संगणक (कॉम्प्युटर) विषयी निबंध । Essay on Computer in Marathi
आधुनिक काळात संगणक हे असे साधन बनले आहे ज्याचा वापर हा प्रत्येक व्यक्ती करतो आहे. आज प्रत्येक घरात लोक संगणकाचा वापर करत आहे. संगणक म्हणजे कॉम्पुटर ही विज्ञानाची अशी देणगी आहे जी लोकांचे कल्याण करत आली आहे आणि पुढेही करत राहिल.
संगणकामुळे आज जगात प्रत्येक दिवशी काही न काहीतरी नवीन आविष्कार हे होत आहेत. यामुळे जग हे पुढे वाटचाल करत आहे. त्यामुळे आज प्रत्येकाला संगणकविषयी माहिती असणे गरजेचे आहे. "संगणक विषयी निबंध" हा शिक्षकांचा सर्वात आवडता विषय बनला आहे. त्यामुळे या विषयावर परीक्षेला देखील पुन्हा पुन्हा निबंध विचारले जातात.
लहान मुलांपासून तर मोठ्या मुलांपर्यंत सर्व लोक या विषयावर लिहितात. तर तुम्ही अंदाज बांधू शकता की हा टॉपिक किती जास्त महत्वाचा आहे. आजच्या आमच्या या लेखात "कॉम्प्युटर विषयी निबंध मराठी मध्ये" विषयवार पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे.
प्रस्तावना
कॉम्प्युटरचा शोध लागल्यानंतर लोकांच्या जीवनात खूप सारे बदल झाले आहेत आणि आजच्या घडीला संगणका शिवाय आपल्या आयुष्याची कल्पना देखील लोक करू शकत नाहीत. संगणकाचा वापर करून मोठे अवघड काम देखील काही क्षणात करता येतात. अमेरिका जपान सारख्या विकसित देशांच्या विकसित होण्याच्या पाठीमागे सर्वात मोठे कारण म्हणजे संगणक आहे.
जर संगणक नसते तर आज आपण ज्या मोठमोठ्या गुगल , फेसबुक सारख्या कंपन्या बघतो त्या झाल्या नसत्या. संगणकाची कमाल आहे की आज तंत्रज्ञान इतके जास्त विकसित झाले आहे. आणि याच संगणकाचे आभार आहेत की ज्यामुळे आज चंद्रावर आणि मंगळवार जाण्याचे राहण्याचे स्वप्न आपण पाहू शकतो.
संगणक म्हणजे काय - What is Computer in Marathi
संगणक हे असे एक इलेक्ट्रॉनिक साधन आहे जे वापरकर्त्याने दिलेल्या डेटा आणि सूचना आत्मसात करून वापरकर्त्याने दिलेल्या आदेशानुसार त्याला प्रोसेस करते. आणि ही प्रोसेस झाल्यानंतर आलेला रिझल्ट हा वापरकर्त्याला परत देतो. हे असे उपकरण आहे त्याचा वापर करून मोठ्यात मोठे कामही काही क्षणात पूर्ण केले जाऊ शकते.
संगणकाचा वापर - Computer Uses in Marathi
संगणकाचा वापर वेगवेगळे लोक वेगवेगळ्या कामांसाठी करत असतात. शिक्षण क्षेत्रात संगणकाचा वापर हा मुलांना संगणक शिकवण्यासाठी आणि नवीन नवीन गोष्टी सांगण्यासाठी केला जातो. तर विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात संगणकाचा वापर हा नवीन नवीन गोष्टींचा शोध लावण्यासाठी केला जातो.
घरांमध्ये संगणकाचा वापर हा तिकीट बुकिंग करण्यासाठी, विजेचे बिल भरण्यासाठी, प्रोजेक्ट इत्यादी बनवण्यासाठी केला जातो.
संगणकाचे महत्व - Importance of Computer in Marathi
संगणकाचा वापर आता प्रत्येक क्षेत्रात केला जातो आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संगणकाचा वापर केला जातो आहे. सोबतच शिक्षणाच्या क्षेत्रात आणि दुसऱ्या कार्य स्थळावर संगणकाचा उपयोग केला जातो.
संगणकाचा वापर हा मोठ-मोठ्या आणि गुंतागुंतीच्या डेटा स्टोअर करण्यासाठी आणि त्याला मॅनेज करण्यासाठी केला जातो. इंटरनेट ही संगणकाची सर्वात मोठी देण आहे. आज याच संगणकाचा आणि प्रमुख दृष्टीने या इंटरनेटचा वापर छोटे मोठे काम करण्यासाठी केला जातो आहे.
संगणकाचे कार्य - Working of Computer in marathi
संगणकाचे मुख्य कार्य हे युझर द्वारे दिले गेलेल्या माहितीला स्टोअर करणे हे आहे. त्यानंतर निर्देशानंतर डेटा वर प्रोसेस करून तो परिणाम युझर पर्यंत पाठवला जातो. संगणकाचा वापर हा कठीण कामांना कमी वेळेत आणि कमी मेहनतीत करण्यासाठी केला जातो.
हेच कारण आहे की जास्तीत जास्त ऑफिसेस मध्ये त्यांची कामे ही संगणकाच्या सहाय्याने करतात. याशिवाय संगणकाच्या मदतीने चॅटिंग देखील करता येते. संगणकाचा वापर करून नव नवीन सॉफ्टवेअर देखील बनवता येतात.
कॉम्प्युटर विषयी निबंध मराठी मध्ये (800 शब्दांत)
प्रस्तावना
आधुनिक तंत्रज्ञानात संगणक हे असे उपकरण आहे त्याचा वापर सर्व क्षेत्रांत केला जातो आहे. संगणकाचा वापर करून मोठ्यात मोठे कठीण काम कमी वेळात करता येतात. संगणकाचा वापर करत लोक आपली मेहनत खूप प्रमाणात कमी करतात.
संगणकावर इंटरनेटचा वापर करून आपल्याला हवी ती माहिती काही सेकंदात मिळू शकते. पहिले काही काळ संगणकाची कार्य करण्याची क्षमता ही थोडी मर्यादित होती परंतु आधुनिक संगणकाची कार्य करण्याची क्षमता खूप जास्त वाढली आहे.
संगणकाचा अर्थ - Meaning of Computer
संगणक या शब्दाचा मराठी अर्थ हा गणना करणे असा होतो. हा शब्द कॉम्प्युटर असा आहे. यातील Compute हा लॅटिन भाषेतील शब्द आहे. संगणकाचा आविष्कार हा चार्ल्स बॅबेज यांनी केला आहे. हे संगणक मोठ्या आणि कठीण समस्या सोडवण्यासाठी बबनवले गेले आहे. यासाठी संगणकाचे कॉम्प्युटर हे नाम Compute शब्दापासून कॉम्प्युटर ठेवले गेले आहे.
संगणकाचे लाभ आणि नुकसान - Pros and Cons of Computer in Marathi
बघायला गेलं तर संगणक हे एक साध इलेक्ट्रॉनिक मशीन आहे परंतु त्यांच्या उपयुक्ततेमुळे ते एखाद्या वरदाना पेक्षा कमी नाहीये. संगणकाचे अनेक लाभ आहेत आणि जिकडे लाभ असतात तिकडे नुकसान देखील येते.
संगणकाचे लाभ/ फायदे - Pros of Computer
- संगणक मोठ्यात मोठे काम देखील अगदी काही क्षणात करता येते.
- संगणकात जी माहिती आपण ठेवतो ती स्टोअर केली जाते. तिचा वापर आपण भविष्यात करू शकतो.
- संगणकाचा वापर करून तुम्ही सहज एखाद्या व्यक्तीला ईमेल किंवा मेसेज पाठवू शकता. फक्त मेसेजच नाही तर तुम्ही संगणकाचा वापर करून एखाद्या व्यक्तीला व्हिडीओ कॉल देखील करू शकता.
- बँकिंग क्षेत्रात देखील संगणकाचा वापर केला जातो आहे. ऑनलाइन बँकिंग आल्यामुळे आजकाल सर्व कार्य हे मोबाईल आणि संगणकाच्या माध्यमातून होत आहेत.
- संगणकाचा वापर करून छोटे मोठे काम जसे की तिकीट बुकिंग करणे, प्रोजेक्ट बनवणे, बिल भरणे हे आरामात घरी बसून होऊ शकतात.
संगणकाचे नुकसान - Cons of Computer in Marathi
संगणकाचे खूप सारे फायदे आहेत परंतु संगणकाचे अनेक नुकसान देखील आहेत.
- संगणक मनुष्याचे कार्य अगदी सोपे करतो आहे त्यामुळे आजकाल लोक संगणकावर पूर्णपणे निर्भर झाला आहे. संगणकाचा अतिरिक्त वापर आरोग्यास हानिकारक आहे.
- संगणकाची स्क्रीन जास्त वेळ समोर असल्याने बऱ्याच लोकांना डोळ्यांचे त्रास होतात.
- संगणकामुळे तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की मोठं मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या या मनुष्याच्या जागेवर रोबोट कामाला लागत आहे. यामुळे बेरोजगारी वाढत आहे.
- संगणकात लोक अनेक महत्वाच्या सर्व माहिती ठेवत असतो आणि हॅकर ती सर्व माहिती मिळवून त्याचा चुकीचा वापर करू शकतो.
आज आपण काय शिकलो?
मित्रांनो या लेखात आम्ही आपल्याला "संगणक विषयी निबंध" या विषयावर महत्वपूर्ण माहिती दिली आहे. यात आम्ही संगणकाविषयी जास्तीत जास्त माहिती दिली आहे. ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की कळवा.
जर तुम्हाला आमचा हा लेख "Essay on Computer in Marathi" आवडला असेल तर मित्रांसोबत सोशल मीडियावर नक्की शेअर करा. याच प्रकारे आमच्या वेबसाईटवर तुम्हाला इतरही माहितीपूर्ण निबंध मिळतील. या पोस्ट विषयी काहीही प्रश्न किंवा शंका किंवा अधिक माहिती तुमच्याकडे असेल तर कमेंट मध्ये देऊ शकता. धन्यवाद!
