एक वेगळा स्टार्टअप - गाढवाच्या दुधापासून सुरू केला बिझनेस

एक वेगळा स्टार्टअप - गाढवाच्या दुधापासून सुरू केला बिझनेस 

मित्रांनो तुम्ही अनेक प्रकारचे स्टार्टअप विषयी ऐकले असेल आणि खूप साऱ्या Business Ideas विषयी ऐकले असेल. परंतु आज तुम्ही या आर्टिकल मध्ये जे काही वाचणार आहात ते तुम्ही ना कधी ऐकले असेल ना कधी बघितले असेल! 

आपण जीवनात गाढवांना कधी महत्व देत नाही आणि त्या मनुष्याला गाढवाची उपमा दिली जाते जे काही काम करत नाही. म्हणजेच गाढव आपल्यासाठी बिनकामाचे आहे परंतु हे फक्त आपल्यासाठी आहे, पूजा कौल यांच्यासाठी नाही.

पूजा कौल यांनी गाढवाचे महत्व समजून घेत जाणून घेतले की गाढवाचे दूध अधिक लाभदायक आहे. त्यांनी या क्षेत्रात माहिती मिळवली आणि स्वतःचा एक स्टार्टअप सुरू केला आणि त्याला नाव दिले "ऑर्गेनिको"! हा स्टार्टअप गाढवाच्या दुधापासून ब्युटी प्रोडक्ट्स बनवतो आणि विकतो. 

Puja Kaul Founder of Organiko Beauty products from donkey milk

सोलापूर, महाराष्ट्र मधील पुजा कौल यांचा अनोखा स्टार्टअप - Founder of OrganiKo Pooja Kaul 

ही अनोखो आयडिया सुचली सोलापुरात राहणाऱ्या पुजा कौल यांना. पूजा यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना घरातच राहावे वाटले. यासाठी त्यांच्याकडे 2 ऑपशन होते की एक तर सरकारी नोकरी करायची किंवा आपल्या स्वप्नांच्या मागे धावायचे! 

पुजा यांनी स्वतःचा बिझनेस करण्याचा विचार केला आणि या क्षेत्रात रिसर्च केला. त्यांना कळले की मिस्त्रची राणी खूप सुंदर होती आणि त्याचे कारण होते की ते गाढवाचे दूध वापरत असे. इथूनच पुजा यांना Business Idea मिळाली आणि त्यांनी या स्टार्टअप ला नाव दिले "ऑर्गेनिको"! या स्टार्टअपचा दावा आहे की ते 100% शुद्ध वस्तू विकतात. 

गाढवाच्या दुधाचे फायदे - Donkey Milk Benefits 

पूजा यांनी सांगितले की, " त्यांनी जेव्हा रिसर्च केला तेव्हा कळाले की गाढवाच्या दुधात सी, ए, बी आणि ओमेगा 3 सारखे महत्वाचे जीवनसत्व असतात आणि हे सर्व तत्व त्वचेला कोमल आणि सुंदर बनवण्यासाठी आवश्यक असतात. चेहऱ्यावर आलेल्या डागांना दूर करण्यासाठी देखील मदत करतात." 

कसे होते काम- 

पुजा यांनी त्या शेतकऱ्यांशी संपर्क केला जे गाढवांना पाळतात आणि त्याचे दूध काढतात. याची किंमत जवळपास 3000 रुपये लिटर इतकी असते. पूजा यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून 2000 रुपये प्रति लिटर प्रमाणे दूध खरेदी करायला सुरुवात केली. त्यानंतर त्याला ब्युटी प्रोडक्ट्स मध्ये बदलणे सुरू केले.  

पुजा या दुधापासून तयार केलेला साबण, चारकोल आणि हनी सोप यांची विक्री करतात. त्या ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धती वापरून ग्राहकांना त्यांच्याकडे आकर्षित करतात. पुजा यांनी सांगितले की त्यांचे टार्गेट हे 25 ते 50 वयोगटातील महिला आहेत. या महिला स्वतःला सुंदर बनवण्यासाठी खूप सारा पैसा खर्च करतात परंतु त्यांना योग्य रिझल्ट मिळत नाही.  

पुजा यांनी सांगितले की सुरुवातीला त्यांनी गाढव पाळणाऱ्या शेतकऱ्यांशी संपर्क केला. त्यांना असे जवळपास 10 शेतकरी मिळाले. पूजा यांनी त्यांच्याकडून दूध घ्यायला सुरुवात केली. त्यांचे म्हणणे होते की ते एका गाढवाचे दूध रोज काढत नाही. याने गाढव कमजोर व्हायला लागतात आणि त्यांच्या मुलांचे पोषण देखील व्यवस्थित होत नाही. 

पुजा यांचे असे म्हणणे आहे की पुढील वर्षीपर्यंत जवळपास 100 शेतकऱ्यांना सोबत घेऊन व्यवसाय चालेल आणि ऑर्गेनिको या ऑरगॅनिक क्षेत्रात आणखी प्रगती करेल. इतरही अनेक उत्पादन आहेत ज्यांना गाढवाच्या दुधापासून बनवता येऊ शकते. 

सुरू करणे सोपे नव्हते- 

पुजा यांनी सांगितले की हे सोपे नव्हते, एक महिला असल्याने समाज आपल्याला हे करू देत नाही. सुरुवातीला जेव्हा त्या स्वतः दूध आणायला जायच्या तेव्हा स्वतःला असुरक्षित वाटत असे. 

पुजा म्हणतात की त्या जर पुरुष असत्या तर त्यांना भीती वाटली नसती. पुढे हळूहळू त्यांची भीती निघून गेली आणि त्या पुढे जात राहिल्या. जेव्हा त्या त्यांची आयडिया कोणाला सांगत असत तेव्हा समोरचे लोक हसत परंतु त्याचे फायदे सांगितल्यानंतर प्रत्येक व्यक्ती त्यांच्या सोबत येत असे. पुजा यांच्या सोबत त्यांचे क्लासमेट ऋषभ यश तोमर देखील आहेत. 

पूजा यांनी सांगितले की छोट्या शहरांमध्ये उद्योगांना आणि स्टार्टअप ला प्रोत्साहन दिले पाहिजे यातून काहीतरी सकारात्मक संदेश जात असतो. आज पूजा खुश आहेत आणि त्यांना यश देखील मिळत आहे. पूजा यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत, त्यातून मिळणारी रक्कम देखील पूजा याच कामात लावतात आणि आपल्या स्टार्टअप ला पुढे नेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने