वेबसाईट बनवण्याची पद्धती । How to start Your Own Website in Marathi
How to start your own website in marathi आजच्या काळात प्रत्येक व्यवसायाला किंवा ब्लॉग लिहिण्यासाठी वेबसाईटची गरज असते. ब्लॉग लिहिणे हे आजच्या काळात खूप जास्त प्रसिद्ध आहे. काही लोक याला आवड म्हणून जोपासतात तर काही लोक बिजनेस म्हणून याची सुरुवात करत असतात. ब्लॉग लिहिणे हे अनेक लोकांचे स्वप्न असते परंतु योग्य माहिती न मिळाल्याने ते सुरुवातच करू शकत नाहीत. सध्याच्या काळात आपल्या बिजनेस साठी देखील वेबसाईट असणे खूप जास्त महत्वाचे आहे. आजच्या आमच्या या लेखातून तुम्हाला वेबसाईट बनवण्यासाठी लागणारी सुरुवाती पासून ते शेवट पर्यंत सर्व माहिती मिळेल. सध्याच्या काळात वेबसाईट बनवण्यासाठी जास्त काही टेक्निकल ज्ञानाची गरज नाहीये, जर तुम्हाला कम्प्युटर चालवता येते, इंटरनेटचा वापर जमतो तर तुम्ही खूप चांगली वेबसाईट बनवू शकता. आम्ही तुम्हाला सर्व काही माहीत देण्याचा प्रयत्न करतोय.
आपली वेबसाईट चांगली चालावी यासाठी तुम्हाला खालील 3 गोष्टींची गरज असते-
- डोमेन निवडणे आणि त्याच आपल्या वेबसाईट साठी रजिस्ट्रेशन करणे
- वेबसाईट होस्टिंग करणे जेणेकरून इंटरनेटवर तुमची वेबसाईट काम करू शकेल
- वेबसाईटवर थीम इंस्टॉल करणे
या गोष्टी तुम्हाला आत्ता समजणार नाहीत, आम्ही हे सर्व स्टेप बाय स्टेप सविस्तर समजून सांगतोय.
स्टेप 1: डोमेन ची निवड (Select Your Domain)
इंटरनेट वर प्रत्येक वेबसाईटला एका डोमेन नेमची गरज असते. हा एक पत्ता म्हणजेच अड्रेस असतो, ज्यामुळे लोक तुमच्या डोमेन नेम ला टाईप करून तुमच्या ब्लॉग पर्यंत पोहोचू शकतील. ज्या प्रकारचा ब्लॉग तुम्ही लिहू इच्छिता त्याच प्रकारचा डोमेन तुम्हाला निवडायचा आहे. तुम्हाला वाटले तर तुमच्या स्वतःच्या नावाचे डोमेन देखील तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला .com किंवा .in किंवा .net यांची निवड करण्याची देखील मुभा आहे. डोमेन नेम उपलब्ध आहे की नाही हे देखील आपल्याला बघणे गरजेचे आहे. सध्या बरेचसे कमी किंमतीत तर कधी कधी फ्री देखील डोमेन उपलब्ध आहेत.
- डोमेन नेम असे निवडा जे लक्षात ठेवायला सोप्पे असेल आणि आकर्षक देखील असेल.
- असे डोमेन नेम निवडा जे तुमच्या वेबसाईटला चांगल्या प्रकारे प्रदर्शित करेल. डोमेन हे आकर्षक, विस्तृत आणि रचनात्मक असले पाहिजे.
जर तुम्ही डोमेन नेम खरेदी करण्याआधी फक्त निवड केली असेल तर आता तुम्हाला फक्त डोमेन खरेदी करण्याची गरज नाहीये. आमच्याकडे दुसरी स्टेप जी आहे त्यात तुम्हाला जेव्हा होस्टिंग खरेदी करता तेव्हा डोमेन नेम फ्री (Free) मिळते. त्यासाठी आता तुम्ही स्टेप 2 देखील वाचा.
स्टेप 2: वेब होस्ट सेटअप (Web Hosting Setup)
डोमेन नेमची निवड केल्यानंतर तुम्हाला एक अकाउंट बनवावे लागेल. हे अकाउंट आपल्याला वेब होस्टिंग कंपनीच्या वेबसाईटवर बनवायचे आहे, जे होस्टिंग आपल्या वेबसाईटला 24/7 लोकांच्या समोर इंटरनेटवर सादर करत राहील. खूप साऱ्या वेब होस्टिंग कंपनी आहेत ज्या नवीन ब्लॉगर्स साठी एक छोटं अकाउंट बनवून देतात. यांचा महिन्याचा चार्ज देखील खूप कमी असतो. वेब होस्टिंग कंपनीची निवड करत असताना पहिले त्या कंपनीचा जुना रिपोर्ट कसा आहे, सर्व्हर स्पीड कसा आहे या सर्व गोष्टी जाणून घेणे खूप गरजेचे असते.
काही होस्टिंग कंपनी आणि त्यांच्या लिंक्स खाली देतो आहे.
- Hostinger
- Bluehost
- Dreamhost
- Siteground
- Cloudways
सर्व होस्टिंग कंपनी च्या प्रोसेस या जवळपास सारख्याच असतात. तुम्हाला होस्टिंग अकाउंट साठी रजिस्टर करावे लागेल. तुम्ही डोमेन नेम आणि होस्टिंग एकाच जागेवरून घेऊ शकता. तुम्हाला रजिस्टर करण्यासाठी लिंक्स वर क्लिक करायचे आहे.
तुम्हाला इथे ई-मेल आय डी आणि एक कठीण पासवर्ड टाकून रजिस्टर करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला डोमेन नेम निवडायचे आहे. स्टेप 1 मध्ये सांगितलेल्या माहिती प्रमाणे तुम्हाला डोमेन नेम घ्यायचे आहे. तुम्हाला ते डोमेन उपलब्ध आहे की नाही यानुसार खाली त्या डोमेन ची किंमत कळेल. डोमेन निवडी नंतर तुम्हाला पुढे जायचे आहे.
पुढे तुम्हाला एक होस्टिंग प्लॅन ची निवड करून तो buy करून त्याचे payment करायचे आहे.
मार्केट मध्ये खूप सारे वेब होस्टिंग कंपनी आहेत परंतु यातील योग्य आणि चांगली कोणती हे बघण्यासाठी इथे क्लिक करा.
स्टेप 3: ब्लॉग स्क्रिप्ट बनवणे (Creating Blog Script)
ब्लॉग तयार करण्यासाठी खूप सारे प्रकार आहेत. स्क्रिप्ट साठी तुम्ही एखादे सॉफ्टवेअर देखील खरेदी करू शकता किंवा फ्री स्क्रिप्ट देखील बघू शकता. वर्डप्रेस ही एक फ्री ब्लॉगिंग स्क्रिप्ट आहे, सध्याच्या वेळेला खूप साऱ्या वेबसाईट याच प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत. ही सर्वात सोप्पी आणि प्रसिद्ध पद्धत आहे. यात तुम्ही तुमचा ब्लॉग कस्टमाईज करू शकता. होस्टिंगवर वर्डप्रेस कसे इन्स्टॉल करायचे हे इथे बघा.
वर्डप्रेस मध्ये 1000 हुन अधिक डिझाईन थीम अगोदर पासून उपलब्ध आहेत. यांच्या मदतीने तुम्ही तुमचा ब्लॉग हा आकर्षक आणि वेगळा बनवू शकता. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही वेब डेव्हलपर कडे जाऊन ब्लॉग बनवण्याची गरज नाहीये. वेब डेव्हलपर इथे पैसे घेतात तर तुम्ही वर्डप्रेस च्या मदतीने फ्री थीम वापरून मोफत करू शकता. वर्डप्रेसला आपल्या वेबसाईट साठी डाउनलोड करून त्याचा वापर करा.
जर तुम्हाला त्या 1000 पैकी थीम आवडली नाही तर तुम्ही बाहेरून देखील थीम घेऊ शकता. बाहेर तुम्हाला पैसे देऊन किंवा cracked थीम मिळू शकतील. इथे खूप साऱ्या सरळ आणि चांगल्या थीम मिळू शकतात. आम्ही सांगू की फ्री चे सामना हे फ्रीचे असते त्यामुळे चांगली थीम पैसे देऊनच मिळू शकेल. तुम्हाला ज्या थीम हव्या आहेत त्या तुम्हाला गुगल करून देखील मिळू शकतील.
जर तुम्हाला सुरुवातीचे काही सेटअप करत असताना काही अडचण आली तर आमच्या contact us पेजवर जाऊन तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. किंवा खाली कमेंट मध्ये देखील तुम्ही प्रॉब्लेम सांगू शकता. आम्ही तूम्हाला मदत करण्याचा नक्की प्रयत्न करू.
