तुम्हाला माहित असेल की प्रत्येक software चा एक गरजेचा data असतो. जसे की त्याचा path, location, address, software ची महत्वाची सेटिंग, Theme, Resources हे देखील असतात, याशिवाय सॉफ्टवेअर चे व्हर्जन देखील यात असते. 

या सर्वांना इंस्टॉल करण्यासाठी ज्या जागेचा वापर केला जातो त्याला विंडोज रजिस्ट्री म्हणतात. विंडोज रजिस्ट्री एक प्रकारचा Database असतो जिथे सॉफ्टवेअर चा सगळा Data हा tree format मध्ये ठेवला जातो. यात एका फोल्डरच्या आत दुसरे फोल्डर असते आणि प्रत्येक फोल्डरच्या उजव्या बाजूला त्याचा Data हा असतो. 

Software शिवाय विंडोज च्या गरजेच्या सेटिंग्स, References, Databases इत्यादी देखील विंडोज रजिस्ट्री मध्ये इंस्टॉल असतात. याशिवाय Operating System आणि Hardware संबंधित Data देखील Windows Registry मध्ये इंस्टॉल असतो. अशा प्रकारे तुम्हाला कळले असेल की विंडोज रजिस्ट्री मध्ये किती महत्वाचा data इंस्टॉल असतो. 

सर्वात खास गोष्ट म्हणजे आपण विंडोज रजिस्ट्री ला आपण Read देखील करू शकतो आणि गरज पडली तर आपण त्याला Write देखील करू शकतो म्हणजे त्यात बदल देखील करू शकतो. रजिस्ट्री विंडोज चा खुप मुख्य भाग आहे जिथे सर्व प्रकारच्या Software, Hardware, Windows Settings इत्यादींचे database install असतात. 

 

विंडोज रजिस्ट्री कसे काम करते - How Windows Registry Works in Marathi 

Windows Registry मध्ये Software आणि Programs ची सेटिंग्स, विंडोज ची default सेटिंग्स, Operating System Configure, Hardware Configure, Control Panel Setting इत्यादी इंस्टॉल असतात. आपण जेव्हा कोणताही program किंवा software विंडोज मध्ये लोड करत असतो तेव्हा त्याचा सर्व database विंडोज रजिस्ट्री मध्ये जात असतो. जेव्हा आपण विंडोज मध्ये काहीही बदल करतो तेव्हा विंडोज रजिस्ट्री मध्ये आपोआप बदल हे होतात 

उदाहरण म्हणून विंडोज मध्ये जेव्हा कधी Software install केले जाते तेव्हा रजिस्ट्री मध्ये एक sub key तयार होते. ज्यात त्या software चे location, व्हर्जन, हे software सुरू करण्याची टेकनिक, काही महत्वाच्या सेटिंग्स इत्यादी आपोआप इंस्टॉल होतात. आपण रजिस्ट्री मध्ये जाऊन त्या सॉफ्टवेअर विषयी माहिती जाणून घेऊ शकता. 

 

विंडोज रजिस्ट्री चा वापर का केला जातो - Why Windows Registry Get used 

Windows Registry चा वापर हा software आणि programs ची information आणि setting store करण्यासाठी होत असतो. यात hardware devices, user preferences, operating system configuration मुख्य स्वरूपात समाविष्ट केलेले आहेत 

उदाहरण म्हणून जेव्हा तुम्ही कोणताही नवीन program इंस्टॉल करता तेव्हा एक नवीन set of instructions आणि file references automatically रजिस्ट्री मध्ये add होत जातात. रजिस्ट्री मध्ये एका specific location ला या प्रोग्रॅम साठी आणि दुसऱ्या प्रोग्रॅम साठी ज्याच्यासोबत त्याला interact करायचे आहे अशा ठिकाणी ऍड केले जाते. यामुळे ते दुसऱ्या गोष्टींना जास्त माहिती साठी रेफर करू शकेल. जसे की files कुठे located आहेत, program मध्ये कोणत्या options चा वापर करावा इत्यादी! 

 

विंडोज रजिस्ट्री क्लिनिंग का गरजेची आहे - Why there is need to Clean Windows Registry 

जेव्हा तुमचा संगणक हा स्लो काम करायला लागेल, चालू असताना हँग होत असेल, तुमचा संगणक फ्रीज किंवा क्रॅश होत असेल तर समजून जा की तुम्हाला विंडोजची रजिस्ट्री क्लीन करण्याची गरज आहे. आपल्या windows registry मध्ये अगोदर पासून हजारो एंट्रीज आहेत आणि येणाऱ्या प्रत्येक दिवशी या नवीन एन्ट्री बनत असतात. जेव्हा या एंट्रीज गरजेपेक्षा जास्त वाढतात तेव्हा त्याचा परिणाम आपल्या computer वर दिसायला लागतो 

विंडोज मध्ये सर्वात मोठी समस्या ही आहे की जेव्हा आपण एखादे software अनइंस्टॉल करतो तेव्हा त्या software संबंधित संपूर्ण रजिस्ट्री ही कधीच काढून टाकली जात नाही. त्यामुळे विंडोज रजिस्ट्री क्लीन करण्याची गरज असते. हे काम तुम्ही मॅन्युअली करू शकत नाहीत कारण जर एखादी चुकीची रजिस्ट्री क्लीन झाली तर त्याचा परिणाम जा विंडोज सेटिंगवर आपल्याला बघायला मिळतो. या साठी आपण एखादे Ccleaner सारखे सॉफ्टवेअर वापरू शकता. 

विंडोज रजिस्ट्री कशी बघणार - How To Watch Windows Registry 

Windows Registry बघण्यासाठी सर्वात आधी Run मध्ये जावे लागेल. यासाठी Windows + R दाबून Run ऑपशन सुरू होईल. Run डायलॉग बॉक्स मध्ये आपण Regedit हे टाईप करून enter दाबायचे. आता तुम्हाला विंडोज ची संपूर्ण रजिस्ट्री बघायला मिळेल. यात संपूर्ण data हा ट्री फॉरमॅट मध्ये असतो. 

  • HKEY_CLASSES_ROOT : या key मध्ये कार्य करण्यासाठी सूचना किंवा अप्लिकेशन संबंधित माहिती असते. 

  • HKEY_CURRENT_USER : यात सध्याच्या युझरची संपूर्न सेटिंग असते. 

  • HKEY_LOCAL_MACHINE : यात Computer विषयी महत्वपूर्ण माहिती असते. यात software आणि hardware विषयी माहिती समाविष्ट असते. 

  • HKEY_USERS : यात सध्या असणाऱ्या सर्व ऍक्टिव्ह युझर्स विषयी सूचना असतात. 

  • HKEY_CURRENT_CONFIG : यात सध्या Computer शी जोडलेल्या Hardware विषयी माहिती असते. 

निष्कर्ष 

हा लेख वाचून तुम्हाला विंडोज रजिस्ट्री काय आहे (What is windows registry in Marathi), ती कशी काम करते, याची गरज काय आहे आणि याला क्लीन करण्याची गरज का पडते इत्यादी विषयी चांगल्या प्रकारे माहिती मिळाली असेल. या पोस्ट च्या माध्यमातून विंडोज रजिस्ट्री विषयी जवळपास सर्व माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. तरी देखील जर काही माहिती राहिली असेल तर ती तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता. जर तुम्हाला आमचा हा लेख विंडोज रजिस्ट्री काय आहे आवडला असेल आणि काहीतरी माहिती घेऊन ज्ञानात भर पडली असेल तर आनंदाने आणि उत्साहाने या पोस्ट ला सोशल मीडियावर नक्की शेअर करा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने