गिधाडांची रायगडी घरटी - Vultures Nests at Raigad
गेली जवळ पास 20 वर्ष रायगड मधील चिरगाव च्या जंगलात गिधाडे वाचवण्याचं काम सुरू आहे. Siscap या संस्थेने या भागात काम सुरू केलं तेव्हा 22 गिधाडे होती. आज ही संख्या साडेतीनशे च्या घरात पोहोचली आहे. भारतामध्ये गिधाडांच्या नऊ प्रजाती आढळतात. त्यापैकी पांढऱ्या पाठीचा आणि लांब चोचीचे गिधाड महाराष्ट्रातील रायगड परिसरात सापडते. गिधाडाचे नैसर्गिक खाद्य कमी होत चालल होत, त्यांची उपासमार सुरू झाली होती. गिधाडांना खाद्य मिळावा यासाठी सिसकॅप च्या या तरुणांनी परिसरातील मृत जनावरे गोळा करायला सुरुवात केली. या प्रयत्नांमुळे गिधाडांची संख्या दिवसागणिक वाढत गेली.
बावीस ते तीनशे - साडेतीनशे पर्यंतचा प्रवास आणि दोन घरट्यावरून 84 घरट्या पर्यंतचा प्रवास हा पूर्णपणे वीस वर्षाचा प्रवास आहे. नारळाच्या झाडावर गिधाडाच्या घरट्यातून त्याचं पिल्लू डोकावत असते, सकाळी पंख पसरून गिधाड सूर्यस्नान घेत असतात, आपल्या चोचीला पंखांना स्वच्छ करताना दिसतात हे सगळे अतिशय दुर्मिळ आहे.
आता या भागांमध्ये गिधाडांच्या इतर प्रजातीही दिसू लागल्या आहेत काही स्थानिक आहेत तर काही पाहुणे! मागील दहा वर्षांमध्ये आपल्याकडे एकूण 4 चक्रीवादळाचा तडाखा या भागात बसलेला आहे आणि आता आपल्याकडे जे निसर्गचक्री वादळ आले त्यांनी ही सगळी झाडं तुम्हाला पडलेली दिसतात. उंच झाडांवर गिधाडांची घरटी असतात. कोरोना महासंकटात गुरे मेली तर लोक या युवकांना सांगायची. हे युवक हे सर्व गुरे गाडीत घेऊन त्या गिधाडासाठी असलेल्या जागेवर टाकायची.
सिस्कॅप संस्थेचे काम सुरू असताना कोरोना प्रादुर्भावाचा आणि निसर्ग चक्रीवादळाचा फटका या भागाला बसला ,सर्व कार्य मंदावले होतं पण पुन्हा एकदा फिनिक्स भरारी घेत त्यांनी या कार्याला जोमाने सुरुवात केली. आता तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच रायगड जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि हे कार्य फक्त सिस्कॅप च्या माध्यमातून होते आहे याचा या सर्व युवकांना अभिमान आहे.
येत्या काही दिवसांमध्ये गिधाडांची नेमकी आकडेवारी आपल्याला कळू शकणार आहे. सरकारी पातळीवर गिधाडांचे संवर्धन हे पिंजऱ्यात ठेवून केले जाते,त्या पद्धतीला सिस्कॅप संस्थेने आक्षेप घेतला आहे. गिधाडांचे संवर्धन हे नैसर्गिक वातावरणातच करणे आवश्यक आहे ही त्यांची भूमिका आहे . पाकिस्तान, राजस्तान आणि काही बलुचिस्तान आणि बाल्टीस्तान या भागामध्ये जेव्हा रॉयल सोसायटी फॉर प्रोटेक्शन ऑफ बर्डस या इंग्लंडच्या संस्थेने काम केलं, त्यानंतर बर्ड लाईफ इंटरनेशनल या संस्थेने जेव्हा काम केल त्यावेळी आकडेवारी मध्ये त्यांना कळले कि भरपूर गिधाड मरतात आणि कमी होतात.
महाराष्ट्रातलं पहिलं गिधाड गणनेच काम आणि खास करून रायगड जिल्ह्यात असलेले काम हे सिस्कॅप संस्था करते. केंद्र सरकार आत्ता 243 कोटी खर्च गिधाडांवर करते आहे पण तो निधी सामाजिक संस्थांकडेयोग्य प्रकारे पोहोचत नाही. गिधाडांच्या संवर्धनात स्थानिकांचा सहभाग गरजेचा असल्याचे म्हणणे सिस्कॅपचे आहे. कंजर्वेशन साठी राहण्याची जागा वाचवणे खूप महत्वाचा आणि स्थानिक लोकांच्या मदतीने स्थानिक लोकांनी मदत करून केले तर ते खूप चांगला रिझल्ट देतात. बंदी अवस्थेत किंवा स्थानिकांना वेगळ ठेऊन कंजर्वेशन केलं तर ते सक्सेस होत नाही.
अन्नसाखळीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गिधाडांचा नैसर्गिक वातावरणात संवर्धन करणे आवश्यक असते. गेल्या 22 वर्षांत तसे पोषक वातावरण गिधाडासाठी रायगड मध्ये तयार झाले आहे.