ब्लॉग मॅनेज करणे / सांभाळणे
ब्लॉग मॅनेज करण्यासाठी तुम्हाला बॅक एंड ला जाऊन लॉगीन(log in) करावे लागेल. तुम्हाला डोमेन समोर wp-admin किंवा login लिहून त्या पेजवर जाता येईल. इथून लॉग इन करून तुम्ही dashboard वर पोहोचाल. Dashboard वर सर्व पेज, पोस्ट, टॅगस, कमेंट आणि कॅटेगरी असतील, ज्यांना तुम्ही बदलू देखील शकता. जितके जास्त तुम्ही हे बघनार,त्यावर काम कराल तितके जास्त तुम्हाला हे समजेल.
पोस्ट-
पोस्ट बनवल्यानंतर वर्डप्रेस मध्ये पेज सिलेकट करा जिथे ती पोस्ट दिसेल. इथे पब्लिश होणारी तारीख, लिहिणाऱ्याचे नाव, कमेंट बॉक्स (जिथे व्हिजिटर जाऊन कमेंट करू शकेल) या गोष्टी असतात.
मीडिया-
मीडिया मेन्यू मध्ये आपले फोटो, व्हिडीओ असतील जे तुम्ही तुमच्या ब्लॉग मध्ये वापरू शकतात.
लिंक-
लिंक सेक्शन मध्ये तुम्ही वेगवेगळ्या लिंक्स बनवू शकता.
पेज-
याचा वापर करून तुम्ही तुमच्या ब्लॉगवर नवीन पेजेस जोडू शकतात. इथे पेज सेटिंग साठी खूप सारे ऑप्शन उपलब्ध आहेत.
डिझाईन-
यात तुम्ही तुमच्या ब्लॉगला कस्टमाईज करू शकता. ब्लॉग कसा दिसेल, त्याची थीम,मेन्यू,साईडबार सर्व काही तुम्ही निवडू शकता. इथे पेजला आकर्षक बनवण्यासाठी खूप पर्याय आहेत, ज्यांचा वापर तुम्ही तुमच्या मर्जीनुसार करू शकतात.
प्लगीन-
प्लगीन हे खूप महत्वाचे टूल आहे. जर त्याचा योग्य वापर केला तर तुम्ही खूप चांगली वेबसाईट बनवू शकता. याने ब्लॉग चा परफॉर्मन्स सुधारतो आणि सर्च इंजिन मध्ये तुमची वेबसाईट वर येऊ शकते.
सेटिंग-
सेटिंग मेन्यू मध्ये जाऊन आपण ब्लॉग नेम, मिडीया सेटिंग, दिनांक, फ्रंट पेज कसे दिसेल या सर्व गोष्टी बघू आणि बदलू शकता.
फ्री ब्लॉगरला येणाऱ्या अडचणी
ब्लॉगर बनण्यासाठी तुम्ही फ्री डोमेन निवडले आहे परंतु पुढे जाऊन तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
- फ्री, फ्री नाहीये- फ्री ब्लॉग साईट तुम्हाला फ्री स्पेस देते परंतु यातून ते चांगली कमाई देखील करतात. ते तुम्हाला मदत करायची आहे म्हणून फ्री डोमेन होस्टिंग देताय असे नाही, ते तुमच्या मेहनत घेऊन लिहिलेल्या लेखांवर ब्लॉग्स वर खालील पध्दतीने चांगल्या प्रकारे कमाई करतात-
- ऍड स्पेस विकून- फ्री ब्लॉग साईट तुमच्या ब्लॉग मध्ये जाहिराती टाकतात. आपल्या ब्लॉग मध्ये कोणतीही जाहिरात लावल्यानंतर तुम्ही त्याविषयी जास्त काही बोलू शकत नाही. त्यासोबत यातून होणाऱ्या कमाई साठी तुम्ही त्यांना पैसे मिळण्यासाठी क्लेम करू शकत नाही. आपण त्यावर हक्क दाखवू शकत नाही.
- अपग्रेड साठी पैसे- ब्लॉग लिहिल्यानंतर लॉगिन करून तुम्ही ते साइन इन करून फ्री मध्ये टाकू शकता. परंतू या फ्री थीम किंवा होस्टिंग तुम्हाला कधी जास्त फीचर्स साठी पैसे मागायला सुरुवात करतात.
- काही फायदा नाही- फ्री ब्लॉग साईटचा उद्देश हाच असतो की ते स्वतःच्या कंपनी साठी पैसे कमावतील आणि तुमच्यासाठी नाही. याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या वेबसाईटच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारे जाहिराती किंवा सर्विसेस विकू शकत नाहीत. पुढे जाऊन ऍड स्पेस मधून येणाऱ्या पैशासाठी कंपनी ऑफर देऊ शकते परंतु ती खूप पुढे जाणारी गोष्ट आहे.
- वेब अड्रेस खूप मोठा असतो त्यामुळे लक्षात ठेवणे कठीण होते.
- काही कंट्रोल नसतो- जेव्हा तुम्ही एखाद्या फ्री वेबसाईट मध्ये ब्लॉग सुरू करतात तेव्हा सुरुवातीला ब्लॉग स्पेस ही भाड्याने म्हणजेच रेंट ने घेत असता. याचाच अर्थ असा की वेबसाईटच्या मालकाकडे तुमच्या ब्लॉग चा संपूर्ण अधिकार आहे. त्यांना वाटले तर ते तुम्हाला ब्लॉग लिहायला बंदी घालू शकता. आपण या विषयावर काही करू शकत नाही किंवा त्यांना त्याविषयी काही बोलू शकत नाही. फ्री ब्लॉग साईट तुम्हाला सर्व गोष्टी म्हणजे फीचर्स देत नाही त्यामुळे तुम्ही एक चांगले ब्लॉगर बनू शकणार नाही.
- सुरक्षा नाही- इंटरनेटवर अनेक वेळा वेबसाईट हॅक होतात. हे नवीन आणि छोट्या ब्लॉग्स सोबत होऊ शकते. यात हॅकर तुमच्या डोमेन नेमला चोरून घेईल आणि ज्यामुळे तुमचे सर्व ब्लॉग जातील आणि हे डोमेन देखील तुम्हाला परत मिळणार नाही.
या सर्व त्रासापासून वाचायचे असेल तर चांगले हेच आहे की आपल्या ब्लॉग साठी थोडाफार खर्च अगोदरच केला पाहिजे. हे फ्री ब्लॉग पेक्षा स्वस्त आहेत कारण त्यासाठी पुढे जाऊन समस्या आणि जास्त पैसे घालावे लागत नाहीत.
ब्लॉगची सुरुवात लक्ष देऊन करा - जर तुम्ही वर्डप्रेस निवडत असाल तर ते कोणत्याही कम्प्युटर, लॅपटॉप, टॅबलेट आणि स्मार्टफोन वर चालू शकते.
ब्लॉग विषयी योग्य माहिती - ब्लॉग काय आहे? ब्लॉग म्हणजेच आपल्या ज्ञानाला शब्दांमध्ये प्रदर्शित करणे. सुरुवातीला त्याच विषयांना निवडा ज्याविषयी तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती असेल. यामुळे लिहिणे सोप्पे होईल व तुमच्या मनातील गोष्टी दुसऱ्यापर्यंत सहज पोहोचेल.
दुसऱ्यांकडून शिका- सुरुवातीला ब्लॉग लिहीत असताना किंवा त्याला पोस्ट करत असताना आपल्याला खूप समस्यांचा सामना हा करावा लागणार आहे. खूप साऱ्या चुका देखील होतील, या सर्वांपासून जर वाचायचे असेल तर जे आत्ता तुम्ही वाचताय तसे आर्टिकल नक्की वाचा. शिकण्यामध्ये काही वाईट नाहीये.
ब्लॉग सुरू केल्याने तुम्हाला हे फायदे होतील (Blogging Benefits in Marathi)
पैसा- ब्लॉगिंग जर योग्य प्रकारे केली तर तुम्हाला खूप जास्त प्रमाणात पैसा हा मिळू शकतो. जगातील टॉपचे ब्लॉगर्स हे खूप जास्त प्रमाणात सध्या पैसे कमवत आहेत. ब्लॉगिंग हे पार्ट टाईम काम आहे, याचा वापर करून सध्या भारतात देखील खूप लोक चांगले पैसे मिळवत आहेत.
नाव होईल- ब्लॉगिंग मध्ये नाव फेमस होते परंतु हे पहिल्याच ब्लॉगने होते असे नाही. कायम ब्लॉगिंग मध्ये सातत्य आणि त्यात वेळ दिल्याने तुम्ही इंटरनेट विश्वात प्रसिद्धी मिळवू शकता. खूप ब्लॉगर्स आपल्या या फिल्ड मध्ये खूप प्रसिद्ध झाले आहेत आणि त्यांना या क्षेत्रात एक्सपर्टी देखील मिळाली आहे.
मनोरंजक असते- पैसे आणि नाव याशिवाय ब्लॉगिंग तुम्हाला आनंद देखील देईल. याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मनातील गोष्टी या शब्दांच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचवू शकता. म्हणतात की शब्दांमध्ये खूप ताकद असते, आज जगात खूप सारे असे मुद्दे आहेत ज्यावर आवाज उठवण्याची गरज आहे. ब्लॉगिंग च्या माध्यमातून या मुद्द्यांवर आपण आपले विचार व्यक्त करू शकतात.
